LIC Bharti 2025: LIC मध्ये भरती! पगार 1,26,000 रु पर्यंत आणि मुंबई मधे नोकरी, लगेच इथून अर्ज करा

LIC Bharti 2025: भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) मध्ये बंपर भरती जाहीर झाली आहे. नुकतीच याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदवीधर उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.

या भरती अंतर्गत उमेदवारांना तब्बल ₹88,635 + पगार मिळणार असून, स्थिर नोकरीसोबत आकर्षक सुविधा पण यात मिळणार आहेत. पदवी पास असणारे सर्व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. त्यामुळे इच्छुकांनी ही संधी हातातून जाऊ देऊ नये.

संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येणार आहे. LIC ने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली असून उमेदवारांनी फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यावेत.

या लेखामध्ये आम्ही LIC Bharti 2025 संबंधित सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, पगार, तसेच अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली मिळेल. संपूर्ण माहिती वाचून झाल्यावर लगेचच ऑनलाईन अर्ज करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

LIC Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची माहिती

विवरणमाहिती (Details)
भरतीचे नावLIC Recruitment 2025
भरती करणारी संस्थाभारतीय जीवन विमा महामंडळ (LIC)
पदाचे नावअसिस्टंट Generalist/ इंजिनिअर/Specialist
एकूण जागा841
शैक्षणिक पात्रतापदवी (पदानुसार भिन्न)
वयोमर्यादा21 ते 30/32 वर्षे
पगार / मानधन88,635 रु. ते 1,26,000 रु.
अर्ज प्रक्रियाऑनलाईन (Online)
अर्ज फीGeneral/OBC/EWS: ₹700/-
SC/ST/PWD: ₹85/-
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारतात (All India)
अधिकृत वेबसाइटlicindia.in

LIC Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पदाचे नावपद संख्यापगार
असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स (AAO) Generalist35088,635 रु. ते 1,26,000 रु.
असिस्टंट इंजिनिअर8188,635 रु. ते 1,26,000 रु.
असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स (AAO) Specialist41088,635 रु. ते 1,26,000 रु.
Total841

LIC Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नावपात्रता व शैक्षणिक अर्हता
असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स (AAO) Generalistअर्जदार उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
असिस्टंट इंजिनिअरअर्जदार उमेदवाराने B.Tech/B.E. (Civil/(Electrical) मध्ये पदवी मिळवलेली असावी.
असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स (AAO) Specialistअर्जदाराने CA/ICSI किंवा पदवीधर किंवा LLB चे शिक्षण घेतले असावे.

LIC Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

पदाचे नाववयाची अट
असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स (AAO) Generalist21 ते 30 वर्षे
असिस्टंट इंजिनिअर21 ते 30 वर्षे
असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स (AAO) Specialist21 ते 32 वर्षे/ 21 ते 30 वर्षे
प्रवर्गसूट
ओबीसी प्रवर्ग3 वर्षे सूट
SC/ST प्रवर्ग5 वर्षे सूट

LIC Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) Prelims Exam (पूर्व परीक्षा)

क्र.विषयप्रश्नमार्क्सवेळ
1.Reasoning Ability353520 मि.
2.Numerical Ability353520 मि.
3.English303020 मि.
Total1007060 मि.

2) Mains Exam (मुख्य परीक्षा)

क्र.विषयप्रश्नमार्क्सवेळ
1.Reasoning309040 मि.
2.General Knowledge, Current Affairs306020 मि.
3.Professional knowledge 309040 मि.
4.Insurance and Financial Market Awareness306020 मि.
एकूण120300120 मि.
5.English Language (Letter Writing & Essay)/ Legal drafting for AAO(Legal)22530 मि.

3) Interview (मुलाखत)

या टप्प्यात वरील दोन्ही पूर्व आणि मुख्य परीक्षा पास झालेले उमेदवार बोलवले जातात, आणि याठिकाणी उमेदवारांची मुलाखत हि घेतली जाते.

मुलाखती मध्ये अर्जदाराची पात्रता हि तपासली जाते, जर उमेदवार पदासाठी योग्य असेल तरच त्याला मुलाखती मध्ये पास केल जाते.

मुलाखती मध्ये मिळालेले मार्क्स हे शेवटी अंतिम निवड प्रक्रियेत समाविष्ट केले जातात, त्यामुळे मुलाखत देखील निवड प्रक्रियेतील एक महत्वाचा टप्पा आहे, जो अर्जदारांना चांगल्या मार्काने पार करणे गरजेचे आहे.

4) Medical Examination (वैद्यकीय तपासणी)

उमेदवाराने Mains व Interview दोन्ही qualify केल्यानंतर त्याचे नाव Final Merit List मध्ये आले तर पुढील टप्पा म्हणजे Pre-Recruitment Medical Examination असतो.

हा वैद्यकीय तपासणी टप्पा प्रत्येक उमेदवारासाठी अनिवार्य (Mandatory) आहे.

LIC कडून नियुक्त केलेल्या Authorized Doctor / Medical Board कडून यात अर्जदारांची वैद्यकीय तपासणी हि केली जाते.

यामध्ये अर्जदारांची उंची, वजन, दृष्टी, रक्तदाब, हार्ट, लिव्हर, किडनी, रक्त तपासणी करणे, इत्यादी मूलभूत आरोग्य चाचण्या घेतल्या जातात.

जर उमेदवार Medical Standards नुसार Fit आढळला तरच त्याला Appointment Letter दिले जाते.

जर उमेदवार Unfit आढळला, तर निवड प्रक्रियेतून त्याला अपात्र ठरवले जाते, यामुळे त्या अर्जदार उमेदवाराला भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.

LIC Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलतारीख
अर्जाची सुरुवात16 ऑगस्ट 2025
अर्जाची शेवटची तारीख08 सप्टेंबर 2025
पूर्व परीक्षा03 ऑक्टोबर 2025
मुख्य परीक्षा08 नोव्हेंबर 2025

LIC Bharti 2025: Important Links & Official Notification – अर्ज लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDFपद क्र.1 ची जाहिरात वाचा
पद क्र.2 & 3 ची जाहिरात वाचा
Apply Online (ऑनलाईन अर्ज)इथून अर्ज करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

LIC Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

1) अधिकृत वेबसाईटला भेट द्या
सर्वप्रथम उमेदवारांनी खालील लिंकवर क्लिक करून अर्ज प्रक्रिया सुरू करावी:
👉 LIC Bharti 2025 Apply Online

2) नवीन नोंदणी (New Registration) करा

  • “Click here for New Registration” वर क्लिक करा.
  • तुमचे नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी टाका.
  • सिस्टमकडून तुम्हाला Registration Number व Password दिला जाईल.

3) लॉगिन करा

  • मिळालेल्या Registration Number व Password ने लॉगिन करा.
  • अर्जामध्ये सर्व माहिती नीट भरा – वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, इत्यादी.

4) फोटो व सही अपलोड करा

  • पासपोर्ट साईज फोटो (JPEG, 20kb – 50kb)
  • सही (JPEG, 10kb – 20kb)

5) फी भरणे (Application Fee Payment)

  • General/OBC: ₹700/-
  • SC/ST/PWD: ₹85/-
  • फी Online Mode ने (Debit/Credit Card, Net Banking, UPI) भरता येते.

6) Final Submit करा

पूर्ण फॉर्म भरून झाला कि मग तुम्हाला एकदा तुमचा अर्ज तपासून घ्यायचा आहे, काही माहिती चुकली असेल तर ती दुरुस्त करून घ्यायची आहे. माहिती योग्य असेल तर मग शेवटी तुम्हाला डायरेक्ट फॉर्म सबमिट करून टाकायचा आहे.

एकदा का फॉर्म सबमिट केला कि मग तुम्हाला फॉर्म ची प्रिंट काढून घ्यायची आहे, प्रिंट सेव करून ठेवण खूप आवश्यक आहे कारण पुढे भरती प्रक्रियेत हि लागू शकते.

इतर भरती

Agniveervayu Sports Quota Bharti 2025: भारतीय हवाई दल अग्निवीरवायु (Sports) भरती, 12वी पास लगेच अर्ज करा

Union Bank of India Bharti 2025: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधरांना नोकरी! ₹93,960 पगार, लगेच अर्ज करा

Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदलात BE/B.Tech/पदवी वर SSC ऑफिसर पदाची भरती! 1,10,000 रु. पगार, अर्ज करा

Western Railway Sports Quota Bharti 2025: पश्चिम रेल्वेत 10वी, 12वी, ITI पास वर खेळाडूंची भरती! 50000 रु. महिना पगार, लगेच फॉर्म भरा

CCRAS Bharti 2025: केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत 10वी पास वर भरती! 39,100 रु. महिना पगार, लगेच अर्ज करा

OICL Assistant Recruitment 2025: ओरिएंटल इंश्योरेंस कंपनी मध्ये भरती ! पदवीधर लगेच येथून अर्ज करा, पगार 20 हजार पासून सुरू!

IBPS Clerk Recruitment 2025: आयबीपीएस क्लर्क भरती, पदवी पास वर 10277 जागांची बंपर भरती, लगेच येथून फॉर्म भरा

Eastern Railway Bharti 2025: पूर्व रेल्वेत 10वी / ITI पास वर 3115 जागांसाठी मेगा भरती, लगेच अर्ज करा

LIC Bharti 2025 – 26 : FAQ

LIC Bharti 2025 मध्ये पदे भरली जात आहेत?

LIC AAO हे पदे या भरती अंतर्गत भरले जाणार आहेत.

LIC Bharti 2025 साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या 841 आहेत.

LIC Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 08 सप्टेंबर 2025 आहे, या तारखे नंतर फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.

LIC Recruitment 2025 मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी च्या आधारावर होणार आहे.

Leave a comment