स्टाफ सिलेक्शन कमिशन दिल्ली भरती, 4000+ जागा! अर्ज करा | SSC CPO Bharti 2024

SSC CPO Bharti: नमस्कार मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलिस मध्ये उपनिरीक्षक या पदासाठी बंपर भरती निघाली आहे. तसेच भरतीसाठी अर्ज पण सुरू झाले आहेत.

जे उमेदवार या स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती साठी अर्ज करू इच्छित आहेत, त्यांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे. इतर कोणताही मार्ग नाहीये, जरी तुम्ही इतर मार्गाने फॉर्म भरला तर तो बाद केला जाईल. त्यामुळे जी अधिकृत वेबसाईट दिली आहे, त्यावरूनच अर्ज भरून घ्या.

तब्बल 4,187 एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त जागांसाठी ही SSC CPO Bharti राबवली जात आहे. पद केवळ 3 आहेत, आणि त्यासाठीच दिल्ली पोलिस विभागामध्ये उपनिरीक्षक अशा वेगवेगळ्या पदावर परीक्षेद्वारे निवड होणार आहे.

यात एक महत्वाची आणि विशेष बाब म्हणजे या स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती साठी केवळ 100 रुपये एवढी परीक्षा फी ठेवण्यात आली आहे, आणि मागासवर्गीय उमेदवारांना फी मध्ये पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. सोबतच सर्व प्रवर्गातील महिला उमेदवारांना देखील फी भरायची गरज नाही, त्यांना पण फी माफ केली आहे.

या भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे, त्यामुळे ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही उमेदवारांना माहिती असणे आवश्यक आहे, Last Date 28 मार्च 2024 आहे. एकदा तारीख गेली की नंतर फॉर्म भरता येणार नाही, त्यामुळे आताच अर्ज सादर करा.

SSC CPO Bharti 2024

📢 भरतीचे नाव – स्टाफ सिलेक्शन कमिशन दिल्ली भरती

✅ पदाचे नाव – 

पदाचे नावपद संख्या
दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.)(पुरुष) 125
दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.)(महिला) 61
CAPF मधील उपनिरीक्षक (GD)4001
Total4187

🚩 एकूण रिक्त जागा – 4,187 Vacancy

👨‍🎓 शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा किमान पदवीधर असावा.

➡️ नोकरीची ठिकाण – संपूर्ण भारत

💰 पगार – 47,496 रुपये प्रति महिना वेतन 

💵 परीक्षा फी – Open, OBC प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये फी भरायची आहे. तर इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना फी माफ असणार आहे. सर्व महिलांना देखील फी मध्ये पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.

📝 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

🔞 वयोमर्यादा – 20 ते 25 वर्षे

📍 वयोमर्यादा सूट – SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट आणि OBC प्रवर्गासाठी 03 वर्षांची सूट असणार आहे.

📆 फॉर्मची Last Date – 28 मार्च, 2024

📋 परीक्षा (CBT) तारीख  – 09, 10 & 13 मे 2024

🌐 अधिकृत संकेतस्थळhttps://ssc.gov.in/
🖥️ जाहिरात (अधिसूचना)PDF Download करा
📝 ऑनलाईन अर्जयेथून Apply करा

SSC CPO Bharti Physical Qualification (शारीरिक पात्रता निकष)

उंचीछातीवजन
पुरुष 170 सेमी80 सेमी28 ते 35 Kg
महिला157 सेमीNot Applicable28 ते 35 Kg

मागासवगीर्य उमेदवारांना या शारीरिक पात्रता निकषांत सूट देण्यात आली आहे, त्याची माहिती तुम्ही SSC CPO Bharti Notification PDF मार्फत घेऊ शकता.

तसेच वजन देखील उमेदवाराच्या उंची नुसार देण्यात आले आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या उंची नुसार वजन किती असायला हवे, हे जाहिराती मधून पहावे लागेल. याठिकाणी दिलेले वजन हे 4 फूट 6 इंच उंची साठी असणार आहे.

SSC CPO Bharti Medical Qualification

SSC CPO Bharti मेडीकल टेस्ट साठी उमेदवाराला काही निकषांचे पालन करावे करावे लागते. त्यानुसारच उमेदवार निवडले जाणार आहेत.

  • त्यासाठी उमेदवाराचे पाय सपाट असू नयेत.
  • उमेदवाराच्या डोळ्यात तिरकसपणा नसावा.
  • उमेदवाराला Knock Knee नसावी. (दोन्ही पायात अंतर असावा)

थोडक्यात वरील प्रमाणे अर्जदार उमेदवाराची मेडीकल तपासणी होणार आहे, आणि जर या निकषात उमेदवार बसत नसेल तर तो भरती साठी पात्र ठरणार नाही.

SSC CPO Bharti Apply online (ऑनलाईन अर्ज प्रक्रिया)

स्टाफ सिलेक्शन कमिशन दिल्ली भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सुरू झाले आहेत, पात्र अशा सर्व पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी SSC द्वारे पोर्टल सुरु करण्यात आले आहे, त्या पोर्टलची लिंक वर दिली आहे. तेथून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.

भरतीचा फॉर्म हा साईट वर देण्यात आला आहे, तो तुम्हाला काळजीपुर्वक भरून घ्यायचा आहे. अचूक स्वरूपात अर्ज भरणे अपेक्षित आहे, नाहीतर अर्ज बाद केला जाऊ शकतो.

अर्ज केल्यानंतर भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे फॉर्म मध्ये अपलोड करायचे आहेत. त्यानंतर Open आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये परीक्षा फी भरायची आहे.

फी भरून झाल्यावर एकदा तुमचा अर्ज तपासून पाहायचा आहे, चुका असतील तर त्या दुरुस्त करून घ्यायची आहेत. आणि नंतरच फॉर्म खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करून अर्ज Submit करायचा आहे.

ऑनलाइन स्वरूपात अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ही 28 मार्च 2024 आहे, त्यामुळे देय तारखे आगोदर अर्ज सादर करायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज घेतले जाणार नाहीत, त्यामुळे त्वरित आता वेळ आहे तो पर्यंत अर्ज करून टाका.

SSC CPO Bharti Exam (स्टाफ सिलेक्शन कमिशन पेपर)

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीसाठी उमेदवारांना SSC CPO Bharti Exam देणे अनिवार्य असणार आहे. ही परीक्षा कॉम्प्युटर वर होणार आहे, म्हणजे ऑनलाइन स्वरूपात MCQ स्वरूपात हि Test असणार आहे. 

CBT स्वरुपातील या भरती पेपर साठी 0.25 अशी Negative Marking असणार आहे. यात जेवढे प्रश्नांची उत्तरे चुकतील त्याच्या 0.25 प्रमाणे मार्क कट केले जाणार आहेत.

ही SSC CPO Bharti Exam 09, 10 & 13 मे 2024 रोजी घेतली जाणार आहे, परीक्षा ऑनलाईन असल्याने कॉम्प्युटर आणि चांगले इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक असणार आहे.

या परीक्षेत जे उमेदवार पास होतील ते SSC CPO Bharti साठी पात्र होणार आहेत, दोन टप्प्यात भरतीची परीक्षा होणार आहे, एकूण 200 प्रश्न आहेत, त्यांना प्रत्येकी 200 मार्क असणार आहेत.

SSC CPO Bharti FAQ

Who is eligible for CPO 2024?

SSC CPO Bharti साठी पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत.

How to Apply for SSC CPO Bharti?

SSC CPO भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करता येतात, त्याची सविस्तर प्रक्रिया वर सांगितली आहे.

How many vacancies are there in SSC CPO Bharti 2024?

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती साठी एकूण 4187 एवढी रिक्त जागा वर भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

3 thoughts on “स्टाफ सिलेक्शन कमिशन दिल्ली भरती, 4000+ जागा! अर्ज करा | SSC CPO Bharti 2024”

Leave a comment