Mahajyoti Free Military Bharti Training 2024-25 : 10वी पास मुला / मुलींना महाज्योती कडून 72 हजार रू.आणि मोफत आर्मी भरती ट्रेनिंग ! लवकर अर्ज करा वेळ कमी आहे !

Mahajyoti Free Military Bharti Training 2024-25: महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे, राज्य सरकारच्या महाज्योती कडून 72 हजार रू.आणि मोफत आर्मी भरती ट्रेनिंग 10वी पास प्रत्येक मुला / मुलींना मिळणार आहे.

या आर्टिकल मध्ये मी याच फ्री ट्रेनिंग संबंधी सविस्तर माहिती सांगितलेली आहे, त्यामुळे कृपया आर्टिकल शेवटपर्यंत वाचा एक शब्द पण सोडू नका, कारण माहिती मोठी कामाची आहे.

मिलिटरी भरतीसाठी परीक्षा पूर्व प्रशिक्षणा करिता 2024-2025 या वर्षांमध्ये 10वी पास विद्यार्थ्यांना मिलिटरी भरती परीक्षा पूर्व तयारीसाठी ऑनलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.इच्छुक अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तर या मिलिटरी ट्रेनिंग 2024 साठी कोणते मुलं-मुली अर्ज करू शकता वयाची अट शिक्षण पात्रता अर्ज कसा करायचा अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे

Mahajyoti Free Military Bharti Training 2024-25

योजनेचे नावMahajyoti Free Military Bharti Training 2024-25
अर्जाची शेवटची तारीख10 जुलै 2024
अर्ज कोठून करायचाऑनलाइन अर्ज करायचा आहे. लिंक खाली दिलेली आहे.

Mahajyoti Free Military Bharti Training 2024-25 Training Process

प्रशिक्षण स्वरूप :-

1) मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण तसेच लेखी व शारीरिक परीक्षांचे सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल.
2) प्रशिक्षण कालावधी – 6 महिने
3) प्रशिक्षण अनिवासी आणि ऑफलाईन स्वरूपाचे असेल.

Mahajyoti Free Military Bharti Training 2024-25 Benefits

महाजोतीमार्फत MHT-CET/JEE/NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महा ज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत Mahajyoti Tab व 6GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते.

Mahajyoti Free Military Bharti Training 2024-25 Criteria

  • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा/असावी
  • विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास व प्रवर्ग मधील असावा.
  • विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा
  • विद्यार्थी 2024 मधे 10वी पास पाहिजे किंवा 12 वी वर्गात प्रवेश घेतलेला असावा किंवा 12 वी वर्ग उत्तीर्ण केलेला असावा.
  • विद्यार्थीने यापूर्वी महाज्योतीच्या कोणत्याही योजनांच्या कोणत्याही स्वरूपात लाभ घेतला असेल तर त्याने चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये.
  • विद्यार्थीचे वय कमीत कमी 17 वर्ष आणि जास्तीत जास्त 19 वर्ष चालेल.

आरक्षण

अ. क्रसामाजिक प्रवर्गटक्केवारी 
1इतर मागास वर्गीय (OBC)59%
2निरधीसूचित जमाती – अ (VJ-A)10%
3भटक्या जमाती – ब (NT-B)8%
4भटक्या जमाती – क (NT-C)11%
5भटक्या जमाती – ड (NT-D)6%
6विशेष मागास वर्गीय (SBC)6%
एकुण100%

Mahajyoti Free Military Bharti Training 2024-25 Physical Criteria

शारीरिक पात्रता :-

महिलांची उंची- कमीत कमी 152 से.मी.पाहिजे
पुरुष उंची– कमीत कमी 157 से.मी.
छाती– कमीत कमी 77 से.मी. ( फुगवल्यानंतर 82 से.मी.) केवळ पुरुषांकरिता.

अधिक पात्रता :-

1) अर्जदाराचे शरीर मजबूत आणि चांगले मानसिक आरोग्य असावे.
2) छातीच्या विकास कमीत कमी 4 से.मी. विस्तारित असावा.
3) प्रत्येक कानाने सामान्य ऐकणे आणि दोन्ही डोळ्यांनी 6/6 अंतरांच्या दृष्टिकोन वाजता आला पाहिजे. ( सैन्य भरतीसाठी रंगदृष्टी चाचणी ( CP-3 असावी )
4) नैसर्गिक निरोगी हिरड्या आणि दात पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे. ( म्हणजे किमान 14 दंतबिंदू )
5) हाडांची विकृती, हायड्रोसेल आणि व्हेरीकोकण किंवा मुळव्याध यांसारखे रोग नसावेत.
6) लाल आणि हिरवा रंग ओळखला पाहिजे. ( उपरोक्त सर्व कागदपत्रांची छाननी व अनिवार्य मानकांची तपासणी करूनच अर्जदारांनी नोंद घ्यावी )

Mahajyoti Free Military Bharti Training 2024-25 Document List

आवश्यक कागदपत्रे :-

  • आधार कार्ड (पुढील व मागील बाजू सहित)
  • जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate)
  • रहिवाशी दाखला (Domicile Certificate)
  • वैद्य नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र (Non-Creamy Leyer)
  • 10 वी गुणपत्रिका
  • विद्यार्थी 12वी वर्गात प्रवेश घेतलेला असावा किंवा 12वी वर्ग उत्तीर्ण केलेला असावा
  • पासबुक किंवा रद्द केलेला धनादेश (आधार कार्ड लिंक असावा)
  • अनाथ असल्यास दाखला

Mahajyoti Free Military Bharti Training 2024-25 Selection Process

निवड प्रकिया :-

1) महाज्योति मार्फत लाभार्थ्याची निवड करण्यासाठी महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

2) त्यानंतर मिळालेल्या अर्जाची निकषानुसार छाननी करण्यात येईल.

3) छाननी मध्ये पात्र अर्जदाराची मिलिटरी भरतीपूर्व परीक्षेच्या धर्तीवर व अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल.

4) चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकना नुसार मेरीटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र अर्जदाराची यादी व प्रतिक्षायादी महा ज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

Mahajyoti Free Military Bharti Training 2024-25 Application Form

अर्ज कसा करायचा खाली सगळी माहिती.

1) महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील “Application for Military- 2024-25 Training” यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

2) सर्व कागदपत्रे स्वाक्षाकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे.

Important Links

ऑनलाईन अर्जइथून अर्ज करा
योजना पीडीएफइथे बघा

Mahajyoti Free Military Bharti Training 2024-25 FAQ

1 thought on “Mahajyoti Free Military Bharti Training 2024-25 : 10वी पास मुला / मुलींना महाज्योती कडून 72 हजार रू.आणि मोफत आर्मी भरती ट्रेनिंग ! लवकर अर्ज करा वेळ कमी आहे !”

Leave a comment