कुसुम सोलार पंप योजना, मोठा फायदा! लगेच अर्ज करा | Kusum Solar Pump Yojana Maharashtra

Kusum Solar Pump Yojana: नमस्कार मित्रांनो, आजच्या या आर्टिकल मध्ये आपण कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, सोबतच कुसुम सोलार पंप साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याची माहिती पण आपण पाहणार आहोत. त्यामुळे हे आर्टिकल काळजीपूर्वक वाचा आणि तुमच्या शेतीसाठी सरकारकडून अनुदानावर सोलार पंप मिळवा.

सरकार द्वारे सध्या या Kusum Solar Pump Yojana Maharashtra साठी एक अभियान राबवले जात आहे. त्यानुसार आता अभियान सुरू झाले आहे, आणि काही लोकांना सोलार पंप ची मंजुरी पण मिळाली आहे. 

जर तुम्हाला पण कुसुम सोलर पंप पाहिजे असेल तर या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती वाचा, आणि सांगितल्या नुसार कुसुम सोलर पंप ऑनलाईन फॉर्म भरून घ्या. म्हणजे तुम्हाला पण सरकारच्या या भारी योजनेचा लाभ घेता येईल.

Kusum Solar Pump Yojana Maharashtra

योजनेचे नावKusum Solar Pump Yojana
सुरुवातकेंद्र सरकार
उद्देशशेतकऱ्यांना अनुदानावर सोलार पंप देणे.
लाभार्थीदेशातील सर्व पात्र शेतकरी
लाभ90 ते 95% अनुदानावर सोलर पंप मिळतो.
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळkusum.mahaurja.com/solar

Kusum Solar Pump Yojana साठी कोण पात्र असणार आहे?

कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ हा सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे, या योजनेसाठी कोणतीही मोठी अशी अट सांगण्यात आली नाही.

  • जे अर्जदार शेतकरी आहेत, केवळ त्यांना या कुसुम सोलर पंप चा लाभ मिळणार आहे.
  • यासाठी अर्जदार हा कोणत्याही खुल्या प्रवर्गातील, अनुसूचित जाती जमाती मधील असला तर त्याला फायदा मिळतो.
  • फक्त अर्जदाराच्या नावे जमीन आसावी, जर जमीन नावे नसेल तर या सोलर पंप योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • ज्या भागात किंवा शेतात वीज जोडणी अद्याप पोहोचली नाही, केवळ अशा शेतकऱ्यांना अनुदान भेटणार आहे. त्यामुळे शेताच्या जवळपास लाईट ची सुविधा असू नये.

Kusum Solar Pump Yojana अंतर्गत मिळणारे लाभ

कुसुम सोलर पंप योजनेद्वारे अर्जदार शेतकऱ्याला सौर उर्जेवर चालणारे सोलर पंप मिळते. तसेच अर्जदाराला या सोलर पंपावर तब्बल 90 ते 95 टक्के एवढे अनुदान भेटते.

खुल्या प्रवर्गातील शेतकरी जर असतील तर त्यांना कुसुम सोलर पंप साठी 90 टक्के अनुदान भेटणार आहे, आणि जर शेतकरी हे अनुसूचित जाती जमाती किंवा मागासवर्गातील असतील तर त्यांना तब्बल 95 टक्के एवढ अनुदान भेटणार आहे.

म्हणजेच जे शेतकरी कुसुम सोलर पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करतील, त्यांना त्यांना 95 टक्के एवढी मोठी रक्कम माफ केली जाणार आहे. शेतकरयांना केवळ 5 ते 10 टक्के एवढीच रक्कम भरायची आहे, आणि त्याद्वारे मोफत अगदी रास्त किंमतीत सोलर पंप मिळवायचा आहे.

Kusum Solar Pump Yojana साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्जदार शेतकऱ्यांना केवळ ऑनलाइन स्वरूपात अर्ज सादर करता येईल. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारला जाणार नाही.

जर शेतकऱ्यांना ऑनलाइन स्वरूपात अर्ज भरता येत नसेल, तर शेतकरी ऑनलाईन केंद्रावर जाऊन कुसुम सोलर पंप योजनेसाठी फॉर्म भरू शकतात.

या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे, कुसुम सोलर पंप योजनेद्वारे तीन प्रकारचे सोलर पंप दिले जाणार आहेत. ते म्हणजे 3 HP, 5 HP आणि 7.5 HP असं सोलर पंप मिळणार आहे.

सोलर पंप मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे, त्यासाठी अर्जदार शेतकरी हे महाऊर्जा च्या अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरू शकतात.

त्यासाठी kusum.mahaurja.com/solar या साईट वर यायचे आहे, तेथे तुम्हाला कुसुम सोलर पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे.

समोर एक फॉर्म ओपन होईल, तो फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे, फॉर्म मध्ये सांगितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. 

काही नाममात्र फॉर्म फी आहे, ती भरायची आहे. त्यानंतर तुमचा फॉर्म कुसुम सोलर पंप योजनेसाठी सादर केला जाईल, जर तुमच्या जिल्ह्यात सोलर पंप साठी जागा सुटल्या असतील, तर तुमचा अर्ज पात्र केला जाईल, आणि तुम्हाला सोलर पंप घेण्यासाठी अनुदान दिले जाईल, म्हणजे फक्त तुम्हाला वरचे 5 ते 10 टक्के रक्कम भरून घ्यायची आहे.

Kusum Solar Pump Yojana FAQ

कुसुम सोलर पंप योजना साठी अर्ज कसा करायचा?

कुसुम सोलर पंप योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत महाऊर्जा पोर्टल वरून फॉर्म भरायचा आहे. त्याची सविस्तर माहिती वर दिली आहे.

कुसुम सोलर पंप योजनेसाठी कोण पात्र आहे?

सोलर पंप योजनेसाठी केवळ शेतकरी पात्र असणार आहेत.

कुसुम सोलर पंप योजनेद्वारे किती अनुदान भेटणार?

सोलर पंप खरेदीसाठी 90 ते 95 टक्के एवढ अनुदान भेटणार आहे.

Leave a comment