Thane Kotwal Bharti 2026: ठाणे जिल्हा कोतवाल भरती! पगार ₹15,000, फक्त 4थी पास मुले/मुली, लगेच इथून अर्ज करा

Thane Kotwal Bharti 2026 या भरतीमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, पगार, एकूण जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का आणि महत्त्वाच्या Hidden अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे अंतर्गत ठाणे, कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी आणि शहापूर या 6 तालुक्यांमधील सजेतील महसूल सेवक (कोतवाल) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात क्रमांक 01/2026 प्रसिद्ध झाली आहे. एकूण 111 जागा असून दरमहा ₹15,000 मानधन मिळणार आहे. शासनाने ही भरती “एक विशेष बाब” म्हणून मान्य केली आहे (शासन पत्र क्र. पदभ-2025/प्र.क्र.98/आस्था-10, दि. 19 ऑगस्ट 2026).

या भरतीची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यासाठी किमान शैक्षणिक पात्रता फक्त 4थी पास आहे. लेखी परीक्षेत Negative Marking नाही. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील या 6 तालुक्यांमध्ये राहणाऱ्या आणि गावपातळीवर सरकारी काम करायची इच्छा असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी ही खरी सुवर्णसंधी आहे.

Thane Kotwal Bharti 2026: संपूर्ण माहिती (Overview)

घटकतपशील
भरती संस्थाजिल्हाधिकारी कार्यालय ठाणे (महसूल सेवक निवड समिती, उपविभाग उल्हासनगर)
पदाचे नावमहसूल सेवक (कोतवाल)
जाहिरात क्रमांक01/2026
एकूण जागा111
तालुकेठाणे, कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर
शैक्षणिक पात्रताकिमान 4थी पास
वयोमर्यादा18 ते 40 वर्षे (01/10/2026 रोजी)
अर्ज पद्धतफक्त Online
नोकरी ठिकाणठाणे जिल्हा (संबंधित तालुक्यातील सजा)
निवड प्रक्रियालेखी परीक्षा (100 गुण) + कागदपत्र पडताळणी + वैद्यकीय तपासणी
पगार (मानधन)₹15,000 प्रति महिना
अर्ज फीखुला प्रवर्ग ₹600 / मागास प्रवर्ग ₹500
अर्ज सुरू07/10/2026
शेवटची तारीख21/10/2026 (सायं. 5.00 पर्यंत)
लेखी परीक्षा15/11/2026
अधिकृत वेबसाइटthane.kotwal.org

Thane Kotwal Bharti 2026: एकूण जागा (Vacancy Details)

या भरतीत एकूण 111 जागा आहेत. यापैकी 81 जागा सर्वसाधारण आणि 30 जागा महिलांसाठी (30%) राखीव आहेत.

तालुकानिहाय जागा

तालुकाएकूण जागा
ठाणे24
कल्याण14
भिवंडी (नॉन पेसा 11 + पेसा 3)14
अंबरनाथ21
मुरबाड (पेसा 25-50% व 50%+ : 4, पेसा 0-25% : 4, नॉन पेसा : 11)19
शहापूर (पेसा 25-50% व 50%+ : 11, पेसा 0-25% : 8)19
एकूण111

तहसिल व प्रवर्गनिहाय जागा

तहसिल व प्रवर्गनिहाय जागा

👉 खाली प्रत्येक तहसिलसाठी फक्त ज्या प्रवर्गांना जागा आहेत तेच प्रवर्ग दिले आहेत. उरलेल्या प्रवर्गांसाठी त्या तहसिलमध्ये जागा नाहीत.

1. तहसिल कार्यालय ठाणे (एकूण 24 जागा)

प्रवर्गसर्वसाधारणमहिलाएकूण
SC (अनुसूचित जाती)112
ST (अनुसूचित जमाती)101
VJ-A101
NT-B101
NT-C101
NT-D101
SBC (विमाप्र)101
OBC (इमाव)112
SEBC112
EWS112
खुला7310
एकूण17724

2. तहसिल कार्यालय भिवंडी, नॉन पेसा क्षेत्र (एकूण 11 जागा)

प्रवर्गसर्वसाधारणमहिलाएकूण
ST (अनुसूचित जमाती)112
VJ-A101
NT-B101
SEBC213
EWS213
खुला101
एकूण8311

3. तहसिल कार्यालय भिवंडी, पेसा क्षेत्र 25% ते 50% व 50% पेक्षा जास्त (एकूण 3 जागा)

प्रवर्गसर्वसाधारणमहिलाएकूण
ST (अनुसूचित जमाती)112
खुला101
एकूण213

4. तहसिल कार्यालय कल्याण (एकूण 14 जागा)

प्रवर्गसर्वसाधारणमहिलाएकूण
SC (अनुसूचित जाती)213
VJ-A101
NT-B101
NT-D101
OBC (इमाव)101
SEBC213
EWS213
खुला101
एकूण11314

5. तहसिल कार्यालय अंबरनाथ (एकूण 21 जागा)

प्रवर्गसर्वसाधारणमहिलाएकूण
SC (अनुसूचित जाती)213
ST (अनुसूचित जमाती)101
VJ-A101
NT-B101
NT-C101
NT-D101
OBC (इमाव)325
SEBC112
EWS112
खुला314
एकूण15621

6. तहसिल कार्यालय मुरबाड, पेसा क्षेत्र 25% ते 50% व 50% पेक्षा जास्त (एकूण 4 जागा)

प्रवर्गसर्वसाधारणमहिलाएकूण
ST (अनुसूचित जमाती)112
खुला112
एकूण224

7. तहसिल कार्यालय मुरबाड, पेसा क्षेत्र 0 ते 25% (एकूण 4 जागा)

प्रवर्गसर्वसाधारणमहिलाएकूण
ST (अनुसूचित जमाती)101
VJ-A101
OBC (इमाव)101
SEBC101
एकूण404

8. तहसिल कार्यालय मुरबाड, नॉन पेसा क्षेत्र (एकूण 11 जागा)

प्रवर्गसर्वसाधारणमहिलाएकूण
ST (अनुसूचित जमाती)101
VJ-A101
NT-B101
OBC (इमाव)112
SEBC112
EWS101
खुला213
एकूण8311

9. तहसिल कार्यालय शहापूर, पेसा क्षेत्र 25% ते 50% व 50% पेक्षा जास्त (एकूण 11 जागा)

प्रवर्गसर्वसाधारणमहिलाएकूण
ST (अनुसूचित जमाती)112
खुला639
एकूण7411

10. तहसिल कार्यालय शहापूर, पेसा क्षेत्र 0 ते 25% (एकूण 8 जागा)

प्रवर्गसर्वसाधारणमहिलाएकूण
VJ-A101
NT-B101
OBC (इमाव)101
SEBC101
EWS101
खुला213
एकूण718

सर्व तहसिल मिळून एकूण जागा

प्रवर्गएकूण जागा
SC (अनुसूचित जाती)8
ST (अनुसूचित जमाती)12
VJ-A7
NT-B6
NT-C2
NT-D3
SBC (विमाप्र)1
OBC (इमाव)12
SEBC14
EWS12
खुला34
एकूण111 (सर्वसाधारण 81 + महिला 30)

👉 पेसा क्षेत्रातील (25% ते 50% व 50% पेक्षा जास्त) जागांवर अनुसूचित जमाती (ST) साठी 50% आणि खुल्या प्रवर्गासाठी 50% आरक्षण ठेवले आहे. इतर ठिकाणी नियमित आरक्षणानुसार जागा वाटप केल्या आहेत.

👉 आरक्षण SC, ST, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, SBC, OBC, SEBC आणि EWS उमेदवारांसाठी लागू आहे.

⚠️ नोट: पदांच्या एकूण संख्येमध्ये व आरक्षणात बदल होऊ शकतो.

Thane Kotwal Bharti 2026: शैक्षणिक पात्रता

महसूल सेवक (कोतवाल) पदासाठी उमेदवाराची किमान शैक्षणिक अर्हता 4थी पास असावी.

👉 जास्त शिक्षण असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात, पण किमान 4थी पास असणे आवश्यक आहे.

👉 उमेदवार कोतवालाची कर्तव्ये पार पाडण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा. कारण कोतवालाला क्षेत्रीय स्तरावर (Field Work) काम करावे लागते.

Thane Kotwal Bharti 2026: वयोमर्यादा (Age Limit)

उमेदवाराचे वय 01/10/2026 रोजी 18 ते 40 वर्षे या वयोगटात असावे.

तपशीलवय
किमान वय18 वर्षे
कमाल वय40 वर्षे

⚠️ वयाची गणना 01/10/2026 नुसार केली जाईल.

👉 अधिकृत जाहिरातीमध्ये प्रवर्गनिहाय वयोमर्यादा सवलतीचा कोणताही उल्लेख केलेला नाही.

Thane Kotwal Bharti 2026: पगार (Salary)

महसूल सेवक (कोतवाल) पदासाठी दरमहा ₹15,000 (रुपये पंधरा हजार फक्त) इतके मानधन दिले जाईल.

👉 हे मानधन शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र. संकीर्ण-2022/प्र.क्र.191/ई-10, दिनांक 06/04/2023 नुसार ठरवले आहे.

👉 वेळोवेळी निघणाऱ्या शासन निर्णयानुसार मानधनात बदल होऊ शकतो.

👉 गावपातळीवर, स्वतःच्या तालुक्यात राहून महसूल विभागात काम करण्याची ही चांगली संधी मानली जाते.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

✅ हो, ही महाराष्ट्र राज्यातील भरती आहे. पण ही तालुकास्तरीय भरती आहे.

❌ फक्त महाराष्ट्राचा रहिवासी असणे पुरेसे नाही. उमेदवार ज्या तालुक्यातील पदासाठी अर्ज करतो, त्याच तालुक्याचा स्थानिक/कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

👉 म्हणजे ठाणे, कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी किंवा शहापूर या तालुक्यांचे रहिवासीच आपापल्या तालुक्यासाठी अर्ज करू शकतात. Pune, Nashik, Ahilyanagar किंवा इतर जिल्ह्यांतील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही.

मुलगा आणि मुलगी दोघे अर्ज करू शकतात का?

✅ हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.

या भरतीमध्ये कोणताही Gender Restriction नाही. उलट एकूण 111 पैकी 30 जागा महिलांसाठी राखीव आहेत.

👉 खुल्या प्रवर्गातील महिलांना महिला आरक्षणाचा लाभ हवा असल्यास त्यांनी ऑनलाईन अर्जातच तशी मागणी करणे अनिवार्य आहे.

👉 महिला आरक्षित पदासाठी दावा करणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domicile) प्रमाणपत्र सादर करावे

Thane Kotwal Bharti 2026: निवड प्रक्रिया (Selection Process)

1️⃣ लेखी परीक्षा

घटकतपशील
एकूण प्रश्न50
एकूण गुण100
प्रत्येक प्रश्नाला गुण2
प्रश्नांचा प्रकारवस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ)
विषयसामान्य ज्ञान
Negative Marking❌ नाही
किमान पात्रता गुण40
परीक्षा दिनांक15/11/2026

👉 संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सर्व तालुक्यांच्या पदांसाठी परीक्षा एकाच दिवशी, एकाच वेळी घेतली जाईल.

2️⃣ कागदपत्र पडताळणी

लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची तात्पुरती निवड यादी वेबसाईटवर प्रसिद्ध होईल. या उमेदवारांना शैक्षणिक व इतर मूळ कागदपत्रे तपासणीसाठी सादर करावी लागतील.

3️⃣ वैद्यकीय तपासणी

उमेदवाराला ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक किंवा वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याचे शारीरिक सक्षमतेचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. पात्रता वैद्यकीय तपासणीनंतर निश्चित केली जाईल.

4️⃣ अंतिम निवड यादी व सजा वाटप

कागदपत्र तपासणीनंतर अंतिम निवड यादी वेबसाईटवर प्रसिद्ध होईल. तालुकानिहाय अंतिम यादीतील उमेदवारांना नियुक्ती प्राधिकारी सजा वाटप करतील.

👉 जाहिरातीमध्ये Interview चा कोणताही उल्लेख नाही.

Thane Kotwal Bharti 2026: अर्ज फी

प्रवर्गफी
खुला प्रवर्ग₹600
मागास प्रवर्ग₹500

👉 फी Online पद्धतीने भरावी लागेल. Netbanking, Debit Card, Credit Card, Google Pay किंवा PhonePe यापैकी कोणताही पर्याय वापरता येईल.

👉 वरील फी मध्ये बँक प्रोसेसिंग चार्जेस समाविष्ट नाहीत. निवडलेल्या पर्यायानुसार बँकेचे सेवा शुल्क वेगळे भरावे लागेल.

⚠️ पेमेंट केल्यावर “Payment Transaction Successful” झाल्याची खात्री करून घ्या. पेमेंटमधील अडचणींसाठी निवड समिती जबाबदार राहणार नाही.

Thane Kotwal Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे

✔️ अद्ययावत पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी (स्कॅन केलेली) ✔️ 4थी पास किंवा त्यापुढील शैक्षणिक प्रमाणपत्र ✔️ संबंधित तालुक्याचा रहिवासी पुरावा ✔️ जात प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ✔️ जात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास) ✔️ नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, 31/03/2027 पर्यंत वैध (SC/ST वगळता इतर मागास प्रवर्गांसाठी) ✔️ महाराष्ट्र अधिवास (Domicile) प्रमाणपत्र (महिला आरक्षणासाठी) ✔️ लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नमुना ‘अ’ ✔️ पोलीस स्टेशनचा दाखला / चारित्र्य प्रमाणपत्र ✔️ ग्रामीण रुग्णालय अधिक्षक / वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याचे शारीरिक सक्षमता प्रमाणपत्र ✔️ कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध न ठेवण्याबाबत ₹500 च्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र

Thane Kotwal Bharti 2026: महत्त्वाच्या Hidden अटी ⭐

❗ फक्त एकाच तालुक्यासाठी अर्ज

उमेदवार कोणत्याही एकाच तालुक्याचा स्थानिक/कायमचा रहिवासी असू शकतो. त्यामुळे अर्ज त्याच तालुक्यातील पदासाठीच करावा. प्रत्येक तालुक्याची भरती प्रक्रिया स्वतंत्र असून दोन तालुक्यांच्या प्रक्रियेचा एकमेकांशी संबंध नसेल.

❗ नियुक्तीनंतर सजेच्या ठिकाणी राहणे बंधनकारक

नियुक्ती झालेल्या उमेदवाराने नियुक्तीनंतर संबंधित महसूल सजेच्या ठिकाणीच वास्तव्य करणे बंधनकारक आहे.

❗ दिव्यांग आरक्षण लागू नाही

कोतवालांना Field Work करावे लागते, त्यामुळे पद धारण करणारी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. म्हणूनच या पदासाठी दिव्यांग आरक्षण लागू केलेले नाही.

❗ समांतर आरक्षण लागू नाही

एका सजेत कोतवालाचे एकच पद असते. त्यामुळे प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, खेळाडू यांसारखी समांतर आरक्षणे या भरतीला लागू नाहीत.

❗ गुन्ह्याची नोंद नसावी

उमेदवाराविरुद्ध कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसावी किंवा कोणत्याही न्यायालयाने शिक्षा दिलेली नसावी. छाननीच्या वेळी पोलीस स्टेशनचा दाखला सादर न केल्यास नियुक्ती नाकारली जाऊ शकते.

❗ राजकीय पक्षाशी संबंध नसावा

कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध न ठेवण्याबाबत ₹500 च्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी द्यावे लागेल.

❗ लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन

शासन निर्णय दिनांक 2 जून 2025 नुसार लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नमुना ‘अ’ सादर करणे बंधनकारक आहे.

❗ जात वैधता 6 महिन्यांत द्यावी लागेल

जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास, तात्पुरते नियुक्ती आदेश निघाल्यापासून 6 महिन्यांच्या आत ते सादर करणे अनिवार्य आहे. अन्यथा नियुक्ती पूर्वलक्षी प्रभावाने रद्द केली जाईल.

❗ परीक्षेआधी कागदपत्र तपासणी होणार नाही

लेखी परीक्षा कागदपत्रांची पूर्वतपासणी न करता घेतली जाईल. त्यामुळे फक्त परीक्षेत चांगले गुण मिळाले म्हणून निवडीचा हक्क मिळत नाही. मूळ कागदपत्रांच्या पूर्ण छाननीनंतरच पात्रता निश्चित होईल.

❗ अर्जातील माहिती नंतर बदलता येणार नाही

ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती नंतर बदलता येणार नाही. अर्जातील माहिती आणि मूळ कागदपत्रांमध्ये फरक आढळल्यास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द होऊ शकते. तसेच मागितलेले आरक्षण किंवा शुल्क सवलत नामंजूर होऊ शकते.

❗ जुन्या कोतवालांच्या वारसांना प्राधान्य

इतर सर्व निकष समान असतील तर त्या सजेतील पूर्वीच्या कोतवालांच्या वारसांना इतर उमेदवारांपेक्षा प्राधान्य दिले जाईल. वारसांव्यतिरिक्त दोन उमेदवारांचे गुण सारखे असल्यास दिनांक 13 जून 2018 च्या शासन निर्णयातील निकषानुसार गुणवत्ताक्रम ठरेल.

❗ पोस्टाने काहीही येणार नाही

प्रवेशपत्र, परीक्षेची तारीख, वेळ आणि कागदपत्र छाननीचा कार्यक्रम फक्त वेबसाईटवरच उपलब्ध होईल. अपात्र अर्जदारांना स्वतंत्रपणे कळवले जाणार नाही. त्यामुळे वेबसाईट नियमित तपासत राहा.

❗ मोबाईल नंबर DND वर असेल तर सावधान

तुमचा मोबाईल नंबर NCPR (DND) वर रजिस्टर्ड असेल आणि त्यामुळे भरतीचे मेसेज मिळाले नाहीत, तर त्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.

❗ परीक्षेचा खर्च स्वतःचा

परीक्षा आणि कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.

Thane Kotwal Bharti 2026: अर्ज कसा करायचा?

Step 1

अधिकृत वेबसाइट https://thane.kotwal.org ला भेट द्या.

Step 2

वेबसाईटवरील सविस्तर जाहिरात आणि अर्ज भरण्याच्या सूचना काळजीपूर्वक वाचा.

Step 3

Online Registration करा. ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर अचूक द्या.

Step 4

Application Form भरा:

  • Personal Details
  • तालुका (ज्या तालुक्याचे रहिवासी आहात तोच)
  • Educational Details
  • Category Information
  • महिला आरक्षण हवे असल्यास त्याची मागणी

Step 5

फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे Upload करा.

Step 6

Application Fee Online भरा आणि “Payment Transaction Successful” झाल्याची खात्री करा.

Step 7

Final Submit करून अर्जाची Print घ्या.

⚠️ शेवटच्या तारखेनंतर (21/10/2026, सायं. 5.00) Online अर्जाची लिंक बंद केली जाईल. इतर कोणत्याही पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

👉 ज्यांनी आधी रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, समाजकल्याण किंवा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात नाव नोंदवले आहे, त्यांनाही Online अर्ज करून फी भरावीच लागेल.

👉 अर्ज भरताना काही अडचण आल्यास संबंधित तहसिल कार्यालयाशी थेट संपर्क साधावा.

Thane Kotwal Bharti 2026: Job Benefits

मुख्य फायदे

  • दरमहा ₹15,000 निश्चित मानधन
  • स्वतःच्या तालुक्यात, गावपातळीवर काम करण्याची संधी
  • महसूल विभागाच्या कामकाजाचा थेट अनुभव
  • फक्त 4थी पास पात्रतेवर सरकारी विभागात काम
  • गावात ओळख आणि सामाजिक प्रतिष्ठा

Thane Kotwal Bharti 2026: कोणासाठी सर्वोत्तम संधी आहे?

  • ठाणे, कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी आणि शहापूर तालुक्यातील रहिवासी उमेदवार
  • कमी शिक्षण असूनही सरकारी विभागात काम करू इच्छिणारे तरुण
  • गावाजवळ राहून नोकरी करू इच्छिणारे उमेदवार
  • पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमातीचे उमेदवार
  • सामान्य ज्ञानाची चांगली तयारी असलेले विद्यार्थी

Thane Kotwal Bharti 2026: महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
जाहिरात दिनांक06/10/2026
अर्ज सुरू07/10/2026
शेवटची तारीख21/10/2026 (सायं. 5.00 पर्यंत)
फी भरण्याची शेवटची तारीख21/10/2026 (सायं. 5.00 पर्यंत)
परीक्षा तारीख15/11/2026
Admit Cardवेबसाईटवर लवकरच उपलब्ध होईल

Thane Kotwal Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFइथे क्लिक करा
Online अर्जइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Thane Kotwal Bharti 2026: FAQs

Thane Kotwal Bharti 2026 मध्ये किती जागा आहेत?

एकूण 111 जागा आहेत. त्यापैकी 30 जागा महिलांसाठी राखीव आहेत.

कोतवाल पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

किमान 4थी पास असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा किती आहे?

01/10/2026 रोजी 18 ते 40 वर्षे.

कोतवालाला पगार किती मिळेल?

दरमहा ₹15,000 मानधन मिळेल.

निवड प्रक्रिया काय आहे?

100 गुणांची लेखी परीक्षा, त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी. यानंतर अंतिम निवड यादी लागेल.

परीक्षेत Negative Marking आहे का?

नाही. चुकीच्या उत्तरासाठी Negative Marking नाही.

परीक्षा पास होण्यासाठी किती गुण लागतात?

लेखी परीक्षेत किमान 40 गुण मिळवणे आवश्यक आहे.

परीक्षा कधी आहे?

लेखी परीक्षा 15/11/2026 रोजी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात एकाच वेळी घेतली जाईल.

दुसऱ्या जिल्ह्यातील उमेदवार अर्ज करू शकतात का?

नाही. ज्या तालुक्यातील पदासाठी अर्ज करायचा आहे, त्याच तालुक्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?

हो. 30% जागा महिलांसाठी राखीव आहेत. खुल्या प्रवर्गातील महिलांनी अर्जात महिला आरक्षणाची मागणी करणे अनिवार्य आहे.

अर्ज फी किती आहे?

खुल्या प्रवर्गासाठी ₹600 आणि मागास प्रवर्गासाठी ₹500. बँक चार्जेस वेगळे.

शेवटची तारीख कधी आहे?

21/10/2026 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अर्ज करता येईल.

इतर भरती अपडेट्स

IOCL Apprentice Bharti 2026: इंडियन ऑइल मध्ये भरती! इंजीनियरिंग/ITI पास मुले/मुली, लगेच इथून अर्ज करा

MECON Bharti 2026: मेकॉन लिमिटेड मध्ये भरती! पगार ₹78,390 पर्यंत, परीक्षा नाही फक्त Interview, लगेच इथून अर्ज करा

Nashik Kotwal Bharti 2026: नाशिक जिल्हा कोतवाल भरती! पगार ₹15,000, 4थी पास मुले/मुली, लगेच इथून अर्ज करा

North Western Railway Bharti 2026: उत्तर पश्चिम रेल्वेत भरती! 2008 जागा, 10वी/ITI पास मुले/मुली, लगेच इथून अर्ज करा

Supreme Court Bharti 2026: सर्वोच्च न्यायालयात भरती! पगार ₹35,400 + भत्ते, ग्रॅज्युएशन पास मुले/मुली, लगेच इथून अर्ज करा

ITBP Bharti 2026: ITBP मध्ये भरती! पगार ₹25,500 ते ₹81,100, 12वी/ITI/ग्रॅज्युएशन पास मुले/मुली, लगेच इथून अर्ज करा

Canara Bank Apprentice Bharti 2026: कॅनरा बँकेत भरती! 3500 जागा, ग्रॅज्युएशन पास मुले/मुली, लगेच इथून अर्ज करा

Leave a comment