Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेतून नवीन भरतीची जाहिरात नुकतीच जाहीर झाली आहे. ही भरती वर्ष 2025 साठी काढण्यात आली असून इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे, या भरतीत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
या भरतीत उमेदवारांना 1,12,400 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक प्रकारे सुवर्णसंधी आहे, विविध पदांसाठी हि भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
यामध्ये 10वी, 12वी पास तसेच आयटीआय, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांनाही संधी उपलब्ध आहे. म्हणजेच वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेनुसार अनेकांना या भरती साठी फॉर्म भरता येणार आहे.
यासोबतच याची अर्ज प्रक्रिया हि पूर्णपणे ऑनलाइन ठेवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिरात नीट वाचून पात्रता तपासून लगेच ऑनलाइन अर्ज करावा. या भरतीबाबतची संपूर्ण माहिती, पात्रता, अर्जाची पद्धत आणि महत्वाच्या तारखा खालील आर्टिकल मध्ये दिल्या आहेत, हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचून काढा आणि मगच ऑनलाईन फॉर्म भरा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
माहितीचा तपशील | विवरण / माहिती |
---|---|
भरती करणारी संस्था | मिरा भाईंदर महानगरपालिका |
भरतीचे नाव | Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 |
पदाचे नाव | विविध पदे |
रिक्त जागा | 358 |
वेतन | १,१२,४००/- रुपये (पदानुसार भिन्न) |
नोकरी ठिकाण | मिरा भाईंदर, महाराष्ट्र |
शैक्षणिक पात्रता | 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा किंवा पदवी पास |
वयोमर्यादा | १८ ते ३८ वर्षे |
अर्जाची फी | खुला प्रवर्ग: ₹1000/- मागासवर्गीय/अनाथ: ₹900/- माजी सैनिक: फी नाही |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | पगार/ वेतन |
---|---|---|---|
1 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 27 | 35400 रु. ते 112400 रु. |
2 | कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) | 02 | 35400 रु. ते 112400 रु. |
3 | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | 01 | 35400 रु. ते 112400 रु. |
4 | लिपिक टंकलेखक | 03 | 19900 रु. ते 63200 रु. |
5 | सर्व्हेअर (सर्वेक्षक) | 02 | 25500 रु. ते 81100 रु. |
6 | नळ कारागीर (प्लंबर) | 02 | 19900 रु. ते 63200 रु. |
7 | फिटर | 01 | 19900 रु. ते 63200 रु. |
8 | मिस्त्री | 02 | 19900 रु. ते 63200 रु. |
9 | पंप चालक | 07 | 19900 रु. ते 63200 रु. |
10 | अनुरेखक | 01 | 25500 रु. ते 81100 रु. |
11 | विजतंत्री (इलेक्ट्रिशियन) | 01 | 19900 रु. ते 63200 रु. |
12 | कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर) / संगणक प्रोग्रामर | 01 | 35400 रु. ते 112400 रु. |
13 | स्वच्छता निरीक्षक | 05 | 25500 रु. ते 81100 रु. |
14 | चालक-वाहनचालक | 14 | 25500 रु. ते 81100 रु. |
15 | सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी | 06 | 35400 रु. ते 112400 रु. |
16 | अग्निशामक | 241 | 21700 रु. ते 69100 रु. |
17 | उद्यान अधिकारी | 03 | 35400 रु. ते 112400 रु. |
18 | लेखापाल | 05 | 35400 रु. ते 112400 रु. |
19 | डायालिसिस तंत्रज्ञ | 03 | 35400 रु. ते 112400 रु. |
20 | बालवाडी शिक्षिका | 04 | 19900 रु. ते 63200 रु. |
21 | परिचारिका / अधिपरिचारिका (स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ) (G.N.M) | 05 | 35400 रु. ते 112400 रु. |
22 | प्रसविका (A.N.M) | 12 | 25500 रु. ते 81100 रु. |
23 | औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी | 05 | 29200 रु. ते 92300 रु. |
24 | लेखापरीक्षक | 01 | 35400 रु. ते 112400 रु. |
25 | सहाय्यक विधी अधिकारी | 02 | 38600 रु. ते 122800 रु. |
26 | तारतंत्री (वायरमन) | 01 | 19900 रु. ते 63200 रु. |
27 | ग्रंथपाल | 01 | 35400 रु. ते 112400 रु. |
Total | 358 |
Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
पद क्र. | पदाचे नाव | आवश्यक शिक्षण |
---|---|---|
1 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी |
2 | कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) | मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी |
3 | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी |
4 | लिपिक टंकलेखक | कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. |
5 | सर्व्हेअर (सर्वेक्षक) | सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी डिप्लोमा किंवा ITI (Surveyor) + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. |
6 | नळ कारागीर (प्लंबर) | 10वी उत्तीर्ण + ITI (Plumber) + 03 वर्षे अनुभव |
7 | फिटर | 10वी उत्तीर्ण + ITI (Plumber) + 03 वर्षे अनुभव |
8 | मिस्त्री | 10वी उत्तीर्ण + ITI (Mason) + 02 वर्षे अनुभव |
9 | पंप चालक | 10वी उत्तीर्ण + ITI (Pump Operator) |
10 | अनुरेखक | 12वी उत्तीर्ण + ITI Tracer |
11 | विजतंत्री (इलेक्ट्रिशियन) | 10वी उत्तीर्ण + ITI (Electrician) + 02 वर्षे अनुभव |
12 | कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर) / संगणक प्रोग्रामर | BE.B.Tech (Computer) /MCA + 03 वर्षे अनुभव |
13 | स्वच्छता निरीक्षक | पदवीधर + स्वच्छता निरीक्षक |
14 | चालक-वाहनचालक | 10वी उत्तीर्ण + अग्निशामक प्रशिक्षण कोर्स + जड वाहन चालक परवाना + 03 वर्षे अनुभव |
15 | सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी | पदवीधर + सब ऑफिसर कोर्स |
16 | अग्निशामक | 10वी उत्तीर्ण + अग्निशामक प्रशिक्षण कोर्स |
17 | उद्यान अधिकारी | B.Sc पास |
18 | लेखापाल | B.Com + 05 वर्षे अनुभव |
19 | डायालिसिस तंत्रज्ञ | BSc/DMLT + डायालिसिस टेक्निशियन कोर्स + 02 वर्षे अनुभव |
20 | बालवाडी शिक्षिका | 12वी उत्तीर्ण + बालवाडी टीचर्स कोर्स |
21 | परिचारिका / अधिपरिचारिका (स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ) (G.N.M) | 12वी उत्तीर्ण + GNM + 03 वर्षे अनुभव |
22 | प्रसविका (A.N.M) | 12वी उत्तीर्ण + ANM |
23 | औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी | 12वी उत्तीर्ण + B.Pharm + 02 वर्षे अनुभव |
24 | लेखापरीक्षक | B.Com + वित्तीय व्यवस्थापनेतील पदव्युत्तर पदवी/पदविका किंवा M.Com |
25 | सहाय्यक विधी अधिकारी | विधी पदवी + 05 वर्षे अनुभव + MS-CIT |
26 | तारतंत्री (वायरमन) | 10वी उत्तीर्ण + ITI (Wireman) + 02 वर्षे अनुभव |
27 | ग्रंथपाल | B.Lib. + 03 वर्षे अनुभव |
Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती
तपशील | विवरण |
---|---|
वयाची अट | 18 ते 38 वर्षे |
मागासवर्गीय/अनाथ | 5 वर्षे सूट |
Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti साठी निवड प्रक्रिया हि तीन टप्प्यात होणार आहे, यामध्ये पदानुसार वेगवेगळी ऑनलाईन परीक्षा हि घेतली जाणार आहे. आणि त्यानंतर कागदपत्रे बरोबर आहेत का हे पाहण्यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे, आणि त्यावरच अंतिम निवड हि केली जाणार आहे.
1) ऑनलाईन परीक्षा (Online Exam):
सर्वप्रथम उमेदवारांना संगणकावर आधारित ऑनलाईन परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेत संबंधित विषयांवरील प्रश्न विचारले जातील. उमेदवारांना मिळालेल्या मार्क नुसार त्यांची पात्रता हि ठरवली जाईल.
या मध्ये खाली याप्रकारे प्रत्येक पदानुसार कोणती ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल, त्याचे स्वरूप कसे असेल याची माहिती हि खालील फोटो मध्ये देण्यात आली आहे.


Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti Syllabus:
विषय | सिलॅबस |
---|---|
सामान्य ज्ञान (General Knowledge) | भारताचा इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, विज्ञान व तंत्रज्ञान, चालू घडामोडी (राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय), अर्थव्यवस्था, पर्यावरण व सामाजिक विषय. |
सामान्य बुद्धिमत्ता / तार्किक चाचणी (Reasoning) | तार्किक विचार, मालिका, कोडी, विश्लेषण क्षमता, आकृती आधारित प्रश्न, दिशानिर्देश, रक्तसंबंध, वेन आकृती. |
सांख्यिकी गणित (Quantitative Aptitude) | संख्या पद्धती, प्रमाण व प्रमाणभाग, टक्केवारी, नफा-तोटा, सरासरी, साधे व चक्रवाढ व्याज, वेळ व काम, वेळ व अंतर, डेटा इंटरप्रिटेशन. |
इंग्रजी भाषा (English Language) | व्याकरण, शब्दसंग्रह, समानार्थी/विरुद्धार्थी शब्द, वाक्य रचना, रिकाम्या जागा भरणे, अपूर्ण वाक्ये पूर्ण करणे, आकलन (Comprehension). |
मराठी भाषा | शुद्धलेखन, व्याकरण, वाक्यरचना, समानार्थी/विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार, अपूर्ण वाक्ये पूर्ण करणे, गद्य व पद्य आकलन. |
तांत्रिक विषय (Technical Subject) | संबंधित पदानुसार तांत्रिक विषयांचा अभ्यासक्रम – उदा. अभियांत्रिकी, आयटीआय ट्रेड, संगणक, लेखा, वैद्यकीय, अग्निशमन, उद्यानशास्त्र इत्यादी पदासाठी आवश्यक असलेले विषय. |
अकाउंट विषय (Account Subject) | Accounting संबंधी सर्व विषय – जसे कि लेखाशास्त्र, ऑडिटिंग, कर प्रणाली, लेखा व्यवस्थापन इत्यादी. |
2) मुलाखत (KYC / Document Verification):
ऑनलाईन परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांना पुढे मुलाखतीसाठी बोलावले जाईल. या टप्प्यात उमेदवारांची वैयक्तिक कौशल्ये, संवाद क्षमता आणि पदासाठी आवश्यक असलेल्या गुणांची चाचणी घेतली जाईल. त्याबरोबर उमेदवाराने जे काही कागदपत्रे सबमिट केले आहेत, अर्जात जी काही माहिती दिली आहे ती माहिती पूर्णपणे योग्य आहे खरी आहे याची खात्री पण याच मुलाखती मध्ये केली जाईल.
मुलाखती मध्ये कोणतेही मार्क्स दिले जाणार नाहीत, हि मुलाखत फक्त पात्रता तपासण्यासाठी असणार आहे.
3) अंतिम निवड (Final Selection):
ऑनलाईन परीक्षा, मुलाखत (कागदपत्र पडताळणी) या सर्व टप्प्यांमध्ये जे कोणी उमेदवार पास होतील केवळ त्यांना मेरीट लिस्ट मध्ये टाकले जाईल. आणि मग मेरीट लिस्ट नुसार पात्र उमेदवारांना मीरा भाईंदर महानगरपालिका मध्ये नोकरी हि दिली जाईल.
Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
तपशील | तारीख |
---|---|
अर्जाची सुरुवात | 22 ऑगस्ट 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 12 सप्टेंबर 2025 |
Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
घटक | लिंक / माहिती |
---|---|
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
भरतीची जाहिरात PDF | जाहिरात वाचा |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
1) अधिकृत वेबसाईट वर जा
सर्वप्रथम वर दिलेल्या Apply Link वर क्लिक करून मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
2) नोंदणी (Registration) करा
नवीन उमेदवारांनी सर्वप्रथम पोर्टलवर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मिळालेला Registration Number / Login ID सेव्ह करून ठेवा.
3) ऑनलाईन अर्ज भरा
नोंदणी झाल्यानंतर पुन्हा लॉगिन करून ऑनलाईन अर्जाचा फॉर्म ओपन करा. फॉर्ममध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील आणि अनुभवाची माहिती नीट भरून घ्या.
4) कागदपत्रे अपलोड करा
आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, फोटो, सही) स्कॅन करून योग्य फॉरमॅटमध्ये या भरतीच्या अर्जात अपलोड करा.
5) परीक्षा फी भरा
जर तुम्हाला अर्जाची फी लागू असेल तर ती ऑनलाईन कोणत्याही मोड द्वारे (Debit Card / Credit Card / Net Banking / UPI) मार्फत भरून घ्या.
6) फॉर्म सबमिट करा
मीरा भाईंदर महानगरपालिका भरती चा फॉर्म भरून झाला कि नंतर तुम्हाला तो फॉर्म एकदा रिचेक करायचा आहे, कोणती माहिती चुकली असेल तर ती दुरुस्त करून घ्यायची आहे. आणि मग त्यानंतरच तुम्हाला तुमचा फॉर्म हा शेवटी सबमिट करून टाकायचा आहे.
थोडक्यात, या पद्धतीने तुम्ही Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 साठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म हा सहजपणे भरू शकता.
इतर भरती
IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 10वी, ITI, डिप्लोमा पास वर भरती! इथून लगेच फॉर्म भरा
Punjab And Sind Bank Bharti 2025: पंजाब & सिंध बँकेत पदवी पास वर भरती! 85,920 रु. पगार लगेच अर्ज करा
Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पासवर भरती! पगार ₹69,100 पर्यंत, येथून लगेच फॉर्म भरा
Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!
IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!
AIIMS CRE Bharti 2025: 10वी, 12वी, ITI, डिग्री पासवर AIIMS मधे 2300+ जागांची भरती, पगार ₹35,400 पासून! संधी सोडू नका लगेच अर्ज करा!
BHEL Bharti 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये ITI+NAC उमेदवारांसाठी मेगाभरती! पगार ₹29,500 पासून! लगेच अर्ज करा!
ICF Bharti 2025: रेल्वे अप्रेंटिस भरती 10वी आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी,₹7000 पासून! लगेच अर्ज करा!
Indian Air Force Airmen Bharti 2025: 12वी आणि डिप्लोमा Pharmacy पाससाठी भरती, पगार ₹26,900 पासून! लगेच अर्ज करा!
Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 – 26: FAQ
Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
विविध पदांसाठी भरती केली जात आहे, पदांची नावे जाणून घ्यायचे असतील तर हे आर्टिकल पूर्ण वाचा.
Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
एकूण रिक्त जागा या 358 आहेत, ज्या वेगवेगळ्या पदांमध्ये विभागलेल्या आहेत.
Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2025 आहे.
Mira-Bhayandar Mahanagarpalika Recruitment 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?
या भरती साठी अर्जदार उमेदवारांची निवड हि ऑनलाईन परीक्षा, मुलाखत आणि मेरीट लिस्टच्या आधारे केली जाणार आहे.