GRSE Bharti 2026: गार्डन रीच शिपबिल्डर्स मध्ये भरती! 10वी + ITI पास पास मुले/मुली, लगेच इथून अर्ज करा

GRSE Bharti 2026 या भरतीमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, पगार, एकूण जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का आणि महत्त्वाच्या Hidden अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

Garden Reach Shipbuilders & Engineers Limited (GRSE) ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या (Ministry of Defence) अंतर्गत येणारी Navratna CPSE कंपनी आहे. कोलकाता येथे मुख्यालय असलेली ही कंपनी भारतीय नौदलासाठी आधुनिक युद्धनौका (Warships) बनवणाऱ्या देशातील प्रमुख Defence Shipyard पैकी एक आहे. GRSE ने Employment Notification No. 2026/05 (J&OP) अंतर्गत Journeyman च्या 55 जागा आणि Driver (Vehicle) च्या 03 जागा अशा एकूण 58 जागांसाठी भरती जाहीर केली आहे.

या भरतीची सर्वात मोठी खासियत म्हणजे Journeyman पदासाठी फक्त 10वी पास + ITI (NTC) किंवा NAC ही पात्रता लागते. 2 वर्षांच्या training दरम्यान दरमहा ₹24,000 ते ₹26,000 स्टायपेंड मिळणार आहे आणि training यशस्वी पूर्ण केल्यावर कायमस्वरूपी नोकरीत absorption होण्याची संधी आहे.

Carpenter, Electrician, Fitter, Welder, Painter, Diesel Mechanic, Electronic Mechanic, Pipe Fitter अशा ITI trades मधून पास झालेल्या उमेदवारांसाठी आणि किमान 6 वर्षांचा driving अनुभव असलेल्या ड्रायव्हर्ससाठी ही Defence PSU मध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे.

GRSE Bharti 2026: संपूर्ण माहिती (Overview)

घटकतपशील
भरती संस्थाGarden Reach Shipbuilders & Engineers Limited (GRSE)
जाहिरात क्रमांकEmployment Notification No. 2026/05 (J&OP)
पदाचे नावJourneyman (14 Trades) आणि Driver (Vehicle)
एकूण जागा58 (Journeyman – 55, Driver Vehicle – 03)
अर्ज पद्धतOnline
नोकरी ठिकाणकोलकाता (पश्चिम बंगाल) व GRSE चे इतर Units
निवड प्रक्रियालेखी परीक्षा + Practical (Trade) Test
पगारJourneyman: ₹24,000 – ₹26,000 स्टायपेंड, Driver: ₹20,110 – ₹70,390 Pay Scale
अर्ज सुरू30 ऑक्टोबर 2026
शेवटची तारीख28 नोव्हेंबर 2026
अधिकृत वेबसाइटwww.grse.in

GRSE Bharti 2026: एकूण जागा (Vacancy Details)

GRSE भरती 2026 मध्ये एकूण 58 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये Journeyman च्या 55 आणि Driver (Vehicle) च्या 03 जागा आहेत.

Journeyman – Trade नुसार जागा

क्र.TradeएकूणURSCSTOBCEWS
1Carpenter020101–––
2Crane Operator0201––01–
3Diesel Mechanic0201––01–
4Driver Material Handling020101–––
5Electrician080401010101
6Electronic Mechanic06 (02 Backlog सह)0102 (01 Backlog)–0102 (01 Backlog)
7Fitter0603010101–
8GRP/FRP Worker040101–0101
9Machine Operator03 (01 Backlog सह)0101––01 (Backlog)
10Painter060301–0101
11Pipe Fitter040101–0101
12Rigger040201–01–
13Structural Fitter0402–0101–
14Welder020101–––
एकूण552312031007

Driver (Vehicle) – जागा

पदाचे नावएकूण जागाप्रवर्गनिहाय
Driver (Vehicle) (Skilled, Grade-III)03UR – 02, OBC – 01

PwBD आरक्षण (Journeyman च्या 55 जागांमध्येच समाविष्ट)

PwBD प्रकारजागा
OH (Locomotor Disability, Cerebral Palsy, Leprosy Cured, Dwarfism, Acid Attack Victims, Muscular Dystrophy)01
HH/PD (Hard of Hearing – Partially Deaf)01
VH/LV (Visually Handicapped – Low Vision)02 (Backlog)

👉 Crane Operator, Rigger आणि Driver Material Handling या trades मध्ये PwBD आरक्षण लागू नाही.

👉 आरक्षण SC, ST, OBC, EWS आणि PwBD उमेदवारांसाठी लागू आहे. Ex-Servicemen (ESM) आणि Ex-Agniveers साठी सरकारी नियमानुसार Horizontal आरक्षण मिळेल.

⚠️ नोट: पदसंख्या कमी किंवा जास्त होऊ शकते.

GRSE Bharti 2026: शैक्षणिक पात्रता

👉 सर्व पात्रता 01 ऑक्टोबर 2026 रोजी पूर्ण असणे आवश्यक आहे.

Journeyman पदासाठी पात्रता

सर्व Journeyman trades साठी 10वी पास (Matriculation) सोबत संबंधित trade मध्ये NAC (National Apprenticeship Certificate) किंवा NTC (ITI पास) असणे आवश्यक आहे.

Tradeआवश्यक ITI / NAC Trade
CarpenterCarpenter / Wood Work Technician / Shipwright (Wood)
Crane OperatorElectrician (Desirable: सरकारमान्य Crane Operation Certificate)
Diesel MechanicDiesel Mechanic / Mechanic Diesel / Mechanic (Marine Diesel)
Driver Material HandlingDiesel Mechanic + Valid Heavy Vehicle Driving License (Desirable: सरकारमान्य Crane Operation Certificate)
ElectricianElectrician
Electronic MechanicElectronic Mechanic
FitterFitter / Weapon Fitter / MMTM (Mechanic Machine Tool Maintenance)
GRP/FRP WorkerFiber Reinforced Plastic Processor / Plastic Processing Operator किंवा 10वी + NSQF Plastic FRP Operator Course
Machine OperatorMillwright Mechanic / MMTM
PainterPainter (General) / Painter (Marine) / Industrial Painter
Pipe FitterPipe Fitter / Plumbing
RiggerRigger / Carpenter / Wood Work Technician
Structural FitterStructural Fitter / Fabricator / Sheet Metal Work / Fitter
WelderWelder / Welder (Gas & Electric) / TIG/MIG Welder / Welder (GMAW & GTAW) / Welder (Pipe) / Welder (Pipe & Pressure Vessels) / Welder (Structural) / Welder (Fabrication & Fitting) / Welder (Welding & Inspection) / Advance Welder

Driver (Vehicle) पदासाठी पात्रता

  • 10वी पास (Matriculation)
  • Valid Commercial LMV Driving License
  • Desirable: Valid Heavy Vehicle Driving License

आवश्यक अनुभव:

  • Light आणि Heavy Motor Vehicle चालवण्याचा किमान 06 वर्षांचा post-qualification अनुभव.
  • हा अनुभव organization / firm / rental agency मध्ये direct employment स्वरूपात असावा.
  • Armed Forces मधील पात्र उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
  • Desirable: सरकारी संस्था / PSU मधील Senior Officers साठी Staff Car Driver म्हणून अनुभव.

👉 अनुभवाची गणना 10वी पास झाल्याची तारीख किंवा Commercial LMV License मिळाल्याची तारीख यापैकी जी नंतरची असेल तिथून 01 ऑक्टोबर 2026 पर्यंत केली जाईल.

GRSE Bharti 2026: वयोमर्यादा (Age Limit)

Journeyman पदासाठी

कमाल वयोमर्यादा 26 वर्षे आहे.

प्रवर्गवयोमर्यादा सवलत
OBC (पद राखीव असल्यास)+3 वर्षे
SC/ST (पद राखीव असल्यास)+5 वर्षे
PwBD (UR)+10 वर्षे
PwBD + OBC-NCL+13 वर्षे
PwBD + SC / PwBD + ST+15 वर्षे
Ex-Servicemen (किमान 6 महिने सलग सेवा)सेवेचा कालावधी + 3 वर्षे
Ex-Agniveer+3 वर्षे (Agnipath च्या पहिल्या Batch साठी एकूण +5 वर्षे)
GRSE मध्ये Apprenticeship पूर्ण केलेले Ex-Trade Apprentices+3 वर्षे

Driver (Vehicle) पदासाठी

कमाल वयोमर्यादा 32 वर्षे आहे.

प्रवर्गवयोमर्यादा सवलत
OBC+3 वर्षे
PwBD (UR)+10 वर्षे
PwBD + OBC-NCL+13 वर्षे
Ex-Servicemen (किमान 6 महिने सलग सेवा)सेवेचा कालावधी + 3 वर्षे
Ex-Agniveer+3 वर्षे (Agnipath च्या पहिल्या Batch साठी एकूण +5 वर्षे)

👉 सर्व सवलती मिळून कमाल वय 56 वर्षांपेक्षा जास्त असू शकत नाही.

⚠️ वयाची गणना 01 ऑक्टोबर 2026 नुसार केली जाईल.

GRSE Bharti 2026: पगार (Salary)

Journeyman – स्टायपेंड (2 वर्षे Training)

कालावधीदरमहा स्टायपेंड
पहिले वर्ष₹24,000
दुसरे वर्ष₹26,000

Training यशस्वी पूर्ण केल्यानंतर Semi-skilled (SSK) Grade मध्ये ₹19,900-3%-69,650 (किंवा सुधारित) या Pay Scale वर कायमस्वरूपी absorption होऊ शकते.

Driver (Vehicle) – पगार

Skilled (SK) Grade: ₹20,110-3%-70,390 (किंवा सुधारित) Pay Scale.

अतिरिक्त फायदे

Journeyman Training काळात:

  • PF कपात आणि कंपनीकडून तितकेच Matching Contribution
  • ESI (लागू असल्यास)
  • Yard Dispensary मध्ये First Aid आणि स्वतःसाठी Hospitalization सुविधा
  • Subsidized Canteen सुविधा

Absorption नंतर / Driver पदासाठी:

  • Basic Pay + Industrial DA
  • HRA आणि इतर Allowances
  • CPF आणि Gratuity
  • Medical आणि Canteen सुविधा

👉 ही Defence PSU क्षेत्रातील सुरक्षित आणि चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मानली जाते.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

✅ हो, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो.

ही All India Recruitment आहे त्यामुळे महाराष्ट्रासह भारतातील कोणत्याही राज्यातील भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

⚠️ मात्र लेखी परीक्षा फक्त कोलकाता आणि रांची येथेच होणार आहे. महाराष्ट्रात परीक्षा केंद्र नाही. तसेच निवड झाल्यास नोकरी कोलकाता किंवा GRSE च्या इतर Units मध्ये करावी लागेल, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी याचा नक्की विचार करा.

मुलगा आणि मुलगी दोघे अर्ज करू शकतात का?

✅ हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.

या भरतीमध्ये कोणताही Gender Restriction नाही. उलट GRSE ने जाहिरातीत स्पष्टपणे सांगितले आहे की महिला उमेदवारांनी अर्ज करावा यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाते.

GRSE Bharti 2026: निवड प्रक्रिया (Selection Process)

Journeyman पदासाठी

1️⃣ Shortlisting (अर्ज जास्त आल्यास)

अर्ज जास्त आल्यास पात्रता परीक्षेतील गुणांच्या टक्केवारीवर shortlisting केले जाऊ शकते.

  • फक्त NAC असलेल्यांसाठी “AITT under ATS” परीक्षेचे गुण धरले जातील.
  • फक्त NTC असलेल्यांसाठी किंवा NAC + NTC दोन्ही असलेल्यांसाठी “AITT under CTS” परीक्षेचे गुण धरले जातील.

2️⃣ लेखी परीक्षा (Written Test)

भागविषयगुण
Part-ITrade संबंधित प्रश्न (Syllabus GRSE website वर)80
Part-IIGeneral Knowledge, General Aptitude, Reasoning, Mental Ability, Numerical Ability20
एकूण100 प्रश्न (MCQ)100
  • परीक्षेचा कालावधी: 2 तास
  • परीक्षा पद्धत: Pen & Paper (OMR Sheet)
  • परीक्षा केंद्र: कोलकाता आणि रांची
  • प्रश्नपत्रिका: इंग्रजी आणि हिंदी (द्विभाषिक)
  • Qualifying गुण: General – 50%, SC/ST/OBC – 45%, PwBD – 40%

3️⃣ Document Verification

Practical Test च्या आधी कागदपत्र पडताळणी होईल. यात पात्र ठरलेल्यांनाच Practical Test देता येईल.

4️⃣ Practical (Trade) Test

  • लेखी परीक्षेच्या merit नुसार 1:5 प्रमाणात उमेदवार बोलावले जातील (1 जागेसाठी जास्तीत जास्त 5 उमेदवार).
  • एकूण गुण 50, Qualifying गुण: General – 50%, SC/ST/OBC – 45%, PwBD – 40%.
  • ही Test फक्त Qualifying स्वरूपाची आहे.

5️⃣ PET (Physical Efficiency Test)

फक्त Driver Material Handling, Rigger आणि Crane Operator या trades साठी PET होईल. ही Test Qualifying स्वरूपाची असेल आणि त्याचे Standards GRSE website वर दिले जातील. Ex-Agniveer उमेदवारांना PET नाही.

👉 Final Merit List फक्त लेखी परीक्षेच्या गुणांवर तयार होईल.

Driver (Vehicle) पदासाठी

1️⃣ Screening / Shortlisting

अनुभवाचे स्वरूप आणि वर्षे (Essential आणि Desirable) यावरून लेखी परीक्षेसाठी उमेदवार shortlist केले जातील.

2️⃣ लेखी परीक्षा

पॅटर्न वरीलप्रमाणेच आहे (80 + 20 = 100 गुण, 100 MCQ, 2 तास, कोलकाता / रांची).

  • Qualifying गुण: General – 40%, OBC – 35%, PwBD – 30%

3️⃣ Document Verification + Practical (Trade) Test

1:5 प्रमाणात उमेदवार बोलावले जातील. Practical 50 गुणांची असून Qualifying गुण 50% (SC/ST/OBC – 45%, PwBD – 40%) आहेत.

❌ जाहिरातीनुसार कोणत्याही पदासाठी Interview नाही.

GRSE Bharti 2026: अर्ज फी

प्रवर्गफी
General / OBC / EWS₹472
SC / ST / PwBD / Internal Candidatesफी नाही

👉 फी Online पद्धतीने (Payment Gateway) भरावी लागेल.

👉 फी Non-refundable आहे, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी पात्रता नीट तपासा.

GRSE Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे

✔️ फोटो आणि स्वाक्षरी (Online Form मध्ये मागितल्यानुसार) ✔️ 10वी प्रमाणपत्र / मार्कशीट ✔️ ITI (NTC) किंवा NAC प्रमाणपत्र (Journeyman साठी) ✔️ जन्मतारखेचा पुरावा ✔️ Commercial LMV Driving License (Driver Vehicle साठी) ✔️ Heavy Vehicle Driving License (Driver Material Handling साठी) ✔️ अनुभव प्रमाणपत्र – Joining आणि Relieving तारखेसह (Driver Vehicle साठी) ✔️ जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) ✔️ OBC Non-Creamy Layer प्रमाणपत्र – 2026-27 या वर्षाचे (लागू असल्यास) ✔️ EWS Income & Asset Certificate – 2026-27 चे (लागू असल्यास) ✔️ PwBD Certificate – किमान 40% अपंगत्व (लागू असल्यास) ✔️ Ex-Servicemen / Ex-Agniveer संबंधित कागदपत्रे (लागू असल्यास) ✔️ NOC (सरकारी / PSU मध्ये नोकरी करत असल्यास)

GRSE Bharti 2026: महत्त्वाच्या Hidden अटी ⭐

❗ जास्त शिक्षण असल्यास अर्ज करता येणार नाही

Engineering / Technology / Pharmacy मधील Graduate किंवा Post Graduate, MBA, CA, CMA, CS, LLB, MCA, PhD किंवा समकक्ष उच्च व्यावसायिक पदवी असलेले उमेदवार अपात्र आहेत. अशी पदवी लपवली आणि नंतर समजले तर निवड रद्द होईल.

❗ परीक्षा फक्त कोलकाता आणि रांची येथे

लेखी परीक्षेचे केंद्र फक्त कोलकाता आणि रांची आहे. Form submit केल्यानंतर केंद्र बदलण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही. लेखी परीक्षेसाठी प्रवास भत्ता (TA) मिळणार नाही.

❗ Journeyman ही कायमस्वरूपी नोकरी लगेच नाही

सुरुवातीला 2 वर्षे स्टायपेंडवर Training असेल. Training दरम्यान काम असमाधानकारक असेल किंवा गैरहजेरी असेल तर Training वाढवली जाईल आणि त्यानंतरही सुधारणा नसेल तर Discharge केले जाईल. Absorption हे performance, रिक्त जागा, Medical Fitness आणि Disciplinary / Vigilance Clearance यावर अवलंबून आहे.

❗ 1 वर्षाचा Probation

Journeyman Absorption नंतर आणि Driver पदावर निवड झाल्यानंतर 1 वर्ष Probation असेल. काम समाधानकारक नसल्यास Probation वाढवला जाऊ शकतो किंवा नोकरीतून काढले जाऊ शकते.

❗ Driver पदासाठी स्वच्छ Driving Record आवश्यक

गेल्या 6 वर्षांत अपघात, अपघाताची Police Complaint, मोठे Traffic Violations, Reckless Driving किंवा दारू पिऊन गाडी चालवणे असा कोणताही रेकॉर्ड नसावा.

❗ Contractor मार्फत काम केलेल्या ड्रायव्हर्ससाठी अट

Contractor / Firm / Agency कडून Staff Car Driver चे अनुभव प्रमाणपत्र दिल्यास, ज्या PSU किंवा सरकारी विभागात काम केले त्यांचे Endorsement आवश्यक आहे.

❗ OBC आणि EWS प्रमाणपत्र चालू वर्षाचेच हवे

OBC (Non-Creamy Layer) प्रमाणपत्र आणि EWS Income & Asset Certificate हे 2026-27 या वर्षाचेच असावे. जुने प्रमाणपत्र स्वीकारले जाणार नाही.

❗ प्रवर्गासाठी जागा नसल्यास सवलत नाही

ज्या Trade मध्ये तुमच्या प्रवर्गासाठी (SC/ST/OBC/EWS) जागा राखीव नाही, तिथे तुम्ही General उमेदवार म्हणून गणले जाल आणि वयाची किंवा इतर कोणतीही सवलत मिळणार नाही. मात्र फी सवलतीसाठी खरा प्रवर्ग Form मध्ये नक्की लिहा.

❗ Form मधील प्रवर्ग नंतर बदलता येणार नाही

Online Form मध्ये एकदा भरलेला प्रवर्ग (SC/ST/OBC-NCL/EWS/PwBD) नंतर बदलता येणार नाही.

❗ एका पदासाठी एकच अर्ज

एकाच पदासाठी / Trade साठी एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास उमेदवारी रद्द होईल. पात्र असल्यास वेगवेगळ्या पदांसाठी वेगळे अर्ज करता येतात, पण वेगवेगळ्या पदांच्या परीक्षा एकाच दिवशी येऊ शकतात.

❗ Posting कुठेही होऊ शकते

निवड झाल्यास GRSE च्या कोणत्याही Unit / Project / Location वर Posting होऊ शकते, ज्यात Raichak आणि Timber Pond सारख्या नवीन ठिकाणांचा समावेश आहे.

❗ Medical आणि Police Verification आवश्यक

अंतिम निवड कंपनीच्या Medical Officer कडून Medical Fitness मिळाल्यावरच होईल. Police Clearance Certificate (PCC) मिळाल्याशिवाय Joining दिले जाणार नाही.

❗ सरकारी नोकरीत असल्यास NOC

सरकारी / PSU / स्वायत्त संस्थेत नोकरी करत असाल तर Proper Channel मार्फत अर्ज करावा लागेल किंवा NOC / Release Certificate द्यावे लागेल.

❗ सर्व पत्रव्यवहार फक्त Email ने

Admit Card, Call Letter आणि इतर माहिती फक्त Email आणि GRSE website वरूनच दिली जाईल. त्यामुळे चालू Email ID द्या आणि तो किमान 1 वर्ष चालू ठेवा. Spam Folder देखील तपासत राहा.

GRSE Bharti 2026: अर्ज कसा करायचा?

Step 1

GRSE ची अधिकृत वेबसाइट www.grse.in च्या Career Section ला किंवा थेट https://jobapply.in/grse2026 ला भेट द्या.

Step 2

“Guidelines to Apply Online” आणि जाहिरात नीट वाचा.

Step 3

चालू Email ID आणि Mobile Number वापरून Online Registration करा.

Step 4

Application Form भरा:

  • Personal Details
  • Educational Details (10वी, ITI / NAC)
  • Category Information
  • अनुभव (Driver Vehicle पदासाठी)

Step 5

सर्व आवश्यक Documents Upload करा.

Step 6

लागू असल्यास ₹472 Application Fee Online भरा.

Step 7

Final Submit करून Application Form ची Print घ्या.

👉 28 नोव्हेंबर 2026 पर्यंत Payment केले आणि पैसे खात्यातून कापले गेले पण Registration पूर्ण झाले नाही, तर अशा केसेस 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत तपासून Update केल्या जातील.

GRSE Bharti 2026: Job Benefits

मुख्य फायदे

  • Ministry of Defence अंतर्गत Navratna PSU मध्ये नोकरी
  • फक्त 10वी + ITI पात्रतेवर ₹24,000 – ₹26,000 स्टायपेंड
  • Training नंतर कायमस्वरूपी नोकरीची संधी (Absorption)
  • Industrial DA, HRA, CPF, Gratuity असे फायदे
  • अनेक Trades मध्ये Training मिळाल्यामुळे Multi-skilled होण्याची संधी
  • युद्धनौका बनवणाऱ्या Defence Shipyard मध्ये काम करण्याचा अनुभव
  • Job Security
  • Career Growth

GRSE Bharti 2026: कोणासाठी सर्वोत्तम संधी आहे?

  • 10वी पास आणि ITI (NTC) किंवा NAC असलेले उमेदवार
  • Electrician, Fitter, Welder, Carpenter, Painter, Diesel Mechanic, Electronic Mechanic, Pipe Fitter अशा Trades मधील उमेदवार
  • Apprenticeship पूर्ण केलेले उमेदवार
  • किमान 6 वर्षांचा अनुभव असलेले Commercial License धारक ड्रायव्हर्स
  • Ex-Servicemen आणि Ex-Agniveers
  • Defence क्षेत्रात सरकारी नोकरी करू इच्छिणारे उमेदवार

GRSE Bharti 2026: महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
अर्ज सुरू30 ऑक्टोबर 2026 (दुपारी 2:00 वाजता)
शेवटची तारीख28 नोव्हेंबर 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत)
अपूर्ण Registration ची पडताळणी30 नोव्हेंबर 2026 पर्यंत
परीक्षा तारीखGRSE website वर जाहीर होईल
Admit Cardनंतर जाहीर होईल
Document Verification / Practical TestGRSE website वर जाहीर होईल

GRSE Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFइथे क्लिक करा
Online अर्जइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

GRSE Bharti 2026: FAQs

GRSE Bharti 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

एकूण 58 जागा आहेत. यात Journeyman च्या 55 आणि Driver (Vehicle) च्या 03 जागा आहेत.

Journeyman पदासाठी पात्रता काय आहे?

10वी पास आणि संबंधित Trade मध्ये NAC किंवा NTC (ITI) असणे आवश्यक आहे. पात्रता 01 ऑक्टोबर 2026 रोजी पूर्ण असावी.

Driver (Vehicle) पदासाठी पात्रता काय आहे?

10वी पास, Valid Commercial LMV Driving License आणि Light व Heavy Motor Vehicle चालवण्याचा किमान 6 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

वयोमर्यादा किती आहे?

Journeyman साठी कमाल 26 वर्षे आणि Driver (Vehicle) साठी कमाल 32 वर्षे (01.10.2026 रोजी). राखीव प्रवर्गांना नियमानुसार सवलत आहे.

पगार किती आहे?

Journeyman ला पहिल्या वर्षी ₹24,000 आणि दुसऱ्या वर्षी ₹26,000 दरमहा स्टायपेंड मिळेल. Driver (Vehicle) साठी ₹20,110-3%-70,390 Pay Scale आहे.

निवड प्रक्रिया काय आहे?

लेखी परीक्षा (100 गुण), Document Verification आणि Practical (Trade) Test. Crane Operator, Rigger आणि Driver Material Handling साठी PET देखील आहे. Final Merit फक्त लेखी परीक्षेच्या गुणांवर लागेल.

Interview आहे का?

नाही, जाहिरातीनुसार Interview नाही.

परीक्षा कुठे होणार आहे?

लेखी परीक्षा फक्त कोलकाता आणि रांची येथे होणार आहे.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

हो, ही All India भरती आहे. मात्र परीक्षा कोलकाता / रांची येथे आणि नोकरी कोलकाता किंवा GRSE च्या इतर Units मध्ये असेल.

महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?

हो, महिला उमेदवार अर्ज करू शकतात. GRSE ने महिलांना अर्ज करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.

अर्ज फी किती आहे?

General / OBC / EWS साठी ₹472. SC / ST / PwBD / Internal Candidates साठी फी नाही.

B.Tech / Engineering झालेले उमेदवार अर्ज करू शकतात का?

नाही. Engineering, MBA, CA, LLB, MCA, PhD अशा उच्च व्यावसायिक पदव्या असलेले उमेदवार अपात्र आहेत.

शेवटची तारीख कधी आहे?

Online अर्जाची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2026 (रात्री 11:59) आहे.

इतर भरती अपडेट्स

Leave a comment