न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन मध्ये मेगा भरती! 55,000 वेतन + इतर भत्ते, लगेच फॉर्म भरून घ्या | NPCIL Bharti 2024

न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी भरती निघाली आहे. NPCIL Bharti 2024 साठी तब्बल 400 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, यासाठी NPCIL द्वारे जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे.

भरती साठी शैक्षणिक पात्रता निकष हे सर्व उमेदवारांना लागू असणार आहेत, तसेच NPCIL Bharti 2024 साठी आता अर्ज देखील सुरू झाले आहेत. ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

ही भरती मुळात एक्झिक्युटिव्ह ट्रेनी या पदांसाठी निघाली आहे, त्यामुळे ज्या उमेदवारांना अनुभव नाही, त्यांच्या साठी ही नामी संधी आहे. विशेष बाब म्हणजे ट्रेनिंग प्रशिक्षण दरम्यान उमेदवारांना तब्बल 55,000 रुपये एवढे मानधन म्हणजेच छात्रवृत्ती दिली जाणार आहे. या सोबत अधिकचे 18,000 रुपये पुस्तके घेण्यासाठी भत्ता तसेच इतर पण बरेचसे भत्ते पात्र उमेदवारांना मिळणार आहेत.

प्रशिक्षणादरम्यान राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था ही NPCIL द्वारेच केली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणताही अतिरिक्त खर्च करण्याची गरज लागणार नाही.

NPCIL Bharti 2024

पदाचे नावएक्झिक्युटिव ट्रेनी
रिक्त जागा400
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी55,000 रुपये महिना
वयाची अट18 ते 26 वर्षे
भरती फीOpen, OBC, EWS साठी 500 रुपये Fees (इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार महिलांना फी नाही)

NPCIL Bharti 2024 Vacancy Details

शाखापद संख्या
मेकॅनिकल150
केमिकल73
इलेक्ट्रिकल69
इलेक्ट्रॉनिक्स29
इंस्ट्रुमेंटेशन19
सिव्हिल60
Total 400

NPCIL Bharti 2024 Education Qualification

  • उमेदवार हा 60% गुणांसह संबंधित शाखेत/विषयात BE/B.Tech/B.Sc (Engg.)/M.Tech (Mechanical/Chemical/Electrical/Electronics/Instrumentation/Civil) उत्तीर्ण असावा.
  • उमेदवाराने GATE 2022/2023/2024 या परीक्षांमध्ये भाग घेतला असावा, आणि उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण झालेले असावेत.

GATE Exam म्हणजे Gratitude Aptitude Test in Engineering

NPCIL Bharti 2024 Application Form

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख10 एप्रिल, 2024
अर्ज बंद होण्याची तारीख30 एप्रिल, 2024

Online Application Form Process

  • सुरुवातीला ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करण्यासाठी https://www.npcilcareers.co.in/ या अधिकृत संकेतस्थळ पोर्टल ला भेट द्या.
  • NPCIL Bharti 2024 साठी फॉर्म Open करा, विचारलेली सर्व माहिती भरून घ्या. जाहिराती मध्ये ज्या सूचना दिल्या आहेत, त्यांचे पालन करा.
  • आवश्यक असे सर्व कागदपत्रे फॉर्म भरताना अपलोड करून टाका, कागदपत्रे योग्य Size आणि Ratio मध्ये ठेवा.
  • सोबतच भरतीसाठी लागणारी फी भरून घ्या, Open, OBC आणि EWS या प्रवर्गातील अर्जदारांना फी भरायची आहे, बाकी इतर प्रवर्गातील आणि सर्व महिलांना देखील फी मध्ये 100% सूट देण्यात आली आहे.
  • एकदा फॉर्म भरून झाला, की मग तो तुम्हाला तपासून घ्यायचा आहे. चूक अपेक्षित नाही, त्यामुळे आवश्यक काळजी घ्यायची आहे.

NPCIL Bharti साठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे, त्यामुळे अर्ज सादर करण्यासाठी ठराविक मुदत देण्यात आली आहे. केवळ 20 दिवस फॉर्म Accept केले जाणार आहेत, त्यांनतर 30 एप्रिल 2024 पासून अर्ज बंद होणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल आहे, त्यामुळे जेवढं लवकर होईल, तेवढ्या लवकर फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा.

NPCIL Bharti 2024 Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFडाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जयेथून करा

NPCIL Bharti 2024 Documents

  • अर्जदाराचे जन्म प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला TC
  • पदवी Last Year गुणपत्रक
  • Gate 2022, 23, 24 प्रवेश आणि गुणपत्रक
  • कास्ट सर्टिफिकेट
  • अर्जदार माजी सैनिक असल्यास प्रमाणपत्र

या सोबत भरती साठी इतर काही महत्त्वाचे कागदपत्रे देखील आवश्यक असणार आहेत, येणं वेळी NPCIL द्वारे कागदपत्रे सादर करण्यासंबंधी अपडेट जारी केली, तर तुम्हाला त्यासाठी एकदा Official Recruitment Notification वाचून घ्यावी लागेल.

NPCIL Bharti 2024 Selection Process

या भरतीसाठी उमेदवाराची निवड ही मेरिट वर होणार आहे, Gate 2022, 23, 24 या वर्षी ज्या उमेदवारांनी गेट ची परीक्षा दिली आहे आणि पास केली आहे, अशा उमेदवारांना त्यांच्या Exam Marks द्वारे Shortlist केले जाणार आहे.

त्यानंतर अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवाराची लिस्ट बनवली जाणार आहे, त्याद्वारे मेरिट लिस्ट मध्ये ज्या अर्जदाराचे नाव येईल त्यांना NPCIL Bharti 2024 अंतर्गत रिक्त पदासाठी निवडले जाणार आहे.

नवीन भरती जॉब अपडेट:

NPCIL Bharti 2024 FAQ

Who is eligible for NPCIL Bharti 2024?

जे उमेदवार 60% गुणांसह पदवीधर आहेत, आणि गेट 2022, 2023 आणि 2024 यापैकी कोणत्याही वर्षी Gate Exam उत्तीर्ण असतील अशाच अर्जदारांना अर्ज करता येणार आहे.

How to Apply For NPCIL Bharti 2024?

NPCIL Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी अर्ज करण्याची सविस्तर माहिती वर लेखामध्ये दिली आहे.

What is the last date for NPCIL Bharti 2024?

NPCIL Bharti साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल, 2024 आहे. एकदा मुदत संपली की नंतर कोणाचाही अर्ज स्वीकारला जाणार नाही, त्यामुळे वेळेत फॉर्म भरा.

1 thought on “न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन मध्ये मेगा भरती! 55,000 वेतन + इतर भत्ते, लगेच फॉर्म भरून घ्या | NPCIL Bharti 2024”

Leave a comment