OICL Bharti: नमस्कार मित्रांनो, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये ऑफीसर पदासाठी भरती निघाली आहे. OICL द्वारे अधिकृत जाहिरात अधिसूचना देखील निर्गमित केली आहे.
जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत, त्यांना भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. एकूण 100 रिक्त जागांसाठी प्रशासकीय अधिकारी [Administrative Officers (Scale-I)] या पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
जे उमेदवार पदवीधर आहेत, त्यांना या भरती साठी मोठे प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर पदवी शिक्षण घेतले असेल, तर तुम्हाला नोकरीची सुवर्णसंधी आहे.
उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात भरतीसाठी फॉर्म भरायचा आहे, केवळ ऑनलाईन रित्या सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अन्य माध्यमातून सादर करण्यात आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी ऑफीसर भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 एप्रिल 2024 आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही, त्यामुळे शेवटची तारीख संपण्यापूर्वी फॉर्म भरून घ्या.
OICL Bharti 2024
📢 भरतीचे नाव – Oriental Insurance Company Limited, OICL Recruitment 2024
✅ पदाचे नाव – प्रशासकीय अधिकारी
🚩 एकूण रिक्त जागा – 100
👨🎓 शैक्षणिक पात्रता – उमदेवार हा किमान पदवीधर असावा, त्याने 60% गुणांसह B.Com/ MBA (Finance)/CA/ICWA/ पदवी (Statistics/ Mathematics/ Actuarial Science) किंवा पदव्युत्तर पदवी (Statistics/ Mathematics/ Actuarial Science) किंवा B.E/B.Tech/M.E/M.Tech (Information Technology /Computer Science/Electronics & Communication/Automobile /Mechanical / Electrical/ Civil/Chemical /Power/ Industrial/ Instrumentation) किंवा MCA किंवा M.B.B.S/BDS किंवा 60% गुणांसह LLB असे शिक्षण झालेले असावे.
➡️ नोकरीची ठिकाण – संपूर्ण भारत
💰 पगार – 85,000 रुपये प्रती महिना वेतन
💵 परीक्षा फी – UR/EWS/OBC प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये परीक्षा फी भरायची आहे, तर [SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांना फक्त 250 रुपये फी भरायची आहे]
📝 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
🔞 वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे
📍 वयोमर्यादा सूट – SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
📆 फॉर्मची Last Date – 12 एप्रिल, 2024
🌐 अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
🖥️ जाहिरात (अधिसूचना) | PDF Download करा |
📝 ऑनलाईन अर्ज | येथून Apply करा |
टीप: 21 मार्च पासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत.
OICL Bharti Apply online अर्ज प्रक्रिया
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे, त्यासाठी अधिकृत संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. त्याची लिंक वर दिली आहे, तेथे ऑनलाईन अर्ज येथून Apply करा या लिंक वर क्लिक करून तुम्ही साईट ला भेट देऊ शकता.
अधिकृत संकेतस्थळ ओपन झाल्यानंतर तुम्हाला भरतीचा फॉर्म ओपन करायचा आहे. त्यानंतर फॉर्म मध्ये आवश्यक ती सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
जाहिराती मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून आवश्यक काळजी घेऊन अर्ज सादर करायचा आहे. फॉर्म भरताना जाहिराती मध्ये नमूद केल्या प्रमाणे आवश्यक ते सर्व कागदपत्रे अर्जामध्ये अपलोड करायचे आहेत.
त्यानंतर वर सांगितल्या प्रमाणे ऑनलाईन परीक्षेसाठी फी देखील भरून घ्यायची आहे. UR/EWS/OBC प्रवर्गातील उमेदवारांना तब्बल 1000 रुपये फी भरायची आहे. आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना केवळ 250 रुपये एवढी परीक्षा फी भरायची आहे.
परीक्षा फी भरणे अनिवार्य आहे, जे उमेदवार फी भरणार नाहीत त्यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. फी भरून झाल्यावर तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे, म्हणजे तुमचा फॉर्म ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीतील करियर विभागाकडे सादर होईल.
OICL Bharti Online Exam
या भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घेतली जाणार आहे, त्यामुळे जे उमेदवार भरती साठी इच्छुक आहेत, त्यांना कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप च्या मदतीने CBT Test Exam द्यायची आहे.
12 एप्रिल, 2024 ही अर्जाची शेवटची तारीख आहे, देय तारखे मध्ये जे उमेदवार अर्ज सादर करतील त्यांची परीक्षा ही लगेच एका महिन्याने घेतली जाणार आहे.
मे किंवा जून महिन्यात परीक्षा होणार आहे, परीक्षेची तारीख तुम्हाला तुमच्या इमेल वर किंवा मोबाईल वर कळवली जाणार आहे. आणि जे उमेदवार या परीक्षेत पास होतील त्यांना पुढील आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून रिक्त जागांसाठी निवडले जाईल.
नवीन भरती अपडेट:
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 12 वी पास वर नोकरीची संधी! लगेच येथून अर्ज करा
- नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन भरती, पदवीधरांना संधी! अर्ज करा
- UPSC नर्सिंग ऑफिसर भरती, पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! त्वरित फॉर्म भरा
OICL Bharti FAQ
OICL Bharti साठी एकूण किती जागा रिक्त आहेत?
एकूण 100 रिक्त जागांसाठी ही OICL Bharti प्रक्रिया राबवली जाणार आहे.
OICL Bharti साठी अर्ज कसा करायचा?
अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, अधिकृत वेबसाईट वरून उमेदवारांना फॉर्म भरायचा आहे.
OICL Officer Bharti साठी परीक्षा किती आहे?
साधारण प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये एवढी फी भरायची आहे, तर मागासवर्गीय उमेदवारांना फी ही 250 असणार आहे.
2 thoughts on “ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये ऑफीसर पदासाठी भरती सुरू! B. com पास असाल, तर संधी | OICL Bharti 2024”