SSC GD Constable Result 2025: SSC-GD कॉन्स्टेबल भरती 2025 चा निकाल आता जाहीर करण्यात आला आहे. या भरती परीक्षेला देशभरातून मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज केला होता. निकाल जाहीर झाल्यामुळे उमेदवारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे आणि सर्वजण आपले नाव यादीत आहे का ते तपासत आहेत.
SSC GD Result 2025 अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आला आहे. उमेदवारांना PDF लिस्टमध्ये रोल नंबर किंवा नावाच्या आधारे निकाल पाहता येणार आहे. यासोबतच प्रत्येक श्रेणीसाठी कट ऑफ मार्क्स देखील जाहीर करण्यात आले आहेत.
या निकालाच्या आधारे पुढील टप्प्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे. फिजिकल टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल तपासणी अशा पुढील प्रक्रिया असणार आहेत. त्यामुळे निकाल लागलेल्या उमेदवारांनी पुढील टप्प्यांची तयारी सुरू करणे गरजेचे आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला SSC GD Constable Result 2025, मेरिट लिस्ट कशी पाहायची, कट ऑफ मार्क्स आणि पुढील निवड प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अधिकृत अपडेटसाठी SSC च्या वेबसाईटवर लक्ष ठेवा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
SSC GD Constable Result 2025
| भरतीचे नाव | SSC-GD कॉन्स्टेबल भरती 2025 |
| पदाचे नाव | कॉन्स्टेबल |
| एकूण पदे | 25487 |
| परीक्षेची तारीख | 04 ते 25 फेब्रुवारी 2025 |
| निकालाची स्थिती | निकाल जाहीर |
| कट-ऑफ | उपलब्ध |
| वैयक्तिक गुण | उपलब्ध |
| अधिकृत संकेतस्थळ | https://ssc.gov.in/ |
SSC GD Constable Result 2025 Important Date and Links: महत्वाची तारीख आणि लिंक्स
| परीक्षेची तारीख | 04 ते 25 फेब्रुवारी 2025 |
| निकाल | List I | List II | List III | List IV |
| अंतिम निकाल | List I | List II | List III | List IV |
| कट-ऑफ मार्क | पूर्व निकाल | अंतिम निकाल |
| अधिकृत संकेतस्थळ | https://ssc.gov.in/ |
How to Check SSC GD Constable Result 2025 Online? Step-by-step guide, SSC-GD कॉन्स्टेबल भरती परीक्षा निकाल कसा पहावा?
SSC GD Constable Result 2025 ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. उमेदवार खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून आपला निकाल सहज पाहू शकतात.
- सर्वप्रथम SSC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- होमपेजवर “Result” किंवा “Latest News” सेक्शनवर क्लिक करा.
- “SSC GD Constable Result 2025” अशी लिंक शोधून त्यावर क्लिक करा.
- निकाल PDF फाईल स्वरूपात उघडेल.
- PDF उघडल्यानंतर Ctrl + F दाबून आपला रोल नंबर / नाव टाका.
- यादीत नाव किंवा रोल नंबर आढळल्यास तुम्ही पुढील टप्प्यासाठी पात्र आहात.
- निकालाची PDF कॉपी डाउनलोड करून सेव्ह करून ठेवा.
Note: निकालाची मेरीट लिस्ट PDF लिंक वर टेबल मध्ये दिली आहे, डायरेक्ट लिंक वर क्लिक करून पण तुम्ही तुमचा निकाल बघू शकता.
निकाल पाहताना लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या गोष्टी:
- निकाल फक्त ऑनलाइन पद्धतीनेच पाहता येतो.
- पोस्टाने किंवा SMS द्वारे निकाल पाठवला जात नाही.
- कट ऑफ मार्क्स वर्गनिहाय (Category-wise) वेगवेगळे असतात.
- निकालात पात्र ठरलेले उमेदवार पुढील Physical Test (PET/PST) साठी बोलावले जातात.
निकालानंतर पुढे काय? –
SSC GD निकालानंतर पात्र उमेदवारांसाठी
- PET / PST (फिजिकल चाचणी)
- Document Verification
- Medical Examination
असे टप्पे असतात, या सर्व टप्प्यांची माहिती SSC कडून अधिकृत वेबसाईटवर दिली जाते. त्याबरोबर तुम्हाला याची माहिती ईमेल द्वारे पण पाठवली जाते, तिथून पण तुम्ही पुढील निवड प्रक्रियेच्या टप्प्याची तयारी हही करू शकता.
इतर भरती अपडेट्स
SSC GD Constable Result 2025 FAQ
SSC-GD कॉन्स्टेबल भरती निकाल 2025 जाहीर झाला आहे का?
हो, SSC-GD कॉन्स्टेबल भरतीचा निकाल हा जाहीर झाला आहे.
निकाल पाहण्यासाठी मला कोणती माहिती लागेल?
तुम्हाला निकाल पाहण्यासाठी कोणतीही माहिती देण्याची गरज नाही, डायरेक्ट लिस्ट मध्ये नाव पाहून तुम्ही निकाल चेक करू शकता.
SSC GD Constable Result कुठे पाहता येईल?
SSC च्या अधिकृत वेबसाईट https://ssc.gov.in/ द्वारे पण तुम्ही निकाल पाहू शकता, याशिवाय मेरीट याद्याची लिंक आपण वर टेबल मध्ये दिली आहे.
SSC-GD कॉन्स्टेबल भरती 2025 निकाल पाहताना वेबसाइट चालत नाही, काय करावे?
एकावेळी अनेक उमेदवार वेबसाइटवर लॉगिन करत असल्याने सर्व्हर स्लो होतो, त्यामुळे तुम्ही काही वेळाने पुन्हा प्रयत्न करून पाहू शकता. पण निकाल तुम्ही यादी द्वारे बघणार आहात त्यामुळे यादी डायरेक्ट डाउनलोड पण होऊ शकते, त्यामुळे साईट न चालणे हा प्रोब्लेम तुम्हाला येणार नाही.
