महाराष्ट्र बोर्ड SSC 2027, 10वी मराठी (कुमारभारती)
112 दिवसांत मराठी पक्के करा
आज तुम्ही Phase 1 मध्ये आहात: धडे, कविता, स्थूलवाचन आणि भाषाभ्यास पक्के करा.
आजचा 1.5 तासांचा प्लॅन सुरू कराSSC Marathi Study Plan 2027 या पोस्टमध्ये आपण 10वी मराठी (कुमारभारती) विषयाचा 112 दिवसांचा संपूर्ण अभ्यास प्लॅन, प्रश्नपत्रिकेची गुणविभागणी, तीन टप्प्यांतील नियोजन, रोजचे वेळापत्रक, आठवड्याचा प्लॅन, उपयोजित लेखनाचे फॉरमॅट, बोर्ड पेपर लिहिताना लागणाऱ्या टिप्स आणि विद्यार्थी सहसा करत असलेल्या Hidden चुका काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.
महाराष्ट्र बोर्डाची 10वीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार आहे आणि 26 ऑक्टोबरपासून मोजले तर बरोबर 112 दिवस आपल्या हातात आहेत. मराठी ही आपली मातृभाषा असल्यामुळे अनेक विद्यार्थी “मराठी तर येतंच” असे समजून या विषयाकडे दुर्लक्ष करतात. पण बोर्डाच्या पेपरमध्ये उपयोजित लेखनाचे फॉरमॅट, रसग्रहणाची मांडणी, सारांशलेखनाची शब्दमर्यादा आणि शुद्धलेखन यांवर गुण कापले जातात. योग्य नियोजन केले तर मराठी हाच विषय तुमची टक्केवारी सर्वात जास्त वाढवू शकतो. विशेष म्हणजे या प्लॅनसाठी रोज फक्त 1.5 तास द्यायचे आहेत.
हा प्लॅन महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीच्या मराठी प्रथम भाषा (कुमारभारती) घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. मराठी माध्यम असो वा सेमी-इंग्रजी, ज्यांना मराठीत 90+ गुण हवे आहेत आणि ज्यांना फक्त पास होण्याची भीती वाटते, अशा दोघांसाठीही हा प्लॅन उपयुक्त आहे.
SSC Marathi Study Plan 2027: संपूर्ण माहिती (Overview)
| घटक | तपशील |
|---|---|
| बोर्ड | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ |
| इयत्ता | 10वी (SSC) |
| विषय | मराठी प्रथम भाषा (कुमारभारती) |
| प्लॅनचा कालावधी | 26 ऑक्टोबर 2026 ते 14 फेब्रुवारी 2027 |
| एकूण दिवस | 112 दिवस (16 आठवडे) |
| रोजचा अभ्यास | फक्त 1.5 तास (Test Day ला 3 तास) |
| टप्पे | 3 Phases |
| लेखी पेपर | 80 गुण, वेळ 3 तास |
| लेखी परीक्षा सुरू | 15 फेब्रुवारी 2027 (Tentative) |
| अधिकृत वेबसाइट | mahahsscboard.in |
SSC Board Exam 2027 कधी आहे?
महाराष्ट्र बोर्डाने 10वी परीक्षा 2027 चे संभाव्य (Tentative) वेळापत्रक जाहीर केले आहे.
| कार्यक्रम | तारीख |
|---|---|
| Practical, तोंडी (Oral) आणि अंतर्गत मूल्यमापन | 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2027 |
| लेखी परीक्षा | 15 फेब्रुवारी ते 11 मार्च 2027 |
| मराठी पेपरची तारीख | लवकरच जाहीर होईल |
⚠️ नोट: या तारखा Tentative आहेत. मराठी पेपरची नेमकी तारीख बोर्डाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर झाल्यावर mahahsscboard.in वर नक्की तपासा.
👉 मराठीची तोंडी परीक्षा लेखी परीक्षेच्या आधी शाळेतच होते. तिची नेमकी तारीख तुमच्या शाळेकडून घ्या आणि Phase 3 मध्ये तिची तयारी करायला विसरू नका.
10वी मराठी प्रश्नपत्रिका आराखडा आणि गुणविभागणी
प्लॅन सुरू करण्याआधी पेपरमध्ये कोणत्या विभागाला किती गुण आहेत हे समजून घ्या. ज्या विभागाला जास्त गुण, त्याला जास्त वेळ द्यायचा, हाच या प्लॅनचा पाया आहे.
| विभाग | काय येते | गुण |
|---|---|---|
| विभाग 1: गद्य | पठित गद्य (धड्यांवरील कृती) + अपठित उतारा | 18 |
| विभाग 2: पद्य | कवितांवरील कृती + दिलेल्या ओळींचे रसग्रहण | 16 |
| विभाग 3: स्थूलवाचन | स्थूलवाचनाच्या पाठांवर आधारित कृती (दिलेल्यापैकी कोणत्याही दोन) | 6 |
| विभाग 4: भाषाभ्यास | व्याकरण घटक + शब्दसंपत्ती आणि लेखननियम | 16 |
| विभाग 5: उपयोजित लेखन | पत्रलेखन किंवा सारांशलेखन (6), जाहिरात / बातमी / कथालेखन यांपैकी दोन (10), लेखनकौशल्य (8) | 24 |
| लेखी परीक्षा | वेळ 3 तास | 80 |
👉 लेखी 80 गुणांसोबत तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाचे 20 गुण असतात, म्हणजे एकूण 100 गुण. ही गुणविभागणी मागील बोर्ड पेपर्सनुसार आहे. बोर्डाने यंदा आराखड्यात बदल जाहीर केला तर तो अंतिम मानावा.
SSC Marathi Study Plan 2027: 3 टप्प्यांचा प्लॅन
112 दिवसांचे तीन टप्पे केले आहेत. तुम्ही आज ज्या टप्प्यात आहात तो आपोआप उघडलेला दिसेल. इतर टप्पे पाहण्यासाठी त्यावर क्लिक करा.
Phase 1: 26 ऑक्टोबर – 30 नोव्हेंबर (5 आठवडे)
ध्येय: धडे, कविता, स्थूलवाचन आणि भाषाभ्यास पक्के करणे. इथे घाई करू नका, कारण पुढचा सगळा अभ्यास याच पायावर उभा राहणार आहे.
गद्य (धडे)
प्रत्येक धड्याचा सारांश आणि मुख्य मुद्दे स्वतःच्या शब्दांत वहीत लिहा. लेखकाचे नाव, धड्याचा साहित्यप्रकार आणि लेखक परिचय पाठ करा. धड्याखालील सर्व कृती (आकृत्यांसह) सोडवा.
पद्य (कविता)
प्रत्येक कवितेचा central idea, कवीचे नाव आणि कवितेचा आशय 3-4 ओळींत लिहा. प्रत्येक कवितेतील महत्त्वाच्या ओळी निवडून त्यांचे रसग्रहण आशयसौंदर्य, काव्यसौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये या मुद्द्यांनुसार लिहिण्याचा सराव सुरू करा.
स्थूलवाचन
स्थूलवाचनाचे पाठ (बालसाहित्यिका : गिरिजा कीर, मनक्या पेरेन लागा, वीरांगना, व्युत्पत्ती कोश) वाचून प्रत्येकाचा 8-10 ओळींचा सारांश लिहा. हा विभाग 6 गुणांचा आहे आणि अनेक विद्यार्थी तो पूर्णपणे सोडून देतात. तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या अनुक्रमणिकेत स्थूलवाचनाचे पाठ एकदा तपासून घ्या.
स्वमत / अभिव्यक्ती प्रश्न
पाठ्यपुस्तकातील स्वमत आणि अभिव्यक्ती प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या शब्दांत आणि मुद्देसूद लिहिण्याची सवय लावा.
भाषाभ्यास
दर 2-3 दिवसांनी एक घटक घ्या: समास, अलंकार, शब्दसिद्धी, वाक्यप्रकार आणि वाक्यरूपांतर, वाक्प्रचार, विरामचिन्हे, पारिभाषिक शब्द, शुद्धलेखन आणि लेखननियम. रोज 30 मिनिटे आणि किमान 10 उदाहरणे सोडवा. पाठ्यपुस्तकाच्या भाषाभ्यास विभागातील घटक क्रमाने पूर्ण करा.
वहीत नोंद
वाक्प्रचार आणि म्हणींची अर्थासह स्वतंत्र यादी करा. रोज नवीन वाक्प्रचार त्यात लिहा आणि प्रत्येकाचे स्वतःचे एक वाक्य तयार करा.
Phase 2: 1 डिसेंबर – 10 जानेवारी (6 आठवडे)
ध्येय: उपयोजित लेखन + अपठित उताऱ्याचा सराव. पहिल्या टप्प्यात जे शिकलात ते आता लिहून पक्के करायचे आहे.
पत्रलेखन
औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही प्रकारचे पत्र लिहा. पत्त्याची जागा, दिनांक, मायना, विषय, मजकूर आणि शेवट हा फॉरमॅट पाठ करा. आठवड्याला किमान 1 पत्र लिहा.
सारांशलेखन
पेपरमध्ये पत्रलेखनाला पर्याय म्हणून सारांशलेखन येते. गद्य विभागातील अपठित उताऱ्याचा एक-तृतीयांश (1/3) शब्दांत सारांश लिहायचा असतो. आठवड्याला 1 सारांश लिहा आणि शब्द मोजून पाहा.
जाहिरात, बातमी आणि कथालेखन
पेपरमध्ये या तिन्हींपैकी कोणत्याही दोन कृती सोडवायच्या असतात आणि शब्दमर्यादा साधारण 60 ते 90 शब्द असते. तिन्ही प्रकारांचा फॉरमॅट पक्का करा, म्हणजे पेपरमध्ये तुम्हाला सोपे वाटणारे दोन निवडता येतील.
लेखनकौशल्य (निबंध)
प्रसंगलेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन या तिन्ही प्रकारांचा सराव करा. प्रस्तावना, मुद्देसूद मांडणी, उदाहरणे आणि समारोप असा क्रम ठेवा. आठवड्याला 2 लेखन करा.
अपठित उतारा
आठवड्याला 2 उतारे सोडवा. आधी प्रश्न (कृती) वाचा आणि मग उतारा वाचा. उत्तर नेहमी उताऱ्यातूनच शोधा, स्वतःच्या मनाने लिहू नका.
भाषाभ्यास revision
सर्व व्याकरण घटकांची उदाहरणांसह उजळणी करा आणि ज्या घटकांत चुका होतात त्यांची वेगळी यादी करा.
Phase 3: 11 जानेवारी – 14 फेब्रुवारी (5 आठवडे)
ध्येय: Board Papers + तोंडी परीक्षा + Final Revision. हा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. इथे परीक्षेसारखी तयारी करायची आहे.
Board Papers सोडवा
गेल्या 5 वर्षांचे मराठीचे board papers घड्याळ लावून पूर्ण 3 तासांत सोडवा. दर 3 दिवसांनी 1 पेपर हा वेग ठेवा. पेपरच्या दिवशी नेहमीच्या 1.5 तासांऐवजी 3 तास राखून ठेवा. जुन्या प्रश्नपत्रिकांची लिंक खाली महत्त्वाच्या लिंक्स मध्ये दिली आहे.
Prelim च्या चुका
शाळेच्या Prelim परीक्षेत झालेल्या चुकांची वेगळी यादी करा. हीच यादी शेवटच्या revision मध्ये सर्वात जास्त कामाला येईल.
तोंडी परीक्षेची तयारी
28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन होणार आहे. शाळेकडून तुमची तारीख आणि स्वरूप विचारून घ्या आणि त्यानुसार मोठ्याने वाचन, कविता पाठांतर आणि दिलेल्या विषयावर बोलण्याचा सराव करा.
रोज एक लेखन प्रकार
रोज एक उपयोजित लेखन प्रकार (पत्र / सारांश / जाहिरात / बातमी / कथा / लेखनकौशल्य) लिहा आणि स्वतः तपासा.
चुकांची नोंद
प्रत्येक पेपर सोडवल्यावर शुद्धलेखन आणि भाषाभ्यासाच्या चुका वेगळ्या नोंदवा.
स्वतःच्या नोट्समधून Revision
Revision फक्त स्वतःच्या नोट्समधून करा: धड्यांचे सारांश, कवितांचे central idea, स्थूलवाचनाचे सारांश, वाक्प्रचार-म्हणी आणि उपयोजित लेखनाचे फॉरमॅट.
शेवटचा आठवडा
शेवटच्या आठवड्यात नवीन काहीही शिकू नका. फक्त फॉरमॅट्स आणि स्वतःच्या नोट्स वाचा.
SSC Marathi Study Plan 2027: रोजचे वेळापत्रक (1.5 तास)
रोजचे 1.5 तास तीन भागांत विभागले आहेत. प्रत्येक भागासाठी 30 मिनिटांचा टायमर सुरू करा आणि काम झाल्यावर टिक करा. कोणत्या भागात काय करायचे हे खालच्या आठवड्याच्या प्लॅनमधून घ्या. तुमची आजची प्रगती याच फोनवर सेव्ह राहील.
आजचा फोकस:
✅ आजचे 1.5 तास पूर्ण! उद्या पुन्हा याच वेळी भेटू.
👉 1.5 तास एकाच वेळी देणे शक्य नसेल तर सकाळी 30 मिनिटे आणि संध्याकाळी 1 तास असे विभागू शकता. रविवारी Test Day असल्यामुळे पूर्ण पेपरसाठी 3 तास द्या.
SSC Marathi Study Plan 2027: आठवड्याचा प्लॅन
आजचा दिवस खाली पिवळ्या रंगात दाखवला आहे. रोजच्या तीन भागांत त्या दिवसाचा फोकस घ्या. उदा. बुधवारी दुसऱ्या भागात कविता आणि रसग्रहण, तर तिसऱ्या भागात त्याच दिवसाचे लेखन.
- सोमवार – मंगळवारगद्य (धडे) + भाषाभ्यास
- बुधवारपद्य (कविता) + रसग्रहण आणि अलंकार
- गुरुवारपत्रलेखन किंवा सारांशलेखन
- शुक्रवारअपठित उतारा + स्थूलवाचन + वाक्प्रचार-म्हणी
- शनिवारजाहिरात / बातमी / कथालेखन + लेखनकौशल्य
- रविवारTest Day (3 तास): पूर्ण पेपर किंवा 1 विभाग सोडवा आणि चुका तपासा
उपयोजित लेखन आणि रसग्रहण: लक्षात ठेवायचे मुद्दे
उपयोजित लेखनाला 24 गुण आहेत आणि इथे फॉरमॅट पाळला तर गुण सहज मिळतात. प्रत्येक प्रकार लिहिताना खालचे मुद्दे तपासा.
पत्रलेखन
- प्रश्नातील निवेदन नीट वाचून औपचारिक की अनौपचारिक पत्र आहे ते आधी ठरवा.
- पत्त्याची जागा, दिनांक, मायना, विषय, मजकूर आणि शेवट हा क्रम चुकवू नका.
- प्रश्नात दिलेले नाव आणि पत्ता वापरा. स्वतःचे खरे नाव लिहू नका.
सारांशलेखन
- सारांश गद्य विभागातील अपठित उताऱ्याचाच लिहायचा असतो.
- मूळ उताऱ्याच्या साधारण एक-तृतीयांश शब्दांत, स्वतःच्या शब्दांत लिहा.
- उदाहरणे, संवाद आणि पुनरावृत्ती गाळा. फक्त मुख्य आशय ठेवा.
जाहिरात, बातमी आणि कथालेखन
- शब्दमर्यादा साधारण 60 ते 90 शब्द असते. ती पाळा.
- बातमीत मथळा, ठिकाण आणि दिनांक लिहा आणि भाषा माहितीपूर्ण ठेवा.
- कथेला योग्य शीर्षक द्या आणि शेवटी तात्पर्य किंवा बोध लिहा.
लेखनकौशल्य (प्रसंगलेखन / आत्मकथन / वैचारिक लेखन)
- दिलेल्या तीन प्रकारांपैकी कोणताही एक निवडायचा असतो. ज्याचे मुद्दे तुम्हाला जास्त सुचतात तो निवडा.
- प्रश्नात दिलेले सर्व मुद्दे लेखनात यायला हवेत.
- प्रस्तावना, मुद्देसूद मांडणी आणि समारोप असा परिच्छेदांचा क्रम ठेवा.
रसग्रहण
- फक्त कवितेचा अर्थ लिहू नका. आशयसौंदर्य, काव्यसौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये असे मुद्दे करून लिहा.
- कवितेतील अलंकार, प्रतिमा आणि शब्दरचना यांचा उल्लेख करा.
- दिलेल्या ओळी कोणत्या कवितेतील आहेत आणि कवी कोण आहे हे बरोबर लिहा.
बोर्ड पेपर लिहिताना महत्त्वाच्या टिप्स
- अक्षर स्वच्छ ठेवा. मात्रा, वेलांटी, उकार आणि अनुस्वार यांच्या चुका टाळा, कारण इथे गुण कापले जातात.
- आकलन कृती आणि व्याकरणातील आकृत्या पेननेच काढा.
- उपयोजित लेखनात प्रश्नातील सूचना किंवा निवेदन पुन्हा उतरवून लिहू नका. थेट उत्तराला सुरुवात करा.
- उपयोजित लेखनासाठी किमान एक तास राखून ठेवा, कारण 24 गुणांचा हा सर्वात मोठा विभाग आहे.
- स्वमत प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या शब्दांत आणि मुद्देसूद लिहा.
- प्रत्येक प्रश्नाचा आणि उपप्रश्नाचा क्रमांक अचूक लिहा.
- पेपर लिहून झाल्यावर शेवटची 5 मिनिटे शुद्धलेखन तपासा.
SSC Marathi 2027: विद्यार्थी करत असलेल्या Hidden चुका ⭐
स्थूलवाचन पूर्णपणे सोडून देणे
स्थूलवाचनाचे पाठ “वाचायचेच तर आहेत” असे समजून अनेक विद्यार्थी त्यांचा अभ्यास करत नाहीत. पण या विभागाला 6 गुण आहेत आणि हे गुण थोड्याशा वाचनाने सहज मिळतात.
सारांशलेखन कोणत्या उताऱ्याचा आहे हे न समजणे
सारांशलेखन गद्य विभागातील अपठित उताऱ्याचा लिहायचा असतो. हे माहीत नसल्याने काही विद्यार्थी गोंधळतात आणि वेळ वाया घालवतात. शब्दमर्यादा एक-तृतीयांश असते हेही लक्षात ठेवा.
रसग्रहणात फक्त अर्थ लिहिणे
रसग्रहण म्हणजे कवितेचा अर्थ नव्हे. आशयसौंदर्य, काव्यसौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये हे मुद्दे नसतील तर पूर्ण गुण मिळत नाहीत.
उपयोजित लेखनाचे फॉरमॅट फक्त वाचणे
फॉरमॅट वाचल्याने लक्षात राहत नाही. पत्र, बातमी किंवा जाहिरातीचा फॉरमॅट चुकला तर गुण कापले जाऊ शकतात. म्हणून प्रत्येक प्रकार किमान 3-4 वेळा लिहून पाहा.
शब्दमर्यादा दुर्लक्षित करणे
जाहिरात, बातमी आणि कथेसाठी शब्दमर्यादा दिलेली असते. जास्त लिहिले म्हणजे जास्त गुण, हा गैरसमज आहे. जास्त लिहिल्याने वेळ जातो आणि शुद्धलेखनाच्या चुका वाढतात.
तोंडी परीक्षेकडे दुर्लक्ष करणे
तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाचे 20 गुण असतात. ही परीक्षा लेखी परीक्षेच्या आधी होते, त्यामुळे शेवटच्या क्षणी तयारी करण्याची वेळ येते. तारीख आधीच शाळेकडून घ्या.
वेळ लावून पेपर न सोडवणे
घरी पेपर सोडवताना 3 तासांचे बंधन ठेवले नाही तर परीक्षा हॉलमध्ये उपयोजित लेखन अपूर्ण राहू शकते. Phase 3 मध्ये प्रत्येक पेपर घड्याळ लावूनच सोडवा.
शेवटच्या आठवड्यात नवीन गाईड उघडणे
शेवटच्या दिवसांत नवीन पुस्तक किंवा नवीन प्रश्न पाहिल्याने गोंधळ वाढतो. फक्त स्वतःच्या नोट्स वाचा.
हा प्लॅन कोणासाठी सर्वोत्तम आहे?
- SSC 2027 चे सर्व विद्यार्थी
- मराठी प्रथम भाषा (कुमारभारती) घेणारे विद्यार्थी
- मराठीत 90+ गुणांचे लक्ष्य असलेले विद्यार्थी
- सेमी-इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी
- मुलांचा अभ्यास नियोजित करू इच्छिणारे पालक
- शिक्षक आणि क्लास चालक
SSC Marathi Study Plan 2027: महत्त्वाच्या लिंक्स
SSC Marathi Study Plan 2027: FAQs
10वी बोर्ड परीक्षा 2027 कधी आहे?
महाराष्ट्र बोर्डाच्या Tentative वेळापत्रकानुसार 10वीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी ते 11 मार्च 2027 दरम्यान होणार आहे. Practical, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2027 दरम्यान होईल.
10वी मराठी पेपरची तारीख कधी आहे?
मराठी पेपरची नेमकी तारीख अजून जाहीर झालेली नाही. बोर्डाचे सविस्तर वेळापत्रक आल्यावर mahahsscboard.in वर तपासा.
10वी मराठी पेपर किती गुणांचा असतो?
लेखी पेपर 80 गुणांचा आणि 3 तासांचा असतो. तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाचे 20 गुण मिळून एकूण 100 गुण होतात.
10वी मराठीचा अभ्यास रोज किती तास करावा?
या प्लॅननुसार रोज 1.5 तास पुरेसे आहेत: 30 मिनिटे भाषाभ्यास, 30 मिनिटे धडा / कविता / स्थूलवाचन आणि 30 मिनिटे उपयोजित लेखन. रविवारी Test Day ला 3 तास द्या.
मराठीत Full Marks कुठे मिळू शकतात?
भाषाभ्यास आणि उपयोजित लेखन या दोन विभागांत नियम आणि फॉरमॅट पाळले तर पूर्ण गुण मिळण्याची शक्यता सर्वात जास्त असते. या दोघांना मिळून 40 गुण आहेत.
सारांशलेखन कसे लिहावे?
गद्य विभागातील अपठित उतारा वाचून त्याचा साधारण एक-तृतीयांश शब्दांत, स्वतःच्या शब्दांत सारांश लिहा. उदाहरणे आणि पुनरावृत्ती गाळून फक्त मुख्य आशय ठेवा.
रसग्रहण कसे लिहावे?
दिलेल्या ओळींचा आशय, त्यातील काव्यसौंदर्य (अलंकार, प्रतिमा) आणि भाषिक वैशिष्ट्ये असे मुद्दे करून लिहा. फक्त अर्थ लिहिल्यास पूर्ण गुण मिळत नाहीत.
स्थूलवाचनाचा अभ्यास कसा करावा?
स्थूलवाचनाचे सर्व पाठ एकदा नीट वाचा आणि प्रत्येकाचा 8-10 ओळींचा सारांश वहीत लिहा. पेपरमध्ये या विभागावर 6 गुणांच्या कृती येतात.
10वीच्या जुन्या प्रश्नपत्रिका (PYQ) कुठे मिळतील?
वरील महत्त्वाच्या लिंक्स विभागात PYQ ची लिंक दिली आहे. गेल्या 5 वर्षांचे मराठीचे पेपर घड्याळ लावून नक्की सोडवा.
शेवटच्या आठवड्यात काय करावे?
नवीन काही शिकू नका. फक्त उपयोजित लेखनाचे फॉरमॅट, धड्यांचे आणि स्थूलवाचनाचे सारांश, कवितांचे central idea, वाक्प्रचार-म्हणी आणि स्वतःच्या नोट्स वाचा.
अजून Free Updates, Scholarship आणि Career Guidance साठी naukrivalaa.com ला नियमित भेट द्या. Naukrivalaa Academy: Helping Maharashtra Students to Grow.
