इंडिया पोस्ट बँकेत भरती सुरू! 30,000 रू. महिना पगार, मोठी संधी, अर्ज करा | IPPB Recruitment 2024

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये भरती (IPPB Recruitment 2024) निघाली आहे, ज्या उमेदवारांनी Graduation केलेले आहे, त्यांच्या साठी पोस्टाच्या बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. एकूण रिक्त जागा या 47 आहेत, पोस्ट पेमेंट बँकेमधील एक्झिक्युटिव्ह (Executive) या एकाच पदासाठी यासर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

ज्या उमेदवारांनी Graduation पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे, केवळ अशाच उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहे. भरती साठी सर्वाधिक प्राधान्य हे ज्या उमेदवारांनी MBA (Sales, Marketing) चे शिक्षण घेतले असेल त्यांना मिळणार आहे.

ऑनलाईन स्वरूपात या भरतीसाठी अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05 एप्रिल, 2024 असणार आहे. 15 मार्च पासून अर्ज सुरू झाले आहेत, त्यामुळे तुम्ही जर इच्छुक असाल तर लवकर फॉर्म भरून घ्या.

इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती 2024

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत पात्र उमेदवारांची एक्झिक्युटिव्ह या पदासाठी भरती होणार आहे. जे उमेदवार या भरती अंतर्गत निवडले जातील, त्यांना मुळात कायमस्वरूपी अशी नोकरी मिळणार नाही.

सुरुवातील ज्या उमेदवारांची निवड केली जाईल, त्यांना किमान 1 वर्षा साठी नोकरी वर ठेवले जाईल. जर उमेदवाराचा Performance चांगला असेल, तर 2 किंवा जास्तीत जास्त 3 वर्षासाठी उमेदवाराला पोस्ट पेमेंट बँकेत एक्झिक्युटिव्ह पदावर ठेवले जाणार आहे.

IPPB Recruitment 2024 Highlights

भरतीचे नावIPPB Recruitment 2024
पदाचे नावएक्झिक्युटिव्ह (Executive)
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी30,000 रुपये प्रति महिना वेतन
वयाची अट21 ते 35 वर्षे
परीक्षा फी750 रुपये (मागासवर्गीय उमेदवारांना 150 रुपये फी भरायची आहे.)

IPPB Recruitment Educational Qualification

Executive पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे किमान Graduation पर्यंत झालेले असावे, म्हणजे उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी.

पोस्ट पेमेंट बँक भरती साठी Graduation बरोबर, जर उमेदवाराने MBA (Sales, Marketing) केले असेल तर अशा उमेदवारांना पोस्ट पेमेंट बँकेत एक्झिक्युटिव्ह पद भरती साठी सर्वाधिक प्राधान्य देण्यात येणार आहे.

IPPB Recruitment Application Form

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख15 मार्च, 2024
अर्ज बंद होण्याची तारीख05 एप्रिल, 2024

Online Application Process

  • उमेदवार पोस्ट पेमेंट बँक भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करू शकणार आहेत, त्यासाठी अधिकृत संकेतस्थळ लिंक खाली Important Links मध्ये दिली आहे.
  • IBPS द्वारे ऑनलाईन फॉर्म सादर करायचा आहे, खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करून तुम्ही सुरुवातीला तुमची नोंदणी करून घ्या.
  • नोंदणी पूर्ण झाल्यावर पोस्ट पेमेंट बँक भरती चा फॉर्म ओपन होईल, तो तुम्हाला काळजीपूर्वक भरून घ्यायचा आहे.
  • नंतर भरतीसाठी लावण्यात आलेली परीक्षा फी भरून घ्यायची आहे, Open प्रवर्गासाठी 750 रुपये फी आहे, तर मागासवर्गीय उमेदवारांना फक्त 150 रुपये फी भरायची आहे.
  • फी भरल्यानंतर तुमचा अर्ज हा पोस्ट पेमेंट बँकेकडे सादर होईल, अशा प्रकारे तुम्ही पोस्ट पेमेंट बँक भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करू शकणार आहात.

IPPB Recruitment Important Links

अधिकृत संकेतस्थळippbonline.com
जाहिरातडाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जयेथून करा

IPPB Recruitment Selection Process

पोस्ट पेमेंट बँक भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही मेरिट द्वारे होणार आहे. म्हणजे उमेदवाराला Graduation करताना पडलेले गुण किती आहेत, हे पहिले जाणार आहे. सोबत कोणाचे MBA असेल, तर ते गुण पाहिले जाणार आहेत, नंतर सर्वांची एकत्रित मेरिट लिस्ट बनवली जाणार आहे.

मेरिट लिस्टमध्ये ज्या उमेदवारांचे नाव येईल, त्यांना पोस्ट पेमेंट बँकेत एक्झिक्युटिव्ह या पदासाठी रिक्त जागांसाठी निवडले जाणार आहे. मुलाखत, Group Discussion मध्ये मिळालेले मार्क देखील, मेरिट लिस्ट साठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

नवीन भरती जॉब अपडेट:

IPPB Recruitment FAQ

पोस्ट पेमेंट बँक भरती साठी किती जागा रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या 47 आहेत, ज्या पोस्ट पेमेंट बँकेत एक्झिक्युटिव्ह या पदासाठी भरल्या जाणार आहेत.

IPPB Recruitment साठी अर्ज कसा करायचा?

पोस्ट पेमेंट बँक भरती साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, त्याची सविस्तर माहिती वर लेखामध्ये आपण दिली आहे.

Post Payment Bank Bharti साठी ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख कोणती?

ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 05 एप्रिल, 2024 आहे, देय तारखे नंतर कोणाचेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

6 thoughts on “इंडिया पोस्ट बँकेत भरती सुरू! 30,000 रू. महिना पगार, मोठी संधी, अर्ज करा | IPPB Recruitment 2024”

  1. I want to do job in bank. So. Plz help. To. Get job in bank as soon. As possible I am graduate in bsc science but i have many skill about bank ,i had done all coursee related to bank help me to get. Job🙏🏻

    Reply

Leave a comment