Bank of Baroda Bharti 2026: बँक ऑफ बडोदा भरती! पगार ₹1,05,280 पर्यंत, लगेच इथून अर्ज करा

Bank of Baroda Bharti 2026 या भरतीमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, पगार, एकूण जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का आणि महत्त्वाच्या Hidden अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

Bank of Baroda ही भारतातील सर्वात मोठ्या सरकारी बँकांपैकी एक असून, बँकेने Information Technology (IT) डिपार्टमेंटसाठी तब्बल 418 जागांची मेगा भरती जाहीर केली आहे. Java, MERN Stack, Cloud, AI/GenAI, Database, Network, Finacle, API Developer अशा तब्बल 38 वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती असून, पगार थेट ₹1,05,280 पर्यंत आहे.

IT/Computer Science शाखेतील B.E./B.Tech/M.Tech/M.E./MCA झालेल्या आणि Software Development, Cloud, AI, Database, Networking क्षेत्रात अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Bank of Baroda Bharti 2026: संपूर्ण माहिती

घटकतपशील
भरती संस्थाBank of Baroda
जाहिरात क्रमांकBOB/HRM/REC/ADVT/2026/04
डिपार्टमेंटInformation Technology (IT)
पदाचे नाव38 वेगवेगळी IT पदे (Officer/Manager/Senior Manager)
एकूण जागा418
अर्ज पद्धतOnline
नोकरी ठिकाणबँकेच्या निर्णयानुसार भारतातील कोणत्याही शाखेत/कार्यालयात
निवड प्रक्रियाOnline Test + Psychometric Test/PI
पगार₹48,480 ते ₹1,05,280 (Grade नुसार)
अर्ज सुरू30.01.2026
शेवटची तारीख (अर्ज + फी)19.02.2026
अधिकृत वेबसाइटwww.bankofbaroda.bank.in

Bank of Baroda Bharti 2026: एकूण जागा (Vacancy Details)

IT डिपार्टमेंटमध्ये एकूण 418 जागा असून, त्या 38 वेगवेगळ्या पदांमध्ये विभागल्या आहेत. महत्त्वाच्या पदांची यादी आणि जागा खाली दिल्या आहेत:

पदाचे नावग्रेडजागा
Senior Manager- Developer Full Stack JAVAMMG/S-III28
Manager-Developer Full Stack JAVAMMG/S-II27
Officer-Developer Full Stack JAVAJMG/S-I3
Senior Manager Developer- Full Stack MERNMMG/S-III20
Manager-Developer- Full Stack MERNMMG/S-II34
Officer-Developer- Full Stack MERNJMG/S-I8
Officer-Cloud EngineerJMG/S-I11
Manager-Cloud EngineerMMG/S-II24
Officer- AI Engineer (AI/GenAI/NLP/ML)JMG/S-I4
Manager- AI Engineer (AI/GenAI/NLP/ML)MMG/S-II23
Senior Manager AI Engineer (AI/GenAI/NLP/ML)MMG/S-III12
Officer- API DeveloperJMG/S-I4
Senior Manager- API DeveloperMMG/S-III18
Manager- Network AdministratorMMG/S-II13
Officer- Network AdministratorJMG/S-I7
Manager- Server Administrator (Linux & Unix)MMG/S-II23
Officer- Server Administrator (Linux & Unix)JMG/S-I6
Senior Manager Database Administrator (SQL)MMG/S-III3
Senior Manager Database Administrator (Oracle)MMG/S-III13
Manager-Database AdministratorMMG/S-II16
Officer- Database AdministratorJMG/S-I5
Senior Manager- Data ScientistMMG/S-III4
Manager- Data ScientistMMG/S-II9
Senior Manager Data EngineerMMG/S-III5
Manager – Data EngineerMMG/S-II8
Officer Data EngineerJMG/S-I3
Officer- Finacle DeveloperJMG/S-I5
Manager- Finacle DeveloperMMG/S-II19
Senior Manager- Finacle DeveloperMMG/S-III8
Senior Manager- Enterprise ArchitectMMG/S-III10
Senior Storage Administrator and BackupMMG/S-III2
Manager – ETL DeveloperMMG/S-II2
Manager – Postgress AdministratorMMG/S-II2
Senior Manager – ETL DevelopersMMG/S-III3
Manager -Storage Administrator and BackupMMG/S-II6
Manager -Developer – Mobile Application DevelopmentMMG/S-II7
Senior Manager – Developer – Mobile Application DevelopmentMMG/S-III7
Manager – API DeveloperMMG/S-II16
एकूण418

प्रवर्गनिहाय (Category-wise) जागा:

प्रवर्गजागा
SC58
ST13
OBC115
EWS36
UR (Unreserved)196
PwBD (एकूण)4
एकूण418

👉 आरक्षण SC, ST, OBC, EWS आणि PwBD उमेदवारांसाठी लागू आहे.

⚠️ नोट: पदसंख्या कमी किंवा जास्त होऊ शकते, बँकेच्या गरजेनुसार जागा बदलू शकतात.

Bank of Baroda Bharti 2026: शैक्षणिक पात्रता

सर्व पदांसाठी मूलभूत शैक्षणिक पात्रता जवळपास सारखीच आहे — फक्त अनुभवाच्या वर्षांत फरक आहे (Officer कमी अनुभव, Manager मध्यम, Senior Manager जास्त अनुभव). खाली पद-गटानुसार सविस्तर माहिती दिली आहे.

फुल स्टॅक डेव्हलपर पदांसाठी (JAVA / MERN)

  • शिक्षण: Full Time B.E./B.Tech./M.Tech/M.E./MCA — Computer Science/Information Technology/Electronics & Communication
  • Officer: किमान 1 वर्ष तांत्रिक अनुभव
  • Manager: किमान 3 वर्ष सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अनुभव, त्यातील किमान 1 वर्ष JAVA/MERN क्षेत्रात
  • Senior Manager: किमान 5 वर्ष सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अनुभव, त्यातील किमान 2 वर्ष JAVA/MERN क्षेत्रात

क्लाउड इंजिनिअर आणि AI इंजिनिअर पदांसाठी

  • शिक्षण: वरीलप्रमाणेच (B.E./B.Tech/M.Tech/M.E./MCA)
  • Officer-Cloud Engineer: किमान 1 वर्ष तांत्रिक अनुभव
  • Manager-Cloud Engineer: किमान 3 वर्ष तांत्रिक अनुभव, त्यातील किमान 1 वर्ष Cloud Computing मध्ये
  • Officer-AI Engineer: किमान 1 वर्ष AI/NLP/ML/Python संबंधित अनुभव
  • Manager-AI Engineer: किमान 3 वर्ष अनुभव
  • Senior Manager-AI Engineer: किमान 5 वर्ष अनुभव

नेटवर्क, सर्व्हर आणि डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर पदांसाठी

  • शिक्षण: B.E./B.Tech/M.Tech/M.E./MCA — Computer Science/IT/Electronics & Communication
  • Officer (Network/Server/Database): किमान 1 वर्ष तांत्रिक अनुभव
  • Manager (Network/Server/Database): किमान 3 वर्ष तांत्रिक अनुभव
  • Senior Manager Database Administrator (SQL/Oracle): किमान 5 वर्ष तांत्रिक अनुभव, त्यातील किमान 2 वर्ष Database Administration मध्ये

डेटा सायंटिस्ट आणि डेटा इंजिनिअर पदांसाठी

  • Manager/Senior Manager Data Scientist: BFSI क्षेत्रातील IT/Data Science अनुभव अनिवार्य (Manager: 3 वर्ष, Senior Manager: 5 वर्ष, त्यातील अर्धा भाग Data Scientist म्हणून)
  • Officer/Manager/Senior Manager Data Engineer: BFSI क्षेत्रातील IT अनुभव + Big Data Technology मधील अनुभव आवश्यक

API डेव्हलपर, Finacle डेव्हलपर आणि एंटरप्राइझ आर्किटेक्ट पदांसाठी

  • Officer/Manager/Senior Manager API Developer: 1 ते 5 वर्षांपर्यंत अनुभव (पदानुसार), API Development मधील अनुभव प्राधान्य
  • Officer/Manager/Senior Manager Finacle Developer: Finacle 10 आणि FI/Connect 24 integration चा अनुभव आवश्यक
  • Senior Manager-Enterprise Architect: किमान 5 वर्ष तांत्रिक अनुभव, त्यातील 2 वर्ष Banking Platform Architecture मध्ये

स्टोरेज, ETL, Postgres आणि मोबाईल ॲप डेव्हलपमेंट पदांसाठी

  • Storage Administrator (Manager/Senior Manager): 3 ते 5 वर्ष अनुभव, Storage & Backup मधील अनुभव अनिवार्य
  • ETL Developer (Manager/Senior Manager): 3 ते 5 वर्ष IT अनुभव, ETL Development मधील अनुभव अनिवार्य
  • Postgres Administrator (Manager): किमान 3 वर्ष अनुभव, त्यातील 1 वर्ष PostgreSQL Administration मध्ये
  • Mobile Application Developer (Manager/Senior Manager): Software Development मधील 3 ते 5 वर्ष अनुभव

👉 सर्व शैक्षणिक पात्रता भारत सरकार/AICTE मान्यताप्राप्त संस्थेतून असणे आवश्यक आहे.

👉 6 महिन्यांपेक्षा कमी post-qualification अनुभव पात्रतेसाठी गृहीत धरला जाणार नाही (सध्याच्या नोकरीचा भाग असल्याशिवाय).

Bank of Baroda Bharti 2026: वयोमर्यादा (Age Limit)

वय 01.01.2026 रोजी खालीलप्रमाणे असावे:

ग्रेडकिमान वयकमाल वय
JMG/S-I (Officer)22 वर्ष32 वर्ष
MMG/S-II (Manager)24 वर्ष34 वर्ष
MMG/S-III (Senior Manager)27 वर्ष37 वर्ष

वयोमर्यादा सवलत (Age Relaxation):

प्रवर्गवयोमर्यादा सवलत
SC/ST+5 वर्ष
OBC (Non-Creamy Layer)+3 वर्ष
PwBD (General/EWS)+10 वर्ष
PwBD (OBC)+13 वर्ष
PwBD (SC/ST)+15 वर्ष
Ex-Servicemen (General/EWS)+5 वर्ष
Ex-Servicemen (OBC)+8 वर्ष
Ex-Servicemen (SC/ST)+10 वर्ष

⚠️ वयाची गणना 01.01.2026 नुसार केली जाईल.

❗ Officer’s कॅडरसाठी Ex-Servicemen आरक्षण लागू नाही (फक्त वयोमर्यादा सवलत लागू आहे).

Bank of Baroda Bharti 2026: पगार (Salary)

Grade नुसार Pay Scale खालीलप्रमाणे आहे:

ग्रेडPay Scale
MMG/S-I₹48,480 – ₹85,920
MMG/S-II₹64,820 – ₹93,960
MMG/S-III₹85,920 – ₹1,05,280

अतिरिक्त फायदे

  • DA, HRA आणि इतर Bank-specific Allowances
  • Industry-level Bipartite Settlement आणि Joint Note नुसार भत्ते
  • Medical, PF/Pension सुविधा बँकेच्या धोरणानुसार

👉 ही Banking क्षेत्रातील अत्यंत चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मानली जाते.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

✅ हो, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो.

ही All India Recruitment आहे त्यामुळे महाराष्ट्रासह भारतातील कोणत्याही राज्यातून उमेदवार अर्ज करू शकतात. Online Exam साठी Mumbai/Navi Mumbai/Thane/MMR, Pune, Nagpur या केंद्रांचा समावेश आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांना जवळचे केंद्र मिळू शकते.

मुलगा आणि मुलगी दोघे अर्ज करू शकतात का?

✅ हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.

या भरतीमध्ये कोणताही Gender Restriction नाही. महिला उमेदवारांसाठी अर्ज फी मध्ये सवलत (₹175/-) देखील दिली आहे.

Bank of Baroda Bharti 2026: निवड प्रक्रिया (Selection Process)

1️⃣ Application Scrutiny — अर्जाची छाननी

2️⃣ Online Test — खालील पॅटर्ननुसार:

विभागप्रश्न संख्यागुणवेळ
Reasoning252575 मिनिटे (एकत्रित)
English Language252575 मिनिटे (एकत्रित)
Quantitative Aptitude252575 मिनिटे (एकत्रित)
Professional Knowledge7515075 मिनिटे
एकूण150225150 मिनिटे
  • Reasoning, English आणि Quant Aptitude हे विभाग फक्त Qualifying स्वरूपाचे आहेत — त्यांचे गुण अंतिम निकालात मोजले जाणार नाहीत.
  • या तीन विभागांसाठी किमान पात्रता गुण: General/EWS साठी 40%, Reserved Category साठी 35%
  • ❌ चुकीच्या उत्तरासाठी Negative Marking नाही.

3️⃣ Psychometric Test / Personal Interview (PI) — Online Test मधील कामगिरीनुसार शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना बोलावले जाईल

  • PI साठी किमान पात्रता गुण: General Category — 60%, Reserved Category — 55%

4️⃣ Final Selection — Online Test आणि PI मधील एकत्रित गुणांवर आधारित

Bank of Baroda Bharti 2026: अर्ज फी

प्रवर्गफी
General / EWS / OBC₹850/- (GST सह) + Payment Gateway Charges
SC / ST / PwBD / ESM/DESM / Women₹175/- (GST सह) + Payment Gateway Charges

👉 फी Online पद्धतीने (Debit Card/Credit Card/Internet Banking/UPI) भरावी लागेल.

👉 फी Non-refundable आहे — Online Test झाला किंवा नाही, Shortlist झाला किंवा नाही, तरीही फी परत मिळणार नाही.

Bank of Baroda Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे

✔️ अद्ययावत Resume ✔️ 10वी मार्कशीट/प्रमाणपत्र (जन्मतारखेचा पुरावा म्हणून) ✔️ Graduation/PG मार्कशीट व प्रमाणपत्र (सेमिस्टर/वर्षनिहाय) ✔️ Photo Identity Proof (PAN/Passport/Driving License/Voter ID/Aadhar) ✔️ जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC — लागू असल्यास, विहित नमुन्यात) ✔️ EWS Certificate (लागू असल्यास) ✔️ PwBD Certificate (लागू असल्यास, District Medical Board कडून) ✔️ अनुभवाचा पुरावा (Appointment Letter, Salary Slip, Relieving Letter) ✔️ पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी (विहित size मध्ये)

Bank of Baroda Bharti 2026: महत्त्वाच्या Hidden अटी ⭐

❗ CIBIL Score किमान 680 आवश्यक

Joining च्या वेळी उमेदवाराचा CIBIL Score किमान 680 किंवा त्यापेक्षा जास्त असणे बंधनकारक आहे. जर Credit History खराब असेल किंवा Loan/Credit Card थकबाकी असेल, तर उमेदवार अपात्र ठरू शकतो — अगदी Joining नंतरही candidature रद्द होऊ शकते.

❗ Service Bond — 3 वर्ष किंवा ₹5 लाख

निवड झालेल्या उमेदवाराला किमान 3 वर्षे बँकेत सेवा देणे बंधनकारक आहे. जर या कालावधीत नोकरी सोडली, तर बँकेला ₹5,00,000 (पाच लाख रुपये) भरपाई द्यावी लागेल.

❗ Posting संपूर्ण भारतात कुठेही होऊ शकते

निवड झालेल्या उमेदवाराला बँकेच्या निर्णयानुसार भारतातील कोणत्याही शाखेत किंवा कार्यालयात पोस्टिंग दिली जाऊ शकते. फक्त भारतात कुठेही सेवा देण्यास तयार असणारेच अर्ज करावेत.

❗ Probation Period — 12 महिने

निवड झालेल्या उमेदवाराला 12 महिन्यांच्या Probation Period वर ठेवले जाईल.

❗ Category बदलता येणार नाही

एकदा Online Application मध्ये Category निवडली की, नंतर कोणत्याही टप्प्यावर ती बदलता येणार नाही.

❗ फक्त एकाच पदासाठी अर्ज करता येतो

एका उमेदवाराला फक्त एका पदासाठीच अर्ज करता येईल. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास, फक्त शेवटचा Valid अर्ज ग्राह्य धरला जाईल आणि इतर अर्जांची फी जप्त होईल.

❗ Percentage Calculation ची काळजी घ्या

59.99% गुण असतील तर ते 60% पेक्षा कमी मानले जातील, आणि 54.99% गुण 55% पेक्षा कमी मानले जातील — त्यामुळे टक्केवारी काळजीपूर्वक भरा.

❗ Govt/PSU कर्मचाऱ्यांसाठी NOC आवश्यक

Government/Quasi-Government/PSU (Nationalised Banks सह) मध्ये सध्या काम करणाऱ्या उमेदवारांनी Interview च्या वेळी “No Objection Certificate” (NOC) सादर करणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांची Candidature विचारात घेतली जाणार नाही.

Bank of Baroda Bharti 2026: अर्ज कसा करायचा?

Step 1

www.bankofbaroda.bank.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Step 2

Career Section → Current Opportunities मध्ये जा.

Step 3

संबंधित जाहिरातीची लिंक शोधून Online Registration करा.

Step 4

Application Form भरा:

  • Personal Details
  • Educational Details
  • Category Information
  • Work Experience Details

Step 5

आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी विहित size मध्ये Upload करा (Photo: 20-50kb, Signature: 10-20kb, JPG/JPEG format).

Step 6

Online पद्धतीने Application Fee भरा (Debit/Credit Card/Net Banking/UPI).

Step 7

Application Form Submit करून त्याची Printout काढून जपून ठेवा.

Bank of Baroda Bharti 2026: Job Benefits

मुख्य फायदे

  • सरकारी बँकेतील स्थिर आणि सुरक्षित नोकरी (Job Security)
  • ₹1,05,280 पर्यंत आकर्षक पगार + भत्ते
  • All India Exposure आणि Career Growth ची संधी
  • IT/Tech क्षेत्रातील Specialized Roles मध्ये काम करण्याची संधी
  • Banking क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची संधी

Bank of Baroda Bharti 2026: कोणासाठी सर्वोत्तम संधी आहे?

  • B.E./B.Tech/M.Tech/M.E./MCA (Computer Science/IT/Electronics) झालेले उमेदवार
  • Java, MERN Stack, Cloud, AI/ML क्षेत्रात अनुभव असलेले Developers/Engineers
  • Database, Network, Server Administration मध्ये अनुभव असलेले IT Professionals
  • Data Scientist, Data Engineer म्हणून काम करणारे उमेदवार
  • Finacle Platform वर काम केलेले Banking IT Professionals
  • High Salary सरकारी बँकिंग नोकरी शोधणारे तंत्रज्ञ

Bank of Baroda Bharti 2026: महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
Online Registration सुरू30.01.2026
Online Registration शेवटची तारीख19.02.2026
Application Fee भरण्याची शेवटची तारीख19.02.2026
Online Test तारीखस्वतंत्रपणे जाहीर होईल
Call Letter/Admit Cardनंतर जाहीर होईल

Bank of Baroda Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFइथे क्लिक करा
Online अर्जइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Bank of Baroda Bharti 2026: FAQs

Bank of Baroda IT Bharti 2026 साठी एकूण किती जागा आहेत?

या भरतीमध्ये Information Technology डिपार्टमेंटसाठी एकूण 418 जागा आहेत, ज्या 38 वेगवेगळ्या पदांमध्ये विभागल्या आहेत.

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

बहुतांश पदांसाठी Full Time B.E./B.Tech/M.Tech/M.E./MCA (Computer Science/Information Technology/Electronics & Communication) आवश्यक आहे, सोबत पदानुसार 1 ते 5 वर्षांचा तांत्रिक अनुभव लागतो.

वयोमर्यादा किती आहे?

ग्रेडनुसार वयोमर्यादा वेगळी आहे — Officer साठी 22-32 वर्ष, Manager साठी 24-34 वर्ष आणि Senior Manager साठी 27-37 वर्ष (01.01.2026 रोजी).

पगार किती आहे?

ग्रेडनुसार ₹48,480 पासून ते ₹1,05,280 पर्यंत Basic Pay असून, त्यासोबत DA, HRA आणि इतर Bank Allowances मिळतात.

निवड प्रक्रिया काय आहे?

Application Scrutiny → Online Test (Reasoning, English, Quant Aptitude — Qualifying + Professional Knowledge — Merit साठी) → Psychometric Test/Personal Interview → Final Selection.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

हो, ही All India Recruitment असल्यामुळे महाराष्ट्रासह भारतातील कोणत्याही राज्यातून अर्ज करता येतो. Mumbai, Pune, Nagpur या केंद्रांवरून Exam देता येऊ शकते.

महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?

हो, महिला उमेदवारांना अर्ज करता येतो आणि त्यांना अर्ज फी मध्ये सवलत (₹175/-) देखील आहे.

शेवटची तारीख कधी आहे?

Online Application आणि Fee Payment ची शेवटची तारीख 19.02.2026 आहे.

Service Bond किती वर्षांचा आहे?

निवड झालेल्या उमेदवाराला 3 वर्षे सेवा देणे बंधनकारक आहे, अन्यथा ₹5 लाख भरपाई द्यावी लागेल.

CIBIL Score किती लागतो?

Joining च्या वेळी किमान 680 CIBIL Score असणे आवश्यक आहे.

इतर भरती अपडेट्स

PDCC Bank Peon Bharti 2026: PDCC बँकेत शिपाई पदांसाठी भरती! 12वी पास मुले/मुली लगेच इथून अर्ज करा

RCF Management Trainee Bharti 2026: राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये भरती! BE/B.Tech पास, लगेच इथून अर्ज करा

PNB LBO Bharti 2026: पंजाब नॅशनल बँकेत भरती! पगार ₹85,920, Graduate पास, लगेच इथून अर्ज करा

Deloitte Bharti 2026:Deloitte मध्ये Associate Analyst पदांची भरती! Freshers मुल/मुली, लगेच इथून अर्ज करा

IBPS Clerk Bharti 2026: IBPS मार्फत 11,403 जागांची मेगा भरती! ग्रॅज्युएशन पास मुल/मुली, लगेच इथून अर्ज करा

IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026: भारतीय वायुसेनेत अग्निवीरवायु भरती! 10वी पास मुलांनी, लगेच इथून अर्ज करा

HAL Bharti 2026: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती! पगार ₹1,60,000 पर्यंत, लगेच इथून अर्ज करा

Accenture Freshers Hiring 2026: Accenture AI/ML Associate पदाची भरती! Freshers मुल/मुली, लगेच इथून अर्ज करा

BPCL Bharti 2026: भारत पेट्रोलियम भरती! Diploma पास मुल/मुली लगेच इथून अर्ज करा

ISRO URSC Bharti 2026: ISRO U.R. राव सॅटेलाइट सेंटर मध्ये भरती! इंजीनियरिंग/डिप्लोमा पास मुल मुली, लगेच इथून अर्ज करा

Tech Mahindra Bharti 2026: टेक महिंद्रा मध्ये Hiring! पगार ₹6 LPA पर्यंत, Freshers लगेच इथून अर्ज करा

SPMCIL Bharti 2026: सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशनमध्ये भरती! पगार ₹1,60,000 पर्यंत, लगेच इथून अर्ज करा

RRB JE Bharti 2026: भारतीय रेल्वेत 4098 जागांची मेगा भरती! फक्त CBT परीक्षा, लवकरच अर्ज सुरू

Concentrix Recruitment 2026: Concentrix फ्रेशर्स Hiring! ग्रॅज्युएट मुल/मुली, लगेच इथून अर्ज करा

ISRO Bharti 2026: इस्रो(ISRO) भरती 2026! ग्रॅज्युएशन पास मुल/मुली, लगेच इथून अर्ज करा

Leave a comment