MAHA TET 2025: महाराष्ट्र शिक्षक भरती सुरु! जाहिरात प्रसिद्ध, इथून अर्ज करा

MAHA TET 2025: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 साठी अधिकृत पणे अर्ज करण्याची प्रक्रिया हि सुरु झाली आहे. जे उमेदवार शिक्षक बनू इच्छितात त्यांच्या साठी हि गोल्डन सुवर्णसंधी आहे.

यासाठी Maharashtra State Examination Council, Pune द्वारे अधिकृत जाहिरात नोटिफिकेशन देखील जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही हि परीक्षा देऊन शिक्षण बनू शकता.

या MAHA TET 2025 संदर्भात मी सविस्तर माहिती खाली लेखात स्पष्ट केली आहे. पूर्ण महत्वाची माहिती यात आहे, त्यामुळे जर तुम्हाला खरच TET Exam द्यायची असेल तर हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा आणि मगच फॉर्म भरा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

MAHA TET 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

परीक्षा घेणारी संस्थाMaharashtra State Examination Council, Pune
परीक्षेचे नावMAHA TET 2025
शैक्षणिक पात्रता12वी/ पदवी पास
वयोमर्यादानमूद नाही
अर्जाची फी700 ते 1200 रुपये
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

MAHA TET 2025: Exam Fees (परीक्षा फी)

TET Exam साठी परीक्षा फी हि कमी जास्त आहे, यात 700 रुपया पासून ते 1200 रुपया पर्यंत फी भरावी लागणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी फी कमी जास्त आहे, जर तुम्हाला केवळ (पेपर 1) 1ली ते 5वी चा पेपर द्यायचा असेल तर तुम्हाला पेपर 2 पेक्षा 200 रुपये कमी फी भरावी लागणार आहे.

प्रवर्गपेपर -1 किंवा पेपर – 2पेपर – 1 व पेपर -2
खुला प्रवर्ग ₹1000/- ₹1200/-
SC/ST/दिव्यांग प्रवर्ग ₹700/- ₹900/-

MAHA TET 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पेपर I (1ली ते 5वी)अर्जदार 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण असावा + त्याने D.T.ED केलेले असावे.
पेपर II (6वी ते 8वी)अर्जदार व्यक्ती 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण असावा + त्याने B.A./B.Sc.Ed. किंवा B.A.Ed./B.Sc.Ed पर्यंत शिक्षण पूर्ण केलेले असावे.

MAHA TET 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

MAHA TET ही फक्त पात्रता परीक्षा (Eligibility Test) आहे.

  • उमेदवाराला शिक्षक म्हणून नोकरी मिळवण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
  • MAHA TET पास झाल्यानंतर उमेदवाराला शिक्षक भरतीसाठी अर्ज करता येतो.
  • MAHA TET परीक्षेचे गुण ७ वर्षे वैध राहतात.
  • अंतिम निवड मात्र नंतरच्या शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवाराने मिळवलेल्या लेखी परीक्षा/मुलाखत आणि इतर निकषांवर अवलंबून असते.

परीक्षा पद्धत (Exam Pattern)

MAHA TET मध्ये दोन पेपर्स घेतले जातात:

  1. पेपर – I (Class 1 ते 5 शिक्षकांसाठी)
  2. पेपर – II (Class 6 ते 8 शिक्षकांसाठी)

उमेदवार त्यांच्या स्वतःच्या इच्छेनुसार एक किंवा दोन्ही पेपर्स देऊ शकतो.

पेपर – I (Class 1 ते 5) –

  • एकूण प्रश्न: 150
  • एकूण गुण: 150
  • वेळ: 150 मिनिटे
  • सर्व प्रश्न बहुपर्यायी (MCQ) असतात.
  • निगेटिव्ह मार्किंग नाही.
विषयप्रश्नगुणवेळ
बाल विकास व शैक्षणिक मनोविज्ञान3030
भाषा – 13030
भाषा – 23030
गणित3030
पर्यावरण अभ्यास3030
एकूण150150150 मिनिटे

पेपर – II (Class 6 ते 8) –

  • एकूण प्रश्न: 150
  • एकूण गुण: 150
  • वेळ: 150 मिनिटे
  • सर्व प्रश्न MCQ मध्ये असतात.
विषयप्रश्नगुणवेळ
बाल विकास व शैक्षणिक मनोविज्ञान3030
भाषा – 13030
भाषा – 23030
गणित व विज्ञान (Science Teachers साठी)6060
समाजशास्त्र (Social Science Teachers साठी)6060
एकूण150150150 मिनिटे
प्रवर्गपात्रतेसाठी किमान गुण
मागासवर्गीय प्रवर्ग55% (82 गुण)
सर्वसाधारण प्रवर्ग60% (90 गुण)

MAHA TET 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात16 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख03 ऑक्टोबर 2025
प्रवेशपत्र10 ते 23 नोव्हेंबर 2025
परीक्षा (पेपर I)23 नोव्हेंबर 2025 (10:30 AM ते 01:00 PM)
परीक्षा (पेपर II)23 नोव्हेंबर 2025 (02:00 PM ते 04:30 PM)

MAHA TET 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFजाहिरात वाचा
ऑनलाईन अर्जApply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

MAHA TET 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • सर्वप्रथम वरील दिलेल्या Apply Link वर क्लिक करा.
  • तुमच्या समोर MAHA TET ची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
  • वेबसाईटवर दिसणाऱ्या Apply Now बटणावर क्लिक करा.
  • परीक्षेचा फॉर्म ओपन होईल, त्यात विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक व अचूक भरा.
  • जाहिरातीत दिलेल्या सर्व सूचनांचे नीट पालन करा.
  • पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी योग्य साईझ व फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
  • पेपर नुसार परीक्षा फी ऑनलाईन स्वरुपात भरून घ्या.
  • फॉर्म मध्ये भरलेली सर्व माहिती नीट तपासा (Recheck) करा.
  • शेवटी Submit बटणावर क्लिक करून अर्ज सबमिट करा.

MAHA TET 2025 – 26: FAQ

MAHA TET Exam 2025 म्हणजे काय?

Maharashtra Teacher Eligibility Test (MAHA TET) ही शिक्षक पात्रता परीक्षा आहे.

MAHA TET Exam 2025 साठी अर्ज कसा करायचा?

अर्ज ऑनलाईन पद्धतीने mahatet.in या अधिकृत वेबसाईटवर करायचा आहे.

MAHA TET Exam 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

03 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

MAHA TET Exam 2025 कधी होणार आहे?

२३ नोव्हेंबर २०२५ रोजी परीक्षा होणार आहे.

1 thought on “MAHA TET 2025: महाराष्ट्र शिक्षक भरती सुरु! जाहिरात प्रसिद्ध, इथून अर्ज करा”

Leave a comment