महाराष्ट्र पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध! लगेच अर्ज करा, संधी सोडू नका | Maharashtra Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti: मित्रांनो मोठी आनंदाची बातमी आली आहे, आता अखेर महाराष्ट्र सरकारने पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानूसार मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे, जे विद्यार्थी किंवा उमेदवार पोलीस भरती साठी तयारी करत होते, त्यांच्या साठी ही सुवर्णसंधी आहे.

महाराष्ट्र पोलीस भरती साठी आज म्हणजे दिनांक 1 मार्च 2024 रोजी अधिकृत जाहिरात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासोबत भरतीची माहिती सर्वांपर्यंत पोहचावी यासाठी वेगवेगळ्या वर्तमान पत्रामध्ये पण भरतीची जाहिरात छापील स्वरूपात देण्यात आली आहे.

तब्बल 17311 रिक्त जागांसाठी मोठी बंपर भरती राबवली जाणार आहे, ही पोलीस भरती जिल्हास्तरावर असणार आहे. म्हणजे जिल्ह्यानुसार भरती निघाली आहे, त्यासाठी अर्ज हा एकाच ठिकाणी करायचा आहे, मात्र तुमच्या इच्छेनुसार कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही अर्ज करू शकता.

पोलीस भरती महाराष्ट्र साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, विविध पोलीस पदांची भरती होणार आहे, त्यासाठी अर्ज हे 5 मार्च पासून सुरू होणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मार्च 2024 होती, पण आता अजून 15 दिवसांची मुदतवाढ दिली गेली आहे. म्हणजे केवळ 26 दिवस + 15 दिवस असे एकूण 41 दिवस दिले गेले आहेत. 15 एप्रिल, 2024 या नवीन मुदती मध्ये फॉर्म भरायचा आहे, तारीख निघून गेल्यावर कोणाचाही अर्ज हा स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे काळजीपूर्वक शेवटच्या तारखे आगोदर फॉर्म भरून घ्या.

Maharashtra Police Bharti 2024

📢 भरतीचे नाव – Maharashtra Police Bharti 2024

✅ पदाचे नाव – कॉन्स्टेबल, Bandsman, ड्रायव्हर, बंदूकधारी कॉन्स्टेबल, जेल वॉर्डन

पदाचे नावपद संख्या
पोलीस शिपाई (Police Constable)9532
पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen)
पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver)1686
पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF)4293
 कारागृह शिपाई (Prison Constable)1800
Total17311

जिल्हानुसार पोलीस भरती साठी रिक्त जागा निघाल्या आहेत, तुम्हाला जर जिल्ह्यानुसार रिक्त जागा पहायच्या असतील, तर तुम्ही अधिकृत जाहिरात वाचू शकता.

🚩 एकूण रिक्त जागा – 17311 

👨‍🎓 शैक्षणिक पात्रता – 

  • उमेदवार हा किमान 10 वी ते 12 वी पास असावेत.
  • मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेले, किंवा पदवीच्या पहिल्या वर्षातील उमेदवार पात्र असणार आहेत.
  • मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतलेले असावे.

पदानुसार पात्रता निकष हे भिन्न आहेत.

  • पोलीस शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.
  • पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण

उमेदवार जर पदवीधर असेल, तर त्याला पण पोलीस भरती साठी प्राधान्य असणार आहे.

➡️ नोकरीची ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र (जिल्हास्तरीय)

💰 पगार – 21,700 ते 69,100 रुपये प्रति महिना (वेतन श्रेणी पदानुसार बदलते)

💵 परीक्षा फी – 

पोलीस भरतीसाठी परीक्षा फी देखील भरणे आवश्यक आहे, परीक्षा फी ही साधारण प्रवर्ग आणि मागासवर्ग यांच्यासाठी वेगवेगळी असणार आहे.

  • साधारण Open प्रवर्ग – 450 रू. 
  • मागासवर्ग – 350 रू. (100 रुपये सूट)

📝 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

🔞 वयोमर्यादा – 

पोलीस भरतीसाठी वयाची अट भिन्न आहे, प्रत्येक पदा नुसार वयोमर्यादा वेगवेगळी असणार आहे. किमान वयाची अट ही सर्व पदांसाठी सारखी आहे, मात्र वयाची मर्यादा मात्र सारखी नाही.

वयाची अट 👇

  • 18 ते 28 वर्षे (साधारण प्रवर्ग)
  • 18 ते 33 वर्षे (मागासवर्ग)

📍 वयोमर्यादा सूट – मागासवर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. 

📆 फॉर्मची Last Date – 15 एप्रिल, 2024 (मुदतवाढ)

पोलीस भरतीचे कागदपत्रे जाणून घ्या

Maharashtra Police Bharti Notification PDF Download

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जाहिरात निघाली आहे, संबंधित शासनाने दिनांक 1 मार्च 2024 रोजी Maharashtra Police Bharti Notification PDF जारी केली आहे.

जे उमेदवार महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहेत, त्यांना भरती साठी जाहीर केलेली जाहिरात वाचणे अनिवार्य आहे. जर भरतीची जाहिरात वाचली तरच उमेदवारांना पोलीस भरतीसाठी अर्ज करता येणार आहे, कारण जाहिरातीमध्ये भरती संबंधी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे.

भरतीची जाहिरात वाचा, म्हणजे एन वेळी तुम्हाला अर्ज करताना कोणती अडचण येणार नाही. आधीसूचना जाहिरात पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक दिली आहे, निळ्या लिंक वर क्लिक करा, आणि PDF Download करा.

Maharashtra Police Bharti Qualification Details

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पात्रता निकष हे पुढीलप्रमाणे:

  • उमेदवार हा किमान 12 वी पास असावा, आणि त्याला बारावी मध्ये किमान 50 ते 60 टक्के मार्क असावेत. (टक्केवारी हि पदानुसार ग्राह्य धरली जाणार आहे, त्यामुळे याची अधिक माहिती तुम्ही जाहिरातीच्या माध्यमातून घेऊ शकता)
  • उमेदवार जर पदवीधर असेल तर त्याने त्याच्या पदवीचे शिक्षण हे मान्यताप्राप्त विद्यापीठात घेतलेले असावे.
  • मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणारे विद्यार्थी देखील पोलीस भरती साठी पात्र असणार आहेत.

Maharashtra Police Bharti Physical Qualification

पोलीस भरतीसाठी शारीरिक पात्रता देखील अनिवार्य आहे, जे उमेदवार भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांना पोलीस भरती निवड प्रक्रिया मध्ये शारीरिक चाचणी द्यावी लागेल. त्यामुळे हे निकष आवश्यक आहेत.

शारीरिक पात्रता ही उंची आणि छाती च्या आधारावर ठरवली जाणार आहे, महिला आणि पुरुषांसाठी हे निकष वेगवेगळे असणार आहेत.

Genderउंचीछाती
पुरुष165 cm79 cm
महिला155 cmलागू नाही

Maharashtra Police Bharti Apply Online

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी उमेदवारांना पोलीस भरतीच्या अधिकृत संकेस्थळावर जावे लागेल, त्याची Direct Link ही आहे.

अधिकृत वेबसाईटवर केल्यानंतर तिथे तुम्हाला सुरुवातीला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे, नोंदणी करताना आवश्यक ती माहिती काळजीपूर्वक टाकायचे आहे. 

नोंदणी करून झाल्यावर पोलीस भरतीसाठी चा फॉर्म भरायचा आहे, फॉर्म भरताना देखील अर्जामध्ये जी माहिती विचारली आहे ती योग्य रीत्या भरायची आहे. 

पोलीस भरतीची अधिक माहिती येथून पहा

अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत, कागदपत्रे सूचनेनुसार योग्यरीत्या साईज आणि रेशियो मध्ये असावेत. 

ऑनलाइन फॉर्म भरून झाल्यावर एकदा तो तपासून घ्यायचा आहे, कोणतीही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करायची आहे. नंतर अर्ज पुन्हा Edit करता येणार नाही.

सोबतच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 एप्रिल 2024 आहे, मुदतवाढ मिळाली आहे त्यामुळे अजून संधी आहे. 15 एप्रिल आगोदर अर्ज भरून टाका. 

नवीन भरती जॉब अपडेट:

Maharashtra Police Bharti FAQ

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी एकूण किती जागा रिक्त आहेत?

एकूण 17311 रिक्त जागांसाठी पोलीस भरती होणार आहे.

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्ज केव्हा सुरू होणार?

पोलीस भरतीचे अर्ज हे 5 मार्च 2024 ला सुरू झाले आहेत.

पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

ऑनलाइन स्वरूपात पोलीस भरतीसाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल, 2024 आहे.

16 thoughts on “महाराष्ट्र पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध! लगेच अर्ज करा, संधी सोडू नका | Maharashtra Police Bharti 2024”

Leave a comment