BPCL Bharti 2026: भारत पेट्रोलियम भरती! Diploma पास मुल/मुली लगेच इथून अर्ज करा

BPCL Bharti 2026 या भरतीमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, पगार, एकूण जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का आणि महत्त्वाच्या Hidden अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ही Maharatna दर्जाची Central Public Sector Undertaking (CPSU) असून Ministry of Petroleum & Natural Gas अंतर्गत काम करणारी Fortune 500 कंपनी आहे. आता BPCL ने Mumbai Refinery आणि Kochi Refinery साठी Non-Management पदांवर तब्बल 154 जागांची मोठी भरती जाहीर केली आहे.

Diploma in Engineering (Chemical, Mechanical, Electrical) पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. Entry level ला थेट ₹26,500 ते ₹34,000 पगार आणि PSU ची सरकारी नोकरी मिळण्याची संधी या भरतीमधून मिळते आहे.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

BPCL Bharti 2026: संपूर्ण माहिती

घटकतपशील
भरती संस्थाBharat Petroleum Corporation Limited (BPCL)
जाहिरात क्रमांकBPCL.HR.ER.03.NMGT.RECT
पदाचे नावProcess Technician / Operator / Technician (Chemical, Mechanical, Electrical)
एकूण जागा154
अर्ज पद्धतOnline
नोकरी ठिकाणMumbai Refinery व Kochi Refinery
निवड प्रक्रियाCBT + Skill/Proficiency Test + Medical Exam
पगार₹26,500 – ₹34,000 (NG-2 Grade)
अर्ज सुरू29.07.2026
शेवटची तारीख13.08.2026
अधिकृत वेबसाइटbharatpetroleum.com

BPCL Bharti 2026: एकूण जागा (Vacancy Details)

एकूण 154 जागांसाठी 4 वेगवेगळ्या Post Code अंतर्गत भरती होणार आहे:

Post Codeपदाचे नावरिफायनरीSCSTOBCEWSURएकूण
AProcess Technician (Chemical)मुंबई रिफायनरी814263060
BProcess Operator/Operator (Chemical)कोची रिफायनरी621763364
CTechnician/Operator (Mechanical)कोची रिफायनरी2031713
DTechnician (Electrical)कोची रिफायनरी2052817

👉 आरक्षण SC, ST, OBC (NCL), EWS आणि PwBD उमेदवारांसाठी लागू आहे.

⚠️ नोट: पदसंख्या Management च्या निर्णयानुसार आणि Presidential Directives नुसार कमी किंवा जास्त होऊ शकते.

BPCL Bharti 2026: शैक्षणिक पात्रता

उमेदवाराकडे AICTE approved Full-Time Regular Diploma असणे आवश्यक आहे. Part-time, Correspondence किंवा Distance Learning मधून केलेला Diploma ग्राह्य धरला जाणार नाही.

Post Code A & B साठी (Chemical)

Diploma in Chemical Engineering / Chemical Technology आवश्यक आहे.

❌ Petrochemical, Chemical (Fertilizer), Plastic & Polymer, Refinery & Petrochemical, Pulp & Paper, Rubber & Plastic, Oil Technology, Polymer Technology यासारख्या Diploma ला पात्र समजले जाणार नाही.

Post Code C साठी (Mechanical)

Diploma in Mechanical Engineering आवश्यक आहे.

❌ Mechanical (Production), Tool & Die, Medical Lab, Maintenance, Automobile, Foundry Tech यासारखे Diploma पात्र नाहीत.

Post Code D साठी (Electrical)

Diploma in Electrical Engg. / Electrical & Electronics Engg. / Electrical Power System / Electrical Engg. (Industrial Control) आवश्यक आहे.

❌ Electronics Engineering किंवा तत्सम Diploma पात्र नाही.

किमान गुण

  • General, EWS, OBC (NCL): किमान 60% एकत्रित गुण
  • SC/ST/PwBD: किमान 50% एकत्रित गुण

👉 CGPA/OGPA असल्यास Board/University च्या नियमानुसार equivalent percentage काढून सादर करावी लागेल, अन्यथा उमेदवारी ग्राह्य धरली जाणार नाही.

❌ Higher Qualification (B.E., B.Tech, AMIE किंवा तत्सम Degree) असणारे उमेदवार पात्र नाहीत. Diploma नंतर अशी पदवी घेतली असेल तरीही अपात्र ठरवले जाईल.

अनुभव (Experience)

सर्व पदांसाठी किमान 1 वर्ष Post-Qualification Experience किंवा Apprenticeship Act, 1961 अंतर्गत 1 वर्षाचे Apprenticeship Training (Refining/Petroleum/Power/Lube/Petrochemical/Fertilizer किंवा संबंधित Engineering Industry मध्ये) आवश्यक आहे.

👉 अनुभवाची गणना 01.07.2026 नुसार केली जाईल.

BPCL Bharti 2026: वयोमर्यादा (Age Limit)

सर्वसाधारण (General/EWS) उमेदवारांसाठी वयोमर्यादा: किमान 18 वर्षे – कमाल 25 वर्षे

वयाची गणना 01.07.2026 नुसार केली जाईल.

प्रवर्गवयोमर्यादा सवलत
OBC (NCL)+3 वर्ष
SC/ST+5 वर्ष
PwBD (General)+10 वर्ष
PwBD (SC/ST)+15 वर्ष
PwBD (OBC-NCL)+13 वर्ष
Ex-Servicemenसैन्य सेवेचा कालावधी वजा करून, कमाल मर्यादेपेक्षा 3 वर्षांपर्यंत सूट

⚠️ एकत्रित (Combined) वयोमर्यादा सवलत जास्तीत जास्त 15 वर्षांपर्यंत मर्यादित आहे.

⚠️ Matriculation प्रमाणपत्रावरील जन्मतारीख हाच वयाचा पुरावा ग्राह्य धरला जाईल.

BPCL Bharti 2026: पगार (Salary)

निवड झालेल्या उमेदवारांना NG-2 Grade मध्ये सुरुवातीचा Basic Pay ₹26,500 दिला जाईल, जो Pay Scale ₹26,500 – ₹34,000 अंतर्गत वाढत जातो.

अतिरिक्त फायदे

  • Industrial Pattern Dearness Allowance (DA)
  • Corporation च्या नियमानुसार इतर Allowances व Benefits
  • Proper Channel ने CPSU/PSU/Government मधून येणाऱ्या उमेदवारांना Last Drawn Basic Pay Protection (कमाल ₹34,000 पर्यंत)

👉 ही PSU क्षेत्रातील अत्यंत चांगल्या पगाराची आणि स्थिर सरकारी नोकरी मानली जाते.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

✅ हो, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो.

ही All India Recruitment असून महाराष्ट्रासह भारतातील कोणत्याही राज्यातील उमेदवार अर्ज करू शकतात. Post Code A साठी Mumbai Refinery असल्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी हे विशेष आकर्षक आहे.

Mumbai, Pune, Nashik, Nagpur, Ahilyanagar आणि इतर शहरांतून उमेदवार अर्ज करून परीक्षा देऊ शकतात.

मुलगा आणि मुलगी दोघे अर्ज करू शकतात का?

✅ हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.

या भरतीमध्ये कोणताही Gender Restriction नाही.

BPCL Bharti 2026: निवड प्रक्रिया (Selection Process)

निवड प्रक्रिया एकूण 3 टप्प्यांमध्ये होणार आहे:

1️⃣ Stage 1 – Computer Based Test (CBT)

  • एकूण 100 प्रश्न, प्रत्येकी 1 गुण
  • वेळ: 120 मिनिटे
  • भाषा: फक्त English
  • ❌ Negative Marking नाही

Paper दोन विभागात असेल:

  • Domain Knowledge – 60 गुण
  • General Aptitude (English Language, Quantitative Aptitude, Logical Reasoning, General Awareness & Current Affairs) – 40 गुण

👉 CBT उत्तीर्ण झाल्याने SPT साठी निवड होण्याचा हक्क मिळत नाही, ते जागांची संख्या आणि Category-wise Performance वर अवलंबून आहे.

2️⃣ Stage 2 – Skill/Proficiency Test (SPT)

CBT मध्ये Cut-off गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना संबंधित Refinery Location वर SPT साठी बोलावले जाईल. SPT ही फक्त Qualifying स्वरूपाची असेल.

3️⃣ Stage 3 – Pre-Employment Medical Examination

अंतिम नियुक्ती BPCL च्या Medical Fitness Standards नुसार वैद्यकीय तपासणीत उत्तीर्ण होण्यावर अवलंबून असेल.

❌ Interview घेतला जाणार नाही.

BPCL Bharti 2026: अर्ज फी

प्रवर्गफी
General / EWS / OBC (NCL)₹590 (₹500 + 18% GST) + Payment Gateway Charges
SC / ST / PwBD / Ex-Servicemenफी नाही

👉 फी फक्त Online Payment Gateway द्वारे भरावी लागेल.

👉 फी Non-refundable आहे.

BPCL Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे

✔️ अलीकडील फोटो आणि स्वाक्षरी ✔️ Matriculation प्रमाणपत्र (वयाचा पुरावा) ✔️ Diploma मार्कशीट व प्रमाणपत्र (सर्व Semester) ✔️ CGPA/Grade असल्यास Equivalent Percentage प्रमाणपत्र ✔️ Experience/Apprenticeship प्रमाणपत्र ✔️ जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC लागू असल्यास) ✔️ EWS Income and Asset Certificate (लागू असल्यास) ✔️ PwBD Certificate (लागू असल्यास) ✔️ Ex-Servicemen Discharge Certificate (लागू असल्यास) ✔️ Valid Photo ID Proof (Aadhaar/PAN/Voter ID/Passport)

BPCL Bharti 2026: महत्त्वाच्या Hidden अटी ⭐

❗ Equivalent Qualification ग्राह्य नाही

फक्त निर्दिष्ट केलेली Diploma Discipline ग्राह्य धरली जाईल. “Equivalent” Diploma असल्याचा दावा केल्यास तो स्वीकारला जाणार नाही, त्यामुळे आपला Diploma exact branch मध्ये आहे का हे नक्की तपासा.

❗ Higher Qualification असल्यास अपात्र

Diploma नंतर B.E./B.Tech/AMIE किंवा तत्सम Degree घेतली असल्यास संपूर्ण उमेदवारी बाद होते. ही माहिती लपवल्यास नोकरी लागल्यानंतरही Termination होऊ शकते.

❗ EWS Certificate ची विशिष्ट अट

EWS Certificate आर्थिक वर्ष 2025-26 साठी वैध असावे व 2024-25 च्या उत्पन्न पडताळणीवर आधारित असावे. “General/Samanya” असे जात नमूद असलेले प्रमाणपत्र चालणार नाही — नेमकी जात नमूद असणे आवश्यक आहे.

❗ Category बदलता येणार नाही

एकदा Online Application मध्ये Category (GEN/SC/ST/OBC/PwBD/EWS) भरल्यानंतर त्यात बदल करण्याची विनंती स्वीकारली जाणार नाही.

❗ Placement कुठेही होऊ शकते

जरी जागा Mumbai व Kochi Refinery साठी जाहीर झाल्या असल्या तरी BPCL भविष्यात कोणत्याही Refinery/Marketing Location वर Posting किंवा Transfer करण्याचा अधिकार राखून ठेवते.

❗ Kochi Refinery Project Evictees ला Preference

Post Code B, C, D साठी इतर सर्व Selection Parameters समान असल्यास, erstwhile Kochi Refinery Project Evictees ला प्राधान्य दिले जाईल.

❗ Government/PSU कर्मचाऱ्यांसाठी NOC आवश्यक

सध्या Government/PSU/Autonomous Body मध्ये कार्यरत उमेदवारांना SPT च्या वेळी No Objection Certificate सादर करावे लागेल आणि Joining च्या वेळी Proper Relieving Letter आवश्यक आहे. Conditional Relieving Letter (Lien सह) स्वीकारला जाणार नाही.

BPCL Bharti 2026: अर्ज कसा करायचा?

Step 1

अधिकृत वेबसाइट bharatpetroleum.com वरील Careers Section ला भेट द्या.

Step 2

BPCL.HR.ER.03.NMGT.RECT या जाहिरातीची लिंक शोधा व Online Application Link वर क्लिक करा.

Step 3

Online Registration करून Registration Number आणि Password मिळवा.

Step 4

Application Form भरा:

  • Personal Details
  • Educational Details (Diploma, % गुण)
  • Experience Details
  • Category Information
  • Preferred Test City

Step 5

आवश्यक Documents व Photo/Signature Upload करा.

Step 6

लागू असल्यास Application Fee Online Payment Gateway द्वारे भरा.

Step 7

Final Submit करून Application Form ची Print काढून ठेवा.

BPCL Bharti 2026: Job Benefits

मुख्य फायदे

  • Maharatna CPSU मधील स्थिर व सुरक्षित सरकारी नोकरी
  • Fortune 500 कंपनीचा अनुभव
  • चांगला Pay Scale व Allowances
  • DA, PF, Medical यासारखे PSU Benefits
  • Career Growth ची संधी

BPCL Bharti 2026: कोणासाठी सर्वोत्तम संधी आहे?

  • Chemical/Mechanical/Electrical Diploma पूर्ण केलेले उमेदवार
  • 1 वर्षाचा Apprenticeship किंवा Industry Experience असलेले उमेदवार
  • PSU/Government Job च्या शोधात असणारे तरुण
  • Refinery/Petroleum Industry मध्ये करिअर करू इच्छिणारे उमेदवार

BPCL Bharti 2026: महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
अर्ज सुरू29.07.2026 (12:00 am)
शेवटची तारीख13.08.2026 (11:59 pm)
Call Letter (CBT)CBT आधी 10 दिवस
CBT परीक्षा (Tentative)सप्टेंबर 2026
CBT Result (SPT Shortlist)CBT नंतर 10 दिवसांनी

BPCL Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFइथे क्लिक करा
Online अर्जइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

BPCL Bharti 2026: FAQs

BPCL Bharti 2026 साठी पात्रता काय आहे?

AICTE approved Full-Time Diploma (Chemical/Mechanical/Electrical – पदानुसार) व किमान 60% गुण (SC/ST/PwBD साठी 50%) आवश्यक आहे.

BPCL Bharti 2026 किती जागा आहेत?

एकूण 154 जागा आहेत – Post A: 60, Post B: 64, Post C: 13, Post D: 17.

वयोमर्यादा किती आहे?

सर्वसाधारण उमेदवारांसाठी 18 ते 25 वर्षे, Category नुसार सवलत उपलब्ध आहे.

पगार किती आहे?

सुरुवातीचा Basic Pay ₹26,500 असून Pay Scale ₹26,500 – ₹34,000 आहे.

निवड प्रक्रिया काय आहे?

CBT, त्यानंतर Skill/Proficiency Test आणि शेवटी Pre-Employment Medical Examination.

Interview असेल का?

नाही, या भरतीमध्ये Interview घेतला जाणार नाही.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

हो, ही All India Recruitment असून महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकतात. Post A साठी Mumbai Refinery आहे.

महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?

हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात, Gender Restriction नाही.

अर्ज फी किती आहे?

General/EWS/OBC साठी ₹590, SC/ST/PwBD साठी फी नाही.

शेवटची तारीख कधी आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख 13.08.2026 आहे.

Higher Qualification (B.E./B.Tech) असलेले उमेदवार अर्ज करू शकतात का?

नाही, Diploma नंतर Higher Qualification घेतलेले उमेदवार अपात्र ठरवले जातात.

इतर भरती अपडेट्स

RRB JE Bharti 2026: भारतीय रेल्वेत 4098 जागांची मेगा भरती! फक्त CBT परीक्षा, लवकरच अर्ज सुरू

Concentrix Recruitment 2026: Concentrix फ्रेशर्स Hiring! ग्रॅज्युएट मुल/मुली, लगेच इथून अर्ज करा

ISRO Bharti 2026: इस्रो(ISRO) भरती 2026! ग्रॅज्युएशन पास मुल/मुली, लगेच इथून अर्ज करा

Accenture Recruitment 2026: Accenture कंपनीत Freshers साठी भरती! Graduate मुल मुली, लगेच इथून अर्ज करा

AAI Bharti 2026: एअरपोर्ट भरती 2026! पगार ₹21 LPA पर्यंत, लगेच इथून अर्ज करा

Amazon Hiring 2026: ऍमेझॉनमध्ये Quality Associate पदासाठी भरती! Freshers आणि Experienced, लगेच इथून अर्ज करा

AIIMS Nursing Officer Bharti 2026: AIIMS मध्ये नर्सिंग ऑफिसर पदांची मेगा भरती! B.Sc. Nursing/GNM Diploma लगेच इथून अर्ज करा

MPSC Group-C Bharti 2026: MPSC मार्फत 5707 जागांची मेगा भरती! ग्रुप-C पदे, लगेच इथून अर्ज करा

Talathi Bharti 2026: महाराष्ट्र तलाठी भरती! पगार ₹81,100 पर्यंत, लगेच इथून अर्ज करा

TMC Bharti 2026: ठाणे महानगरपालिकेत गट क आणि गट ड पदांची मेगा भरती, 10वी ते ग्रॅज्युएशन पास लगेच इथून अर्ज करा

Wipro Pune Walk-in Drive 2026: विप्रो पुणे मध्ये Walk-in Drive! Freshers आणि Experienced, सर्व इथून माहिती बघा

Leave a comment