Indian Air Force Agniveervayu Bharti 2026 ची अखेर जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु म्हणून काम करण्याची इच्छा असेल, तर ही भरती खास तुमच्यासाठी आहे. देशसेवा करता करता चांगली नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.
या भरतीत निवड झाली तर सुरुवातीला दरमहा सुमारे 30,000 रुपये पगार मिळतो. याशिवाय सरकारी सुविधा, विमा आणि इतर फायदेही दिले जातात.
या भरतीसाठी फक्त 12वी पास असणं गरजेचं आहे. मुलं आणि मुली दोघंही अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे, त्यामुळे कुठेही जायची गरज नाही, मोबाईलवरूनही अर्ज करता येतो.
या पोस्टमध्ये तुम्हाला पात्रता, वयाची अट, निवड कशी होणार, परीक्षा, पगार आणि अर्ज कसा करायचा याची सगळी माहिती सोप्या शब्दात दिली आहे. हवाई दलात नोकरी करायची असेल, तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Indian Air Force Agniveervayu Bharti 2026: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
| भरती करणारी संस्था | भारतीय हवाई दल |
| भरतीचे नाव | Indian Air Force Agniveervayu Bharti 2026 |
| पदाचे नाव | अग्निवीरवायु |
| रिक्त जागा | नमूद नाही |
| वेतन | 30,000 रु. |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| शैक्षणिक पात्रता | 12वी पास |
| वयोमर्यादा | 17.5 ते 20.5 वर्षे |
| अर्जाची फी | 550 रु. + GST |
| अर्ज प्रक्रिया | Online |
Indian Air Force Agniveervayu Bharti 2026: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
| पदाचे नाव | जागा |
|---|---|
| अग्निवीरवायु (इनटेक 01/2027) | नमूद नाही |
Indian Air Force Agniveervayu Bharti 2026: Salary (पगार)
भारतीय हवाई दल अग्निवीर वायु भरती पगार:
| वर्षे | मासिक पॅकेज | In Hand | ३०% अग्निवीर कॉर्पस फंड |
|---|---|---|---|
| पहिले | ३०,०००/- | २१,०००/- | ९,०००/- |
| दुसरे | ३३,०००/- | २३,१००/- | ९,९००/- |
| तिसरे | ३६,५००/- | २५,५८०/- | १०,९५०/- |
| चौथे | ४०,०००/- | २८,०००/- | १२,०००/- |
| भारतीय हवाई दलात अग्निवीर म्हणून ४ वर्षे काम केल्यानंतर निवृत्ती – सेवा निधी पॅकेज म्हणून ११.७१ लाख रुपये + कौशल्य प्राप्त प्रमाणपत्र. २५% पर्यंत उमेदवार भारतीय हवाई दलाच्या नियमित केडरमध्ये नोंदणी केली जातील. | एकूण रु. ५.०२ लाख | ||
Indian Air Force Agniveervayu Bharti 2026: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| अग्निवीरवायु | अर्जदार किमान 50% गुणांसह 12 वी पास (Mathematics, Physics and English) असावा. किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile / Computer Science / Instrumentation Technology / Information Technology). किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. Physics and Mathematics. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी विषयासह उत्तीर्ण असावा. |
Indian Air Force Agniveervayu Bharti 2026: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
1) Online Test –
| गटाचे नाव | विषय | प्रश्नांची संख्या | एकूण गुण | परीक्षेचा कालावधी |
|---|---|---|---|---|
| एअरमेन सायन्स | English | २० | ७० | ६० मिनिटे |
| Mathematics | २५ | |||
| Physics | २५ | |||
| विज्ञानाव्यतिरिक्त इतर विमानचालक | Reasoning & General Awareness (RAGA) | ३० | ५० | ४५ मिनिटे |
| English | २० | |||
| वैमानिक विज्ञान आणि विज्ञानाव्यतिरिक्त | Mathematics | २५ | १०० | ८५ मिनिटे |
| English | २० | |||
| Reasoning & General Awareness (RAGA) | ३० | |||
| Physics | २५ |
| विषय (Subject) | पुस्तके (Best Books) | उपयोग |
|---|---|---|
| Physics | NCERT Physics Class 11 & 12 | बेसिक संकल्पना, सूत्रे आणि थिअरी समजण्यासाठी |
| Mathematics | NCERT Maths Class 11 & 12Quantitative Aptitude – R.S. Aggarwal | गणिताचा मजबूत पाया आणि सराव प्रश्न |
| English | English Grammar & Comprehension (कोणतेही Competitive Exam Book) | Grammar, Vocabulary, Comprehension सुधारण्यासाठी |
| Reasoning | A Modern Approach to Verbal & Non-Verbal Reasoning – R.S. Aggarwal | Logical Thinking आणि Reasoning प्रश्नांसाठी |
| General Awareness (GA) | Lucent’s General Knowledge | इतिहास, भूगोल, विज्ञान, चालू घडामोडी |
| Previous Papers | Agniveer Airforce Previous Year Question Papers (Solved) | परीक्षेचा पॅटर्न समजण्यासाठी आणि सरावासाठी |
| All-in-One Guide | IAF Agniveer Vayu Exam Guide | पूर्ण सिलॅबस, Mock Tests आणि Practice साठी |
2) Physical Fitness Test (PFT) –
Physical Fitness Test (PFT) – पुरुष उमेदवार:
| चाचणी | कमाल वेळ | टीप (Remarks) |
|---|---|---|
| 1.6 किमी धाव | 7 मिनिटांच्या आत | धाव पूर्ण झाल्यावर 10 मिनिटांचा ब्रेक दिला जाईल. |
| 10 पुश-अप्स | 1 मिनिट | 10 मिनिट ब्रेकनंतर चाचणी. |
| 10 सिट-अप्स | 1 मिनिट | पुश-अप्सनंतर 2 मिनिट ब्रेक. |
| 20 स्क्वॅट्स | 1 मिनिट | सिट-अप्सनंतर 2 मिनिट ब्रेक. |
Physical Fitness Test (PFT) – महिला उमेदवार:
| चाचणी | कमाल वेळ | टीप (Remarks) |
|---|---|---|
| 1.6 किमी धाव | 8 मिनिटांच्या आत | धाव पूर्ण झाल्यावर 10 मिनिटांचा ब्रेक दिला जाईल. |
| 10 सिट-अप्स | 1 मिनिट 30 सेकंद | 10 मिनिट ब्रेकनंतर चाचणी |
| 15 स्क्वॅट्स | 1 मिनिट | सिट-अप्सनंतर 2 मिनिट ब्रेक. |
3) Medical Examination –
- मेडिकल तपासणी हा फिजिकल टेस्टनंतरचा महत्त्वाचा टप्पा आहे.
- यामध्ये उमेदवाराची उंची, वजन, छाती, डोळ्यांची दृष्टी, कान ऐकण्याची क्षमता, दात, त्वचा आणि एकूण आरोग्य तपासलं जातं.
- डोळ्यांना जास्त नंबर, कलर ब्लाइंडनेस, कोणताही गंभीर आजार किंवा कायमस्वरूपी दुखापत असल्यास उमेदवार अपात्र ठरू शकतो.
- हृदय, श्वसन आणि इतर शारीरिक तपासणीत फिट आल्यावरच अंतिम निवड प्रक्रियेत पुढे जाता येतं, त्यामुळे भरतीपूर्वी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.
सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे तपासणी केली जाते. यामध्ये शैक्षणिक प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, ओळखपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे तपासली जातात.
सर्व माहिती बरोबर आढळल्यानंतर उमेदवारांची कामगिरी पाहून अंतिम मेरीट लिस्ट तयार केली जाते. या मेरीट लिस्टमध्ये नाव आलेल्या उमेदवारांचीच अंतिम निवड केली जाते, आणि त्यांना पुढील प्रशिक्षणासाठी बोलावले जाते.
Indian Air Force Agniveervayu Bharti 2026: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| अर्जाची सुरुवात | 12 जानेवारी, 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 01 फेब्रुवारी 2026 |
| परीक्षेची तारीख | 30 मार्च /31 मार्च 2026 |
Indian Air Force Agniveervayu Bharti 2026: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | जाहिरात पहा |
| ऑनलाईन अर्ज | Apply Now |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Indian Air Force Agniveervayu Bharti 2026: Step-by-Step Application Process
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या – Indian Air Force Agniveervayu च्या website वर जा.
- नवीन नोंदणी (Registration) करा – ई-मेल ID आणि मोबाईल नंबर वापरून अकाउंट तयार करा.
- लॉगिन करा – नोंदणी झाल्यानंतर ID-पासवर्डने लॉगिन करा.
- अर्ज फॉर्म भरा – वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती नीट भरा.
- कागदपत्रे अपलोड करा – फोटो, सही आणि आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करा.
- अर्ज फी भरा – ऑनलाइन पद्धतीने फी भरा (लागू असल्यास).
- फॉर्म सबमिट करा – सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करा.
- प्रिंट काढा – भरलेल्या अर्जाची प्रिंट किंवा PDF सेव्ह करून ठेवा.
इतर भरती अपडेट्स
Indian Army SSC Tech Bharti 2026: इंडियन आर्मी SSC टेक्निकल भरती, पगार 56,100 रु.लगेच इथून अर्ज करा
Federal Bank Bharti 2026: फेडरल बँकेत ऑफिस असिस्टंट पदाची भरती, 19500 रु. महिना, 10वी पास अर्ज करा
NMMC Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिकेत भरती, 177500 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
IOCL Bharti 2026: इंडियन ऑइल मध्ये भरती! 1,05,000 रु. पगार 12वी पास अर्ज करा
BARC DAE Bharti 2026: भाभा अणु संशोधन केंद्र भरती, 74000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
RRB Group D Bharti 2026: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांची मेगाभरती! 22,000 जागा
FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
Indian Air Force Agniveervayu Bharti 2026 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
अग्निवीरवायु पदांची भरती केली जाणार आहे.
Indian Air Force Agniveervayu Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
एकूण रिक्त जागा अद्याप सांगितली नाहीये.
Indian Air Force Agniveervayu Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
ऑनलाइन अर्ज करण्याची लास्ट डेट हि 01 फेब्रुवारी 2026 आहे.
Indian Air Force Agniveervayu Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मेडिकल टेस्ट वर आधारित आहे.
Indian Air Force Agniveervayu पदासाठी वेतन पगार किती आहे?
निवड झालेल्या उमेदवारांना प्रती महिना पगार हा 30000 रु. मिळणार आहे.
