MHT CET Exam New Update 2026: आता MHT-CET Exam वर्षातून २ वेळा होणार! जाणून घ्या नवीन अपडेट

MHT CET Exam New Update 2026: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे! आता MHT-CET परीक्षा वर्षातून दोनदा होणार आहे. होय, अगोदर ही परीक्षा वर्षात फक्त एकदाच घेतली जायची, पण आता ती दोन वेळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा बदल विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्वाचा आणि उपयोगी ठरणार आहे.

ही अपडेट Maharashtra Health and Technical Common Entrance Test (MHT CET) संदर्भात आहे, जी अभियांत्रिकी, फार्मसी आणि इतर तांत्रिक शिक्षणासाठी प्रवेश मिळवण्यासाठी घेतली जाते. विद्यार्थ्यांना आता दोन वेळा परीक्षा देण्याची संधी मिळणार असल्यामुळे, त्यांचा दबाव कमी होईल सोबतच जर पहिल्या प्रयत्नात विद्यार्थी पास झाला नाही तर त्याला पुन्हा त्याच वर्षात अजून एकदा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.

मागील काही वर्षांपासून MHT CET परीक्षा एकदाच घेतली जायची, त्यामुळे जर विद्यार्थ्यांचा पहिला प्रयत्न नीट झाला नाही, तर त्यांना पुढील वर्षाची वाट पहावी लागायची. पण आता या नवीन नियमामुळे विद्यार्थ्यांना एकाच वर्षात दोन संधी मिळणार आहेत, जे त्यांच्या करिअरसाठी फायदेशीर ठरणार आहे.

या पोस्टमध्ये आपण या नवीन अपडेटची सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासोबतच MHT CET परीक्षा कशी घेतली जाते, तिचं स्वरूप काय आहे, आणि तयारी कशी करावी याबद्दलची माहितीही दिली आहे. जर तुम्ही MHT CET 2026 साठी तयारी करत असाल, तर हे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा आणि अजून जोमाने परीक्षेच्या तयारीला लागा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

MHT CET Exam New Update 2026: Complete MHT-CET Exam Details – परीक्षेची सविस्तर माहिती (नवीन अपडेट)

परीक्षेचे नावMHT CET Exam 2026
परीक्षा घेणारी संस्थाState CET Cell, Maharashtra
परीक्षेचा प्रकारऑनलाईन CBT (Computer Based Test)
नवीन अपडेटआता MHT CET परीक्षा वर्षातून २ वेळा होणार
पूर्वीची परीक्षा पद्धतवर्षातून एकदाच परीक्षा घेतली जात होती
बदलाचा उद्देशविद्यार्थ्यांवरील दबाव करणे
लागू होणारे वर्षशैक्षणिक वर्ष 2026 पासून
परीक्षा विषयPhysics, Chemistry, Mathematics / Biology
पात्रता12वी उत्तीर्ण (Science शाखा)
अधिकृत वेबसाईटcetcell.mahacet.org

MHT CET Exam New Update 2026: आता वर्षातून २ वेळा परीक्षा होणार!

MHT CET परीक्षा संदर्भात एक मोठा बदल करण्यात आला आहे. 2004 ते 2018 या काळात ही परीक्षा ऑफलाइन स्वरूपात (pen-paper mode) घेतली जायची. त्यानंतर 2019 पासून परीक्षा ऑनलाइन पद्धतीने (Computer Based Test) घेण्यात येऊ लागली आणि ती मल्टिशिफ्ट प्रणालीत पार पडू लागली. पुढे 2021 मध्ये नवीन syllabus लागू करण्यात आला आणि त्या वेळेपासून परीक्षा अधिक आधुनिक स्वरूपात घेण्यात येत आहे.

YearChanges
2004 – 2018ऑफलाईन परीक्षा
2019ऑनलाईन परीक्षा (Multishift)
2021अभ्यासक्रम बदल (Syllabus Changes)
2026वर्षातून 2 वेळा परीक्षा देता येणार
Exam AttamptYear 2026Year 2027
1st Examमार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातजानेवारी महिन्याच्या आसपास
2nd Examमे महिन्यातएप्रिल ते मे महिन्या दरम्यान

Note: MHT CET च्या डबल परीक्षा या 2026 मध्ये मागे पुढे आहेत, मात्र 2027 पासून परीक्षा या रेगुलर JEE सोबत होणार आहेत.

आतापर्यंत विद्यार्थ्यांना MHT-CET परीक्षा वर्षातून फक्त एकदाच देता येत होती, म्हणजे HSC बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर CET घेतली जायची. पण आता विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी आली आहे, महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे की 2026 पासून MHT-CET परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्यात येईल.

CET कमिशनर दिलीप सरदेसाई यांनी सांगितले आहे की, 2025 मध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी आणि MBA प्रवेशासाठी CET च्या दोन फेऱ्या घेण्यात येतील – २५ मार्च ते १५ मे दरम्यान, पुढील वर्षापासून म्हणजेच 2026 पासून ही नवी प्रणाली कायमस्वरूपी लागू होणार आहे.

आता विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा परीक्षा देण्याची संधी मिळेल आणि ज्या प्रयत्नात अधिक गुण मिळतील तो स्कोअर प्रवेशासाठी ग्राह्य धरला जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी होईल, तयारी सुधारता येईल आणि चांगले गुण मिळवण्याची संधीही वाढेल. त्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय खरोखरच स्वागतार्ह आणि लाभदायक आहे.

MHT CET Exam Pattern 2026 (परीक्षेचे स्वरूप)

MHT CET परीक्षा पूर्णपणे Computer-Based Test (CBT) म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने घेतली जाते. ही परीक्षा दोन गटांसाठी घेतली जाते – PCM (Physics, Chemistry, Mathematics) आणि PCB (Physics, Chemistry, Biology). दोन्ही गटांची परीक्षा कालावधी 180 मिनिटे (3 तास) असतो.

परीक्षेत सर्व प्रश्न Multiple Choice Questions (MCQs) स्वरूपात विचारले जातात. PCM गटात एकूण 150 प्रश्न असतात — म्हणजे प्रत्येक विषयातून अंदाजे 50 प्रश्न येतात. PCB गटात मात्र एकूण 200 प्रश्न विचारले जातात — ज्यात Biology विषयाचे प्रमाण जास्त असते.

परीक्षेचा एकूण गुणांचा विचार केला तर, दोन्ही गटांसाठी (PCM आणि PCB) 200 गुणांचे पेपर घेतले जातात. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला 200 गुणांच्या पेपरमध्ये 3 तासांत प्रश्न सोडवायचे असतात.

PaperSubjectNumber of MCQsMarks Per QuestionTotal MarksDuration of Examination (In minutes)
Class 11Class 12
Paper 1Mathematics1040210090
Paper 2Physics1040110090
Chemistry10401
Paper 3Biology1040110090

MHT CET Exam Important Links (Official Website, Brochures)

अधिकृत वेबसाईटcetcell.mahacet.org
ऑनलाईन अर्जApply Now
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा
Pharmecy BrochureDownload Now
Engineering BrochureDownload Now
Agriculture BrochureDownload Now
Architecture BrochureDownload Now
Management BrochureDownload Now
इतर भरती

Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्र राज्य पोलीस भरती अर्ज सुरु! 15,500+ जागांची मेगा भरती, लगेच इथून फॉर्म भरा

GMC Solapur Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे 10वी पास वर भरती! 47600 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा

Indian Army TES Bharti 2025: भारतीय सैन्य दलात 12 वी पास वर भरती! टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 55 (जुलै 2026) इथून फॉर्म भरा

IB ACIO Gr-II/ Tech Recruitment 2025: गुप्तचर विभागात भरती! 1,42,400 रु. पगार, पदवीधर उमेदवार अर्ज करा

UCO Bank Apprentice Bharti 2025: युको बँकेत भरती! पदवी पास वर भरती, लगेच अर्ज करा

BRO Bharti 2025: सीमा रस्ते संघटनेत भरती! 63,200 रु. पगार, 10वी/ ITI पास अर्ज करा

ISRO SDSC SHAR Bharti 2025: सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये भरती! 1,77,500 रु. पगार, 10वी/ ITI/ डिप्लोमा, पदवी पास अर्ज करा

Jalgaon DCC Bank Bharti 2025: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती! पदवी/ MSCIT पास अर्ज करा

NMMC NUHM Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिका-NUHM अंतर्गत स्टाफ नर्स भरती! 12वी/ नर्सिंग पास अर्ज करा

ONGC Apprentice Bharti 2025: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात मेगा भरती! 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ पदवी पास अर्ज करा

BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात भरती! 69,100 रु. पगार, 10वी पास अर्ज करा

Mumbai Port Bharti 2025: मुंबई पोर्ट मध्ये भरती! 10वी/ ITI/ पदवी पास अर्ज करा

SEBI Bharti 2025: सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये भरती! 1,84,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

MHT CET Exam New Update 2026: FAQs

MHT CET परीक्षा म्हणजे काय?

MHT CET म्हणजे Maharashtra Health and Technical Common Entrance Test, ही राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा आहे जी अभियांत्रिकी, फार्मसी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेतली जाते.

MHT CET परीक्षेत काय नवीन बदल करण्यात आले आहेत?

MHT CET परीक्षा 2026 पासून वर्षातून दोन वेळा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दोन वेळेस परीक्षा देता येईल, ज्या पेपर मध्ये जास्त गुण मिळतील ते मार्क्स विचारात घेतले जातील.

MHT CET नवी परीक्षा पद्धत कधीपासून लागू होणार आहे?

ही नवी पद्धत शैक्षणिक वर्ष 2026 पासून लागू होईल.

MHT CET परीक्षा कोणत्या पद्धतीने घेतली जाते?

ही परीक्षा पूर्णपणे Computer-Based Test (CBT) स्वरूपात घेतली जाते, म्हणजेच ऑनलाईन परीक्षा असते.

Leave a comment