SBI Clerk Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत ग्रॅज्युएशन पासवर लिपिक पदाची मेगा भरती, तब्बल 5180+ जागा, लगेच इथून अर्ज करा

SBI Clerk Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत (SBI) लिपिक पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार असून, कोणत्याही राज्यातून या भरती साठी फॉर्म भरता येणार आहे. सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी नक्कीच ही एक चांगली संधी आहे.

या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. म्हणजे BA, BCom, BSc किंवा इतर कोणतीही डिग्री असेल तरी चालते. काही ठिकाणी स्थानिक भाषेचं ज्ञान आवश्यक आहे, त्यामुळे जाहिरातीत दिलेली माहिती एकदा नीट वाचून नक्की घ्या.

सोबतच या भरती साठी अर्ज, पात्रता, वयाची अट, परीक्षा कशी असते, वेतन किती असतं – यासारख्या सगळ्या गोष्टींची माहिती पुढच्या लेखात सविस्तर दिली आहे. त्यामुळे कृपया आर्टिकल काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचा आणि लगेच ऑनलाईन स्वरुपात वेळ न दवडता लागलीच फॉर्म भरून टाका.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

SBI Clerk Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

विवरणमाहिती (Details)
भरतीचे नावSBI Clerk Bharti 2025
भरती करणारी संस्थाभारतीय स्टेट बँक (State Bank of India)
पदाचे नावज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
एकूण जागा5180+
शैक्षणिक पात्रताकिमान पदवी (Graduation) कोणत्याही शाखेत
वयोमर्यादा20 ते 28 वर्षे
पगार / मानधन₹26,730/-
अर्ज प्रक्रियाऑनलाईन (Online)
अर्ज फीGeneral/OBC/EWS: ₹750/
SC/ST/PWD/ExSM: फी नाही
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अधिकृत वेबसाइटhttps://sbi.co.in/web/careers

SBI Clerk Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पदाचे नावपद संख्या
ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)5180

SBI Clerk Bharti 2025: Per Month Salary

प्रारंभिक मूळ वेतन (Basic Pay)₹26,730/- (₹24,050/- + पदवीसाठी दोन अ‍ॅडव्हान्स इन्क्रिमेंट्स)
पगार श्रेणी (Pay Scale)Rs. 24050-1340/3-28070-1650/3-33020-2000/4-41020-2340/7-57400-4400/1-61800-2680/1-64480
एकूण प्रारंभिक पगार (Metro Cities)₹46,000/- प्रतिमाह (DA व इतर भत्त्यांसह)
महागाई भत्ता (DA)सध्याच्या दरानुसार लागू
इतर भत्तेHRA, TA, City Allowance, इ.
इतर सुविधाPF, New Pension Scheme, मेडिकल सुविधा, एलटीसी, रजा सुविधा, इत्यादी
टीपपगार व भत्ते पोस्टिंगच्या ठिकाणावर अवलंबून असतात.

SBI Clerk Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नावशिक्षण
ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्सकोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त उमेदवार.

SBI Clerk Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

वर्गवयोमर्यादासवलत
सर्वसाधारण (General / UR)20 ते 28 वर्षेसवलत नाही
OBC20 ते 31 वर्षे03 वर्षे वयोमर्यादेत सूट
SC / ST20 ते 33 वर्षे05 वर्षे वयोमर्यादेत सूट

SBI Clerk Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) प्राथमिक परीक्षा (Preliminary Exam)

  • ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होईल.
  • एकूण 100 गुणांची परीक्षा असेल.
  • एकूण कालावधी: 1 तास, पण प्रत्येक विभागाला स्वतंत्र वेळ दिली जाईल.
  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण वजा केले जातील.
  • या टप्प्यात फक्त गुणवत्ता यादीनुसार 10 पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी निवडले जातील.
विषयाचे नावप्रश्नांची संख्यागुणवेळमाध्यम
English language303020 मिनिटेइंग्रजी
Numerical Ability353520 मिनिटेइंग्रजी / हिंदी
Reasoning Ability353520 मिनिटेइंग्रजी / हिंदी
एकूण10010060 मिनिटे

2) मुख्य परीक्षा (Main Exam)

  • मुख्य परीक्षा पण ऑनलाईन असते, आणि यात देखील प्रत्येक विभागाला स्वतंत्र वेळ असतो.
  • एकूण गुण: 200, प्रश्न: 190, आणि कालावधी: 2 तास 40 मिनिटे.
  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण वजा केले जातील.
  • अंतिम गुणवत्ता यादी फक्त Main Exam च्या गुणांवर आधारित असते.
विषयाचे नावप्रश्नगुणवेळमाध्यम
General/ Financial
Awareness
505035 मिनिटेइंग्रजी / हिंदी
General English404035 मिनिटेइंग्रजी
Quantitative Aptitude505045 मिनिटेइंग्रजी / हिंदी
Reasoning Ability &
Computer Aptitude
506045 मिनिटेइंग्रजी / हिंदी
एकूण190200160 मिनिटे
  • SC/ST/OBC/PWD/ExS उमेदवारांना एकूण गुणांमध्ये 5% सवलत मिळते.
  • SBI चे प्रशिक्षित अपरेंटिस असलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेत 5 अतिरिक्त गुण दिले जातील, जर त्यांनी 1 वर्षाचा अनुभव पूर्ण केला असेल.

3) स्थानिक भाषा चाचणी (Local Language Test)

  • ज्या उमेदवारांनी 10वी किंवा 12वी मध्ये स्थानिक भाषा शिकलेली नसेल, त्यांना स्थानिक भाषेची चाचणी देणे आवश्यक असणार आहे.
  • ही टेस्ट पास करणे आवश्यक आहे, अन्यथा उमेदवाराला अपात्र ठरवले जाईल.
  • ज्यांनी 10वी/12वी मध्ये स्थानिक भाषा शिकलेली आहे, त्यांना ही चाचणी देण्याची गरज नाही.

✅ अंतिम निवड कशी केली जाईल?

50% पर्यंत उमेदवारांची वेटिंग लिस्ट (राज्य व श्रेणी अनुसार) तयार केली जाईल. ही वेटिंग लिस्ट 1 वर्षासाठी वैध असेल. अंतिम निवड फक्त मुख्य परीक्षेच्या एकूण गुणांवर आधारित असेल.

पात्रता तपासणी, स्थानिक भाषा चाचणी (आवश्यक असल्यास), आणि कागदपत्र पडताळणी यावर अंतिम निवड अवलंबून असेल. बँक अधिकृत वेबसाइटवर गुणवत्ता यादी जाहीर करेल, तिथून उमेदवार विद्यार्थी त्यांचा रिझल्ट पाहू शकतात.

SBI Clerk Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलतारीख
अर्जाची सुरुवात06 ऑगस्ट 2025
अर्जाची शेवटची तारीख26 ऑगस्ट 2025
पूर्व परीक्षासप्टेंबर 2025
मुख्य परीक्षानोव्हेंबर 2025

SBI Clerk Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDFNotification वाचा
Apply Online (ऑनलाईन अर्ज)इथे अर्ज करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

SBI Clerk Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

Step 1: अधिकृत अर्ज लिंकला भेट द्या
👉 https://ibpsonline.ibps.in/sbijajul25/ या लिंकवर क्लिक करून अर्ज प्रक्रिया सुरू करा.

Step 2: नवी नोंदणी (New Registration) करा
“Click here for New Registration” या पर्यायावर क्लिक करा.
तुमचं नाव, मोबाइल नंबर, ईमेल ID भरून ओटीपीद्वारे तुमची नोंदणी करून घ्या.

Step 3: लॉगिन करा आणि अर्ज भरा
नोंदणी झाल्यानंतर मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड वापरून लॉगिन करा.
त्यानंतर फॉर्म मध्ये आवश्यक माहिती भरून घ्या –

  • वैयक्तिक माहिती
  • शैक्षणिक पात्रता
  • अनुभव (असल्यास)
  • राज्य व भाषा निवडा

Step 4: फोटो व सिग्नेचर अपलोड करा

  • पासपोर्ट साईज फोटो (recent)
  • सिग्नेचर (signature)
    साईट वर दिलेल्या नियमानुसार योग्य साईजमध्ये फाइल अपलोड करा.

Step 5: अर्जाची फी भरा

  • General/OBC/EWS: ₹750/-
  • SC/ST/PWD: फी नाही
    अर्जाची फी Debit Card, Credit Card, UPI किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येते.

Step 6: अर्ज Final Submit करा आणि प्रिंट काढा
एकदा सर्व माहिती नीट तपासून घ्या, त्यानंतर फॉर्म Submit करा.
अर्जाची एक पावती येईल ती तुम्हाला सेव करून ठेवायची आहे, आणि त्याची प्रिंट देखील काढून घ्यायची आहे, जेणेकरून भरती च्या पुढील टप्प्यात तुम्हाला ती लागणार आहे.

इतर भरती

Agniveervayu Sports Quota Bharti 2025: भारतीय हवाई दल अग्निवीरवायु (Sports) भरती, 12वी पास लगेच अर्ज करा

Union Bank of India Bharti 2025: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधरांना नोकरी! ₹93,960 पगार, लगेच अर्ज करा

Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदलात BE/B.Tech/पदवी वर SSC ऑफिसर पदाची भरती! 1,10,000 रु. पगार, अर्ज करा

Western Railway Sports Quota Bharti 2025: पश्चिम रेल्वेत 10वी, 12वी, ITI पास वर खेळाडूंची भरती! 50000 रु. महिना पगार, लगेच फॉर्म भरा

CCRAS Bharti 2025: केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत 10वी पास वर भरती! 39,100 रु. महिना पगार, लगेच अर्ज करा

OICL Assistant Recruitment 2025: ओरिएंटल इंश्योरेंस कंपनी मध्ये भरती ! पदवीधर लगेच येथून अर्ज करा, पगार 20 हजार पासून सुरू!

IBPS Clerk Recruitment 2025: आयबीपीएस क्लर्क भरती, पदवी पास वर 10277 जागांची बंपर भरती, लगेच येथून फॉर्म भरा

Eastern Railway Bharti 2025: पूर्व रेल्वेत 10वी / ITI पास वर 3115 जागांसाठी मेगा भरती, लगेच अर्ज करा

SBI Clerk Bharti 2025 – 26 : FAQ

SBI Clerk Bharti 2025 मध्ये पदे भरली जात आहेत?

ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) हि पदे या भरती अंतर्गत भरली जाणार आहेत.

SBI Clerk Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या 5180 आहेत, ज्या पुढे वाढू शकतात.

SBI Clerk Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 26 ऑगस्ट 2025 आहे, या तारखे नंतर फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.

SBI Clerk Bharti 2025 मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि 4 टप्प्यात होणार आहे यात पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, लोकल भाषा टेस्ट आणि अंतिम निवड असे टप्पे आहेत.

Leave a comment