व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र शासन देत आहे 10 लाख रुपये! कोणत्याही हमीची गरज नाही | PM Mudra Yojana Marathi

PM Mudra Yojana Marathi: केंद्र सरकारने व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी एक अभिनव अशी योजना सूरू केली आहे, त्यानुसार जे तरुण व्यवसायिक आहेत, किंवा ज्यांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे, अशा गरजू तरुणांना शासन कर्जाच्या स्वरुपात आर्थिक मदत करणार आहे.

छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्राद्वारे पीएम मुद्रा योजना सुरू करण्यात आली आहे, या योजनेचा सर्वाधिक फायदा हा महिलांना मिळणार आहे. योजनेद्वारे कर्ज देण्यास सर्वाधिक प्राधान्य हे महिलांना दिले जात आहे.

यामधे अजून एक विशेष बाब म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा योजना द्वारे जर तुम्ही Loan साठी Apply केलं तर तुम्हाला कर्जासाठी कोणतीही हमी देण्याची गरज नाही. पण कर्जावर व्याज मात्र भरावा लागणार आहे, व्याजासोबत कर्जाच्या मुद्दल रक्कमेचे हप्ते देखील अर्जदार लाभार्थी यांना वेळेत भरणे अनिवार्य आहे.

मुद्रा योजने साठी अर्ज कसा करायचा? कोणते व्यक्ती पात्र असणार आहेत? कर्ज कसे मिळणार? कर्जावर व्याज किती लागणार? अशी सविस्तर माहिती आता आपण पुढे पाहणार आहोत.

PM Mudra Yojana Marathi

योजनेचे नावPM Mudra Yojana
योजनेची सुरुवातकेंद्र शासन
उद्देशतरुणांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे
फायदाव्यवसाय करण्यासाठी 10 लाख रुपये कर्ज
लाभार्थीदेशातील सर्व पात्र नागरिक
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळmudra.org.in

PM Mudra Yojana Qualification Criteria

देशातील कोणताही व्यक्ती जो नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित आहे, किंवा पूर्वीचा व्यवसाय वाढवू इच्छित आहे असे व्यक्ती मुद्रा लोन साठी पात्र असणार आहेत.

व्यक्ती हा भारताचा कायमस्वरूपी नागरिक असेल, आणि त्याला व्यवसायासाठी 10 लाख रुपये पेक्षा कमी पर्यंत कर्ज लागत असेल तर तो व्यक्ती मुद्रा योजना अंतर्गत कर्जासाठी पात्र ठरवला जातो.

PM Mudra Yojana Benifits

  • व्यवसाय सुरू किंवा वाढवण्यासाठी केंद्राद्वारे 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मुद्रा योजनेद्वारे उपलब्ध करून दिले जाते.
  • कर्जासाठी कोणत्याही स्वरूपाची हमी देण्याची गरज नाही.

मुद्रा लोन योजनेद्वारे तीन प्रकारचे कर्ज दिले जातात, त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

शिशु लोन50 हजार रुपया पर्यंत
किशोर लोन50 हजार ते 5 लाख रुपया पर्यंत
तरुण लोन5 लाख ते 10 लाख रुपया पर्यंत

PM Mudra Yojana Interest Rate

मुद्रा लोन योजना साठी केंद्र सरकारने कोणताही निश्चित Fix व्याज दर ठरवला नाही, मुद्रा लोन साठी वेगवेगळ्या बँका वेगवेगळे Intreast Rate आकारू शकतात.

कर्जावरील व्याजदर हा व्यक्ती कोणता व्यवसाय करत आहे? जोखीम किती आहे? व्यवसायाचे स्वरूप काय आहे? या सर्व बाबी तपासून ठरवले जाते. सामान्यपणे मुद्रा लोन साठी कर्जावर कमीत कमी आकारला जाणारा व्याजदर 12% एवढा आहे.

PM Mudra Yojana Documents

  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट फोटो
  • अर्जदाराची सही Signature
  • Passport Identity / Address Of Business Enterprises

वर सांगितलेले सर्व कागदपत्रे हे मुद्रा लोन साठी Pre-Requisite करण्यासाठी लागणार आहेत, बाकी जेव्हा तुमचा अर्ज मंजूर होईल, तेव्हा तुम्हाला तुमच्या जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल, त्यासाठी कर्जनुसार Documents लागणार आहेत, ते तुम्ही मुद्रा लोन योजना आवश्यक कागदपत्रे या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

PM Mudra Yojana Application Process

  1. सुरुवातीला तुम्हाला मुद्रा योजेनेच्या अधिकृत @mudra.org.in या वेबसाईट ला भेट द्यायची आहे.
  2. साईट वर गेल्यावर तिथे तुम्हाला Apply Now या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  3. त्यासाठी तुम्ही New Entrepreneur/ Existing Entrepreneur/Self-employed यापैकी कोणताही Option निवडू शकता.
  4. त्यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे, त्यासाठी तुम्हाला आवश्यक ती माहिती भरावी लागणार आहे.
  5. एकदा नोंदणी पूर्ण झाल्यावर पुढे तुम्हाला एक फॉर्म दिसेल, तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती टाकायची आहे.
  6. कर्जाचा प्रकार देखील याच वेळी निवडायचा आहे, सोबत तुमच्या व्यवसायाची माहिती आणि अहवाल माहिती देखील फॉर्म मध्ये टाकायची आहे.
  7. फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती सुचनेनुसार योग्य प्रकारे भरून घ्यायची आहे, चुकीची माहिती आढळली तर अर्ज बाद होतो.
  8. वर सांगितलेले सर्व कागदपत्रे पुढे तुम्हाला अर्जामध्ये अपलोड करायचे आहेत, कागदपत्रे कोणते लागणार याची लिस्ट वर दिली आहे.
  9. अर्ज भरून झाला की नंतर तुम्ही तुमचा मुद्रा लोन अर्ज Submit करू शकता, फॉर्म सबमिट केल्यावर फॉर्मचा Application Number Note करून ठेवा.

PM Mudra Yojana FAQ

Who is eligible for PM Mudra Yojana?

देशातील सर्व नागरिक प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना साठी पात्र असणार आहेत, पात्रता निकष काय आहेत? याची सविस्तर माहिती आपण वर दिली आहे.

How to Apply For PM Mudra Yojana?

मुद्रा लोन योजना साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करता येतो, परंतु सुरुवातीला फक्त पोर्टल वरून नोंदणी करायची आहे, बाकी नंतर तुमच्या जवळील कोणत्याही बँकेतून तुम्ही कर्जासाठी अर्ज करता येणार आहे.

What is the Loan Amount of PM Mudra Yojana?

PM Mudra Yojana अंतर्गत 50,000 ते 10,00,000 रुपये एवढे व्यवसायिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. अधिक माहिती तुम्ही वरील सविस्तर पोस्ट वाचून जाणून घेऊ शकता.

1 thought on “व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र शासन देत आहे 10 लाख रुपये! कोणत्याही हमीची गरज नाही | PM Mudra Yojana Marathi”

Leave a comment