North Western Railway Bharti 2026: उत्तर पश्चिम रेल्वेत भरती! 2008 जागा, 10वी+ITI पास मुले/मुली, लगेच इथून अर्ज करा

North Western Railway Bharti 2026 या भरतीमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, स्टायपेंड, एकूण जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का आणि महत्त्वाच्या Hidden अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

उत्तर पश्चिम रेल्वे (North Western Railway – NWR) हा भारतीय रेल्वेचा महत्त्वाचा झोन असून त्याचे मुख्यालय जयपूर येथे आहे. अजमेर, बिकानेर, जयपूर आणि जोधपूर हे चार डिव्हिजन आणि अनेक मोठी वर्कशॉप्स या झोनमध्ये येतात. Railway Recruitment Cell (RRC), जयपूर यांनी Apprentices Act 1961 अंतर्गत 2026-27 वर्षासाठी Act Apprentice भरतीची सुधारित (Revised) जाहिरात क्र. 04/2026 दिनांक 21.10.2026 रोजी प्रसिद्ध केली आहे. या भरतीत एकूण 2008 जागा असून कोणतीही लेखी परीक्षा नाही. 10वी आणि ITI च्या गुणांवर थेट मेरिट लिस्ट लागणार आहे.

ज्या उमेदवारांनी 10वी किमान 50% गुणांनी पास केली आहे आणि Fitter, Electrician, Welder, Diesel Mechanic, COPA, Carpenter, Painter, Electronics Mechanic यांसारख्या trade मध्ये ITI (NCVT/SCVT) पूर्ण केले आहे, त्यांच्यासाठी रेल्वेमध्ये प्रत्यक्ष काम शिकण्याची ही मोठी सुवर्णसंधी आहे.

👉 महत्त्वाचे: याआधी 01.10.2026 रोजी जाहीर झालेली अधिसूचना रद्द करण्यात आली आहे. मांगपत्रात (Demand) आंशिक बदल झाल्यामुळे आता 21.10.2026 ची सुधारित अधिसूचना क्र. 04/2026 हीच अधिकृत मानली जाईल.

North Western Railway Bharti 2026: संपूर्ण माहिती (Overview)

Table of Contents

घटकतपशील
भरती संस्थाNorth Western Railway (उत्तर पश्चिम रेल्वे), Railway Recruitment Cell, Jaipur
जाहिरात क्रमांकNotice No. 04/2026 (NWR/AA) – Revised Notification
पदाचे नावAct Apprentice (अप्रेंटिस)
भरती वर्ष2026-27
कायदाApprentices Act 1961
एकूण जागा2008 (जाहिरातीनुसार)
शैक्षणिक पात्रता10वी (किमान 50%) + संबंधित Trade मध्ये ITI (NCVT/SCVT)
वयोमर्यादा15 ते 24 वर्षे (22.11.2026 रोजी)
अर्ज पद्धतफक्त Online
ट्रेनिंग ठिकाणअजमेर, बिकानेर, जयपूर, जोधपूर (राजस्थान)
निवड प्रक्रिया10वी + ITI गुणांवर मेरिट लिस्ट (परीक्षा नाही)
स्टायपेंडRailway Board च्या नियमांनुसार
अर्ज फी₹100 (SC/ST/PwBD/महिला – फी नाही)
अर्ज सुरू23.10.2026
शेवटची तारीख22.11.2026 (रात्री 11:59 पर्यंत)
अधिकृत वेबसाइटwww.rrcjaipur.in

North Western Railway Bharti 2026: एकूण जागा (Vacancy Details)

जाहिरातीमध्ये एकूण 2008 training slots असल्याचे नमूद केले आहे. या जागा 8 Division/Unit मध्ये विभागल्या आहेत.

युनिटनुसार एकूण जागा

युनिटUROBCSCSTEWSएकूण
DRM Office, Ajmer206131733642488
DRM Office, Bikaner199131703844482
DRM Office, Jaipur230148813951549
DRM Office, Jodhpur181123643146445
B.T.C. Carriage, Ajmer42271679101
B.T.C. LOCO, Ajmer2918105769
Carriage Workshop, Bikaner14952333
Carriage Workshop, Jodhpur331895267

⚠️ नोट: जाहिरातीच्या मजकुरात एकूण जागा 2008 सांगितल्या आहेत. मात्र जाहिरातीतील युनिटनिहाय टेबल्सची बेरीज 2234 येते. जागा provisional असून प्रशासनाच्या गरजेनुसार कमी किंवा जास्त होऊ शकतात, असेही जाहिरातीत स्पष्ट लिहिले आहे. त्यामुळे अंतिम जागांसाठी www.rrcjaipur.in वरील अपडेट तपासत राहा.

PwBD आणि Ex-Servicemen साठी राखीव जागा

युनिटVIHILDMDEx-SM
DRM Ajmer2511012
DRM Bikaner00016
DRM Jaipur0814016
DRM Jodhpur02407
BTC Carriage Ajmer01213
BTC Loco Ajmer00303
CW Bikaner00101
CW Jodhpur00001

👉 PwBD आणि Ex-Servicemen च्या जागा वेगळ्या नाहीत. त्या वरील एकूण जागांमध्येच समाविष्ट आहेत.

👉 आरक्षण SC, ST, OBC, EWS आणि PwBD उमेदवारांसाठी लागू आहे.

North Western Railway Bharti 2026: Trade नुसार जागा (युनिटनिहाय)

खाली प्रत्येक युनिटमधील Trade नुसार जागा दिल्या आहेत. अर्ज करण्याआधी आपल्या ITI Trade साठी त्या युनिटमध्ये जागा आहे की नाही हे नक्की तपासा. (COPA = Computer Operator and Programming Assistant)

1️⃣ DRM Office, Ajmer – 488 जागा

TradeUROBCSCSTEWSएकूण
Electrician (Coaching)201384550
Electrician (Power)201384550
Electrician (TRD)201384550
Welder513419912125
Fitter (C&W)201384550
Carpenter (Mech.)8532220
Diesel Mechanic2718105767
S&T Department
Carpenter110002
Painter110002
Electronics Mechanic9532120
COPA110002
Engg. (TMC Department)
Electrician421108
Welder421007
Fitter421007
Carpenter100001
Diesel Mechanic521109
Turner/Machinist421007
Electronics Mechanic321006
Refrigeration and Air Conditioning110002
Painter100001
COPA110002
एकूण206131733642488

2️⃣ DRM Office, Bikaner – 482 जागा

TradeUROBCSCSTEWSएकूण
Fitter (Mechanical)5436201014134
Electrician (Power)8532220
Electrician (Coaching)8632221
Electrician (TRD)8532220
Welder (Gas & Electric)(Mech)110002
S&T Department
Carpenter110002
Painter110002
Electronics Mechanic8632221
COPA110002
Engg. (TMC Department)
Electrician110002
Welder110002
Fitter110002
Carpenter000000
Diesel Mechanic210003
Turner/Machinist110002
Electronics Mechanic110002
Refrigeration and Air Conditioning100001
Painter000000
COPA100001
Engg. Department
Carpenter/Works5321112
Plumber5321112
Mason5321112
Welder/Works10642224
Fitter/Works10642224
Painter/Works10642224
Welder/P.way201374549
Fitter/P.way201374549
Painter/P.way10642224
COPA5421113
एकूण199131703844482

3️⃣ DRM Office, Jaipur – 549 जागा

TradeUROBCSCSTEWSएकूण
Fitter (Mechanical)7550281419186
Welder (Gas and Electric)221016
Electrician (Elect./G)201374549
Electrician (Electrical/TRD)10632223
S&T Department
Carpenter110002
Painter110002
Electronics Mechanic191273445
COPA110002
Engg. (TMC Department)
Electrician211004
Welder211004
Fitter211004
Carpenter100001
Mechanic Diesel311005
Turner/Machinist211004
Electronics Mechanic210003
Mechanic Refrigeration and Air Conditioning100001
Painter100001
COPA110002
Engg. Department
Fitter412715810101
Welder (Gas and Electric)191273546
Painter321118
Plumber9632222
Carpenter6421114
Mason6421114
एकूण230148813951549

4️⃣ DRM Office, Jodhpur – 445 जागा

TradeUROBCSCSTEWSएकूण
COPA5421214
Steno/English110013
Steno/Hindi211015
Fitter3222126880
Mechanic Diesel (Mech/DSL)241695660
Chemical Laboratory Assistant110013
Draughtsman431019
Electrician161163440
Refrigeration & Air Conditioning8532220
Dental Laboratory Technician110002
Carpenter13853332
Painter5321112
Forger & Heat Treater181273545
Welder231594657
Pipe Fitter10642224
S&T Department
Carpenter110002
Painter110002
Electronics Mechanic6531217
COPA110002
Engg. (TMC Department)
Electrician110002
Welder110002
Fitter110002
Carpenter100001
Mechanic Diesel110013
Turner/Machinist110002
Electronic Mechanic110002
Refrigeration & Air Conditioning100001
COPA100001
एकूण181123643146445

5️⃣ B.T.C. Carriage, Ajmer – 101 जागा

TradeUROBCSCSTEWSएकूण
Painter211004
Fitter2617105664
Welder311005
Electric Department
Electrician11842328
एकूण42271679101

6️⃣ B.T.C. LOCO, Ajmer – 69 जागा

TradeUROBCSCSTEWSएकूण
Diesel Mechanic7421216
Fitter10632223
Welder12852330
एकूण2918105769

7️⃣ Carriage Workshop, Bikaner – 33 जागा

TradeUROBCSCSTEWSएकूण
Fitter7321114
Welder331018
Electrician4321111
एकूण14952333

8️⃣ Carriage Workshop, Jodhpur – 67 जागा

TradeUROBCSCSTEWSएकूण
Fitter13842128
Carpenter7421115
Welder (G & E)421108
Painter (General)421108
Mechanic Machine Tool Maintenance311005
Machinist210003
एकूण331895267

⚠️ नोट: पदसंख्या कमी किंवा जास्त होऊ शकते.

North Western Railway Bharti 2026: शैक्षणिक पात्रता

10वी पास (किमान 50% गुण)

उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी किंवा समकक्ष परीक्षा (10+2 पद्धतीत) किमान 50% गुणांसह (aggregate) उत्तीर्ण केलेली असावी.

ITI (NCVT/SCVT)

ज्या Trade साठी अर्ज करत आहात त्या notified trade मध्ये National Trade Certificate असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र NCVT (National Council for Vocational Training) किंवा SCVT (State Council for Vocational Training) यांनी दिलेले असावे.

👉 10वीचे टक्के सर्व विषयांच्या गुणांवरून मोजले जातील, फक्त ठराविक विषयांवरून नाही.

👉 अर्ज करण्याच्या तारखेला शैक्षणिक आणि तांत्रिक पात्रता पूर्ण असणे आवश्यक आहे.

❌ ज्यांचा 10वी किंवा ITI चा निकाल अजून लागलेला नाही त्यांनी अर्ज करू नये.

North Western Railway Bharti 2026: वयोमर्यादा (Age Limit)

उमेदवाराचे वय किमान 15 वर्षे पूर्ण असावे आणि 24 वर्षे पूर्ण झालेली नसावीत.

👉 सोप्या भाषेत: सर्वसाधारण (UR) उमेदवाराची जन्मतारीख 23.11.2002 ते 22.11.2011 या दरम्यान असावी.

प्रवर्गवयोमर्यादा सवलत
OBC+3 वर्ष
SC/ST+5 वर्ष
PwBD+10 वर्ष
Ex-Servicemenसंरक्षण दलातील सेवेचा कालावधी + 3 वर्षे, कमाल अतिरिक्त 10 वर्षांपर्यंत (किमान 6 महिने सलग सेवा आवश्यक)

⚠️ वयाची गणना 22.11.2026 नुसार केली जाईल.

👉 Ex-Servicemen दर्जाचा वापर करून आधीच civil सरकारी नोकरीत लागलेल्या माजी सैनिकांना ही सवलत मिळणार नाही.

North Western Railway Bharti 2026: स्टायपेंड (Stipend)

ही नोकरी नसून Apprenticeship Training आहे. त्यामुळे पगाराऐवजी दर महिन्याला स्टायपेंड (विद्यावेतन) मिळतो.

👉 जाहिरातीनुसार Training कालावधी आणि स्टायपेंड Railway Board ने वेळोवेळी जारी केलेल्या नियमांनुसार दिला जाईल. जाहिरातीत स्टायपेंडची रक्कम स्वतंत्रपणे नमूद केलेली नाही.

अतिरिक्त माहिती

  • ❌ Hostel किंवा राहण्याची सोय मिळणार नाही. Training दरम्यान राहण्याची व्यवस्था स्वतः करावी लागेल.
  • ❌ Document Verification साठी येण्याचा प्रवास भत्ता (TA/DA) मिळणार नाही.

👉 भारतीय रेल्वेच्या मोठ्या वर्कशॉप्स आणि डिव्हिजनमध्ये प्रत्यक्ष काम शिकण्याचा अनुभव ही या Apprenticeship ची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

✅ हो, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो.

जाहिरातीत कोणत्याही राज्याच्या रहिवासाची (Domicile) अट दिलेली नाही. त्यामुळे पात्र असलेले महाराष्ट्रातील उमेदवारही Online अर्ज करू शकतात.

⚠️ मात्र लक्षात ठेवा: Training ची सर्व ठिकाणे राजस्थानमध्ये (अजमेर, बिकानेर, जयपूर, जोधपूर) आहेत. Document Verification आणि Medical Examination देखील निवडलेल्या युनिटमध्येच होईल. Hostel मिळणार नाही, त्यामुळे राहण्याचा खर्च आणि व्यवस्था लक्षात घेऊनच अर्ज करा.

मुलगा आणि मुलगी दोघे अर्ज करू शकतात का?

✅ हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.

या भरतीमध्ये कोणताही Gender Restriction नाही. उलट महिला उमेदवारांना अर्ज फी भरावी लागत नाही.

North Western Railway Bharti 2026: निवड प्रक्रिया (Selection Process)

❌ कोणतीही लेखी परीक्षा नाही.

❌ Interview घेतला जाणार नाही.

1️⃣ मेरिट लिस्ट

10वीचे टक्के आणि ITI चे गुण यांची साधी सरासरी (Simple Average) काढून मेरिट लिस्ट तयार केली जाईल.

👉 उदाहरण: 10वी मध्ये 70% आणि ITI मध्ये 80% असतील तर मेरिट = (70 + 80) ÷ 2 = 75%

ITI चे गुण Provisional/Final Certificate वर दिलेल्या गुणांनुसार घेतले जातील.

2️⃣ Tie झाल्यास

  • दोन उमेदवारांचे गुण सारखे असल्यास वयाने मोठ्या उमेदवाराला प्राधान्य मिळेल.
  • जन्मतारीखही सारखी असल्यास ज्याने 10वी आधी पास केली त्याला प्राधान्य मिळेल.

3️⃣ युनिटनिहाय मेरिट

मेरिट लिस्ट Division/Unit-wise, Trade-wise आणि Community-wise तयार होईल. Centralized मेरिट लिस्ट बनणार नाही.

4️⃣ Document Verification

मेरिटमध्ये आलेल्या उमेदवारांची निवडलेल्या Division/Unit मध्ये मूळ कागदपत्रांची तपासणी होईल.

5️⃣ Medical Examination

सरकारी डॉक्टरने दिलेले Medical Fitness Certificate (Annexure-IV) सादर करावे लागेल.

North Western Railway Bharti 2026: अर्ज फी

प्रवर्गफी
General / OBC / EWS (पुरुष)₹100
SC / STफी नाही
PwBDफी नाही
सर्व प्रवर्गातील महिलाफी नाही

👉 फी Online पद्धतीने (Debit Card / Credit Card / Internet Banking) भरावी लागेल.

👉 फी Non-refundable आहे.

👉 Online Payment चे Transaction Charges उमेदवारालाच भरावे लागतील.

👉 पैसे कापले गेले पण Application Form डाउनलोड झाला नाही तर वेबसाइटवरील “Verify Payment” बटण वापरा.

North Western Railway Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे

✔️ रंगीत फोटो (3 महिन्यांपेक्षा जुना नसावा) आणि त्याच फोटोच्या 2 अतिरिक्त प्रती

✔️ स्वाक्षरी (Signature)

✔️ आधार कार्ड (मूळ प्रत)

✔️ 10वी प्रमाणपत्र आणि मार्कशीट

✔️ ITI (NCVT/SCVT) मार्कशीट / Provisional किंवा Final Certificate

✔️ SC/ST जात प्रमाणपत्र – Central Government format (Annexure-I) (लागू असल्यास)

✔️ OBC जात प्रमाणपत्र + 01.04.2026 किंवा त्यानंतर जारी झालेले Non-Creamy Layer Certificate – Central format (Annexure-II) + OBC Declaration (Annexure-IIA) (लागू असल्यास)

✔️ EWS Certificate (Annexure-III) (लागू असल्यास)

✔️ PwBD Certificate – Medical Board चे (Annexure-V A/B/C/D) (लागू असल्यास)

✔️ Ex-Servicemen साठी Discharge Certificate / माजी सैनिक किंवा सैनिकांच्या मुलांसाठी पालकांचे Discharge किंवा Serving Certificate (लागू असल्यास)

✔️ Medical Fitness Certificate (Annexure-IV)

✔️ Online अर्जाची Printout

North Western Railway Bharti 2026: महत्त्वाच्या Hidden अटी ⭐

❗ 10वी मध्ये 50% पेक्षा 0.01% ही कमी चालणार नाही

जाहिरातीत स्पष्ट लिहिले आहे की Rounding off केले जाणार नाही. म्हणजे 49.99% असेल तरी उमेदवार अपात्र ठरेल.

❗ फक्त एकच युनिट निवडता येईल

संपूर्ण भरतीत फक्त एकाच Division/Unit साठी अर्ज करता येईल. आपल्या ITI Trade साठी ज्या युनिटमध्ये जागा नाही ते युनिट निवडल्यास अर्ज निरुपयोगी ठरेल. उदा. Bikaner TMC मध्ये Carpenter आणि Painter साठी 0 जागा आहेत.

❗ एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास सर्व अर्ज रद्द

वेगळे नाव, फोटो, Email, Mobile नंबर किंवा इतर माहिती वापरून एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास सर्व अर्ज थेट रद्द होतील.

❗ नाव, वडिलांचे नाव आणि जन्मतारीख 10वीच्या प्रमाणपत्राप्रमाणेच

यात थोडा जरी फरक आढळला तरी Document Verification मध्ये उमेदवारी रद्द होईल आणि Debarment देखील होऊ शकते.

❗ Payment नंतर बदल करता येणार नाही

फी भरल्यानंतर अर्जात कोणताही बदल (Edit) करता येणार नाही. त्यामुळे Payment करण्याआधी सर्व माहिती नीट तपासा.

❗ रेल्वेत कायमस्वरूपी नोकरीची हमी नाही

Apprenticeship Rules 1992 नुसार Training पूर्ण झाल्यावर नोकरी देणे रेल्वेवर बंधनकारक नाही. ही फक्त Training आहे, नोकरी नाही.

❗ Hostel नाही, TA/DA नाही

Training दरम्यान राहण्याची व्यवस्था आणि Document Verification ला येण्याचा खर्च उमेदवारालाच करावा लागेल.

❗ निवडीनंतर युनिट/Trade बदलता येणार नाही

निवड झाल्यानंतर Division, Unit किंवा Trade बदलण्याची विनंती मान्य केली जाणार नाही.

❗ OBC चे Non-Creamy Layer Certificate नवीन हवे

OBC आरक्षणासाठी NCL Certificate 01.04.2026 किंवा त्यानंतर जारी झालेले आणि Central Government format मध्येच असावे. राज्य सरकारच्या format मधील प्रमाणपत्र चालणार नाही.

❗ Medical Fitness चे कडक निकष

  • किमान उंची 137 cm, वजन 25.4 kg आणि छाती फुगवणे किमान 3.8 cm. हे निकष पूर्ण नसले तरी Assistant Surgeon (Gazetted) ने संबंधित Trade साठी fit असल्याचे लेखी दिल्यास उमेदवार चालू शकतो.
  • BP 140/85 पेक्षा जास्त नसावा. Systolic BP 100 पेक्षा कमी असल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • दोन्ही कानांनी चांगले ऐकू यावे. Hearing Aid ला परवानगी नाही.
  • Colour Vision ची अट नाही.
  • TB (सक्रिय किंवा बरा झालेला), संसर्गजन्य आजार, त्वचारोग, Hernia, मूळव्याध इत्यादी नसावेत. लघवीत साखर नसावी.
  • Medical Certificate सरकारी हॉस्पिटलमधील Assistant Surgeon पेक्षा कमी दर्जाचा नसलेल्या Gazetted डॉक्टरने दिलेले असावे.

❗ PwBD साठी ठराविक अपंगत्वच पात्र

  • LD (Locomotor Disability/Cerebral Palsy): किमान 40% अपंगत्व
  • HI (Hearing Impairment): चांगल्या कानात 60 Decibel किंवा अधिक
  • VI (Low Vision): फक्त Mechanic (Diesel) आणि Fitter Trade साठी
  • प्रत्येक Trade साठी LD च्या वेगळ्या अटी आहेत. उदा. Machinist साठी फक्त करंगळी damaged असेल तरच चालेल.
  • या निकषांबाहेरील उमेदवारांनी PwBD म्हणून अर्ज करू नये.

❗ Contract of Apprenticeship

Training सुरू होण्याआधी उमेदवाराला रेल्वेसोबत Contract of Apprenticeship करावा लागेल. उमेदवार अल्पवयीन (18 पेक्षा कमी) असल्यास हा करार पालकांना करावा लागेल.

❗ खोटी कागदपत्रे = कधीही बाहेर

खोटे प्रमाणपत्र आढळल्यास Training सुरू झाल्यानंतरही कोणतीही नोटीस न देता उमेदवाराला काढून टाकले जाईल. कोणत्याही प्रकारची शिफारस (Canvassing) केल्यास उमेदवारी रद्द होईल.

North Western Railway Bharti 2026: अर्ज कसा करायचा?

Step 1

अधिकृत वेबसाइट www.rrcjaipur.in ला भेट द्या.

Step 2

Act Apprentice Notice No. 04/2026 (NWR/AA) च्या Online Application लिंकवर क्लिक करा.

Step 3

Online Registration करा. Registration Number मिळेल तो लिहून ठेवा.

Step 4

Application Form भरा:

  • Personal Details (10वीच्या प्रमाणपत्राप्रमाणे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख)
  • 12 अंकी आधार नंबर
  • Active Mobile नंबर आणि Email ID
  • 10वी आणि ITI चे गुण
  • Category Information
  • Division/Unit आणि Trade ची निवड

Step 5

Documents Upload करा:

तपशीलफोटोस्वाक्षरी
Size3.5 cm × 3.5 cm3.5 cm × 2.5 cm
FormatJPG/JPEG (रंगीत)JPG/JPEG
Resolution100 DPI100 DPI
File Size20 KB ते 70 KB20 KB ते 30 KB

👉 फोटो 3 महिन्यांपेक्षा जुना नसावा. चेहरा समोरून स्पष्ट दिसावा. टोपी किंवा गॉगल घालू नये.

Step 6

सर्व माहिती तपासून Application Fee भरा (लागू असल्यास).

Step 7

Final Submit करून Application Form आणि e-Receipt ची Print घ्या.

👉 अर्जाची Physical Copy RRC ला पोस्टाने पाठवायची गरज नाही.

👉 शेवटच्या दिवसांत वेबसाइटवर गर्दी होते, त्यामुळे लवकर अर्ज करा.

👉 अर्ज भरताना अडचण आल्यास Helpline नंबर वेबसाइटवर 23.10.2026 पासून उपलब्ध आहे. वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5 (रविवार आणि सुट्ट्या सोडून).

North Western Railway Bharti 2026: Apprenticeship चे फायदे

मुख्य फायदे

  • कोणतीही परीक्षा नाही, थेट 10वी + ITI मेरिटवर निवड
  • भारतीय रेल्वेच्या मोठ्या वर्कशॉप्स आणि डिव्हिजनमध्ये प्रत्यक्ष काम शिकण्याची संधी
  • Training दरम्यान Railway Board नियमांनुसार दर महिन्याला स्टायपेंड
  • SC/ST, PwBD आणि महिलांसाठी अर्ज पूर्णपणे मोफत
  • ITI नंतर Resume मध्ये भारतीय रेल्वेचा अनुभव
  • Fitter, Electrician, Welder, Diesel Mechanic सारख्या Trade मध्ये कौशल्य वाढवण्याची संधी

North Western Railway Bharti 2026: कोणासाठी सर्वोत्तम संधी आहे?

  • 10वी (50%+) आणि ITI पूर्ण केलेले उमेदवार
  • Fitter, Electrician, Welder, Diesel Mechanic, COPA, Electronics Mechanic, Carpenter, Painter, Plumber, Mason, Turner, Machinist, Steno, Draughtsman इत्यादी Trade चे ITI धारक
  • 10वी आणि ITI मध्ये चांगले गुण असलेले विद्यार्थी, कारण निवड थेट मेरिटवर आहे
  • भविष्यात रेल्वेमध्ये करिअर करण्याची इच्छा असलेले उमेदवार
  • राजस्थानमध्ये राहून Training घेण्याची तयारी असलेले उमेदवार

North Western Railway Bharti 2026: महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
सुधारित जाहिरात प्रसिद्ध21.10.2026
Online अर्ज सुरू23.10.2026
Online अर्जाची शेवटची तारीख22.11.2026 (रात्री 11:59 पर्यंत)
वयाची गणना22.11.2026 नुसार
लेखी परीक्षानाही (मेरिटवर निवड)
मेरिट लिस्ट / Document Verificationलवकरच जाहीर होईल

North Western Railway Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFइथे क्लिक करा
Online अर्जइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

North Western Railway Bharti 2026: FAQs

North Western Railway Apprentice साठी पात्रता काय आहे?

10वी किमान 50% गुणांसह (Rounding off न करता) उत्तीर्ण आणि संबंधित Trade मध्ये NCVT/SCVT मान्यताप्राप्त ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

North Western Railway Bharti 2026 मध्ये किती जागा आहेत?

जाहिरातीनुसार एकूण 2008 Apprentice जागा आहेत. या जागा अजमेर, बिकानेर, जयपूर, जोधपूर डिव्हिजन आणि 4 वर्कशॉप्स अशा 8 युनिट्समध्ये आहेत.

वयोमर्यादा किती आहे?

22.11.2026 रोजी उमेदवाराचे वय किमान 15 वर्षे पूर्ण आणि 24 वर्षांपेक्षा कमी असावे. OBC ला 3 वर्षे, SC/ST ला 5 वर्षे आणि PwBD ला 10 वर्षे सवलत आहे.

स्टायपेंड किती मिळेल?

Training कालावधी आणि स्टायपेंड Railway Board च्या नियमांनुसार दिला जाईल. जाहिरातीत स्वतंत्र रक्कम नमूद केलेली नाही.

निवड प्रक्रिया काय आहे?

कोणतीही परीक्षा किंवा Interview नाही. 10वीचे टक्के आणि ITI चे गुण यांच्या सरासरीवर मेरिट लिस्ट लागेल. त्यानंतर Document Verification आणि Medical Examination होईल.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

हो. जाहिरातीत Domicile ची अट नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. मात्र Training राजस्थानमध्ये होईल आणि Hostel मिळणार नाही.

महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?

हो, महिला उमेदवार अर्ज करू शकतात आणि त्यांना अर्ज फी भरावी लागत नाही.

अर्ज फी किती आहे?

General/OBC/EWS पुरुष उमेदवारांसाठी ₹100. SC/ST, PwBD आणि सर्व महिलांसाठी फी नाही.

एकापेक्षा जास्त युनिटसाठी अर्ज करता येतो का?

नाही. फक्त एकाच युनिटसाठी एकच अर्ज करता येईल. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास सर्व अर्ज रद्द होतील.

शेवटची तारीख कधी आहे?

Online अर्जाची शेवटची तारीख 22.11.2026 (रात्री 11:59 पर्यंत) आहे.

Training नंतर रेल्वेत कायमस्वरूपी नोकरी मिळेल का?

नाही. Apprenticeship Rules 1992 नुसार Training पूर्ण झाल्यावर नोकरी देणे रेल्वेवर बंधनकारक नाही.

इतर भरती अपडेट्स

LIC HFL Apprentice Bharti 2026: एलआयसी हाउसिंग फायनान्स भरती! ग्रॅज्युएशन पास मुले/मुली, लगेच इथून अर्ज करा

RRB Station Master Bharti 2026: रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर पदांची भरती! पगार ₹35,400 पासून, ग्रॅज्युएशन पास मुले/मुली, सर्व माहिती इथून बघा

EIL Bharti 2026: इंजिनियर्स इंडिया लिमिटेड मध्ये भरती! लेखी परीक्षा नाही, B.E./B.Tech/B.Sc(Engg.) पास, लगेच इथून अर्ज करा

ISRO SDSC SHAR Bharti 2026: इस्रो मध्ये भरती! 10वी/ITI/Diploma आणि ग्रॅज्युएशन पास, लगेच इथून अर्ज करा

UCO Bank Apprentice Bharti 2026: युको बँकेत भरती! Apprentice, ग्रॅज्युएशन पास मुले/मुली, लगेच इथून अर्ज करा

BHEL Bharti 2026: भेल मध्ये भरती! पगार ₹६५,०००, 10वी/ITI पास, लगेच इथून अर्ज करा

CWC Bharti 2026: वखार महामंडळात परमनंट भरती! B.sc/ग्रॅज्युएशन पासवर, लगेच इथून अर्ज करा

Indian Army TES Bharti 2026: भारतीय सेनेत भरती! पगार ₹56,100 पासून, १२वी पास मुले/मुली, लगेच इथून अर्ज करा

CRPF Sports Quota Bharti 2026: CRPF स्पोर्ट कोटा भरती! पगार ₹81,100 पर्यंत, १०वी/१२वी पास मुले/मुली, लगेच इथून अर्ज करा

Leave a comment