MSC Bank Bharti 2025: नमस्कार मित्रांनो! महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी आहे! MSC Bank Bharti 2025 अंतर्गत एकूण 167 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Trainee Junior Officer, Trainee Associate, Trainee Typist, Trainee Driver आणि Trainee Peon अशा विविध पदांचा समावेश आहे.
MSC Bank ही महाराष्ट्रातील अग्रगण्य सहकारी बँक असून, राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील आर्थिक विकासासाठी कार्यरत आहे. बँकेच्या विविध शाखांमध्ये काम करण्याची संधी मिळणार असून, trainees म्हणून निवड झाल्यानंतर उमेदवारांना बँकिंग फील्डमध्ये अनुभव घेता येणार आहे.
या भरती प्रक्रियेमार्फत पात्र उमेदवारांची निवड विविध टप्प्यांद्वारे केली जाणार आहे. अर्ज, परीक्षा व मुलाखतीच्या माध्यमातून निवड प्रक्रिया पार पडेल. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेला संपूर्ण लेख वाचून भरतीबाबत सविस्तर माहिती घ्यावी.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
MSC Bank Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
| घटक / माहिती (Details) | तपशील (Information) |
|---|---|
| संस्था नाव (Organization Name) | Maharashtra State Cooperative Bank (MSC Bank) |
| एकूण पदसंख्या (Total Posts) | 167 पदे (Trainee Junior Officer, Trainee Associate, Typist, Driver, Peon) |
| नोकरी ठिकाण (Posting Location) | महाराष्ट्र (Maharashtra – Various branches of MSC Bank) |
| पगार (Pay Scale) | – Training Period: ₹25,000/- प्रतिमाह- Post Confirmation (Typist): ₹34,400/- + ₹650 Typist Allowance |
| अर्ज शुल्क (Application Fees) | – Trainee Junior Officer: ₹1,770/- (Including GST)- Others: ₹1,180/- (Including GST) |
MSC Bank Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
| पोस्ट क्र. | पदाचे नाव | रिक्त पदांची संख्या |
|---|---|---|
| 1 | ट्रेनी ज्युनियर ऑफिसर | 44 |
| 2 | ट्रेनी असोसिएट | 50 |
| 3 | ट्रेनी टायपिस्ट | 09 |
| 4 | ट्रेनी ड्रायव्हर | 06 |
| 5 | ट्रेनी शिपाई | 58 |
| – | एकूण | 167 |
MSC Bank Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
| पोस्ट क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|---|
| 1 | ट्रेनी ज्युनियर ऑफिसर | (i) कोणत्याही शाखेतील पदवी 50% गुणांसह(ii) संबंधित क्षेत्रात 2 वर्षांचा अनुभव |
| 2 | ट्रेनी असोसिएट | कोणत्याही शाखेतील पदवी 50% गुणांसह |
| 3 | ट्रेनी टायपिस्ट | (i) कोणत्याही शाखेतील पदवी(ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. |
| 4 | ट्रेनी ड्रायव्हर | (i) 10वी उत्तीर्ण(ii) हलक्या वाहनाचा वैध ड्रायव्हिंग लायसन्स |
| 5 | ट्रेनी शिपाई | 10वी उत्तीर्ण |
MSC Bank Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती
| Post No. | पदाचे नाव | वयोमर्यादा |
|---|---|---|
| 1 | Trainee Junior Officer | 23 to 32 years |
| 2 | Trainee Associate | 21 to 28 years |
| 3 | Trainee Typist | 21 to 28 years |
| 4 | Trainee Driver | 18 to 30 years |
| 5 | Trainee Peon | 18 to 30 years |
🔸 सवलती (Age Relaxation):
- आरक्षण आणि वयोमर्यादा सवलती महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार दिल्या जातील.
- सवलतीसाठी संबंधित प्रमाणपत्रे (जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमी लेयर इ.) आवश्यक असतील.
MSC Bank Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
🔹 A) ट्रेनी ज्युनियर ऑफिसर (Trainee Junior Officer) – निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया:
- ऑनलाईन परीक्षा (IBPS मार्फत)
- वैयक्तिक मुलाखत (MSC बँक मार्फत)
परीक्षा पद्धत:
| क्र. | चाचणीचा प्रकार | प्रश्नसंख्या | गुण | माध्यम | वेळ |
|---|---|---|---|---|---|
| 1 | व्यावसायिक ज्ञान (Professional Knowledge) | 40 | 80 | इंग्रजी | |
| 2 | बँकिंग व सामान्य ज्ञान | 40 | 40 | इंग्रजी | |
| 3 | गणितीय व संख्यात्मक क्षमता | 40 | 40 | इंग्रजी | |
| 4 | इंग्रजी भाषा | 40 | 40 | इंग्रजी | 120 मिनिटे |
| एकूण | 160 | 200 |
- किमान पात्रता गुण: 50% म्हणजेच 100 गुण
- शॉर्टलिस्टिंग: ऑनलाईन परीक्षा, कागदपत्र तपासणी आणि अनुभवाच्या आधारे
- अंतिम गुणवत्ता यादी: ऑनलाईन परीक्षा + मुलाखत यांच्या एकत्रित गुणांवर आधारित
🔹 B) ट्रेनी असोसिएट (Trainee Associate) – निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया:
- ऑनलाईन परीक्षा (IBPS मार्फत)
- वैयक्तिक मुलाखत (MSC बँक मार्फत)
परीक्षा पद्धत:
| क्र. | चाचणीचा प्रकार | प्रश्नसंख्या | गुण | माध्यम | वेळ |
|---|---|---|---|---|---|
| 1 | लॉजिकल रीझनिंग व संगणक योग्यता | 40 | 80 | इंग्रजी | |
| 2 | इंग्रजी भाषा | 40 | 40 | इंग्रजी | |
| 3 | बँकिंग व सामान्य ज्ञान | 40 | 40 | इंग्रजी | |
| 4 | गणितीय व संख्यात्मक क्षमता | 40 | 40 | इंग्रजी | 120 मिनिटे |
| एकूण | 160 | 200 |
- किमान पात्रता गुण: 50% म्हणजेच 100 गुण
- अंतिम निवड: ऑनलाईन परीक्षा + मुलाखत + कागदपत्र तपासणीच्या आधारे
- गुणवत्ता यादी: एकत्रित कामगिरीच्या आधारे तयार केली जाईल
🔹 C) ट्रेनी टायपिस्ट (Trainee Typist) – निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया टप्पे:
- टप्पा-I: ऑनलाईन परीक्षा
- टप्पा-II: कौशल्य चाचणी (टायपिंग टेस्ट)
परीक्षा पद्धत (टप्पा-I):
| क्र. | चाचणीचा प्रकार | प्रश्नसंख्या | गुण | माध्यम | वेळ |
|---|---|---|---|---|---|
| 1 | मराठी भाषा व आकलन | 40 | 80 | मराठी | |
| 2 | लॉजिकल रीझनिंग | 40 | 40 | मराठी | |
| 3 | सामान्य ज्ञान (संगणकासहित) | 40 | 40 | इंग्रजी | |
| 4 | गणितीय व संख्यात्मक क्षमता | 40 | 40 | इंग्रजी | 120 मिनिटे |
| एकूण | 160 | 200 |
- किमान पात्रता गुण (टप्पा-I): 100 गुण
- कौशल्य चाचणी: फक्त टप्पा-I मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी
- अंतिम गुणवत्ता यादी: कौशल्य चाचणी पात्रतेवर आधारित
🔹 D) ट्रेनी शिपाई व ट्रेनी ड्रायव्हर (Trainee Peon & Trainee Driver) – निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया:
- ऑनलाईन लेखी परीक्षा
- वैयक्तिक मुलाखत
परीक्षा पद्धत:
| क्र. | चाचणीचा प्रकार | प्रश्नसंख्या | गुण | माध्यम | वेळ |
|---|---|---|---|---|---|
| 1 | लॉजिकल रीझनिंग | 35 | 35 | इंग्रजी व मराठी | |
| 2 | सामान्य इंग्रजी | 30 | 30 | फक्त इंग्रजी | 25 मिनिटे |
| 3 | सामान्य ज्ञान | 20 | 20 | इंग्रजी व मराठी | 15 मिनिटे |
| 4 | संख्यात्मक क्षमता | 35 | 35 | इंग्रजी व मराठी | 25 मिनिटे |
| एकूण | 120 | 120 | 90 मिनिटे |
- किमान पात्रता गुण: 60 गुण (50%)
- अंतिम निवड: परीक्षा + मुलाखत + कागदपत्र पडताळणीवर आधारित
📍 परीक्षा केंद्रे (Online Exam Centres)
- परीक्षा केंद्रे: मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, कोल्हापूर
- परीक्षेचे ठिकाण व संपूर्ण पत्ता कॉल लेटरवर नमूद असेल
- परीक्षा केंद्र किंवा तारखेत बदल करण्याची विनंती स्वीकारली जाणार नाही
- उमेदवारांनी स्वतःच्या खर्चावर परीक्षेला उपस्थित रहावे
- MSC Bank ला परीक्षा रद्द/बदलण्याचा किंवा केंद्रांमध्ये बदल करण्याचा अधिकार राखून ठेवलेला आहे
📍 मुलाखत / कौशल्य चाचणी
- मुलाखत किंवा कौशल्य चाचणी मुंबई येथे MSC बँकेच्या धोरणानुसार घेतली जाईल
MSC Bank Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| क्र. | क्रियाकलाप | दिनांक |
|---|---|---|
| 1 | ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख | 17.07.2025 |
| 2 | ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 06.08.2025 |
| 3 | अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख | 06.08.2025 |
MSC Bank Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| घटक | लिंक / माहिती |
|---|---|
| भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| भरतीची जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
| Apply Online (ऑनलाईन अर्ज) | इथे अर्ज करा |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
MSC Bank Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
✅ महत्त्वाचे टप्पे (Main Steps):
A) अर्ज नोंदणी (Application Registration)
B) शुल्क भरणे (Payment of Fees)
C) कागदपत्रे स्कॅन व अपलोड प्रक्रिया (Document Scan & Upload)
🔹 A. अर्ज नोंदणी प्रक्रिया (Application Registration)
Step-by-Step मार्गदर्शक:
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- “Apply Online” वर क्लिक करा → “Click here for New Registration” निवडा
- आपले पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल ID भरा.
- सिस्टमद्वारे एक Provisional Registration Number आणि Password तयार केला जाईल.
- अर्ज अपूर्ण असल्यास “SAVE AND NEXT” चा वापर करून नंतर लॉगिन करता येते.
- अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा – एकदा नोंदणी पूर्ण झाली की बदल करता येणार नाहीत.
- अर्जातील स्पेलिंग प्रमाणपत्रांनुसार बरोबर लिहा.
- Validate & Save करा → त्यानंतर फोटो, स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणा अपलोड करा.
- संपूर्ण माहिती भरल्यानंतर “Preview Tab” वापरून अंतिम तपासणी करा.
- नंतर “COMPLETE REGISTRATION” वर क्लिक करा.
- Payment Tab वर जाऊन ऑनलाईन पेमेंट करा.
- शेवटी अर्ज Submit करा.
🔹 B. शुल्क भरणे (Payment of Fees)
| पदाचे नाव | अर्ज शुल्क (GST सह) |
|---|---|
| ट्रेनी ज्युनियर ऑफिसर | ₹1,770/- |
| इतर सर्व पदांसाठी | ₹1,180/- |
शुल्क भरण्याची माहिती:
- फक्त Online Mode नेच शुल्क भरायचे आहे.
- Debit/Credit Card, Net Banking, UPI, Wallet चा वापर करून भरता येईल.
- ट्रान्झॅक्शन यशस्वी झाल्यानंतर e-Receipt मिळेल.
- e-Receipt न मिळाल्यास पुन्हा लॉगिन करून Payment करणे आवश्यक आहे.
- अर्ज व e-Receipt प्रिंट करून ठेवा.
- शुल्क परत मिळणार नाही (Non-refundable)
शुल्क भरण्याच्या तारखा:
📅 17.07.2025 ते 06.08.2025
🔹 C. कागदपत्रांची स्कॅन व अपलोड प्रक्रिया (Document Scan & Upload)
अपलोडपूर्वी ही कागदपत्रे तयार ठेवा:
| प्रकार | तपशील |
|---|---|
| फोटो | 4.5 x 3.5 से.मी., 20-50 KB, 200×230 px |
| स्वाक्षरी | काळ्या शाईने, 10-20 KB, 140×60 px |
| डाव्या हाताचा अंगठा ठसा | काळी/निळी शाई, 20-50 KB, 240×240 px |
| हस्तलिखित जाहीरनामा | 50-100 KB, 800×400 px |
हस्तलिखित जाहीरनामा मजकूर:
“I, (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”
⚠️ महत्त्वाच्या टीपा (Important Notes):
- Capital Letters मध्ये स्वाक्षरी केल्यास ती अमान्य केली जाईल.
- फोटो स्पष्ट आणि हलक्या पार्श्वभूमीचा असावा.
- सर्व फाइल्स फक्त JPG/JPEG फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
- स्कॅन केलेले डॉक्युमेंट जर अस्पष्ट असतील, तर पुन्हा अपलोड करणे गरजेचे आहे.
- अपलोड केल्यानंतर Preview Image करून गुणवत्तेची खात्री करूनच फॉर्म सबमिट करा.
📝 इतर महत्त्वाच्या सूचना (Other Instructions):
- अर्ज करताना वैध ई-मेल ID आणि मोबाईल नंबर असावा.
- अर्ज यशस्वी झाल्यावर त्याची प्रिंट घ्या आणि सुरक्षित ठेवा.
- निवड झाल्यानंतर उमेदवारांनी MSC Bank सोबत 4 वर्षे सेवा करणे बंधनकारक आहे.
- यासाठी ₹10 लाखांचे अंडरटेकिंग आणि 2 श्योरिटीज द्याव्या लागतील.
इतर भरती
MSC Bank Bharti 2025: FAQ
MSC Bank Bharti 2025 साठी कोण पात्र आहे?
MSC Bank Bharti 2025 साठी पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. काही पदांसाठी पदवी आवश्यक आहे, तर Peon आणि Driver पदासाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तपशीलवार पात्रता वाचण्यासाठी अधिकृत अधिसूचना पहा.
MSC Bank Bharti 2025 मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
MSC Bank Bharti 2025 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 ऑगस्ट 2025 आहे. यानंतरचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
MSC Bank Bharti 2025 मध्ये कोणकोणती पदे उपलब्ध आहेत?
MSC Bank Bharti 2025 अंतर्गत खालील पदांसाठी भरती होत आहे:
Trainee Junior Officer, Trainee Associate, Trainee Typist, Trainee Driver, Trainee Peon
एकूण जागा: 167
MSC Bank Bharti 2025 मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?
MSC Bank Bharti 2025 मध्ये निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा (IBPS द्वारे) व मुलाखतीच्या आधारे होणार आहे. काही पदांसाठी Skill Test सुद्धा घेतले जाईल.
