Maharashtra Board Exam Dates 2026: 10वी/ 12वी परीक्षा तारीख जाहीर! मागील 10 वर्षाचे परीक्षा पेपर्स इथून डाउनलोड करा

Maharashtra Board Exam Dates 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10वी (SSC) आणि 12वी (HSC) बोर्ड परीक्षांच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत! विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी अपडेट आहे कारण आता परीक्षेची तयारी पूर्ण जोमात सुरू करण्याची वेळ आली आहे.

या वर्षीच्या SSC आणि HSC बोर्ड परीक्षा नेहमीप्रमाणे फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणार आहेत. त्यासंबंधी मंडळाने अधिकृत तारखा जाहीर केल्या असून, विद्यार्थ्यांना आता अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी योग्य दिशा मिळाली आहे.

परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून या ठिकाणी मागील तब्बल 10 वर्षांचे बोर्ड पेपर्स सुद्धा उपलब्ध करून दिले आहेत. हे पेपर्स डाउनलोड करून तुम्ही घरीच सराव करू शकता. जुन्या पेपरमधून प्रश्नांच्या प्रकारांची कल्पना येते आणि तयारी अजून मजबूत करता येते.

आता परीक्षा तारीखा निश्चित झाल्याने विद्यार्थ्यांनी आपला वेळ वाया न घालवता अभ्यासाला लागणे गरजेचे आहे. दिवाळी आलीच आहे, पण या सुट्टीचा उपयोग अभ्यासासाठी करा. दिलेल्या पेपर्स नीट सोडवा आणि SSC तसेच HSC बोर्ड परीक्षेत टॉप करा!

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Maharashtra Board Exam Dates 2026: Exam Dates All Details – महाराष्ट्र SSC/ HSC बोर्ड परीक्षा तारीख

परीक्षा मंडळमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)
परीक्षेचे नावSSC (10वी) आणि HSC (12वी) बोर्ड परीक्षा 2026
परीक्षा प्रकारवार्षिक (Annual Exam)
अधिकृत वेबसाइटmahahsscboard.in
SSC परीक्षा कालावधीफेब्रुवारी ते मार्च 2026
HSC परीक्षा कालावधीफेब्रुवारी ते मार्च 2026
वेळापत्रक जारी तारीखऑक्टोबर 2025
Previous Year Papersमागील 10 वर्षांचे परीक्षा पेपर्स (प्रश्नपत्रिका)

10th Board Exam Date 2026: SSC Maharashtra Board Exam Dates 2026 – 10 वी बोर्ड परीक्षा तारीख

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) 10वी म्हणजेच SSC बोर्ड परीक्षा 2026 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. यात अधिकृत अपडेट नुसार, लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 दरम्यान घेण्यात येणार आहेत.

तसेच, प्रॅक्टिकल (Practical) आणि व्हायवा (Viva) परीक्षा 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पार पडतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता तयारीला गती देण्याची गरज आहे.

परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करण्यास मदत होईल आणि विषयवार तयारी अधिक प्रभावीपणे करता येईल.

परीक्षेचे नावSSC (10वी) बोर्ड परीक्षा 2026
परीक्षा मंडळमहाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)
लेखी परीक्षा तारीख20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026
प्रॅक्टिकल/ व्हायवा परीक्षा02 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026
परीक्षा प्रकारवार्षिक परीक्षा (Annual Exam)

12th board exam date 2026: HSC Maharashtra Board Exam Dates 2026 – 12 वी बोर्ड परीक्षा तारीख

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) 12वी म्हणजेच HSC बोर्ड परीक्षा 2026 साठीच्या तारखा देखील प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 दरम्यान घेण्यात येणार आहेत.

तसेच, प्रॅक्टिकल (Practical) आणि व्हायवा (Viva) परीक्षा 23 जानेवारी ते 09 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पार पडतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास वेगात पूर्ण करून Revision सुरू करणे आवश्यक आहे.

परीक्षा तारखा अधिकृतपणे जाहीर झाल्यामुळे आता विद्यार्थ्यांनी वेळ व्यवस्थापन करून विषयवार तयारी सुरू करावी. परीक्षेच्या तारीख लक्षात घेऊन नियोजनबद्ध अभ्यास केल्यास यश नक्की मिळेल.

परीक्षेचे नावHSC (12वी) बोर्ड परीक्षा 2026
परीक्षा मंडळमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)
लेखी परीक्षा तारीख10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026
प्रॅक्टिकल/ व्हायवा परीक्षा23 जानेवारी ते 09 फेब्रुवारी 2026
परीक्षा प्रकारवार्षिक परीक्षा (Annual Exam)

SSC Previous Year Question Papers Class 10 PDF Maharashtra Board – 10 वी बोर्ड परीक्षा मागील 10 वर्षाचे पेपर्स

महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी म्हणजेच SSC परीक्षा 2026 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी मदत म्हणून मागील 10 वर्षांचे प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. या प्रश्नपत्रिकेचा नीट सराव केल्यास परीक्षा पॅटर्न समजायला मदत होते आणि वेळ व्यवस्थापन सुधारते.

सर्व प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात दिल्या आहेत, त्या तुम्ही Maharashtra Study या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र PDF पेपर उपलब्ध आहे, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास आणि भूगोल यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांनी या पेपर्सचा सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. जुने पेपर्स सोडवल्याने फक्त प्रश्नांचे प्रकार समजत नाहीत तर उत्तरलेखन आणि वेळेचे नियोजन सुद्धा सुधारते. त्यामुळे SSC बोर्ड परीक्षेत तयारी अधिक मजबूत होते.

10th SSC Board Exam मागील 10 वर्षाचे पेपर्सDownload PDF Link

Maharashtra HSC Board Previous Year Exam Paper PDF Download – 12 वी बोर्ड परीक्षा मागील 10 वर्षाचे पेपर्स

महाराष्ट्र बोर्डाच्या 12वी म्हणजेच HSC परीक्षा 2026 साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मागील 10 वर्षांचे प्रश्नपत्रिका याठिकाणी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जर तुम्हीं या सफ्व पेपर्स चा सर्व केला तर तुम्हाला वार्षिक परीक्षेत याचा खूप फायदा होणार आहे.

सर्व प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात उपलब्ध आहेत. त्या तुम्ही Maharashtra Study या वेबसाईटवरून सहज डाउनलोड करू शकता. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र PDF पेपर्स आहेत, सोबत स्त्रीम नुसार पण पेपर्स दिले आहेत, म्हणजे तुम्ही जर विज्ञान/ वाणिज्य/ कला यातील कोणत्याही स्त्रीम मध्ये असाल तर तुम्हाला याठिकाणी मागील वर्षाचे पेपर्स हे भेटणार आहेत.

12th HSC Board Exam मागील 10 वर्षाचे पेपर्सDownload PDF Link
इतर भरती

Mumbai Port Bharti 2025: मुंबई पोर्ट मध्ये भरती! 10वी/ ITI/ पदवी पास अर्ज करा

SEBI Bharti 2025: सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये भरती! 1,84,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

IPPB Bharti 2025: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती! 30,000 रु. पगार, परीक्षा नाही, लगेच इथून अर्ज करा

Railway RRC NWR Bharti 2025: भारतीय रेल्वे मध्ये 2162 जागांची मेगा भरती! 10वी/ ITI पास अर्ज करा

RRB JE Bharti 2025: भारतीय रेल्वेत 2570 जागांची मेगा भरती! B.Sc आणि डिप्लोमा पासवर, 35,400 रु. पगार, लगेच अर्ज करा

Indian Army DG EME Group C Bharti 2025: भारतीय सैन्यात 10वी/ 12वी/ ITI/ पदवी पास वर भरती! 20,200 रु. पगार, लगेच अर्ज करा

Bhumi Abhilekh Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात भरती! 63,200 रु. पगार, 10वी/ITI/ सिविल डिप्लोमा पास अर्ज करा

Delhi Police HCM Recruitment 2025: दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल (Ministerial) भरती! 81,100 रु. पगार, 12वी पास लगेच अर्ज करा

RRB NTPC Recruitment 2025: रेल्वेमध्ये 8,850 जागांची मेगा भरती! 35,400 रु. पगार, 12वी/ पदवी पास अर्ज करा

UPSC ESE Bharti 2025: UPSC इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2026, महिना 60000 रु. पगार, पदवीधर अर्ज करा

Maharashtra Board Exam Dates 2026: FAQ

What is the date of 10th board exam result 2025 in Maharashtra?

10वी ची प्रॅक्टिकल/व्हायवा परीक्षा हि 02 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 यादरम्यान आहे, तर लेखी परीक्षा हि 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 दरम्यान असणार आहे.

What is the date of the HSC board exam 2025 in Maharashtra?

12वी ची प्रॅक्टिकल/व्हायवा परीक्षा हि 23 जानेवारी ते 09 फेब्रुवारी 2026 ला होणार आहे, तर लेखी परीक्षा हि

HSC SSC Previous Year Exam Papers कुठून डाउनलोड करावे?

मागील 10 वर्षाचे परीक्षा पेपर्स ची डायरेक्ट डाउनलोड लिंक वर आर्टिकल मध्ये दिली आहे.

Previous Year च्या पेपर्स चा सराव का करावा?

जुने पेपर्स सोडवल्याने पेपर पॅटर्न समजतो, वेळेचे नियोजन सुधारते आणि तयारी मजबूत होते, त्यामुळे तुम्ही मागील वर्षाचे पेपर्स सोडवले पाहिजेत.

Leave a comment