IOCL Apprentice Bharti 2026: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मार्फत Apprentice Bharti 2026 साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीअंतर्गत विविध ट्रेडमध्ये शिकाऊ उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
या IOCL भरतीसाठी 10वी/ 12वी पास उमेदवार अर्ज करू शकतात, तसेच काही पदांसाठी ITI किंवा पदवी पात्रता देखील मागितली जाऊ शकते. विशेष बाब म्हणजे या भरतीसाठी कोणतीही अर्ज फी घेतली जाणार नाही, त्यामुळे सर्व पात्र उमेदवार सहजपणे अर्ज करू शकतात.
इंडियन ऑइल ही देशातील मोठी सरकारी कंपनी असून येथे अप्रेंटिस म्हणून काम करण्याची संधी मिळणे म्हणजे भविष्यासाठी चांगला अनुभव ठरतो. अप्रेंटिस कालावधीत उमेदवारांना ठराविक स्टायपेंड (वेतन) देखील दिले जाते.
या लेखामध्ये तुम्हाला IOCL Apprentice Bharti 2026 ची संपूर्ण माहिती जसे की पदांची संख्या, पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत सविस्तर दिली आहे. त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा आणि वेळेत अर्ज करा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
IOCL Apprentice Bharti 2026: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
| भरती करणारी संस्था | इंडियन ऑइल |
| भरतीचे नाव | IOCL Apprentice Bharti 2026 |
| पदाचे नाव | अप्रेंटिस |
| रिक्त जागा | 405 |
| वेतन | 14,000 रु. |
| नोकरी ठिकाण | महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड, दादरा नगर आणि हवेली, दमण आणि दीव |
| शैक्षणिक पात्रता | 10वी/ 12वी / ITI/ डिप्लोमा/ पदवी पास |
| वयोमर्यादा | 18 ते 24 वर्षे |
| अर्जाची फी | फी नाही |
| अर्ज प्रक्रिया | Online |
IOCL Apprentice Bharti 2026: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ट्रेड अप्रेंटिस | 75 |
| 2 | टेक्निशियन अप्रेंटिस | 120 |
| 3 | पदवीधर अप्रेंटिस | 210 |
| Total | 405 |
IOCL Apprentice Bharti 2026: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
| पद क्र. | पदाचे नाव | शिक्षण |
| 1 | ट्रेड अप्रेंटिस | उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण+ ITI (Fitter/ Electrician/Electronic Mechanic/Instrument Mechanic/Machinist) किंवा 12वी उत्तीर्ण असावा. |
| 2 | टेक्निशियन अप्रेंटिस | उमेदवार 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical /Electrical /Instrumentation /Civil /Electrical & Electronics/Electronics) [SC/ST/PWD: 45% गुण] उत्तीर्ण असावा. |
| 3 | पदवीधर अप्रेंटिस | उमेदवार 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 45% गुण] धारक असावा. |
IOCL Apprentice Bharti 2026: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
IOCL Apprentice Bharti साठी कोणत्याही स्वरुपाची लेखी परीक्षा होणार नाही, सोबतच मुलाखत पण घेतली जाणार नाही. डायरेक्ट उमेदवारांची निवड मेरीट वर केली जाणार आहे, पदासाठी दिलेल्या शैक्षणिक पात्रते नुसार ज्या उमेदवाराला जास्त मार्क्स आहेत त्यांची निवड हि केली जाणार आहे.
प्रथम मेरीट नुसार उमेदवारांची Shortlist काढली जाईल, जे उमेदवार या लिस्ट मध्ये येतील त्यांना कागदपत्रे पडताळणी साठी बोलवले जाईल. जर कागदपत्रे योग्य असतील तर उमेदवाराला मेडिकल टेस्ट साठी पात्र ठरवले जाईल, आणि मग शेवटी मेडिकल टेस्ट तपासणी घेऊन योग्य उमेदवाराला अप्रेंटीस पदासाठी निवडले जाईल.
IOCL Apprentice Bharti 2026: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| अर्जाची सुरुवात | 16 जानेवारी, 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 31 जानेवारी, 2026 |
IOCL Apprentice Bharti 2026: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | जाहिरात पहा |
| मेडिकल टेस्ट Medical Format | मेडिकल तपासणी नियम |
| ऑनलाईन अर्ज (पद क्र.1) | Apply Online |
| ऑनलाईन अर्ज (पद क्र.2 & 3) | Apply Online |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
IOCL Apprentice Bharti 2026: Step-by-Step Application Process
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या – IOCL च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- नवीन नोंदणी (Registration) करा – तिथे तुमची नोंदणी करून घ्या.
- लॉगिन करा – नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मिळालेल्या ID आणि पासवर्डने लॉगिन करा.
- अर्ज फॉर्म भरा – वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक तपशील नीट भरा.
- कागदपत्रे अपलोड करा – फोटो, सही आणि आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करा.
- अर्ज फी भरा – IOCL Apprentice Bharti भरतीसाठी कोणतीही अर्ज फी नाही.
- फॉर्म सबमिट करा – सर्व माहिती एकदा तपासून अर्ज सबमिट करा.
- प्रिंट काढा – भरलेल्या अर्जाची प्रिंट किंवा PDF कॉपी सेव्ह करून ठेवा.
इतर भरती अपडेट्स
FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
IOCL Apprentice Bharti 2026 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
अप्रेंटीस पदासाठी हि भरती केली जात आहे.
IOCL Apprentice Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
एकूण रिक्त जागा 405 आहेत.
IOCL Apprentice Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
ऑनलाइन अर्ज करण्याची लास्ट डेट हि 31 जानेवारी 2026 आहे.
IOCL Apprentice Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि Shortlist आणि कागदपत्रे/ मेडिकल टेस्ट च्या माध्यमातून होणार आहे.
IOCL Apprentice पदासाठी वेतन पगार किती आहे?
निवड झालेल्या उमेदवारांना प्रती महिना पगार हा 14000 रु. मिळणार आहे.
