RCFL Apprentice Bharti 2026: RCF लिमिटेड मध्ये भरती! 12वी/डिप्लोमा/ग्रॅज्युएशन पास मुले/मुली, लगेच इथून अर्ज करा

RCFL Apprentice Bharti 2026 या भरतीमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, स्टायपेंड, एकूण जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का आणि महत्त्वाच्या Hidden अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

Rashtriya Chemicals and Fertilizers Limited (RCF Ltd.) ही भारत सरकारची Navratna कंपनी आहे. खते आणि औद्योगिक रसायनांचे उत्पादन करणारी ही कंपनी असून तिची वार्षिक उलाढाल सुमारे ₹18,690.90 कोटी आहे. कंपनीचे दोन प्लांट महाराष्ट्रातच आहेत – Trombay (चेंबूर, मुंबई) आणि Thal (रायगड जिल्हा). RCF ने 2026-27 या वर्षासाठी एकूण 326 Graduate Apprentice, Technician Apprentice आणि Trade Apprentice जागांची भरती जाहीर केली आहे. या भरतीत कोणतीही लेखी परीक्षा नाही – फक्त मार्कांच्या Merit वर निवड होणार आहे आणि दरमहा ₹14,600 ते ₹17,300 स्टायपेंड मिळणार आहे.

12वी Science पास, कोणत्याही शाखेचा Diploma, B.Sc (PCM), B.Com, BBA किंवा कोणत्याही शाखेचे पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही खरोखर सुवर्णसंधी आहे कारण दोन्ही प्लांट महाराष्ट्रातच आहेत.

RCFL Apprentice Bharti 2026: संपूर्ण माहिती

घटकतपशील
भरती संस्थाRashtriya Chemicals and Fertilizers Limited (RCF Ltd.) – Navratna, भारत सरकार
पदाचे नावGraduate Apprentice / Technician Apprentice / Trade Apprentice
एकूण जागा326
अर्ज पद्धतOnline
नोकरी ठिकाणTrombay (मुंबई) आणि Thal (रायगड), महाराष्ट्र
निवड प्रक्रियाMerit List (मार्कांच्या टक्केवारीनुसार) + Document Verification
स्टायपेंड₹14,600 ते ₹17,300 प्रति महिना
प्रशिक्षण कालावधी12 / 15 / 24 महिने (पदानुसार)
अर्ज सुरू04 सप्टेंबर 2026 (सकाळी 08:00)
शेवटची तारीख20 सप्टेंबर 2026 (संध्याकाळी 05:00 पर्यंत)
अधिकृत वेबसाइटrcfltd.com

RCFL Apprentice Bharti 2026: एकूण जागा

या भरतीत एकूण 326 जागा आहेत – Trombay साठी 177 आणि Thal साठी 149. जागा तीन Category मध्ये विभागल्या आहेत.

Table A – Graduate Apprentice (145 जागा)

पदTrombayThalएकूण
Accounts Executive252550
Secretarial Assistant352560
Recruitment Executive (HR)201535
एकूण8065145

Table B – Technician Apprentice (105 जागा)

पदTrombayThalएकूण
Diploma Chemical101020
Diploma Civil090615
Diploma Computer050510
Diploma Electrical101020
Diploma Instrumentation101020
Diploma Mechanical101020
एकूण5451105

Table C – Trade Apprentice (76 जागा)

पदTrombayThalएकूण
Attendant Operator (Chemical Plant)351550
Instrument Mechanic (Chemical Plant)020204
Laboratory Assistant (Chemical Plant)020406
Boiler Attendant010102
Electrician010506
Horticulture Assistant020406
Medical Laboratory Technician (Pathology)000202
एकूण433376

प्रवर्गनिहाय आरक्षण

प्रवर्गजागा
SC32
ST29
OBC (NCL)88
EWS32
Unreserved145
एकूण326

👉 आरक्षण SC, ST, OBC, EWS आणि PwBD उमेदवारांसाठी लागू आहे.

⚠️ नोट: पदसंख्या कमी किंवा जास्त होऊ शकते. जाहिरातीनुसार प्रतिसादानुसार जागांमध्ये 10% पर्यंत बदल होऊ शकतो.

RCFL Apprentice Bharti 2026: शैक्षणिक पात्रता

सर्व पदांसाठी पात्रता परीक्षेत किमान 50% गुण आवश्यक आहेत.

Graduate Apprentice

  • Accounts Executive: B.Com, BBA किंवा Economics विषयासह Graduation. Basic English आणि Computer operation चे ज्ञान आवश्यक.
  • Secretarial Assistant: कोणत्याही शाखेतील पदवीधर (Any Graduate). Basic English आणि Computer operation चे ज्ञान आवश्यक.
  • Recruitment Executive (HR): कोणत्याही शाखेतील पदवीधर (Any Graduate). Basic English आणि Computer operation चे ज्ञान आवश्यक.

👉 Graduation मध्ये Biology (फक्त Zoology किंवा फक्त Botany) असलेले उमेदवार Secretarial Assistant किंवा Recruitment Executive (HR) यापैकी एका पदासाठी अर्ज करू शकतात.

Technician Apprentice

  • Diploma Chemical: Diploma in Chemical Engineering
  • Diploma Civil: Diploma in Civil Engineering
  • Diploma Computer: Diploma in Computer Engineering
  • Diploma Electrical: Diploma in Electrical Engineering
  • Diploma Instrumentation: Diploma in Instrumentation Engineering
  • Diploma Mechanical: Diploma in Mechanical Engineering

❌ Diploma च्या Allied Branches (संबंधित पण वेगळ्या शाखा) स्वीकारल्या जाणार नाहीत.

Trade Apprentice

  • Attendant Operator (Chemical Plant): B.Sc with Physics, Chemistry, Mathematics – Chemistry हा Major विषय असणे आवश्यक.
  • Instrument Mechanic (Chemical Plant): B.Sc with Physics, Chemistry, Mathematics – Physics हा Major विषय असणे आवश्यक.
  • Laboratory Assistant (Chemical Plant): B.Sc with Physics, Chemistry, Mathematics – Chemistry हा Major विषय असणे आवश्यक.
  • Boiler Attendant: 12वी Science पास (10+2)
  • Electrician: 12वी Science पास (10+2) किंवा समकक्ष
  • Horticulture Assistant: 12वी पास (10+2) किंवा समकक्ष (कोणतीही शाखा)
  • Medical Laboratory Technician (Pathology): 12वी Science पास (10+2)

👉 SC/ST/PwBD उमेदवारांना अंतिम निवडीच्या निकषात 5% गुणांची सवलत मिळेल.

👉 पात्रता परीक्षा मान्यताप्राप्त University/Institute मधून Regular Full-Time पद्धतीने पूर्ण केलेली असावी.

👉 पात्रता परीक्षा 01 जुलै 2023 रोजी किंवा त्यानंतर पास केलेली असावी. टक्केवारी अंतिम वर्षाची किंवा शेवटच्या दोन सेमिस्टरच्या Aggregate ची ग्राह्य धरली जाईल.

👉 Passing Certificate अजून मिळाले नसेल तरी अर्ज करता येतो, पण Document Verification च्या वेळी मूळ प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक आहे.

RCFL Apprentice Bharti 2026: वयोमर्यादा

  • किमान वय: 18 वर्ष
  • कमाल वय: 25 वर्ष (सर्व पदांसाठी)
प्रवर्गवयोमर्यादा सवलत
OBC+3 वर्ष
SC/ST+5 वर्ष
PwBD+10 वर्ष
1984 दंगलग्रस्तांचे मुले / कुटुंबीय+5 वर्ष

⚠️ वयाची गणना 01 सप्टेंबर 2026 नुसार केली जाईल.

RCFL Apprentice Bharti 2026: स्टायपेंड (पगार)

स्टायपेंड दोन भागात मिळतो – एक भाग RCF कडून आणि दुसरा भाग BOAT (Board of Apprenticeship Training) कडून. Trade Apprentice ना संपूर्ण रक्कम RCF कडूनच मिळते.

पदRCF कडूनBOAT कडूनएकूण दरमहा
Accounts Executive / Secretarial Assistant / Recruitment Executive (HR)₹11,150₹6,150₹17,300
Diploma Chemical / Civil / Computer / Electrical / Instrumentation / Mechanical₹10,450₹5,450₹15,900
Attendant Operator / Instrument Mechanic / Laboratory Assistant (Chemical Plant)₹17,300₹17,300
Boiler Attendant / Electrician / Horticulture Assistant / Medical Lab Technician₹14,600₹14,600

अतिरिक्त फायदे

  • कंपनीच्या Canteen मध्ये सकाळचा नाश्ता, चहा आणि दुपारची शाकाहारी जेवणाची थाळी मोफत
  • RCF Hospital मध्ये OPD स्वरूपात वैद्यकीय सुविधा (फक्त स्वतःसाठी)
  • Uniform आणि PPE (Personal Protective Equipment) कंपनीकडून दिले जाईल

👉 RCF कडून मिळणारा स्टायपेंड दर महिन्याला ठराविक तारखेला जमा होतो. BOAT चा भाग BOAT थेट उमेदवाराच्या खात्यात जमा करते.

⚠️ स्टायपेंड शिवाय इतर कोणतेही भत्ते, HRA किंवा प्रवास खर्च मिळणार नाही.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

✅ हो, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो.

ही All India Recruitment आहे, पण दोन्ही Training ठिकाणे – Trombay (मुंबई) आणि Thal (रायगड) – महाराष्ट्रातच आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही भरती विशेष फायद्याची आहे. Mumbai, Thane, Raigad, Pune, Nashik, Ahilyanagar आणि इतर जिल्ह्यांतील उमेदवार अर्ज करू शकतात.

मुलगा आणि मुलगी दोघे अर्ज करू शकतात का?

✅ हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.

या भरतीमध्ये कोणताही Gender Restriction नाही.

RCFL Apprentice Bharti 2026: निवड प्रक्रिया

या भरतीत कोणतीही लेखी परीक्षा नाही. निवड पूर्णपणे Merit वर होणार आहे.

1️⃣ Merit List

पात्रता परीक्षेतील टक्केवारी आणि लागू आरक्षणानुसार Merit List तयार केली जाईल. CGPA/CPI असेल तर University च्या नियमानुसार समकक्ष टक्केवारी अर्जात लिहावी लागेल आणि Document Verification ला त्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल.

2️⃣ Document Verification

Merit List मधील उमेदवारांना Document Verification साठी बोलावले जाईल. याची माहिती फक्त Email द्वारे दिली जाईल.

3️⃣ Apprenticeship Contract

Document Verification पूर्ण झाल्यावर NATS/NAPS पोर्टलवर Apprenticeship Contract मंजूर होईल आणि त्यानंतर Joining होईल.

👉 समान गुण असल्यास जास्त शिक्षण असलेल्या उमेदवाराला प्राधान्य; शिक्षण समान असल्यास आधीच्या परीक्षेत जास्त गुण असलेल्या उमेदवाराला वरचे स्थान.

❌ Interview घेतला जाणार नाही.

❌ लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.

RCFL Apprentice Bharti 2026: अर्ज फी

👉 अधिकृत जाहिरातीत कोणत्याही अर्ज फीचा उल्लेख नाही. म्हणजेच या भरतीसाठी कोणतीही फी भरावी लागणार नाही.

RCFL Apprentice Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे

अर्ज करताना कोणतीही कागदपत्रे पाठवायची नाहीत. फक्त Photo आणि Signature Upload करायचे आहेत. खालील कागदपत्रे Document Verification आणि Joining च्या वेळी लागतील.

✔️ पासपोर्ट साईज रंगीत फोटो (jpg/jpeg, 75 KB पेक्षा कमी) ✔️ स्वाक्षरी (jpg/jpeg, 25 KB पेक्षा कमी) ✔️ PAN Card (अपडेटेड) ✔️ Aadhaar Card (अपडेटेड – नाव शैक्षणिक कागदपत्रांप्रमाणेच असावे) ✔️ स्वतःच्या नावाचे बँक खाते – DBT Enabled आणि Aadhaar-linked (Postal Bank खाते चालणार नाही) ✔️ वयाचा पुरावा – SSC प्रमाणपत्र / जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / पासपोर्ट (कोणतेही एक) ✔️ 10वी, 12वी, Graduation च्या सर्व वर्षांच्या / सेमिस्टरच्या मार्कशीट आणि Passing Certificate ✔️ SSC, HSC आणि Graduation चे Leaving Certificate आणि Student ID ✔️ CGPA असल्यास University कडून समकक्ष टक्केवारीचे प्रमाणपत्र ✔️ Medical Fitness Certificate – सरकारी / महानगरपालिका रुग्णालयातील Registered Medical Officer कडून, फक्त Annexure A च्या Format मध्ये ✔️ जात प्रमाणपत्र – SC/ST (Annexure B Format) ✔️ OBC (NCL) प्रमाणपत्र – केंद्र सरकारच्या Format मध्ये (लागू असल्यास) ✔️ EWS Certificate (लागू असल्यास) ✔️ 1984 दंगलग्रस्त कुटुंबीय प्रमाणपत्र (लागू असल्यास)

RCFL Apprentice Bharti 2026: महत्त्वाच्या Hidden अटी ⭐

❗ फक्त एकाच पदासाठी अर्ज करा

उमेदवाराने फक्त एकाच Discipline/Trade साठी अर्ज करायचा आहे. एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केल्यास उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द केले जातील. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपली पात्रता नीट तपासा.

❗ Posting Location एकदा निवडली की बदलता येणार नाही

अर्ज भरताना “Posting At” मध्ये Trombay किंवा Thal यापैकी एक निवडावे लागेल. एकदा निवड केल्यानंतर ती कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही आणि संपूर्ण प्रशिक्षण कालावधीत Transfer मिळणार नाही.

❗ कायमस्वरूपी नोकरीची कोणतीही हमी नाही

ही Apprenticeship आहे, नोकरी नाही. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर RCF वर Regular नोकरी देण्याचे कोणतेही बंधन नाही. जाहिरातीत हे ठळकपणे नमूद केले आहे.

❗ Distance / Part-Time / Correspondence शिक्षण चालणार नाही

पात्रता परीक्षा Distance Learning, Part-Time किंवा Correspondence पद्धतीने केली असेल तर उमेदवार पात्र नाही आणि अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

❗ पास होण्याची तारीख 01.07.2023 नंतरची असावी

पात्रता परीक्षा 01 जुलै 2023 च्या आधी पास केली असेल तर अर्ज करता येणार नाही. जुन्या पदवीधरांसाठी ही महत्त्वाची अट आहे.

❗ आधी Apprenticeship केली असेल किंवा 1 वर्ष नोकरी केली असेल तर पात्र नाही

ज्यांनी आधी Act Apprentice Training पूर्ण केली आहे, 1 वर्ष किंवा जास्त Job Experience आहे, किंवा सध्या Higher Studies सुरू आहेत – असे उमेदवार पात्र नाहीत.

❗ 50% ची अट कडक आहे

किमान 50% गुण आवश्यक आहेत. फक्त SC/ST आणि PwBD उमेदवारांना अंतिम निवडीत 5% सवलत आहे. OBC/EWS उमेदवारांना गुणांमध्ये सवलत नाही.

❗ Medical Certificate फक्त Annexure A Format मध्येच

Medical Fitness Certificate सरकारी किंवा महानगरपालिका रुग्णालयातील Registered Medical Officer कडून आणि फक्त जाहिरातीतील Annexure A च्या Format मध्येच स्वीकारले जाईल. दुसरा Format चालणार नाही.

❗ Postal Bank खाते चालणार नाही

स्टायपेंड फक्त स्वतःच्या नावाच्या, DBT Enabled आणि Aadhaar-linked बँक खात्यात जमा होईल. Postal Bank (India Post Payments Bank) खाते स्वीकारले जाणार नाही. शक्यतो Nationalized बँकेचे Internet Banking असलेले खाते ठेवा.

❗ Aadhaar वरील नाव शैक्षणिक कागदपत्रांप्रमाणेच असावे

Aadhaar Card वरील नाव आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांवरील नाव एकसारखे असणे बंधनकारक आहे. फरक असेल तर आधीच Aadhaar अपडेट करून घ्या.

❗ Face Recognition Attendance आणि Late आल्यास स्टायपेंड कपात

Training मध्ये Face Recognition Attendance System मध्ये दररोज IN आणि OUT दोन्ही Punch करावे लागतील. एक Punch चुकला तर त्या दिवशी Absent धरले जाईल. उशिरा आल्यास स्टायपेंडमधून प्रमाणशीर कपात होईल.

❗ प्रशिक्षण अर्धवट सोडल्यास Contract रद्द आणि स्टायपेंड Recovery

Valid कारणाशिवाय प्रशिक्षण अर्धवट सोडले किंवा गैरहजर राहिल्यास Contract विना सूचना रद्द केला जाईल, Certificate मिळणार नाही आणि दिलेल्या स्टायपेंडची वसुली होऊ शकते.

❗ Email ने संपर्क – Phone Call किंवा भेट केल्यास अपात्र

Document Verification ची माहिती फक्त Email ने येईल (Spam Folder सुद्धा तपासा). कोणत्याही चौकशीसाठी फक्त apprentice2026@rcfltd.com वर Email करा. Phone Call किंवा Office ला प्रत्यक्ष भेट दिल्यास उमेदवार अपात्र ठरू शकतो.

❗ Training Timing आणि इतर सुविधा

Graduate Apprentice साठी सकाळी 9 ते संध्याकाळी 6, तर Technician आणि Trade Apprentice साठी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 अशी वेळ आहे. प्रवास खर्च किंवा वाहतूक सुविधा कंपनी देणार नाही.

❗ Portal Registration आवश्यक

Trade Apprentice साठी apprenticeshipindia.gov.in (NAPS) वर आणि Graduate/Technician Apprentice साठी nats.education.gov.in (NATS) वर Student म्हणून Registration करणे आवश्यक आहे.

RCFL Apprentice Bharti 2026: अर्ज कसा करायचा?

Step 1

कंपनीच्या अधिकृत वेबसाइट www.rcfltd.com ला भेट द्या.

Step 2

“RECRUITMENT” मध्ये जा आणि “ENGAGEMENT OF APPRENTICES – 2026-27” वर क्लिक करा.

Step 3

संपूर्ण जाहिरात, सूचना आणि अटी काळजीपूर्वक वाचा.

Step 4

“I Accept” वर क्लिक करा आणि नंतर “Apply Online” वर क्लिक करा.

Step 5

“Posting At” Drop-down मधून Trombay किंवा Thal निवडा. (ही निवड नंतर बदलता येणार नाही.)

Step 6

Application Form भरा:

  • Personal Details
  • Educational Details (CGPA असल्यास समकक्ष टक्केवारी)
  • Category Information

Step 7

पासपोर्ट साईज रंगीत फोटो (jpg/jpeg, 75 KB पेक्षा कमी) आणि स्वाक्षरी (jpg/jpeg, 25 KB पेक्षा कमी) Upload करा.

Step 8

“SAVE/SUBMIT” वर क्लिक करून अर्ज Submit करा. Submit झाल्यावर Application Form Generate होईल.

Step 9

“Print” वर क्लिक करून Application Form ची Print काढा. ही Print Document Verification ला लागेल. अर्जाची Hard Copy RCF ला पाठवायची नाही.

👉 Application Number आणि जन्मतारीख जपून ठेवा – Accepted Application Form Download करण्यासाठी हे लागते.

RCFL Apprentice Bharti 2026: Job Benefits

मुख्य फायदे

  • Navratna PSU मध्ये 12 ते 24 महिन्यांचा प्रशिक्षण अनुभव
  • दरमहा ₹14,600 ते ₹17,300 स्टायपेंड
  • मोफत नाश्ता, चहा आणि जेवण
  • RCF Hospital मध्ये OPD सुविधा
  • Uniform आणि PPE मोफत
  • प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर NATS/NAPS चे अधिकृत Apprenticeship Certificate
  • पुढील PSU / Government भरतीसाठी Experience आणि Career Growth
  • कोणतीही परीक्षा किंवा Interview नाही

RCFL Apprentice Bharti 2026: कोणासाठी सर्वोत्तम संधी आहे?

  • 12वी Science पास उमेदवार (Boiler Attendant, Electrician, Medical Lab Technician)
  • 12वी कोणत्याही शाखेतून पास उमेदवार (Horticulture Assistant)
  • Chemical / Civil / Computer / Electrical / Instrumentation / Mechanical Diploma धारक
  • B.Sc (Physics, Chemistry, Mathematics) पदवीधर
  • B.Com / BBA / Economics पदवीधर
  • कोणत्याही शाखेतील पदवीधर (Secretarial Assistant, HR)
  • 2023 नंतर पास झालेले Fresher उमेदवार
  • मुंबई, ठाणे, रायगड आणि कोकण भागातील उमेदवार
  • Government Job तयारी करणारे विद्यार्थी ज्यांना PSU चा अनुभव हवा आहे

RCFL Apprentice Bharti 2026: महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
अर्ज सुरू04 सप्टेंबर 2026 (सकाळी 08:00)
शेवटची तारीख20 सप्टेंबर 2026 (संध्याकाळी 05:00 पर्यंत)
वयाची गणना01 सप्टेंबर 2026
Document VerificationEmail द्वारे कळवले जाईल

RCFL Apprentice Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFइथे क्लिक करा
Online अर्जइथे क्लिक करा (Recruitment → Engagement of Apprentices 2026-27)
NATS Registration (Graduate/Technician)इथे क्लिक करा
NAPS Registration (Trade)इथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

RCFL Apprentice Bharti 2026: FAQs

RCFL Apprentice साठी पात्रता काय आहे?

पदानुसार 12वी Science / 12वी पास, Engineering Diploma, B.Sc (PCM), B.Com/BBA किंवा Any Graduate असावे. किमान 50% गुण आवश्यक आणि पात्रता परीक्षा 01.07.2023 नंतर Regular पद्धतीने पास केलेली असावी.

किती जागा आहेत?

एकूण 326 जागा – Graduate Apprentice 145, Technician Apprentice 105 आणि Trade Apprentice 76. Trombay साठी 177 आणि Thal साठी 149 जागा आहेत.

वयोमर्यादा किती आहे?

01 सप्टेंबर 2026 रोजी किमान 18 आणि कमाल 25 वर्ष. SC/ST ला 5 वर्ष, OBC ला 3 वर्ष आणि PwBD ला 10 वर्ष सवलत आहे.

स्टायपेंड किती आहे?

Graduate Apprentice आणि B.Sc Trade Apprentice ना ₹17,300, Diploma Technician Apprentice ना ₹15,900 आणि 12वी Trade Apprentice ना ₹14,600 दरमहा.

निवड प्रक्रिया काय आहे?

कोणतीही लेखी परीक्षा किंवा Interview नाही. पात्रता परीक्षेच्या टक्केवारीनुसार Merit List तयार होईल आणि नंतर Document Verification होईल.

अर्ज फी किती आहे?

जाहिरातीत कोणत्याही अर्ज फीचा उल्लेख नाही, त्यामुळे अर्ज मोफत आहे.

प्रशिक्षण कालावधी किती आहे?

Graduate, Technician आणि B.Sc Trade Apprentice साठी 12 महिने; Boiler Attendant, Electrician आणि Horticulture Assistant साठी 24 महिने; Medical Laboratory Technician साठी 15 महिने.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

हो. दोन्ही Training ठिकाणे – Trombay (मुंबई) आणि Thal (रायगड) – महाराष्ट्रातच आहेत.

महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?

हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.

एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करता येतो का?

नाही. फक्त एकाच पदासाठी अर्ज करा. जास्त अर्ज केल्यास सर्व अर्ज रद्द होतील.

प्रशिक्षणानंतर RCF मध्ये कायम नोकरी मिळेल का?

नाही. ही फक्त Apprenticeship आहे. प्रशिक्षणानंतर Regular नोकरी देण्याचे कंपनीवर कोणतेही बंधन नाही.

शेवटची तारीख कधी आहे?

20 सप्टेंबर 2026, संध्याकाळी 05:00 पर्यंत Online अर्ज करता येईल.

इतर भरती अपडेट्स

SSC JE Bharti 2026: SSC JE मेगा भरती! 1748 जागा, Diploma/Degree पास मुले/मुली, लगेच इथून अर्ज करा

ITBP CAPF Medical Officer Bharti 2026: इंडो-तिबेटन बॉर्डर भरती! पगार ₹56,100 ते ₹78,800, लगेच इथून अर्ज करा

Police Bharti 2027: पोलिस भरती २०२७! निवड प्रक्रिया, PYQ, Preparation Tips आणि नोव्हेंबर भरतीबद्दल सविस्तर माहिती, इथे बघा

India Post GDS Cut-off 2026: पोस्ट भरती Cut-off! महाराष्ट्र सर्कल Category-wise Cut-off, लगेच इथून बघा

Bombay High Court Bharti 2026: औरंगाबाद खंडपीठात भरती! पगार ₹52,400, 4थी पास मुले/मुली, लगेच इथून अर्ज करा

NIC Bharti 2026: राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात भरती! GATE स्कोअरवर निवड, पगार ₹1,12,400, लगेच इथून अर्ज करा

India Post GDS Bharti 2026: 10वी पासवर इंडिया पोस्ट GDS भरती जाहीर, परीक्षा नाही डायरेक्ट मेरिटलिस्ट, लगेच इथून अर्ज करा

High Explosives Factory Khadki Bharti 2026: हाय एक्सप्लोसिव फॅक्टरी खडकी भरती! पगार ₹19,900+, लगेच इथून अर्ज करा

GMC Latur Bharti 2026: लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती! गट ड पदे, १०वी पास मुले/मुली, लगेच इथून अर्ज करा

Leave a comment