IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026: भारतीय वायुसेनेत अग्निवीरवायु भरती! 10वी पास मुलांनी, लगेच इथून अर्ज करा

IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026 या भरतीमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, पगार, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का आणि महत्त्वाच्या Hidden अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

भारतीय वायुसेनेने (Indian Air Force) अग्निपथ योजनेअंतर्गत “अग्निवीरवायु नॉन-कॉम्बॅटंट” या पदासाठी Intake 01/2027 करिता भरती जाहीर केली आहे. फक्त 10वी पास उमेदवारांना संधी असल्यामुळे ही भरती अनेक तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. या भरतीत Hospitality आणि Housekeeping अशा दोन स्ट्रीम असून, निवड झाल्यास ₹30,000 दरमहा पगार आणि इतर सुविधा मिळणार आहेत.

10वी पास असलेले आणि भारतीय वायुसेनेत करिअर करू इच्छिणारे अविवाहित पुरुष उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026: संपूर्ण माहिती

Table of Contents

घटकतपशील
भरती संस्थाभारतीय वायुसेना (Indian Air Force)
पदाचे नावअग्निवीरवायु नॉन-कॉम्बॅटंट (Agniveervayu Non-Combatant)
इनटेक01/2027
स्ट्रीमHospitality आणि Housekeeping
अर्ज पद्धतOffline (पोस्टाने / ड्रॉप बॉक्सद्वारे)
सेवा कालावधी4 वर्षे
निवड प्रक्रियालेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, स्ट्रीम सुयोग्यता चाचणी, वैद्यकीय तपासणी
पगार₹30,000 प्रति महिना (वार्षिक वाढीसह)
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख17 ऑगस्ट 2026
अधिकृत वेबसाइटiafrecruitment.edcil.co.in

⚠️ नोट: या जाहिरातीत एकूण जागांचा निश्चित आकडा नमूद केलेला नाही. वेगवेगळ्या वायुसेना स्टेशनवर Hospitality आणि/किंवा Housekeeping स्ट्रीमनुसार जागा उपलब्ध असतील.

IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026: कामाचे स्वरूप (Job Profile)

निवड झालेल्या उमेदवारांना खालील दोन स्ट्रीमपैकी एका स्ट्रीममध्ये नेमणूक दिली जाईल:

Hospitality Stream

जेवण बनवणे, स्वयंपाकघर व्यवस्थापन, पदार्थांची मांडणी, स्वच्छ आणि व्यवस्थित स्वयंपाकघर राखणे, अन्नपदार्थांची सुरक्षित साठवणूक, क्रॉकरी-कटलरी हाताळणी, टेबल-खुर्च्या मांडणे आणि जेवण-पाणी वाढणे या कामांचा समावेश आहे.

Housekeeping Stream

जमीन/रस्ते/खोल्या/बाथरूम/कमोड/मूत्रालय स्वच्छ करणे, झाडू बनवणे, गवत कापणे, जमीन सपाट करणे, बागेला पाणी देणे, भांडी-कपडे धुणे, पाणी भरणे-नेणे तसेच केस कापणे, दाढी करणे, डोक्याची मालिश करणे, कपडे इस्त्री करणे, चामड्याच्या वस्तू शिवणे-दुरुस्त करणे, बूट पॉलिश करणे आणि कपड्यांची शिलाई-कटिंग या कामांचा समावेश आहे.

👉 संघटनात्मक गरजेनुसार वेळोवेळी सोपवलेली इतर कामेही करावी लागतील.

IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026: शैक्षणिक पात्रता

  • नोंदणीच्या तारखेपर्यंत केंद्र, राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाकडून मॅट्रिक्युलेशन/समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026: वयोमर्यादा (Age Limit)

  • जन्मतारीख 01 जानेवारी 2005 ते 01 जुलै 2009 (दोन्ही दिवस धरून) या दरम्यान असलेले उमेदवार अर्जासाठी पात्र आहेत.
  • जर एखादा उमेदवार निवड प्रक्रियेचे सर्व टप्पे पार करत असेल, तर नामांकनाच्या तारखेला त्याची कमाल वयोमर्यादा 22 वर्षे असावी लागेल.

⚠️ ही All India Recruitment असल्यामुळे या भरतीत स्वतंत्र प्रवर्गनिहाय (SC/ST/OBC) वयोमर्यादा सवलतीचा उल्लेख जाहिरातीत नाही.

IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026: वैवाहिक स्थिती

❗ फक्त अविवाहित पुरुष उमेदवारच अग्निवीरवायु नॉन-कॉम्बॅटंट पदासाठी भरतीस पात्र आहेत. उमेदवारांना 4 वर्षांच्या निश्चित सेवा कालावधीत लग्न न करण्याचे लेखी वचन द्यावे लागेल. या कालावधीत लग्न करणाऱ्या उमेदवाराला सेवेतून बडतर्फ केले जाईल.

IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026: वैद्यकीय पात्रता

निकषतपशील
उंचीकिमान 152 सेमी
छाती विस्तारकिमान 5 सेमी
वजनउंची व वयानुसार प्रमाणबद्ध
दृष्टीप्रत्येक डोळा 6/36, सुधारून 6/9 (कॉर्नियल सर्जरी/LASIK/PRK मान्य नाही)
श्रवणशक्तीसामान्य (6 मीटर अंतरावरून फुसफुसणारा आवाज ऐकू येणे)
दातकिमान 14 डेंटल पॉइंट्स, फिक्स्ड/रिमूव्हेबल ब्रेसेस असल्यास अनफिट
टॅटूफक्त बाहूच्या आतील बाजूस, हाताच्या मागील भागावर व आदिवासी परंपरेनुसार असलेले टॅटू विचारात घेतले जातील

👉 फायनल मेडिकल फिटनेस निर्णय मेडिकल बोर्डाकडून घेतला जाईल.

❌ लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया केलेल्या उमेदवारांना अनफिट घोषित केले जाईल.

IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026: पगार (Salary & Benefits)

या योजनेअंतर्गत भरती झालेल्या उमेदवारांना ₹30,000 प्रति महिना निश्चित अग्निवीर पॅकेज मिळेल, त्यासोबत निश्चित वार्षिक वाढ देखील दिली जाईल.

वर्षमासिक पॅकेज (₹)
पहिले वर्ष30,000
दुसरे वर्ष33,000
तिसरे वर्ष36,500
चौथे वर्ष40,000

अतिरिक्त फायदे

  • रिस्क आणि हार्डशिप भत्ता (वायुसेनेत लागू असल्यानुसार)
  • ड्रेस आणि प्रवास भत्ता
  • रेशन, कपडे, निवास आणि रजा प्रवास सवलत (LTC)
  • सेवा कालावधीत सैन्य रुग्णालयात वैद्यकीय सुविधा तसेच CSD सुविधा
  • ₹48 लाखांचे विनायोगदान जीवन विमा संरक्षण (Life Insurance Cover)

👉 उमेदवारांना कोणत्याही सरकारी भविष्य निर्वाह निधीत (Provident Fund) योगदान द्यावे लागणार नाही.

❌ या पदावर ग्रॅच्युईटी आणि कोणत्याही प्रकारच्या पेन्शन लाभाचा अधिकार नाही.

Seva Nidhi Package (सेवा निधी पॅकेज)

4 वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झाल्यावर उमेदवारांना एकवेळ “सेवा निधी” पॅकेज दिले जाते, ज्यात त्यांचे मासिक योगदान आणि सरकारकडून दिले जाणारे समतुल्य योगदान समाविष्ट असते.

वर्षमासिक योगदान (₹)हातात (70%)कॉर्पस फंड योगदान (30%)सरकारकडून योगदान
पहिले वर्ष30,00021,0009,0009,000
दुसरे वर्ष33,00023,1009,9009,900
तिसरे वर्ष36,50025,55010,95010,950
चौथे वर्ष40,00028,00012,00012,000

4 वर्षांनंतर एकूण अंदाजे ₹10.04 लाख (व्याजाशिवाय) सेवा निधी पॅकेज म्हणून मिळतील.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

✅ हो, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो.

ही All India Recruitment आहे. जाहिरातीमध्ये पुणे (लोहगाव), मुंबई, ठाणे, नाशिक (ओझर/देवळाली) आणि नागपूर यासह महाराष्ट्रातील अनेक वायुसेना स्टेशनचा समावेश आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवार जवळच्या केंद्रावरून अर्ज करू शकतात.

मुलगा आणि मुलगी दोघे अर्ज करू शकतात का?

❌ नाही. जाहिरातीनुसार फक्त अविवाहित पुरुष उमेदवारच या पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. महिला उमेदवारांसाठी या भरतीत तरतूद नाही.

IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026: निवड प्रक्रिया (Selection Process)

निवड प्रक्रियेत खालील 4 टप्पे असतील:

1️⃣ Phase I – लेखी परीक्षा (Written Test)

लेखी परीक्षा दोन्ही स्ट्रीमसाठी समान असेल.

विषयगुण
General English (10वी स्तर)15 (किमान उत्तीर्ण गुण – 5)
General Knowledge (10वी स्तर)15 (किमान उत्तीर्ण गुण – 5)
एकूण30 (किमान उत्तीर्ण गुण – 15)

👉 उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान 5 गुण आणि एकूण किमान 15/30 गुण मिळवणे आवश्यक आहे.

2️⃣ Phase II – शारीरिक चाचणी (Physical Fitness Test – PFT)

  • उंची तपासणी: किमान 152 सेमी
  • PFT-I: 1.6 किमी धावणे 7 मिनिटांत पूर्ण करणे (उंच डोंगराळ भागात वेळेत सवलत)
  • PFT-II: 10 पुश-अप्स (1 मिनिट), 10 सिट-अप्स (1 मिनिट), 20 स्क्वॉट्स (1 मिनिट) — प्रत्येकानंतर 2 मिनिटे विश्रांती

3️⃣ Phase III – स्ट्रीम सुयोग्यता चाचणी (Stream Suitability Test – SST)

निवडलेल्या स्ट्रीमशी संबंधित कोणतेही काम करण्यास तयार असणे आवश्यक आहे. काम करण्यास नकार दिल्यास अनफिट घोषित केले जाईल.

4️⃣ Phase IV – वैद्यकीय तपासणी (Medical Examination)

ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट, चेस्ट एक्स-रे, ECG आणि इतर आवश्यक तपासण्या केल्या जातील.

❌ या भरतीत स्वतंत्र Interview घेतला जाणार नाही.

IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे

अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे:

✔️ 10वी/मॅट्रिक्युलेशन मार्कशीट व उत्तीर्ण प्रमाणपत्र ✔️ पासपोर्ट आकाराचा अलीकडील रंगीत फोटो (काळ्या स्लेटवर नाव व फोटो काढल्याची तारीख लिहून) ✔️ 18 वर्षांखालील उमेदवारासाठी पालक/कायदेशीर पालकाचे संमती प्रमाणपत्र ✔️ ₹10 चे तिकीट लावलेले स्वतःच्या पत्त्याचे लिफाफा (Self-addressed envelope)

लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहताना खालील कागदपत्रे सत्यापनासाठी सोबत आणणे आवश्यक आहे:

✔️ आधार कार्ड (किंवा J&K/आसाम/मेघालयच्या उमेदवारांसाठी इतर वैध ओळखपत्र) ✔️ राजपत्रित अधिकारी/पंचायत अधिकारी/मुख्याध्यापक यांनी सही केलेले चारित्र्य प्रमाणपत्र (6 महिन्यांपेक्षा जुने नसावे) ✔️ मूळ 10वी/मॅट्रिक्युलेशन उत्तीर्ण प्रमाणपत्र (किंवा DigiLocker सत्यापित प्रिंटआउट) ✔️ मूळ 10वी/मॅट्रिक्युलेशन मार्कशीट ✔️ अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026: महत्त्वाच्या Hidden अटी ⭐

❗ ऑफलाइन अर्ज पद्धत

ही भरती पूर्णपणे ऑफलाइन आहे. उमेदवारांना वेबसाइटवरून रिकामा अर्ज डाउनलोड करून तो भरून पोस्टाने किंवा ड्रॉप बॉक्सद्वारे दिलेल्या पत्त्यांपैकी एका पत्त्यावर पाठवावा लागेल. निर्धारित नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास किंवा मुदतीनंतर अर्ज पोहोचल्यास तो स्वीकारला जाणार नाही.

❗ एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास पूर्ण रद्द

एकापेक्षा जास्त अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराची संपूर्ण उमेदवारी रद्द केली जाईल.

❗ 4 वर्षांनंतर Ex-Servicemen दर्जा नाही

4 वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झाल्यावर सेवेतून मुक्त झालेल्या उमेदवारांना भूतपूर्व सैनिक (Ex-Servicemen) दर्जा मिळणार नाही.

❗ स्वतःहून सेवा सोडता येत नाही

सेवा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी स्वतःच्या विनंतीवरून सेवामुक्ती मिळणार नाही. अपवादात्मक परिस्थितीतच सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने सेवामुक्ती शक्य आहे.

❗ फक्त 25% कायम कॅडरमध्ये संधी

4 वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर प्रत्येक बॅचमधील जास्तीत जास्त 25% उमेदवारांनाच NC(E) या नियमित कॅडरमध्ये कायम भरतीसाठी अर्ज करण्याची संधी मिळेल. ही निवड कामगिरीवर आधारित केंद्रीकृत पद्धतीने होईल आणि निवडीचा कोणताही अधिकार उमेदवाराला नसेल.

❗ परीक्षा हॉलमध्ये गैरप्रकार केल्यास कायमस्वरूपी बंदी

कॉपी करणे, प्रतिबंधित इलेक्ट्रॉनिक वस्तू बाळगणे, चिठ्ठी बाळगणे किंवा तोतयागिरी केल्यास उमेदवाराला अग्निवीरवायु नॉन-कॉम्बॅटंट निवड परीक्षेसाठी कायमस्वरूपी बंदी घातली जाईल.

❗ वैद्यकीय तपासणीसाठी स्वखर्चाने राहावे लागेल

वैद्यकीय तपासणीसाठी उमेदवारांना 4 ते 5 दिवस स्वतःच्या खर्चाने राहावे लागेल. यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026: अर्ज कसा करायचा?

Step 1

अधिकृत वेबसाइट https://iafrecruitment.edcil.co.in ला भेट द्या.

Step 2

“Agniveervayu Non-Combatant” टॅबखालील “Application Forms” सब-टॅबमध्ये जा.

Step 3

रिकामा अर्ज आणि आवश्यक प्रमाणपत्रांचे नमुने डाउनलोड करा.

Step 4

अर्ज व्यवस्थित भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.

Step 5

भरलेला अर्ज व कागदपत्रे जाहिरातीत दिलेल्या 100हून अधिक पत्त्यांपैकी सोयीच्या (जवळच्या) पत्त्यावर सामान्य पोस्टाने किंवा ड्रॉप बॉक्समध्ये सादर करा.

Step 6

अर्ज 17 ऑगस्ट 2026 पूर्वी संबंधित पत्त्यावर पोहोचेल याची खात्री करा.

IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026: Job Benefits

मुख्य फायदे

  • भारतीय वायुसेनेत काम करण्याची संधी
  • ₹30,000 पासून सुरू होणारा निश्चित पगार व वार्षिक वाढ
  • ₹48 लाखांचे जीवन विमा संरक्षण
  • 4 वर्षांनंतर अंदाजे ₹10.04 लाख सेवा निधी
  • सेवा कालावधीत वैद्यकीय व CSD सुविधा
  • कौशल्य प्रमाणपत्र (Agniveer Skill Certificate) सेवा समाप्तीनंतर
  • सेवा कालावधीत सर्व Defence Commissioning परीक्षांना (कमाल 5 प्रयत्न) बसण्याची परवानगी

IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026: कोणासाठी सर्वोत्तम संधी आहे?

  • फक्त 10वी उत्तीर्ण असलेले तरुण
  • भारतीय वायुसेनेत करिअर सुरू करू इच्छिणारे अविवाहित पुरुष उमेदवार
  • शिस्तबद्ध सरकारी नोकरीसह पुढे Defence परीक्षांची तयारी करू इच्छिणारे उमेदवार
  • कमी शैक्षणिक पात्रतेत चांगला पगार व सुविधा शोधणारे उमेदवार

IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026: महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख17 ऑगस्ट 2026
लेखी परीक्षेची तारीखजाहीर होईल (Admit Card वर नमूद असेल)

IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFइथे क्लिक करा
अर्ज PDFइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026: महाराष्ट्रातील अर्ज पाठवण्याचे पत्ते

भरलेला अर्ज आणि कागदपत्रे खालीलपैकी जवळच्या महाराष्ट्रातील पत्त्यावर सामान्य पोस्टाने किंवा ड्रॉप बॉक्समध्ये पाठवावी लागतील, जेणेकरून ती 17 ऑगस्ट 2026 पूर्वी पोहोचतील.

⚠️ एकापेक्षा जास्त पत्त्यांवर अर्ज पाठवल्यास (Multiple Applications) संपूर्ण उमेदवारी रद्द केली जाईल — त्यामुळे फक्त एकाच पत्त्यावर अर्ज पाठवा.

अ.क्र.ठिकाणपोस्टल पत्तास्ट्रीम
9पुणे (लोहगाव)Air Officer Commanding, Air Force Station Lohegaon, Pune, Maharashtra – 411 032Hospitality & Housekeeping
10ठाणेStation Commander, Air Force Station Thane, PO – Sandoz Baug, Kolshet Road, Thane (W), Maharashtra – 400 607Hospitality & Housekeeping
19मुंबईStation Commander, Air Force Station Mumbai, Kalina Military Camp, Air India Road, Santa Cruz (East), Mumbai, Maharashtra – 400 029Hospitality & Housekeeping
23मुंबई (माढ आयलंड)Station Commander, Air Force Station Madh Island, Near Harbadevi Mandir, Post-Varsova, Andheri West, Mumbai, Maharashtra – 400 061Hospitality
26ठाणे (कान्हेरी हिल्स)Air Officer Commanding, Air Force Station Kanheri Hills (Yeour), PO-Jeke Gram, Dist-Thane (West), Maharashtra – 400 606Hospitality & Housekeeping
37पुणे (9 BRD)Air Officer Commanding, 9 Base Repair Depot, Air Force, Dunkirk Line SO, Nagar Road, Pune, Maharashtra – 411 014Hospitality & Housekeeping
38ओझर (नाशिक)Air Officer Commanding, Air Force Station Ojhar, Nashik, Maharashtra – 422 221Hospitality & Housekeeping
45नागपूर (HQ Maintenance Command)Commanding Officer, HQ Maintenance Command (Unit), Vayusena Nagar, Nagpur, Maharashtra – 440 007Hospitality & Housekeeping
47देवळाली (नाशिक)Air Officer Commanding, 25 Equipment Depot, Air Force Station Devlali (South), Distt-Nashik, Maharashtra – 422 501Hospitality & Housekeeping
57नागपूर (सोनेगाव)Station Commander, Air Force Station Sonegaon, Sonegaon, Nagpur, Maharashtra – 440 005Hospitality & Housekeeping

👉 वरील सर्व 10 पत्ते जाहिरातीत नमूद असलेल्या महाराष्ट्रातील अधिकृत केंद्रांचे आहेत. यापैकी तुमच्या राहत्या ठिकाणाच्या सर्वात जवळचा पत्ता निवडून अर्ज पाठवा.

⚠️ प्रत्येक ठिकाणी Postal Address व्यतिरिक्त स्वतंत्र Drop Box Location देखील दिलेला आहे. अचूक ड्रॉप बॉक्स ठिकाणासाठी अधिकृत वेबसाइट किंवा मूळ जाहिरात PDF तपासा.

IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026: FAQs

IAF Agniveervayu Non-Combatant पदासाठी पात्रता काय आहे?

10वी/मॅट्रिक्युलेशन किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असलेले, 01 जानेवारी 2005 ते 01 जुलै 2009 दरम्यान जन्मलेले अविवाहित पुरुष उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

किती जागा आहेत?

जाहिरातीत एकूण जागांचा निश्चित आकडा नमूद नाही. वेगवेगळ्या वायुसेना स्टेशननुसार Hospitality व Housekeeping स्ट्रीममध्ये जागा उपलब्ध असतील.

वयोमर्यादा किती आहे?

जन्मतारीख 01 जानेवारी 2005 ते 01 जुलै 2009 (दोन्ही दिवस धरून) दरम्यान असावी. निवड पूर्ण झाल्यास नामांकनाच्या वेळी कमाल वय 22 वर्षे असावे.

पगार किती आहे?

पहिल्या वर्षी ₹30,000 प्रति महिना, त्यानंतर दरवर्षी निश्चित वाढीसह चौथ्या वर्षी ₹40,000 पर्यंत पगार मिळतो.

निवड प्रक्रिया काय आहे?

लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी (PFT-I व PFT-II), स्ट्रीम सुयोग्यता चाचणी (SST) आणि वैद्यकीय तपासणी अशा 4 टप्प्यांत निवड होते. Interview घेतला जात नाही.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

हो, ही All India Recruitment असून पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक व नागपूर या महाराष्ट्रातील केंद्रांचा समावेश आहे.

महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?

नाही, जाहिरातीनुसार फक्त अविवाहित पुरुष उमेदवारच पात्र आहेत.

अर्ज ऑनलाइन करायचा की ऑफलाइन?

हा अर्ज पूर्णपणे ऑफलाइन आहे. वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करून पोस्टाने किंवा ड्रॉप बॉक्सद्वारे सादर करावा लागतो.

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख कधी आहे?

17 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज संबंधित पत्त्यावर पोहोचणे आवश्यक आहे.

4 वर्षांनंतर काय होते?

4 वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झाल्यावर उमेदवारांना अंदाजे ₹10.04 लाख सेवा निधी दिला जातो. कामगिरीच्या आधारे जास्तीत जास्त 25% उमेदवारांना नियमित कॅडरमध्ये कायम भरतीची संधी मिळू शकते.

इतर भरती अपडेट्स

Accenture Freshers Hiring 2026: Accenture AI/ML Associate पदाची भरती! Freshers मुल/मुली, लगेच इथून अर्ज करा

BPCL Bharti 2026: भारत पेट्रोलियम भरती! Diploma पास मुल/मुली लगेच इथून अर्ज करा

ISRO URSC Bharti 2026: ISRO U.R. राव सॅटेलाइट सेंटर मध्ये भरती! इंजीनियरिंग/डिप्लोमा पास मुल मुली, लगेच इथून अर्ज करा

Tech Mahindra Bharti 2026: टेक महिंद्रा मध्ये Hiring! पगार ₹6 LPA पर्यंत, Freshers लगेच इथून अर्ज करा

SPMCIL Bharti 2026: सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशनमध्ये भरती! पगार ₹1,60,000 पर्यंत, लगेच इथून अर्ज करा

RRB JE Bharti 2026: भारतीय रेल्वेत 4098 जागांची मेगा भरती! फक्त CBT परीक्षा, लवकरच अर्ज सुरू

Concentrix Recruitment 2026: Concentrix फ्रेशर्स Hiring! ग्रॅज्युएट मुल/मुली, लगेच इथून अर्ज करा

ISRO Bharti 2026: इस्रो(ISRO) भरती 2026! ग्रॅज्युएशन पास मुल/मुली, लगेच इथून अर्ज करा

Leave a comment