SSC JE Bharti 2025: केंद्र सरकारच्या विविध विभागांत इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी मोठी संधी आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत ज्युनिअर इंजिनिअर (JE) पदांसाठी 2025 मध्ये मेगा भरती जाहीर होणार आहे. या भरतीतून सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि अन्य तांत्रिक शाखांसाठी पदे भरण्यात येणार आहेत.
दरवर्षी SSC मार्फत विविध केंद्र सरकारी विभागांसाठी JE पदांची भरती केली जाते. लाखो विद्यार्थी ही परीक्षा देऊन सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतात. ही भरती केवळ चांगला पगारच नव्हे तर स्थिर नोकरी, भत्ते आणि प्रगतीची उत्तम संधी देखील देते.
जर तुम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री केलेली असेल आणि सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असेल, तर ही भरती तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. खाली आम्ही SSC JE Bharti 2025 संदर्भातील संपूर्ण माहिती खाली दिली आहे — एकूण जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा आणि महत्वाच्या तारखा.


आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
SSC JE Bharti 2025 भरतीची थोडक्यात माहिती
घटक माहिती | तपशील |
---|---|
विभागाचे नाव | कर्मचारी निवड आयोग (SSC) |
भरतीचे नाव | SSC Junior Engineer (JE) भरती 2025 |
पदसंख्या | 1340 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फीस | सामान्य, OBC : ₹100/- SC, ST, महिला, PwBD : फी नाही |
शिक्षण पात्रता | संबंधित शाखेत डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग डिग्री आवश्यक |
वयोमर्यादा | सामान्यतः 18 ते 30/32 वर्षे (विभागानुसार) सवलती नियमानुसार लागू |
निवड प्रक्रिया | CBT पेपर 1 + डिस्क्रिप्टिव्ह पेपर 2 + कागदपत्र पडताळणी |
पगार व भत्ते | ₹35,400 ते ₹1,12,400 प्रतिमाह (7वा वेतन आयोग) त्यासोबत DA, HRA, इतर भत्ते |
SSC JE Bharti 2025 शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित शाखेत (सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इतर) डिप्लोमा किंवा पदवी आवश्यक.
- अंतिम वर्षात असलेले विद्यार्थी अर्ज करू शकत नाहीत.
SSC JE Bharti 2025 वयोमर्यादा (Age Limit):
- किमान वय: 18 वर्षे
- कमाल वय:
- CPWD व CWC साठी: 32 वर्षे
- उर्वरित विभागांसाठी: 30 वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सवलत:
- SC/ST: 5 वर्षे
- OBC: 3 वर्षे
- PwBD: 10 वर्षे (SC/ST: 15 वर्षे, OBC: 13 वर्षे)
- इतर केंद्र सरकारी नियमांनुसार सवलती लागू राहतील.
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, दिव्यांग उमेदवारांना केंद्र शासनाच्या नियमानुसार वयात सवलत लागू.
SSC JE Bharti 2025 पगार व भत्ते (Salary & Benefits)
पद | Pay Level | प्रारंभिक पगार | अंदाजे मासिक पगार (DA, HRA सहित) |
---|---|---|---|
JE | पगार – लेव्हल 6 | ₹35,400 | ₹50,000 – ₹60,000 |
SSC JE Bharti 2025 निवड प्रक्रिया (Selection Process)
निवड प्रक्रिया (Selection Process)
SSC JE भरतीसाठी खालील तीन टप्प्यांद्वारे निवड प्रक्रिया राबवली जाते:
1. पेपर 1 (CBT – संगणक आधारित परीक्षा):
- प्रकार : ऑब्जेक्टिव्ह (MCQ)
- एकूण गुण : 200
- कालावधी : 2 तास
- नकारात्मक गुण : प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा
2. पेपर 2 (डिस्क्रिप्टिव्ह पेपर):
- प्रकार : लेखी परीक्षा (Descriptive)
- एकूण गुण : 300
- कालावधी : 2 तास
- संबंधित तांत्रिक विषयावर आधारित प्रश्न
3. कागदपत्र पडताळणी (Document Verification):
- पेपर 1 व 2 मध्ये पात्र उमेदवारांना दस्तऐवज पडताळणीसाठी बोलावले जाते.
- सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर अंतिम निवड होते.
SSC JE Bharti 2025 परीक्षा पद्धत (Exam Pattern) – टेबल फॉर्ममध्ये:
पेपर 1 (CBT) – MCQ स्वरूपात
विषय | प्रश्नसंख्या | गुण | वेळ |
---|---|---|---|
सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती | 50 | 50 | |
सामान्य जागरूकता | 50 | 50 | |
संबंधित शाखेचा तांत्रिक विषय | 100 | 100 | |
एकूण | 200 | 200 | 2 तास |
पेपर 2 (डिस्क्रिप्टिव्ह पेपर) – लेखी स्वरूपात
विषय | एकूण गुण | वेळ |
---|---|---|
संबंधित तांत्रिक विषय (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) | 300 | 2 तास |
इतर महत्वाची माहिती:
- पेपर 1 मध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील.
- पात्र उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाते.
SSC JE Bharti 2025 Important Dates | महत्वाच्या तारखा
तपशील | तारीख |
---|---|
ऑनलाईन अर्ज सुरू | 30 जून 2025 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 21 जुलै 2025 रात्री 11:00 वाजेपर्यंत |
शुल्क भरण्याची अंतिम तारीख | 22 जुलै 2025 |
अर्जात दुरुस्ती करण्याची विंडो | 26 ते 28 जुलै 2025 |
परीक्षा (CBT – पेपर I) | 27 ते 31 ऑक्टोबर 2025 |
परीक्षा (CBT – पेपर II) | जानेवारी/फेब्रुवारी 2026 |
SSC JE Bharti 2025 Important Links महत्वाच्या लिंक्स
घटक | लिंक / माहिती |
---|---|
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
भरतीची जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
Apply Online (ऑनलाईन अर्ज) | इथे अर्ज करा |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
SSC JE Bharti 2025 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया (How to Apply Online):
SSC JE भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
टप्पा 1: अधिकृत वेबसाईटला भेट द्या
उमेदवारांनी सर्वप्रथम SSC च्या अधिकृत वेबसाईटला www.ssc.gov.in भेट द्यावी.
टप्पा 2: नवी नोंदणी (One-Time Registration)
जर तुम्ही प्रथमच SSC च्या भरतीसाठी अर्ज करत असाल, तर नोंदणी करणे आवश्यक आहे.
- Register Now या लिंकवर क्लिक करा.
- आपले नाव, जन्मतारीख, मोबाइल नंबर, ईमेल आयडी, फोटो व स्वाक्षरी यासह सर्व माहिती भरा.
- OTP द्वारे मोबाईल व ईमेल व्हेरिफाय करा.
- युजर आयडी व पासवर्ड तयार होईल.
टप्पा 3: लॉगिन करा आणि अर्ज भरा
- युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- JE Examination 2025 या लिंकवर क्लिक करा.
- वैयक्तिक, शैक्षणिक व इतर सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (फोटो, स्वाक्षरी, इत्यादी).
टप्पा 4: शुल्क भरणे (Fee Payment)
- सामान्य व OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹100/- आहे.
- SC/ST, महिला आणि PwBD उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.
- ऑनलाइन पद्धतीने डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग द्वारे फी भरणे आवश्यक आहे.
टप्पा 5: अर्ज सबमिट करा व प्रिंट काढा
- सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून घेतल्यानंतर अर्ज सबमिट करा.
- अर्जाचा प्रिंटआउट व फी पावती प्रिंट करून सुरक्षित ठेवा.
महत्वाची टीप:
✅ अर्ज करताना संपूर्ण माहिती बरोबर भरा, चुकीच्या माहितीमुळे अर्ज रद्द होऊ शकतो.
✅ फोटो व स्वाक्षरी फॉरमॅट आणि साईझ अधिकृत सूचनांनुसारच अपलोड करा.
✅ अर्ज करण्याची अंतिम तारीख लक्षात ठेवा.