Konkan Railway Bharti 2026 या भरतीमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, पगार, एकूण जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का आणि महत्त्वाच्या Hidden अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ही महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यांना जोडणारी महत्त्वाची रेल्वे संस्था आहे. KRCL ने Employment Notification No. CO/P-R/02/2026 अंतर्गत विविध पदांसाठी तब्बल 201 जागांची मोठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये Junior Engineer, Station Master, Assistant Loco Pilot, Track Maintainer यांसारख्या अनेक पदांचा समावेश आहे.
10वी पास उमेदवारांपासून ते इंजिनिअरिंग पदवीधर उमेदवारांपर्यंत सर्वांसाठी या भरतीमध्ये संधी उपलब्ध आहे, त्यामुळे ही भरती महाराष्ट्रातील तरुणांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Konkan Railway Bharti 2026: संपूर्ण माहिती
| घटक | तपशील |
|---|---|
| भरती संस्था | Konkan Railway Corporation Ltd. (KRCL) |
| जाहिरात क्रमांक | CO/P-R/02/2026 |
| पदाचे नाव | Junior Engineer, Senior Section Engineer, Station Master, Section Controller, Goods Train Manager, Assistant Loco Pilot, Technician-III, ESTM-III, Commercial Supervisor, Track Maintainer |
| एकूण जागा | 201 |
| अर्ज पद्धत | Online |
| नोकरी ठिकाण | Maharashtra, Goa, Karnataka (KRCL Route) |
| निवड प्रक्रिया | CBT + (काही पदांसाठी CBAT/Aptitude Test) + Document Verification + Medical + (Track Maintainer साठी PET) |
| पगार | ₹18,000 ते ₹44,900 (Level-1 ते Level-7) |
| जाहिरात तारीख | 31/07/2026 |
| अर्ज सुरू | ऑगस्ट 2026 च्या शेवटच्या आठवड्यात (तात्पुरती तारीख) |
| CBT परीक्षा | सप्टेंबर 2026 (तात्पुरती) |
| अधिकृत वेबसाइट | www.konkanrailway.com |
Konkan Railway Bharti 2026: एकूण जागा (Vacancy Details)
KRCL ने एकूण 12 पदांसाठी 201 जागा जाहीर केल्या आहेत. विभागनिहाय आणि पदनिहाय जागांचा तपशील खालीलप्रमाणे:
| विभाग | पदाचे नाव | मेडिकल कॅटेगरी | एकूण जागा |
|---|---|---|---|
| Civil | Junior Engineer | A-3 | 25 |
| Civil | Track Maintainer | A-3 | 57 |
| S & T | Senior Section Engineer | A-3 | 05 |
| S & T | ESTM-III | B-1 | 15 |
| Operating | Section Controller | A-2 | 09 |
| Operating | Station Master | A-2 | 15 |
| Operating | Goods Train Manager | A-2 | 10 |
| Electrical | Assistant Loco Pilot | A-1 | 30 |
| Mechanical | Senior Section Engineer | A-3 | 06 |
| Mechanical | Junior Engineer | A-3 | 07 |
| Mechanical | Technician/III | B-1 | 15 |
| Commercial | Commercial Supervisor | C-1 | 07 |
| एकूण | 201 |
Category-wise वाटप: UR – 105, EWS – 27, OBC-NCL – 10, SC – 40, ST – 19, Ex-Servicemen – 20, PwBD – 1
👉 आरक्षण SC, ST, OBC-NCL, EWS आणि PwBD उमेदवारांसाठी लागू आहे. ⚠️ नोट: पदसंख्या कमी किंवा जास्त होऊ शकते, KRCL वेबसाइटवर अपडेटेड जागा प्रसिद्ध करू शकते. ⚠️ Track Maintainer (Erstwhile Group-D) पद फक्त Land Loser उमेदवारांसाठीच भरले जाणार आहे.
Konkan Railway Bharti 2026: शैक्षणिक पात्रता
पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे:
Junior Engineer (Civil / Mechanical)
Civil/Mechanical Engineering मधील 3 वर्षांचा Diploma किंवा संबंधित शाखेतील Degree (AICTE मान्यताप्राप्त संस्थेतून).
Senior Section Engineer (S&T / Mechanical)
Electrical/Electronics/IT/Communication/Computer Science किंवा Mechanical Engineering मधील 4 वर्षांची Bachelor’s Degree.
Track Maintainer
10वी उत्तीर्ण (मान्यताप्राप्त बोर्डातून).
Assistant Loco Pilot / Technician-III / ESTM-III
10वी पास + ITI (NCVT/SCVT) संबंधित ट्रेडमध्ये, किंवा Course Completed Act Apprenticeship (CCAA), किंवा 3 वर्षांचा संबंधित Diploma.
Section Controller / Station Master / Goods Train Manager / Commercial Supervisor
कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) मान्यताप्राप्त विद्यापीठातून.
👉 Diploma/Degree Engineering उमेदवार ITI ऐवजी Technician पदासाठी पात्र ठरणार नाहीत, ITI/CCAA अनिवार्य आहे. 👉 Final वर्षाचे निकाल प्रलंबित असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात, मात्र Document Verification वेळी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
Konkan Railway Bharti 2026: वयोमर्यादा (Age Limit)
Group C पदांसाठी: 18 ते 36 वर्षे Track Maintainer (Erstwhile Group D) साठी: 18 ते 45 वर्षे
वयाची गणना 01/08/2026 रोजी केली जाईल.
| प्रवर्ग | Group C वयोमर्यादा सवलत | Track Maintainer वयोमर्यादा सवलत |
|---|---|---|
| SC/ST | 5 वर्ष (कमाल 41 वर्षे) | 5 वर्ष (कमाल 50 वर्षे) |
| OBC (NCL) | 3 वर्ष (कमाल 39 वर्षे) | लागू नाही |
| Ex-Servicemen (UR & EWS) | 3 वर्ष (कमाल 39 वर्षे) | 3 वर्ष (कमाल 48 वर्षे) |
| Ex-Servicemen (OBC-NCL) | 6 वर्ष (कमाल 42 वर्षे) | लागू नाही |
| Ex-Servicemen (SC/ST) | 8 वर्ष (कमाल 44 वर्षे) | 8 वर्ष (कमाल 53 वर्षे) |
| PwBD (UR & EWS) | 10 वर्ष (कमाल 46 वर्षे) | — |
| PwBD (OBC-NCL) | 13 वर्ष (कमाल 49 वर्षे) | — |
| PwBD (SC/ST) | 15 वर्ष (कमाल 51 वर्षे) | — |
⚠️ वयाची गणना 01/08/2026 नुसार केली जाईल. ⚠️ एकापेक्षा जास्त कारणांसाठी सवलत मिळणाऱ्या उमेदवारांना जास्तीत जास्त सवलत असलेल्या प्रवर्गाचा फायदा मिळेल, cumulative सवलत मिळणार नाही.
Konkan Railway Bharti 2026: पगार (Salary)
पदानुसार पगार खालीलप्रमाणे आहे (7th CPC नुसार):
| पद | ग्रुप | Pay Level | सुरुवातीचा पगार |
|---|---|---|---|
| Senior Section Engineer (S&T/Mechanical) | C | Level-7 | ₹44,900 |
| Junior Engineer (Civil/Mechanical) | C | Level-6 | ₹35,400 |
| Section Controller | C | Level-6 | ₹35,400 |
| Station Master | C | Level-6 | ₹35,400 |
| Commercial Supervisor | C | Level-6 | ₹35,400 |
| Goods Train Manager | C | Level-5 | ₹29,200 |
| Technician-III (Mechanical) | C | Level-2 | ₹19,900 |
| ESTM-III (S&T) | C | Level-2 | ₹19,900 |
| Assistant Loco Pilot | C | Level-2 | ₹19,900 |
| Track Maintainer-IV | D | Level-1 | ₹18,000 |
अतिरिक्त फायदे
DA (Dearness Allowance), HRA, वैद्यकीय सुविधा, PF/Pension योजना आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या इतर सर्व भत्त्यांचा समावेश यात असतो.
👉 ही Public Sector Undertaking (PSU) क्षेत्रातील अत्यंत स्थिर आणि चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मानली जाते.
महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?
✅ हो, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो.
ही भरती Maharashtra, Goa आणि Karnataka राज्यांसाठी लागू आहे. विशेषतः Raigad, Sindhudurg आणि Ratnagiri या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील उमेदवारांना Employment Exchange registration द्वारे प्राधान्य मिळू शकते. तसेच Maharashtra राज्याचे Domicile असणारे उमेदवारही तिसऱ्या प्राधान्य श्रेणीत अर्ज करू शकतात.
मुलगा आणि मुलगी दोघे अर्ज करू शकतात का?
✅ हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.
या भरतीमध्ये कोणताही Gender Restriction नाही. मात्र PET (Physical Efficiency Test) साठी पुरुष आणि महिला उमेदवारांचे निकष वेगवेगळे ठेवण्यात आले आहेत.
Konkan Railway Bharti 2026: निवड प्रक्रिया (Selection Process)
1️⃣ Computer Based Test (CBT) — सर्व पदांसाठी अनिवार्य, 5 भाषांमध्ये (English, Hindi, Marathi, Konkani, Kannada) उपलब्ध
2️⃣ CBAT/OMR Based Aptitude Test — फक्त Section Controller, Station Master आणि Assistant Loco Pilot साठी (English आणि Hindi मध्ये). यामध्ये CBT ला 70% आणि Aptitude Test ला 30% weightage दिले जाते.
3️⃣ Document Verification (DV) — मेरिट यादीनुसार पदसंख्येच्या 5 पट उमेदवार बोलावले जातील
4️⃣ Physical Efficiency Test (PET) — फक्त Track Maintainer पदासाठी अनिवार्य (Qualifying स्वरूपाची)
5️⃣ Medical Examination — अंतिम निवडीपूर्वी वैद्यकीय तपासणी
❌ कोणत्याही पदासाठी Interview घेतला जाणार नाही.
CBT पात्रता गुण
| पद | UR & EWS | OBC-NCL, SC & ST |
|---|---|---|
| Group C पदे | 50% | 40% |
| Track Maintainer (Group D) | 40% | 30% |
⚠️ Negative Marking लागू आहे — प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जाईल. 👉 PwBD उमेदवारांसाठी पात्रता गुणांमध्ये 2% सवलत मिळेल.
Konkan Railway Bharti 2026: अर्ज फी
| प्रवर्ग | फी |
|---|---|
| General / OBC / EWS | ₹1,180 (₹1,000 + 18% GST) |
| SC / ST / Ex-Servicemen / महिला / Minority / EBC / PwBD | ₹1,180 भरावी लागेल, पण CBT ला हजर राहिल्यास परतफेड होईल |
👉 फी Online पद्धतीने (Net Banking, Debit/Credit Card, UPI) भरावी लागेल. 👉 फक्त CBT ला उपस्थित राहणाऱ्या सवलतप्राप्त उमेदवारांची फी परत केली जाईल, अर्ज नाकारल्यास फी परत मिळणार नाही.
Konkan Railway Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे
✔️ पासपोर्ट साईज फोटो आणि सही (JPEG, 30-70 KB) ✔️ 10वी/Matriculation प्रमाणपत्र (जन्मतारीख पुराव्यासाठी) ✔️ शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र (Diploma/Degree/ITI) ✔️ Domicile प्रमाणपत्र (Maharashtra/Goa/Karnataka) ✔️ SC/ST/OBC-NCL जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) ✔️ EWS Income & Asset Certificate (लागू असल्यास) ✔️ EBC Income Certificate (फी सवलतीसाठी, लागू असल्यास) ✔️ PwBD Certificate (लागू असल्यास) ✔️ Land Loser Certificate (SLAO व Tahsildar कडून, लागू असल्यास) ✔️ Aadhaar Card आणि PAN Card
Konkan Railway Bharti 2026: महत्त्वाच्या Hidden अटी ⭐
❗ Land Loser Priority System
KRCL मध्ये पॅनेल तीन टप्प्यांत तयार होते — प्रथम Land Loser उमेदवार, नंतर Employment Exchange registered उमेदवार, आणि शेवटी Domicile उमेदवार. Track Maintainer पद फक्त Land Loser साठीच राखीव आहे, इतर उमेदवारांना हे पद मिळणार नाही.
❗ एकदा Preference दिल्यावर बदल शक्य नाही
अर्ज करताना दिलेले पद-प्राधान्य (Post Preference) एकदा Submit केल्यावर बदलता येणार नाही, त्यामुळे काळजीपूर्वक क्रम निवडा.
❗ Medical Standards खूप कडक
Lasik surgery केलेले उमेदवार A-1, A-2, A-3, B-1 Medical Standard असलेल्या पदांसाठी अपात्र ठरतात. तसेच Vertigo, Epilepsy, Asthma, Hypertension असलेले उमेदवारही या Standards साठी अपात्र आहेत. उंचीची अटदेखील आहे — पुरुषांसाठी किमान 152 cm आणि महिलांसाठी 150 cm.
❗ एकापेक्षा जास्त वेळा नोंदणी केल्यास संपूर्ण अर्ज रद्द
एकाच उमेदवाराने एकापेक्षा जास्त वेळा नोंदणी करण्याचा प्रयत्न केल्यास सर्व नोंदणी रद्द होऊन कायमस्वरूपी अपात्र ठरवले जाईल.
❗ सरकारी नोकरीत असलेल्या उमेदवारांसाठी NOC अनिवार्य
सध्या सरकारी नोकरीत (Railway/PSU सह) असलेल्या उमेदवारांनी अर्ज करताना नियोक्त्याला कल्पना देणे आवश्यक आहे, आणि DV वेळी NOC सादर करणे बंधनकारक आहे — अन्यथा उमेदवारी रद्द होईल.
Konkan Railway Bharti 2026: अर्ज कसा करायचा?
Step 1
www.konkanrailway.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
Step 2
Recruitment/Career विभागात जाऊन Employment Notification No. CO/P-R/02/2026 शोधा.
Step 3
प्रथम Registration करा — Registration Number आणि Password Email/SMS वर मिळेल.
Step 4
मिळालेल्या Link वरून Application Form उघडा आणि भरा:
- Personal Details
- Educational Details
- Category Information (SC/ST/OBC/EWS/Land Loser इ.)
- Post Preference
Step 5
आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून Upload करा.
Step 6
Online पद्धतीने Application Fee भरा.
Step 7
Form Final Submit करून प्रिंटआउट काढून सुरक्षित ठेवा.
Konkan Railway Bharti 2026: Job Benefits
मुख्य फायदे
- केंद्र सरकारच्या PSU मधील स्थिर आणि सुरक्षित नोकरी
- आकर्षक पगार आणि रेल्वे भत्ते
- Job Security आणि Pension योजना
- Maharashtra, Goa, Karnataka परिसरात Posting संधी
- Interview नसल्यामुळे प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक
Konkan Railway Bharti 2026: कोणासाठी सर्वोत्तम संधी आहे?
- 10वी पास उमेदवार (Track Maintainer साठी)
- ITI/Diploma उमेदवार (Technician, ALP, ESTM, JE साठी)
- Engineering Degree धारक उमेदवार (Senior Section Engineer साठी)
- कोणत्याही शाखेतील पदवीधर (Station Master, Section Controller, Commercial Supervisor साठी)
- Maharashtra, Goa, Karnataka मधील Government Job इच्छुक तरुण
Konkan Railway Bharti 2026: महत्त्वाच्या तारखा
| कार्यक्रम | तारीख |
|---|---|
| जाहिरात प्रसिद्ध | 31/07/2026 |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | ऑगस्ट 2026 चा शेवटचा आठवडा (तात्पुरती, अंतिम तारीख 7 दिवस आधी जाहीर होईल) |
| CBT परीक्षा | सप्टेंबर 2026 (तात्पुरती) |
| Admit Card | CBT पूर्वी 10 दिवस आधी वेबसाइटवर उपलब्ध |
Konkan Railway Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
| Online अर्ज (ऑगस्ट चा शेवटचा आठवड्यात सुरू) | इथे क्लिक करा |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Konkan Railway Bharti 2026: FAQs
Konkan Railway Bharti 2026 साठी एकूण किती जागा आहेत?
या भरतीमध्ये एकूण 201 जागा आहेत, ज्यामध्ये Junior Engineer, Station Master, Assistant Loco Pilot, Track Maintainer यांसारख्या 12 पदांचा समावेश आहे.
Konkan Railway Bharti 2026 साठी पात्रता काय आहे?
पदानुसार पात्रता वेगवेगळी आहे — 10वी पास (Track Maintainer), ITI (Technician/ALP/ESTM), Diploma (Junior Engineer), Degree (Senior Section Engineer, Station Master इ.).
Konkan Railway Bharti 2026 वयोमर्यादा किती आहे?
Group C पदांसाठी 18 ते 36 वर्षे आणि Track Maintainer साठी 18 ते 45 वर्षे. वयाची गणना 01/08/2026 नुसार होईल.
Konkan Railway Bharti 2026 पगार किती आहे?
पदानुसार ₹18,000 पासून ते ₹44,900 पर्यंत पगार आहे (Pay Level 1 ते Level 7)
निवड प्रक्रिया काय आहे?
CBT (आणि काही पदांसाठी CBAT), Document Verification, PET (फक्त Track Maintainer साठी) आणि Medical Examination या टप्प्यांतून निवड होते. Interview नाही.
महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?
हो, ही भरती Maharashtra, Goa आणि Karnataka राज्यांसाठी लागू आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकतात.
महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?
हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात, मात्र PET साठी निकष वेगवेगळे आहेत.
अर्ज कधी सुरू होणार?
ऑगस्ट 2026 च्या शेवटच्या आठवड्यात अर्ज सुरू होण्याची शक्यता आहे, अचूक तारीख 7 दिवस आधी KRCL वेबसाइटवर जाहीर होईल.
अर्ज फी किती आहे?
सर्व उमेदवारांना ₹1,180 फी भरावी लागेल. SC/ST/Ex-SM/महिला/Minority/EBC/PwBD उमेदवारांना CBT ला हजर राहिल्यास फी परत मिळेल.
Track Maintainer पदासाठी कोण अर्ज करू शकतो?
Track Maintainer (Erstwhile Group-D) पद फक्त Land Loser उमेदवारांसाठीच राखीव आहे.
इतर भरती अपडेट्स
HAL Bharti 2026: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती! पगार ₹1,60,000 पर्यंत, लगेच इथून अर्ज करा
BPCL Bharti 2026: भारत पेट्रोलियम भरती! Diploma पास मुल/मुली लगेच इथून अर्ज करा
RRB JE Bharti 2026: भारतीय रेल्वेत 4098 जागांची मेगा भरती! फक्त CBT परीक्षा, लवकरच अर्ज सुरू
Concentrix Recruitment 2026: Concentrix फ्रेशर्स Hiring! ग्रॅज्युएट मुल/मुली, लगेच इथून अर्ज करा
ISRO Bharti 2026: इस्रो(ISRO) भरती 2026! ग्रॅज्युएशन पास मुल/मुली, लगेच इथून अर्ज करा
