1 लाख रुपयांचे कर्ज मिळणार! प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, अर्ज करा | PM Vishwakarma Yojana Maharashtra

PM Vishwakarma Yojana Maharashtra: नमस्कार मित्रांनो, आजच्या या आर्टिकल मध्ये आपण प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना संबंधी सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. केंद्र सरकारने सुरू केलेली अभिनव अशी योजना असलेली PM विश्वकर्मा योजना देशातील सर्व करागिरांसाठी मोठी फायद्याची ठरणार आहे.

या विश्वकर्मा योजने अंतर्गत केंद्र सरकार कारागिरांना आर्थिक मदत करणार आहे, ज्याद्वारे गरीब होतकरू आणि कष्टाळू कारागीर अधिक चांगल्या प्रकारे उच्च प्रतीचे काम करू शकतील. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना द्वारे आर्थिक मदती बरोबरच कौशल्य वृध्दी करण्यासाठी पण कारागिरांना मदत केली जाणार आहे. 

PM Vishwakarma Yojana Maharashtra

योजनेचे नावPM Vishwakarma Yojana
सुरुवातकेंद्र सरकार
उद्देशदेशातील सर्व कारागिरांना आर्थिक मदत करणे आणि त्यांचे कौशल्य वृध्दी करणे.
लाभव्यवसाय वाढी साठी कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देणे.
लाभार्थीविश्वकर्मा समाजातील सर्व 140 जातीतील कारागीर व्यक्ती
हेल्पलाईन नंबर18002677777
अधिकृत संकेतस्थळpmvishwakarma.gov.in

PM Vishwakarma Yojana Objective (उद्देश)

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा मुख्य हेतू हा देशातील सर्व पारंपरिक कारागिरांना आर्थिक मदत करून त्यांचे कौशल्य वृद्धी करणे हा आहे.

आर्थिक मदतीमध्ये कारागिरांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी केंद्र शासनाद्वारे कर्ज स्वरूपात आर्थिक मदत केली जाते. 

या आर्थिक मदतीद्वारे जे व्यवसाय अजूनही पारंपारिक स्तरावर आहेत, त्यांना वृध्दींगत करण्यासाठी मदत देऊ केली जाणार आहे.

कारागिरांचे कल्याण करून समूळ विश्वकर्मा समाजातील तब्बल 140 जाती सक्षम करण्याचा मूळ प्रयत्न या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने द्वारे केला जातोय.

PM Vishwakarma Yojana Benifits (लाभ-फायदे)

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेद्वारे पात्र व्यक्तींना बरेचसे फायदे मिळणार आहेत, ज्यामुळे त्यांना नव्या जोमाने त्यांचा पारंपरिक व्यवसाय वृध्दींगत करता येईल.

विश्वकर्मा योजनेद्वारे विश्वकर्मा समाजातील सर्व कारागिरांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी 1 ते 3 लाखापर्यंत कर्ज दिले जाणार आहे.

योजनेद्वारे दिले जाणारे कर्ज हे कमी माफक व्याज दरात दिले जाणार असल्याने, अर्जदार व्यक्तींना अगदी कमी दरात Loan मिळणार आहे.

सोबतच जे लोक आपला पारंपरिक व्यवसाय अजूनही इच्छा बाळगतात, त्यांना त्यांच्या व्यवसायाशी निगडित प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. 

व्यवसायांचे प्रशिक्षण देऊन पारंपारिक स्तरावरील व्यवसाय जास्तीत जास्त मोठा कसा करायचा? याचे देखील मार्गदर्शन या प्रशिक्षण कार्यक्रमा मध्ये केले जाणार आहे.

PM Vishwakarma Yojana Qualification Details (पात्रता निकष)

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमध्ये व्यक्तींना लाभ घेण्यासाठी केंद्र सरकार काही पात्रता निकष जाहीर केले आहेत. या निकषा अंतर्गत जे लोक पात्र असतील त्यांनाच प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळणार आहे.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा विश्वकर्मा समाजातील असावा. त्याच्या कडे जातीचे प्रमाणपत्र असावे.

विश्वकर्मा समाजातील एकूण 140 जाती या योजनेस अर्ज करण्यास पात्र असणार आहे, दिलेल्या जातीमध्ये जर तुमची कास्ट येत असेल, तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहात.

उमेदवाराने या अगोदर केंद्र किंवा राज्य शासनाच्या PMEGP, PM स्वानिधी, मुद्रा योजना अशा कर्जाशी निगडित कोणत्याही योजनांचा लाभ मागील 5 वर्षांत घेतलेला नसावा.

अर्जदार कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी दफ्तरात किंवा नोकरीमध्ये कार्यरत नसावा, जर असेल तर त्याला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळणार नाही.

PM Vishwakarma Yojana साठी कोणते व्यक्ती पात्र आहेत?

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी विश्वकर्मा समाजातील पूर्ण 140 जाती मधील सर्व व्यक्ती या योजनेसाठी पात्र असणार आहेत. परंतु वरील अटी नुसार काही व्यक्ती PM Vishwakarma Yojana साठी पात्र असणार नाहीत.

विश्वकर्मा समाजातील जे व्यक्ती त्यांचा पारंपारिक व्यवसाय करत आहेत अशा व्यक्तींना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. यामध्ये सुतार, लोहार, कुंभार, चांभार आणि सोनार अशा कास्ट मधील कारागीर असणार आहेत.

PM Vishwakarma Yojana Apply Online

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी जे व्यक्ती इच्छुक आहेत त्यांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याची प्रक्रिया खाली सांगण्यात आली आहे.

सुरुवातीला अर्जदार उमेदवारांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक https://pmvishwakarma.gov.in/ आहे. तुम्ही थेट या लिंक ला search करू शकता, किंवा वर टेबल मध्ये Clickable दिली आहे. 

अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यावर, तेथे तुम्हाला सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर Verify करून घ्यायचा आहे. त्यासाठी आधार ला लिंक आहे तो मोबाईल नंबर टाका, आणि Aadhar Authentication पूर्ण करा. 

Aadhar Verify करताना आधार ला जो नंबर लिंक आहे, त्यावर OTP येईल तो OTP टाकून Verify करून घ्यायचा आहे. आधार कार्ड Verify झाल्यावर पुढे PM Vishwakarma Yojana साठीचा एक Registation Form Open होईल, तो काळजीपूर्वक भरून घ्यायचा आहे.

आवश्यक ती सर्व माहिती फॉर्म मध्ये टाकायची आहे, सूचनांचे पालन करून फॉर्म भरायचा आहे. जर थोडी पण चूक झाली तर वेबसाईट तुमचा फॉर्म Reject करेल, त्यामुळे काळजीपुर्वक फॉर्म भरायचा आहे.

Registation Form भरून झाल्यावर शेवटी फॉर्म सबमिट करायचा आहे, त्यांनतर तुमच्या समोर तुमचे PM Vishwakarma Digital ID आणि Certificate येईल ते Download करून घ्यायचे आहे.

एकदा सर्टिफिकेट Download झाले की मग तुम्ही इतर Scheme Components साठी देखील अर्ज सादर करू शकता. तुमचा अर्ज Approved झाला तर तुम्हाला योजनेचे सर्व फायदे दिले जातात, यात आर्थिक मदत तसेच व्यवसायिक प्रशिक्षण समाविष्ट आहे.

थोडक्यात अशा प्रकारे तुम्ही PM Vishwakarma Yojana साठी Online Apply करू शकता. अगदी सोपी पद्धत आहे, केवळ 10 मिनिटाच्या आत कोणीही हा फॉर्म भरू शकतो. 

जर तरही तुम्हाला PM Vishwakarma Yojana Form संबंधी काही अडचणी असतील, तर तुम्ही या पोस्ट खाली कोणतेही प्रश्न विचारू शकता. किंवा नेहमी प्रमाणे आमचा Telegram Group जॉईन करू शकता.

PM Vishwakarma Yojana FAQ

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी कोण पात्र असणार आहे?

देशातील विश्वकर्मा समाजातील लोक, जे त्यांचा पारंपारिक व्यवसाय करतात.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत कोणते लाभ मिळतात?

लाभार्थी अर्जदार व्यक्तीला विश्वकर्मा योजनेअंतर्गत व्यवसाय वृध्दी साठी आर्थिक सहाय्य केले जाते, सोबतच व्यवसाय वाढीसाठी व्यवसायाचे प्रशिक्षण पण दिले जाते.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून अर्ज सादर करता येतो. अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती लेखा मध्ये दिले आहे.

4 thoughts on “1 लाख रुपयांचे कर्ज मिळणार! प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, अर्ज करा | PM Vishwakarma Yojana Maharashtra”

Leave a comment