महावितरण इंजिनियर भरती, पदवीधरांना नोकरीची संधी! लगेच ऑनलाईन अर्ज करा | Mahadiscom Bharti 2024

Mahadiscom Bharti 2024: नमस्कार मित्रांनो महावितरण द्वारे पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी दिली जाणार आहे. महावितरण द्वारे इंजिनियर पदासाठी बंपर भरती निघाली आहे, वेगवेगळ्या ट्रेड नुसार पदांची भरती होणार आहे. 

यासंबंधी महावितरण द्वारे अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, 407 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 

पदवीधर ट्रेनी आणि डिप्लोमा ट्रेनी अशा दोन विभागांतर्गत महावितरण मध्ये भरती राबवली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 20/06/2024 असणार आहे, या तारखेच्या आगोदर मुदत संपण्यापूर्वी अर्जदार उमेदवारांना फॉर्म भरायचे आहेत. तारीख संपल्यावर कोणाचेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळे याची काळजी घ्यायची आहे.

महावितरण इंजिनियर भरती संबंधी सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये दिली आहे, जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल तर लागलीच ऑनलाईन अर्ज सादर करा. परंतु त्या अगोदर महावितरण द्वारे जारी करण्यात आलेली अधिकृत जाहिरात नक्की वाचा.

Mahadiscom Bharti 2024

📢 भरतीचे नाव – Mahadiscom Bharti 2024

✅ पदाचे नाव – 

पदाचे नावपद संख्या
पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (वितरण)281
पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (सिव्हिल)40
डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी (वितरण)51
डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी सिव्हिल)35
Total407

🚩 एकूण रिक्त जागा – 407

👨‍🎓 शैक्षणिक पात्रता – 

  • पदवीधर इंजिनिअर ट्रेनी – इलेक्ट्रिकल/सिव्हिल (Electrical/Civil) इंजिनिअरिंग पदवी
  • डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी – इलेक्ट्रिकल/सिव्हिल (Electrical/Civil) इंजिनिअरिंग डिप्लोमा

➡️ नोकरीची ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

💰 पगार – 17,000 रुपये महिना (वेतन श्रेणी बदलू शकते)

💵 परीक्षा फी – Open: ₹500/- [मागासवर्ग: ₹250/-]

📝 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

🔞 वयोमर्यादा – 

  • पदवीधर इंजिनिअर ट्रेनी: 18 ते 35 वर्षांपर्यंत
  • डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी: 18 ते 30 वर्षांपर्यंत

पदवीधर आणि डिप्लोमाधारक उमेदवारांसाठी वयाची अट ही भिन्न आहे, त्यामध्ये 5 वर्षांचा फरक आहे.

📍 वयोमर्यादा सूट – मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादा अटी मध्ये 5 वर्षांची सूट आहे.

📆 फॉर्मची Last Date – 16/08/2024

🌐 ऑनलाईन अर्जApply Online

🖥️ जाहिरात PDF –

पदवीधर इंजिनिअर ट्रेनीजाहिरात Download
डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनीजाहिरात Download

Mahadiscom Bharti 2024 Eligibility Criteria (पात्रता निकष)

महावितरण डिप्लोमा पदवीधर ट्रेनि पदासाठी वेगवेगळे पात्रता निकष जारी करण्यात आलेले आहेत, उमेदवारांना ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाचे पात्रता निकष पूर्ण करणे अनिवार्य आहे.

  • उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • उमेदवाराने स्थापत्य, सिव्हील, वितरण मध्ये पदवी किंवा डिप्लोमा केलेला असावा.
  • उमेदवार किमान 18 वर्षांचा असावा.
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची वयोमर्यादा सूट असणार आहे.

Mahadiscom Bharti 2024 Apply Online

महावितरण मध्ये सिविल, स्थापत्य विभागात इंजिनिअर पदासाठी भरती निघाली आहे. यासंबंधी अधिकृत जाहिरात देखील प्रसिध्द करण्यात आली आहे.

उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी महावितरण द्वारे अधिकृत संकेस्थळ सुरू करण्यात आले आहे.

अधिकृत वेबसाईट ची लिंक वर लेखा मध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही अगदी सहजपणे महावितरण इंजिनिअर भरतीसाठी आपला फॉर्म सादर करू शकता.

  1. सुरुवातीला तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे, वेबसाईटवर गेल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला Apply Online या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  2. तुमच्यासमोर महावितरण इंजिनियर भरतीचा फॉर्म ओपन होईल, त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
  3. अर्ज अचूक रित्या सादर करायचा आहे, कोणतीही चूक करायची नाही. चूक आढळल्यास अर्ज बाद होऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्यायची आहे.
  4. अर्जासोबतच आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत, कागदपत्रे हे जाहिरातीमध्ये सांगितलेल्या सूचनेनुसार योग्य साईज मध्ये असावेत.
  5. कागदपत्रे सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी या दोन्ही माध्यमात तयार करून ठेवायची आहेत. अर्जामध्ये अपलोड करण्यासाठी सॉफ्ट कॉपी कागदपत्रे आवश्यक आहेत, तर शेवटी Document Verification साठी Hard Copy कागदपत्रे लागणार आहेत.
  6. कागदपत्रा सोबतच उमेदवारांना भरतीसाठी परीक्षा फी देखील भरायची आहे, परीक्षा फी भरणे अनिवार्य आहे, साधारण जनरल प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये फी भरायची आहे, तर मागासवर्गीय उमेदवारांना 50% सूट देण्यात आली आहे, म्हणजे त्यांना केवळ 250 रुपये फी भरायची आहे.
  7. परीक्षा फी भरून झाल्यावर शेवटी अर्ज तपासून पाहायचा आहे, अर्जामध्ये कोणत्याही चुका आढळल्या तर त्या लागलीच दुरुस्त करायच्या आहेत. एकदा अर्ज सबमिट केला की नंतर तो एडिट करता येत नाही, त्यामुळे काळजी घ्यायची आहे, आणि अर्ज दुरूस्त करायचा आहे.

महावितरण इंजिनिअर भरती फॉर्म साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे, 20 मार्च 2024 हि भरतीची शेवटची तारीख आहे. इच्छुक अशा सर्व उमेदवारांना विनंती आहे, या अंतिम तारखे आगोदर फॉर्म भरून घ्या. मुदत वाढेल या संभ्रमात राहू नका.

महावितरण भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. उमेदवार लेखी परीक्षेत पास होतील, त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. जे उमेदवार मुलाखतीमध्ये उत्तीर्ण होतील त्यांचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन करून, त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार पदावर नियुक्त केले जाईल.

महावितरण इंजिनियर भरती संबंधी सविस्तर माहिती तुम्ही अधिकृत जाहिरातीच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. अर्ज कसा करायचा? कोण पात्र असणार? निवड प्रक्रिया कशी आहे? अशी सर्व माहिती दिलेली आहे. त्यामुळे जाहिरात वाचा, जेणेकरून प्रत्यक्षरीत्या अर्ज करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

तरीही जर तुम्हाला भरती साठी अर्ज करण्यास कोणती अडचण येत असेल, तर या आर्टिकल च्या खाली कमेंट करा. आम्ही तुमच्या प्रश्नांचे नक्कीच उत्तर देऊ, त्याव्यातिरीत तुम्ही आमचा Telegram Group पण जॉईन करू शकता, त्याच्यावर वेळोवेळी भरतीच्या नविन अपडेट येत असतात, त्यामुळे तुमचा फायदा होईल.

नवीन भरती अपडेट:

Mahadiscom Bharti 2024 FAQ

महावितरण इंजिनियर भरतीसाठी एकूण रिक्त जागा किती आहेत?

एकूण रिक्त जागा या 407 आहेत.

महावितरण इंजिनियर भरतीसाठी अर्ज पद्धती काय आहे?

उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून अर्ज सादर करायचा आहे.

महावितरण भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे?

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया लेखामध्ये सांगितली आहे.

महावितरण भरतीसाठी कोणते उमेदवार पात्र असणार आहेत?

जे उमेदवार पदवीधर किंवा डिप्लोमा धारक आहेत, त्यांना भरतीसाठी प्राधान्य असणार आहे.

2 thoughts on “महावितरण इंजिनियर भरती, पदवीधरांना नोकरीची संधी! लगेच ऑनलाईन अर्ज करा | Mahadiscom Bharti 2024”

Leave a comment