SSC HSC Exam 2026 Study Plan: 10वी/ 12वी बोर्ड परीक्षेत मिळवा 90%+ मार्क्स, स्टेप बाय स्टेप स्टडी प्लान & मागील पेपर्स

SSC HSC Exam 2026 Study Plan: 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा असतो. या परीक्षेत मिळालेले मार्क्स पुढच्या कॉलेज, करिअर आणि भविष्यातल्या संधींवर थेट परिणाम करतात. त्यामुळे 2026 च्या बोर्ड परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्यासाठी योग्य नियोजन खूप गरजेचं आहे.

अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करायची इच्छा असते, पण कुठून सुरुवात करायची, वेळ कसा विभागायचा, आणि दररोज किती अभ्यास करावा हे कळत नाही. चुकीच्या पद्धतीने अभ्यास केल्यामुळे मार्क्स कमी येतात. पण योग्य Study Plan असेल तर 90%+ मिळवणे अजिबात कठीण नाही.

या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी एकदम सोप्या भाषेत SSC आणि HSC Exam 2026 साठी Step-by-Step Study Plan तयार केला आहे. कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा, Revision कसे करायचे, Notes कसे बनवायचे, आणि Mock Tests कधी सुरू करायचे—सगळं detail मध्ये सांगितलं आहे.

जर तुम्ही 2026 मध्ये बोर्ड परीक्षा देत असाल आणि तुमचं Dream Target 90%+ असेल, तर ही पोस्ट तुमच्यासाठीच आहे. चला तर मग, योग्य प्लॅनने अभ्यासाला सुरुवात करूया, जेणेकरून बोर्ड परीक्षेत तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळतील.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

SSC & HSC Exam 2026 Study Plan Overview

कोणती परीक्षा? (Which Exams?)SSC 10th Board Exam 2026
HSC 12th Board Exam 2026
परीक्षा कोण घेतं?Maharashtra State Board of Secondary
Higher Secondary Education (MSBSHSE)
या पोस्टमध्ये काय दिलं आहे?10वी व 12वी साठी Step-by-Step Study Plan, Daily Time Table, Revision Strategy, Tips, आणि 90%+ मिळवण्यासाठी Golden Rules
ही पोस्ट कोणासाठी आहे?2026 मध्ये SSC किंवा HSC बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, तसेच self-study करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी.
या Study Plan ने काय फायदा?• Concept Strong होतील
• Revision योग्य वेळी होईल
• Time management सुधारेल
• Writing speed वाढेल
• परीक्षेतील mistakes कमी होतील
ही पोस्ट फॉलो केली तर किती मार्क्स मिळू शकतात?या पोस्ट मधील माहिती follow केल्यास → 90%+ ते 95%+ सहज मिळू शकतात (SSC/HSC दोन्ही साठी लागू)
ज्यांचा बेस विक आहे (weak basics)या प्लॅनने 2–3 महिन्यांत basics मजबूत होतात + Oct पासून full practice सुरू करता येते.
कोणते विभाग सर्वात महत्त्वाचे?Maths, Science, Languages (SSC)
Maths/Physics/Accounts/Eco (HSC)
शेवटच्या 2 महिन्यांमध्ये फोकसFull Papers, Model Tests, आणि Fast Revision
SSC HSC Exam 2026 Study Plan PDFDownload करा

SSC 10वी बोर्ड परीक्षा 2026 – संपूर्ण Study Plan

SSC मध्ये Maths + Science हे सर्वात जास्त मार्क्स वाढवणारे विषय आहेत. Social Science आणि Languages मध्ये Presentation महत्वाचे असते.

1. SSC अभ्यासाचे टप्पे (Phases) आणि लक्ष्य

टप्पा (Phase)कालावधीमुख्य लक्ष्य
Foundation Phaseजून – सप्टेंबरसंपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणे, स्वतःच्या नोट्स तयार करणे, concepts clear करणे
Practice Phaseऑक्टोबर – डिसेंबरPYQs सोडवणे, लेखन गती वाढवणे, चुकीचे प्रश्न सुधारून घेणे
Revision Phaseजानेवारी – फेब्रुवारीजलद उजळणी, Model Papers, कठीण प्रश्नांचा सराव

2. SSC दैनिक अभ्यास वेळापत्रक (Daily Study Timetable)

शाळा/क्लास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

वेळविषयकालावधी
5:30 – 7:00 (सकाळ)Science 1 & 21.5 तास
8:00 – 4:00शाळा/क्लास8 तास
4:30 – 6:30 (दुपार)Maths 1 & 22 तास
7:00 – 8:30 (संध्याकाळ)History / Geography1.5 तास
9:30 – 10:30 (रात्र)Languages – Grammar + Writing1 तास
रविवारRevision + एक Full Paper7 तास

3. SSC मध्ये 95%+ मिळवण्यासाठी खास टिप्स

  • Maths
    • रोज किमान 10 उदाहरणे सोडवा.
    • Theorems पाठ न करता लिहून सराव करा.
    • Steps neat लिहा—प्रत्येक step ला marks आहेत.
  • Science
    • Diagrams neat आणि नावांसह (Label) करून घ्या.
    • Scientific Reason खूप थेट व clear ठेवा.
    • Formulas वेगळ्या वहीत लिहून ठेवा.
  • Social Science
    • उत्तरे points मध्ये लिहा.
    • नकाशे आणि आलेखांचा सराव करा.

10वी बोर्डाचे मागील 10 वर्षाचे पेपर्स / PYQ

HSC 12वी बोर्ड परीक्षा 2026 – संपूर्ण Study Plan

HSC मध्ये विषयांची सखोलता, formula correctness, numerical practice आणि paper completion speed महत्त्वाची असते.

1. HSC अभ्यासाचे टप्पे (Phases) आणि लक्ष्य

टप्पाकालावधीउद्देश
Foundation Phaseजून – सप्टेंबरConcepts + Formulas strong करणे, स्वतःच्या notes तयार करणे.
Practice Phaseऑक्टोबर – डिसेंबरPYQs + Model Papers, numerical वर फोकस.
Revision Phaseजानेवारी – फेब्रुवारीFormula Sheet, Fast Revision, Writing Speed वाढवणे.

HSC Golden Study Rules

  • Daily Notes – प्रत्येक धड्याचे लहान Notes काढा.
  • 100% Concept – समजलं नाही तर पुढे जाऊ नका.
  • Weekly Revision – दर रविवारी उजळणी करा.

2. HSC दैनिक अभ्यास वेळापत्रक (All Streams: Science / Commerce / Arts)

वेळविषयकालावधी
5:00 – 7:00 (सकाळ)Maths / Accounts – Problem Solving2 तास
8:00 – 4:00कॉलेज / क्लास8 तास
4:30 – 6:30कठीण Theory (Physics/Economics)2 तास
7:00 – 8:30हलके Theory (Chemistry/OCM/History)1.5 तास
9:30 – 10:30English/Marathi Writing Skills1 तास
रविवार4 तास Revision + 3 तास Full PaperNo time limit

3. HSC 95%+ Score Tips

  • Science Stream
    • Physics/Chemistry Numerical → formula + unit correct
    • Derivations रोज लिहा.
    • Organic reactions एका chart मध्ये ठेवा.
  • Commerce
    • Accounts → रोज एक Problem.
    • OCM, Economics → Points + Subheadings
  • Arts
    • Deep reading
    • Comparative Study → History & Polity मध्ये फार उपयोगी.

SSC HSC Exam 2026 Study Plan: अभ्यासाचे ‘सुवर्ण नियम’ Golden Rules for 95%+ (SSC + HSC)

✔ Attractive Handwriting

स्वच्छ, neat अक्षर — boards मध्ये खूप फरक पडतो.

✔ Perfect Presentation

  • Points मध्ये उत्तर.
  • Underline important words
  • Neat, labelled diagrams

✔ Margins & Start New Page

  • प्रत्येक मुख्य प्रश्न नवीन पानावर.
  • neat margins → examiner वर positive effect

✔ Time Management

  • First 15 min → Paper वाचा
  • 80% → Writing
  • Last 20% → Checking

✔ Avoid Distractions

  • Study करताना phone दूर
  • सोशल मीडिया पूर्ण बंद

✔ Health First

  • 7–8 तास झोप घेणे.
  • पर्याप्त पाणी पिणे.
  • हलकी exercise व्यायाम करणे.

SSC HSC Exam 2026 Study Plan: परीक्षा हॉल लास्ट मिनिट टिप्स

  • शांत रहा, panic होऊ देऊ नका.
    • पेपर सुरू करण्यापूर्वी आणि दरम्यान शांत रहा. इतरांनी किती लिहीले याचा विचार करू नका.
  • प्रत्येक उत्तराचा बरोबर प्रश्न क्रमांक लिहा.
    •  प्रत्येक प्रश्नाला आणि उपप्रश्नाला (Sub-question) योग्य क्रमांक देणे विसरू नका. प्रश्न क्रमांक चुकीचा असल्यास तुम्हाला शून्य (Zero) गुण मिळतील.
  • गणितात final answer चौकटीत (box) मध्ये लिहा.
  • Paper लिहून झाला कि मग शेवटी तितकाच वेळ तपासणीसाठी ठेवा.
    • पेपर संपल्यानंतर, तुम्ही सर्व प्रश्न सोडवले आहेत की नाही आणि प्रत्येक प्रश्नाला क्रमांक दिला आहे की नाही, हे तपासा. विशेषत: गणितात शेवटचे उत्तर (Final Answer) बॉक्समध्ये आहे की नाही, हे तपासा.

FAQs: नेहमी विचारले जाणारे प्रश्न

SSC आणि HSC 2026 बोर्ड परीक्षेत 90%+ मिळवण्यासाठी दररोज किती तास अभ्यास करावा?

दररोज 4 ते 6 तास Self-Study पुरेशी आहे. महत्त्वाचे म्हणजे तास जास्त नाही, तर अभ्यास नियमित, planning ने, आणि revision सह असावा.

कमी बेस असलेल्या (weak students) विद्यार्थ्यांनी हा Study Plan फॉलो केला तर 90% मिळवता येतील का?

होय! Basics कमजोर असले तरी, जून ते सप्टेंबरपर्यंतचा Foundation Phase योग्यरित्या फॉलो केला तर Concept strong होतात आणि परीक्षेत 80–90%+ मिळू शकतात.

10वी आणि 12वी दोन्ही विद्यार्थ्यांसाठी एकच Study Plan चालतो का?

नाही. SSC आणि HSC यांचे विषय व अवघडपणा वेगळा आहे. म्हणूनच पोस्टमध्ये SSC साठी वेगळा प्लॅन आणि HSC साठी वेगळा प्लॅन दिला आहे.

फक्त 2–3 महिने उरले तरीही या प्लॅनने चांगले मार्क्स मिळवता येतात का?

होय. जरी कमी वेळ उरला तरी Revision Phase + Model Papers वर फोकस केल्यास students ला 70–85%+ सहज मिळतात. पूर्ण 90%+ साठी किमान 5–6 महिन्यांची तयारी उत्तम.

Leave a comment