केंद्र सरकारने गरोदर महिलांसाठी सुरू केलेली एक अभिनव अशी योजना म्हणजे Janani Suraksha Yojana या योजनेच्या माध्यमातून गरीब घरातील गरोदर महिलांना थोडी फार आर्थिक मदत व्हावी यासाठी 1400 रुपयांचा थेट लाभ DBT द्वारे लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात पाठवला जातो.
या सोबतच इतर काही फायदे देखील दिले जातात, त्याची सविस्तर माहिती तुम्ही Benefits Section मध्ये जाणून घेऊ शकता. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? कोणत्या महिला पात्र असणार? निकष काय आहेत? लाभ कसा मिळणार? याची पण माहिती लेखामध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे कृपया ही महत्वाची अशी माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या, त्यानंतर Janani Suraksha Yojana साठी अर्ज सादर करा.
Janani Suraksha Yojana Maharashtra
योजनेचे नाव | Janani Suraksha Yojana |
योजनेची सुरुवात | केंद्र शासन |
उद्देश | गरोदर महिलांना आर्थिक मदत करणे |
लाभार्थी | दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील गरोदर महिला |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
Janani Suraksha Yojana Elegibility Criteria
जननी सुरक्षा योजनेसाठी केंद्र सरकारने काही पात्रता निकष जारी केले आहेत, या पात्रता निकषा नुसारच अर्जदार व्यक्तीची लाभार्थी म्हणून या योजनेअंतर्गत निवड केली जाणार आहे.
- अर्ज करणारी व्यक्ती ही महिला असावी.
- महिलेचे कुटुंब हे दारिद्र रेषेखालील असावे.
- महिला ही गरोदर असावी.
- महिलेचे वय किमान 19 वर्षे असावे.
- केवळ दोन अपत्यासाठी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- ज्या महिलांनी JSY साठी अर्ज केला आहे त्यांनाच लाभ मिळणार आहे.
- ज्या महिलांची Delivery Goverment Hospital किंवा ठराविक Private Medical Centre मध्ये झाली असेल तरच त्या महिला पात्र असणार आहेत.
Janani Suraksha Yojana Benefits
ग्रामीण भागात Hospital मध्ये Delivery झाली असेल तर | 1400 रुपये |
शहरी भागात Hospital मध्ये Delivery झाली असेल तर | 1000 रुपये |
Janani Suraksha Yojana Required Document List
- महिलेचे आधार कार्ड
- रहिवासी पुरावा
- JSY card.
- Delivery certificate
- BPL Ration Card
- बँकेचे पासबुक
- चालू मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
थोडक्यात वर सांगितलेले सर्व कागदपत्रे जननी सुरक्षा योजनेसाठी अर्ज सादर करताना फॉर्म सोबत जोडायचे आहेत. कागदपत्रांची हार्ड कॉपी बनवायची आहे, कारण ऑफलाईन अर्ज करताना सर्व कागदपत्रे अर्जा सोबत जोडावे लागतात.
Janani Suraksha Yojana Application Form
जननी सुरक्षा योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन स्वरूपात फॉर्म भरावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन योजनेचा फॉर्म Download करून घ्यायचा आहे, त्यासाठी तुम्ही वर दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करू शकता.
जर तुम्हाला योजनेचा फॉर्म सापडत नसेल, किंवा वर दिलेला फॉर्म स्वीकारला जात नसेल, तर तुम्ही तुमच्या जवळील अंगणवाडी केंद्रात जाऊन या योजनेच्या फॉर्मची मागणी करू शकता.
योजनेचा फॉर्म डाउनलोड केल्यानंतर त्या फॉर्मची तुम्हाला प्रिंट आउट काढून घ्यायची आहे, त्यानंतर आवश्यक अशी सर्व माहिती त्या फॉर्ममध्ये भरायची आहे.
त्यामध्ये तुम्ही तुमची Personal Information, Age, Address अशी माहिती टाकू शकता, माहिती नमूद केल्यानंतर तुम्हाला वर सांगितलेले सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत जोडायचे आहेत.
कागदपत्रे हे Hard Copy मध्ये असावेत, कारण ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहे. त्यामुळे कागदपत्रे Hard Copy मध्ये असणे आवश्यक आहे.
शेवटी तुम्हाला योजनेचा फॉर्म एकदा तपासून घ्यायचा आहे, फॉर्म Verify करून Cross Check केल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म आशा वर्कर किंवा अंगणवाडी केंद्रातील सेविका किंवा पर्यवेक्षक यांच्या कडे सादर करायचा आहे.
थोडक्यात वरील प्रमाणे तुम्ही जननी सुरक्षा योजनेसाठी तुमचा अर्ज सादर करू शकता, जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला जननी सुरक्षा योजनेचे फायदे दिले जातील, आणि DBT द्वारे रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
नवीन सरकारी योजना:
- Sukanya Samrudhi Yojana: या मुलींना मिळत आहेत 5 लाख रुपये! तुम्हाला मिळतील का? चेक करा Free मध्ये
- उज्वला योजनेतून मिळणार फ्री गॅस कनेक्शन! संधी सोडू नका, लगेच अर्ज करून फायदा घ्या PM Ujjwala Yojana 2.0 Marathi
- लेक लाडकी योजना महाराष्ट्र, मुलींना मिळणार 1 लाख रुपये, अर्ज करा Lek Ladki Yojana Maharashtra
Janani Suraksha Yojana FAQ
Who is eligible for Janani Suraksha Yojana?
जननी सुरक्षा योजनेसाठी देशातील सर्व दारिद्र्य रेषेखालील गरोदर महिला अर्ज सादर करण्यास पात्र असणार आहेत. त्यासाठी याबरोबरच वेगवेगळे निकष देखील लावण्यात आले आहेत, त्याची माहिती तुम्ही वर लेखातून जाणून घेऊ शकता.
How to apply for Janani Suraksha Yojana?
जननी सुरक्षा योजनेसाठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट वरून योजनेचा अर्ज डाऊनलोड करू शकता, अर्ज डाऊनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून तो फॉर्म सर्व कागदपत्रांसह अंगणवाडी केंद्रात जाणून सादर करायचा आहे.
What is the age limit for Janani Suraksha Yojana?
जननी सुरक्षा योजनेसाठी अर्ज करणारी महिला ही किमान 19 वर्षे वयाची असणे आवश्यक आहे, जर महिलेचे वय हे 19 वर्षा पेक्षा कमी असेल तर त्या महिलेला Janani Suraksha Yojana चा लाभ मिळणार नाही.
3 thoughts on “Janani Suraksha Yojana: गरोदर महिलांना मिळणार 1400 रुपये! जननी सुरक्षा योजना, संधी सोडू नका फायदा घ्या”