PGCIL Bharti 2025: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये पदवी/ डिप्लोमा पास वर भरती! किमान 1 वर्ष अनुभव आवश्यक, 1,20,000 रु. पगार, लगेच अर्ज करा

PGCIL Bharti 2025: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे विविध इंजिनिअर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या संबंधी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जर तुम्ही पदवीधर असाल किंवा इंजिनियरिंग डिप्लोमा धारक असाल तर तुमच्यासाठी नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये नोकरी लागल्यावर तब्बल 1 लाख 20 हजार रुपये एवढा पगार हा मिळणार आहे.

त्यामुळे ज्यांना अर्ज करण्याची इच्छा आहे ते उमेदवार या भरती साठी फॉर्म भरू शकतात, भरती प्रक्रिया हि ऑनलाईन स्वरुपात राबवली जात आहे. अधिकृत वेबसाईट वरूनच अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

सोबतच या भरतीची पूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये देखील देण्यात आली आहे, माहिती वाचून घ्या आणि लगेच अर्ज सादर करा.

 आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

PGCIL Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

माहितीचा तपशीलविवरण / माहिती
भरती करणारी संस्थापॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL)
भरतीचे नावPGCIL Bharti 2025
पदाचे नावइंजिनिअर / सुपरवायझर
रिक्त जागा1543
वेतन₹1,20,000/- (पदांनुसार)
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रताडिप्लोमा / पदवी / पदव्युत्तर पदवी (पदांनुसार)
वयोमर्यादा१८ ते 29 वर्षे
अर्जाची फीGeneral/OBC: (पद क्र.1 & 2 – ₹400)
General/OBC: (पद क्र.3 ते 5 – ₹300)
SC/ST/PwD/ExSM: फी नाही
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

PGCIL Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्यावेतन श्रेणी
1फील्ड इंजिनिअर (Electrical)532₹30,000 – ₹1,20,000
2फील्ड इंजिनिअर (Civil)198₹30,000 – ₹1,20,000
3फील्ड सुपरवायझर (Electrical)535₹23,000 – ₹1,05,000
4फील्ड सुपरवायझर (Civil)193₹23,000 – ₹1,05,000
5फील्ड सुपरवायझर  (Electronics & Communication)85₹23,000 – ₹1,05,000
Total1543

PGCIL Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पद क्र.पदाचे नावशिक्षण
1फील्ड इंजिनिअर (Electrical)उमेदवाराने 55% गुणांसह B.E /B.Tech / B.Sc-Engg. (Electrical) ची पदवी घेतलेली असावी, आणि त्याला किमान 01 वर्ष चा अनुभव असावा.
2फील्ड इंजिनिअर (Civil)उमेदवाराने 55% गुणांसह B.E /B.Tech / B.Sc-Engg. (Civil) ची पदवी घेतलेली असावी, आणि त्याला किमान 01 वर्ष चा अनुभव असावा.
3फील्ड सुपरवायझर (Electrical)उमेदवाराने 55% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा ची पदवी घेतलेली असावी, आणि त्याला किमान 01 वर्ष चा अनुभव असावा.
4फील्ड सुपरवायझर (Civil)उमेदवाराने 55% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा ची पदवी घेतलेली असावी, आणि त्याला किमान 01 वर्ष चा अनुभव असावा.
5फील्ड सुपरवायझर  (Electronics & Communication)उमेदवाराने 55% गुणांसह डिप्लोमा (Electrical / Electronics & Communication / Information Technology) ची पदवी घेतलेली असावी, आणि त्याला किमान 01 वर्ष चा अनुभव असावा.

PGCIL Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

तपशीलविवरण
वयाची अट18 ते 29 वर्षे
SC/ST05 वर्षे सूट
OBC03 वर्षे सूट

17 सप्टेंबर 2025 रोजी अर्जदार उमेदवाराचे वय हे 29 वर्षांपर्यंत असावे.

PGCIL Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) नोंदणी (Registration):

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी POWERGRID – Common FTE Written Test 2025 साठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्ज करताना सर्व पात्रता निकष पूर्ण असणे आवश्यक आहे (यामध्ये किमान 1 वर्षाचा संबंधित अनुभव असणे हे प्रत्येक पोस्ट साठी लागू आहे)

2) लेखी परीक्षा (Written Test):

  • परीक्षा संपूर्ण भारतभर एकाच दिवशी घेतली जाईल.
  • परीक्षा कालावधी: 1 तास (PwD उमेदवारांना अतिरिक्त वेळ मिळेल).
  • Negative Marking नाही.
  • पात्रतेसाठी किमान गुण:
    • 40% (Unreserved/EWS)
    • 30% (SC/ST/OBC/PwD)
  • उमेदवारांना परीक्षा हिंदी किंवा इंग्रजी मधे देण्याची मुभा असेल.
विषयप्रश्नगुणवेळ
Technical Knowledge Test
[संबंधित विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित (BE/B.Tech/Diploma)]
5050
Aptitude Test
[English, Reasoning, Quantitative Aptitude, General Awareness]
2525
Total75751 तास (60 मिनिटे)

3) Interview (मुलाखत):

लेखी परीक्षा झाल्यावर संबंधित पदांसाठी मुलाखत द्यावी लागणार आहे, मुलाखती मध्ये अर्जदार उमेदवारांची पात्रता हि तपासली जाईल. जे उमेदवार पदासाठी योग्य असतील केवळ त्यांना मुलाखती मध्ये पास केले जाणार आहे.

4) Document Verification:

यासोबतच काही पदांसाठी कागदपत्रे पडताळणी लागू असणार आहे, त्यामुळे संबंधित पदासाठी अर्ज करण्यारया उमेदवारांना त्यांचे कागदपत्रे तपासणी करण्यासाठी बोलवले जाईल. त्यावेळी अर्जदाराचे कागदपत्रे बरोबर आहेत का हे तपासले जाईल.

5) मेरीट लिस्ट (Merit List):

शेवटी मग पात्र उमेदवारांची मेरीट लिस्ट काढली जाईल, जे उमेदवार पास होतील त्याचं नाव मेरीट लिस्ट मध्ये येईल. मेरीट लिस्ट मध्ये नाव आलेल्या उमेदवारांची मग पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे भरती अंतर्गत अंतिम निवड हि केली जाईल.

Field Engineer पदासाठी निवड प्रक्रिया

  • पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेनंतर मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • मुलाखत हिंदी किंवा इंग्रजीत घेतली जाणार आहे.
  • अंतिम Merit List फक्त Interview मधील मार्क्स वर आधारित असणार आहे.
  • या भरती मध्ये 1:5 या प्रमाणात (पदसंख्या : उमेदवार) शॉर्टलिस्ट केले जातील.
  • समान गुण मिळाल्यास वयाने मोठ्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.

Field Supervisor पदासाठी निवड प्रक्रिया

  • निवड फक्त लेखी परीक्षेतील गुणांवर आधारित असेल.
  • पात्र उमेदवारांना 1:5 या प्रमाणात शॉर्टलिस्ट केले जाईल.
  • समान गुण मिळाल्यास वयाने मोठ्या उमेदवाराला प्राधान्य.
  • शॉर्टलिस्ट झालेल्यांना Document Verification साठी बोलावले जाईल.
  • Document Verification मध्ये पात्र ठरल्यावरच अंतिम निवड केली जाईल.
Field EngineerWritten Test + Interview
Field Supervisorफक्त Written Test

PGCIL Bharti 2025 Syllabus:

विभागअभ्यासक्रम (Syllabus)
Technical Knowledge Test– संबंधित शाखेचा Diploma / B.E. / B.Tech अभ्यासक्रम
– Electrical Engineering / Civil Engineering / Electronics & Communication Engineering मध्ये मूलभूत व प्रगत विषयांचा समावेश (पदांनुसार वेगवेगळा तांत्रिक अभ्यासक्रम लागू होईल)
General English– Articles, Prepositions
– Vocabulary, Synonyms/Antonyms
– Comprehension (गद्यवाचन)
– Jumbled Sentences
Reasoning– Data Interpretation
– Coding & Decoding
– Deductive & Inductive Logic
– Data Sufficiency
– Series Completion
– Puzzles, Pattern Completion
Quantitative Aptitude– Ratio & Proportion
– Time & Work, Speed & Distance
– Profit & Loss
– Simple & Compound Interest
– Percentage, Average
– Mensuration, Geometry, Trigonometry
– Algebra, Probability
– LCM & HCF, Numbers
General Awareness– सामान्य विज्ञान (Science)
– सामाजिक शास्त्र (Social Science)
– चालू घडामोडी (Current Affairs)
– सामान्य ज्ञान (General Knowledge)

टीप: कृपया परीक्षेच्या अभ्यासक्रमाची एकदा फेरतपासणी करून घ्या, वरील माहिती मध्ये काही चुका असू शकतात.

PGCIL Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलतारीख
अर्जाची सुरुवात27 ऑगस्ट 2025
अर्जाची शेवटची तारीख17 सप्टेंबर 2025

PGCIL Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDFजाहिरात वाचा
ऑनलाईन अर्जApply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

PGCIL Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

1) अधिकृत वेबसाईटला भेट द्या

भरतीसाठी दिलेल्या Apply Link वर क्लिक करून PGCIL च्या अधिकृत साइटला भेट द्या.

2) नोंदणी (Registration) करा

तुमची बेसिक माहिती भरून वेबसाईटवर नवीन नोंदणी करा.

3) ऑनलाईन अर्ज भरा (Fill Application Form)

व्यक्तिगत माहिती, शैक्षणिक तपशील व इतर आवश्यक माहिती भरतीच्या फॉर्ममध्ये भरून घ्या.

4) कागदपत्रे अपलोड करा

फोटो, स्वाक्षरी व आवश्यक कागदपत्रे योग्य फॉरमॅटमध्ये साइटवर अपलोड करा.

5) अर्जाची फी भरा (Fee Payment)

या भरतीसाठी लागू असलेली फी Online Mode द्वारे भरा. त्यासाठी तुम्ही UPI, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, नेट बँकिंग वापरू शकता.

6) अर्ज सबमिट करा व प्रिंट काढा

भरतीचा फॉर्म एकदा नीट तपासून घ्या. सर्व माहिती योग्य असल्यास अर्ज सबमिट करा व त्याची पावती (Acknowledgement/Printout) Save करून ठेवा.

इतर भरती

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 10वी ते पदवी पास वर भरती! 1,22,800 रु. पगार, लगेच अर्ज करा

Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत 10वी पासून ते डिग्री पाससाठी पर्मनेंट भरती! 1,12,400 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा

IB Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात B.Sc, BCA, इंजिनिअरिंग डिप्लोमा, पदवी पास वर भरती! 81,100 रु. पगार, लगेच अर्ज करा

Thane DCC Bank Bharti 2025:8वी, MSCIT ते पदवी पास सर्वांसाठी सुवर्णसंधी ! बँकिंग क्षेत्र मध्ये नोकरीची संधी! पगार ₹15,000 पासुन! त्वरित अर्ज करा!

IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 10वी, ITI, डिप्लोमा पास वर भरती! इथून लगेच फॉर्म भरा

Punjab And Sind Bank Bharti 2025: पंजाब & सिंध बँकेत पदवी पास वर भरती! 85,920 रु. पगार लगेच अर्ज करा

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पासवर भरती! पगार ₹69,100 पर्यंत, येथून लगेच फॉर्म भरा

Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!

IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!

PGCIL Bharti 2025 – 26: FAQ

PGCIL Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

इंजिनिअर / सुपरवायझर या पदांसाठी भरती केली जात आहे.

PGCIL Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या 1547 आहेत, ज्या या भरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत.

PGCIL Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2025 आहे.

PGCIL Recruitment 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?

या भरती साठी अर्जदार उमेदवारांची निवड Writeen Test, Interview, Document Verification – Merit List द्वारे केली जाणार आहे.

Leave a comment