PSI Information In Marathi: नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण PSI निवड कशी होते? याची सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. सोबतच यामध्ये PSI होण्यासाठी कोण पात्र आहे, निकष काय आहेत? PSI Exam कशी होते? अशी पूर्ण माहिती नमूद केली आहे.
त्यामुळे तुम्हाला जर PSI व्हायचं असेल, तुमच जर Ultimate स्वप्न PSI होण असेल तर तुमच्या मोठ्या कामाची अशी हि माहिती आहे. आर्टिकल काळजीपूर्वक वाचा, म्हणजे तुम्ही आता तयारी करायचा विचार करत असाल, किंवा तयारी सुरु केली असेल तर तुम्हाला या महितीचा खूप फायदा होईल.
PSI Information In Marathi
आजकाल मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग अंगावर खाकी वर्दी असावी, म्हणून स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे.
स्पर्धा परीक्षा मध्ये उत्तीर्ण होऊन PSI होण्याच स्वप्न खूप जणांच असत, त्यासाठी तरून खूप धडपड पण करतात. पण योग्य माहिती नसल्याने खूप अडचणी देखील उद्भवतात. त्याच Soluction म्हणून मी हे मुद्दाम आर्टिकल लिहित आहे, जेणेकरून आपल्या भावांना बहिणींना PSI Information In Marathi ची माहिती मिळावी.
PSI Eligibility criteria
PSI बनण्यासाठी MPSC मार्फत परीक्षा द्यावी लागते, स्पर्धा परीक्षा मधून पास झाल्यावर त्याच पात्र उमेदवारांना निवडले जाते. यासाठी सुरुवातीला फॉर्म भरतानाच काही निकष सांगण्यात आले आहेत, त्यात वयाची अट, शिक्षण इत्यादी गोष्टी नमूद आहेत.
PSI Education Qualification
तुम्हाला जर MPSC अंतर्गत PSI पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुमचे शिक्षण हे खालीलप्रमाणे असणे आवश्यक आहे.
शिक्षण कमी असेल तर मात्र उमेदवार अर्ज सादर करु शकत नाही, MPSC द्वारे ज्या शिक्षणाच्या अटी दिल्या आहेत त्याच लागू आहेत.
MPSC अंतर्गत PSI पदासाठी कोणतीही पदवी किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षी असणारा उमेदवार अर्ज करू शकतो.
PSI Age Limit
पीएसआय पदासाठी वयाची अट हि १९ ते ३१ वर्षे आहे. १९ वर्षे हि किमान वयोमर्यादा आहे, तर 31 वर्षे हि कमाल मर्यादा आहे. सोबतच यामध्ये मागासवर्गीय, अनाथ, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, यासारख्या आरक्षित गटातील उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये विशेष 5 वर्षांची सूट आहे. सामान्य स्वरुपात सांगायचे झाले तर 19 ते 36 वर्षे अशी वयाची अट मागासवर्गीय आणि इतर आरक्षित गटासाठी लागू असणार आहे. (PSI Information In Marathi)
सामान्य प्रवर्ग | १९ ते ३१ वर्षे |
मागासवर्ग | 19 ते 36 वर्षे |
PSI Physical Exam Details
पुरुष | महिला | |
---|---|---|
उंची | 165 सेंटिमीटर | 157 सेंटीमीटर |
छाती | 79 सेंटीमीटर | लागू नाही |
पुरुषांसाठी:
गुण | इतर माहिती | |
---|---|---|
गोळाफेक | १५ गुण | ७.५० मी |
पूल अप्स | २० गुण | ८ पुलअप्स |
लांब उडी | १५ गुण | ४.५० मी |
धावणे | ५० गुण | ८०० मी (२ मी.३० सेकंद) |
महिलांसाठी:
गुण | इतर माहिती | |
---|---|---|
गोळाफेक | १५ गुण | ६ मी |
धावणे | ४० गुण | २०० मी (३५ सेकंद) |
चालणे | ५० गुण | ३ किमी (२३ मिनिट) |
PSI Exam Details
PSI परीक्षेसाठी एकूण 4 टप्पे आहेत, या चारी टप्प्यामध्ये जर उमेदवार पास झाले तर त्यांना त्यांच्या गुणांच्या आधारे पात्रता मेरीट लिस्ट काढून PSI पदासाठी निवडले जाते.
टप्पे | गुण | अधिक माहिती |
---|---|---|
संयुक्त पूर्व परीक्षा | १०० गुण | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पेपर |
मुख्य परीक्षा | ४०० गुण | पेपर १ संयुक्त व पेपर २ स्वतंत्र |
शारीरीक चाचणी | १०० गुण | – |
मुलाखत | ४० गुण | – |
1) संयुक्त पूर्व परीक्षा
पूर्व परीक्षा हि केवळ एकाच टप्प्यामध्ये होणार आहे, या परीक्षेत जे उमेदवार पास होतील केवळ त्यांना मुख्य परीक्षा देता येईल.
2) मुख्य परीक्षा
मुख्य परीक्षेत एकूण दोन पेपर असतात, दोन्ही पेपर 200-200 मार्कचे असतात.
- पेपर १ (संयुक्त) – २०० गुण (मराठी & इंग्रजी व्याकरण)
- पेपर २ (स्वतंत्र) – २०० गुण (१० विषय असतात)
3) शारीरीक चाचणी
पुरुष आणि महिलांसाठी हि चाचणी थोडीफार वेगळी असते, महिलांना यामध्ये शिथिलता दिली जाते.
उंची, छाती, गोळाफेक, धावणे, चालणे, लांब उडी, पूल अप्स हे सर्व काही उमेदवारांना या शारीरीक चाचणी दरम्यान करावे लागते.
4) मुलाखत
मुलाखती मध्ये पात्र उमेदवारांना काही प्रश्न विचारले जातात, मुलाखती मध्ये त्या प्रश्नांचे उत्तर उमेदवाराने कसे दिले या नुसार त्यांना मार्क दिले जातात. PSI Information In Marathi
पूर्व आणि मुख्य परीक्षेचा सिलॅबस
1) पूर्व परीक्षा –
- चालू घडामोडी (Current Affairs)
- इतिहास (History)
- भूगोल (Geography)
- भारतीय राज्यघटना (Indian Polity)
- अर्थशास्त्र (Economics)
- सामान्य विज्ञान (General Science)इ .
- अंक गणित | बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning and Arithmetic)
2) मुख्य परीक्षा –
- मराठी व्याकरण –
- व्याकरण (Grammar)
- शब्दसंग्रह (Vocabulary)
- इंग्रजी व्याकरण –
- व्याकरण (Grammar)
- शब्दसंग्रह (Vocabulary)
- भाषाशुद्धता (Language Proficiency)
- निबंध लेखन (Essay Writing)
- सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी –
- चालू घडामोडी (Current Affairs)
- इतिहास (History)
- भूगोल (Geography)
- भारतीय राज्यघटना (Indian Polity)
- अर्थशास्त्र (Economics)
- सामान्य विज्ञान (General Science)
- पर्यावरण (Environment)
- अंकगणित (Arithmetic)
- तर्कशक्ती चाचणी (Logical Reasoning)
- बौद्धिक क्षमता (Intellectual Ability)
PSI Selection Process
उमेदवार 4 टप्प्यामध्ये पास झाले कि त्यांचे मार्क तपासले जातात, मुख्य परीक्षा + मुलाखत यावरून फाइनल कट ऑफ लिस्ट लागते. ज्यांना या मध्ये सर्वात जास्त मार्क आहेत त्यांची निवड PSI पदावर केली जाते. [PSI Information In Marathi]
नवीन भरती अपडेट:
- MPSC Group C Bharti 2024: कर सहायक भरती,MPSC गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024, ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करा!
- NTRO Bharti:साइंटिस्ट पदाची भरती!M.sc,BE,b.Tech पाससाठी मोठी संधी,पगार 1,77,500 रू.महिना आहे.
PSI Information In Marathi FAQ
PSI ची पात्रता काय आहे?
उमेदवार हा शैक्षणिक दृष्ट्या पात्र असावा.
What is the age limit of PSI?
वयाची अट हि १९ ते ३१ वर्षे आहे, मागासवर्ग साठी 5 वर्षांची सूट आहे.
PSI साठी किती टक्केवारी आवश्यक आहे?
PSI साठी मुख्य परीक्षा आणि मुलाखती मध्ये जास्त गुण मिळवणे आवश्यक असते.
महाराष्ट्रात psi कसे व्हायचे?
महाराष्ट्रात जर तुम्हाला PSI बनायचे असेल तर तुम्हाला MPSC ची परीक्षा द्यावी लागते.
पी एस आय होण्यासाठी काय करावे?
PSI होण्यासाठी तुम्हाला MPSC ची परीक्षा द्यावी लागते, सोबत शरीरिक चाचणी मध्ये पास व्हावे लागते, सोबत मुलाखती मध्ये जर जास्त घ्यावे लागतात.