Indian Army NCC 123rd Course April 2026: इंडियन आर्मीमध्ये अधिकारी होण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. इंडियन आर्मीने NCC Special Entry Scheme 123rd Course (April 2026) अंतर्गत भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पदवी पास केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. निवड झाल्यानंतर उमेदवारांना आर्मीमध्ये अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.
या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणाच्या काळात मानधन म्हणून 56,100 रुपये पगार मिळणार आहे. याशिवाय इतर भत्ते, सुविधा आणि नंतर पेन्शनही मिळेल. त्यामुळे ही नोकरी तुमच्या साठी नक्कीच एक चांगली संधी आहे.
या भरतीसाठी केवळ NCC प्रमाणपत्र असलेले पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. पुरुष आणि महिला दोघांसाठीही ही भरती खुली आहे. सोबतच यात उमेदवार शारीरिक मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. याची अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे त्यामुळे जी काही लास्ट डेट दिली आहे त्या ठराविक मर्यादित कालावधी मध्ये फॉर्म भरणे अनिवार्य आहे.
जर तुम्हाला या भरती साठी अर्ज करण्याची इच्छा असेल तर हे आर्टिकल काळजीपूर्वक वाचा आणि लगेच ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरून टाका.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Indian Army NCC 123rd Course April 2026 – भरतीची संपूर्ण माहिती
विवरण | माहिती (Details) |
---|---|
भरतीचे नाव | Indian Army NCC Special Entry Scheme 123rd Course (April 2026) |
भरती करणारी संस्था | भारतीय सेना (Indian Army) |
पदाचे नाव | शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) अधिकारी |
एकूण जागा | 76 |
शैक्षणिक पात्रता | पदवी पास व NCC ‘C’ सर्टिफिकेट धारक (किमान 50% गुण) |
वयोमर्यादा | 19 ते 25 वर्षे |
पगार / मानधन | ₹56,100/- पासून सुरुवात |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन (Online) |
अर्ज फी | फी नाही |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत वेबसाइट | https://joinindianarmy.nic.in |
Indian Army NCC 123rd Course April 2026: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
पदाचे नाव (Trade) | रिक्त जागा |
---|---|
NCC पुरुष | 63 |
NCC महिला | 05 |
युद्धात हुतात्मा झालेल्यांची मुले | 07 |
युद्धात हुतात्मा झालेल्यांच्या मुली | 01 |
Total | 76 |
Indian Army NCC 123rd Course April 2026: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
श्रेणी | पात्रता व शैक्षणिक अर्हता |
---|---|
NCC ‘C’ प्रमाणपत्र धारक | कोणत्याही शाखेतील पदवी किमान 50% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण केलेली आणि किमान 2 वर्षे NCC प्रमाणपत्र असणे आवश्यक. अंतिम वर्षातील विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. |
युद्धात हुतात्मा झालेल्यांची मुले (Ward of Battle Casualties) | कोणत्याही शाखेतील पदवी किमान 50% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण केलेली असावी. |
Indian Army NCC 123rd Course April 2026: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती
विवरण | माहिती |
---|---|
वयोमर्यादा | 19 ते 25 वर्षे |
किमान वय | 19 वर्षे |
जास्तीत जास्त वय | 25 वर्षे |
जन्मतारीख अट | 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2007 दरम्यान जन्म झालेला असावा |
वयोमर्यादा सवलत | Indian Army NCC 123rd Course April 2026 भरतीच्या नियमांनुसार लागू |
Indian Army NCC 123rd Course April 2026: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
1) अर्ज सादर करणे
उमेदवारांनी दिलेल्या तारखेत ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
2) अर्जांची शॉर्टलिस्टिंग
अर्जांची तपासणी करून NCC ‘C’ प्रमाणपत्रातील ग्रेड आणि पदवी परीक्षेतील टक्केवारीनुसार बोनस गुण दिले जातात.
NCC ‘C’ प्रमाणपत्र बोनस गुण:
NCC ‘C’ ग्रेड | बोनस गुण |
---|---|
A ग्रेड | 50 गुण |
B ग्रेड | 25 गुण |
पदवी टक्केवारी बोनस गुण:
पदवी टक्केवारी | बोनस गुण |
---|---|
60% पेक्षा कमी | 0 गुण |
60.00% ते 64.99% | 5 गुण |
65.00% ते 69.99% | 10 गुण |
70.00% ते 74.99% | 20 गुण |
75.00% ते 79.99% | 30 गुण |
80.00% ते 84.99% | 40 गुण |
85.00% ते 100% | 50 गुण |
3) SSB मुलाखत
शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना SSB मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखत प्रयागराज, भोपाळ, बेंगळुरू आणि जालंधर येथे घेतली जाईल.
- मुलाखत दोन टप्प्यात होते:
- Stage 1: स्क्रीनिंग टेस्ट
- Stage 2: सखोल मुलाखत व मानसशास्त्रीय चाचण्या
- Stage 1 मध्ये नापास झालेल्यांना त्याच दिवशी परत पाठवले जाते.
- सोबतच SSB मुलाखत हि 5 दिवसांची असणार आहे.
4) वैद्यकीय तपासणी
SSB मध्ये निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाते. यामध्ये उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्ट्या फिट आहे का हे पाहिले जाते.
5) मेरिट लिस्ट
SSB गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाते. जर गुण समान असतील तर वयानुसार किंवा पदवी टक्केवारीनुसार क्रम ठरवला जातो.
6) जॉइनिंग लेटर
मेरिट लिस्टमध्ये असलेले व वैद्यकीयदृष्ट्या फिट असणारया सर्व पात्र उमेदवारांना OTA चेन्नई येथे प्रशिक्षणासाठी बोलावले जाते, आणि इथेच उमेदवाराचे प्रशिक्षण पार पडते, प्रशिक्षण दरम्यान उमेदवारांना 56100 रुपयाचा स्टायपेंड दिला जातो. त्यानंतर एकदा का 49 आठवड्याचे प्रशिक्षण संपले कि मग उमेदवारांना इंडियन आर्मी मध्ये ऑफिसर पदासाठी निवडले जाते.
Indian Army NCC 123rd Course April 2026: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
तपशील | तारीख |
---|---|
अर्जाची सुरुवात | 12 ऑगस्ट 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | ११ सप्टेंबर 2025 |
Indian Army NCC 123rd Course April 2026: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
घटक | लिंक / माहिती |
---|---|
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
भरतीची जाहिरात PDF | पुरुषांसाठी जाहिरात महिलांसाठी जाहिरात |
Apply Online (ऑनलाईन अर्ज) | इथून अर्ज करा |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Indian Army NCC 123rd Course April 2026 Online Form: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
1) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या वेबसाईट ला भेट द्या.
अधिकृत वेबसाइट www.joinindianarmy.nic.in वर जावे.
2) नोंदणी (Registration)
- Officer Entry Application/Login या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर Registration वर क्लिक करा.
- आधी नोंदणी केलेली असल्यास पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही.
3) अर्ज भरणे (Apply Online)
- नोंदणी पूर्ण झाल्यावर Dashboard मध्ये Apply Online वर क्लिक करा.
- Officers Selection – Eligibility पेज उघडेल.
- Short Service Commission NCC Special Entry Course च्या समोर Apply बटणावर क्लिक करा.
4) आवश्यक माहिती अर्जामध्ये टाकणे
- Application Form पेज उघडेल.
- सूचना नीट वाचून Continue वर क्लिक करा.
- त्यानंतर टप्प्याटप्प्याने खालील माहिती भरा:
- वैयक्तिक माहिती (Personal Information)
- संपर्क माहिती (Communication Details)
- शैक्षणिक माहिती (Education Details)
- मागील SSB तपशील (Details of Previous SSB)
- प्रत्येक टप्प्यानंतर Save & Continue करा.
5) Preview Check करा
- शेवटी अर्ज भरून झाला कि मग तुम्हाला फॉर्म चा Preview Check करायचा आहे.
- भरलेली सर्व माहिती बरोबर आहे हे तपासून झाले कि मग काही चुकले असेल तर ते दुरुस्त करून घ्यायचे आहे.
6) अर्ज सबमिट करणे (Submit)
- सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यावर Submit वर क्लिक करा.
- थोडक्यात अशा प्रकारे तुमचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
7) अर्जाची प्रिंट काढणे
- फॉर्म सबमिट केला कि तुमच्या समोर अर्जाची प्रिंट काढण्याचा पर्याय येईल त्यावर क्लिक करून तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे.
- पुढे भरती प्रक्रियेत तुम्हाला हि प्रिंट लागणार आहे.
इतर भरती
Agniveervayu Sports Quota Bharti 2025: भारतीय हवाई दल अग्निवीरवायु (Sports) भरती, 12वी पास लगेच अर्ज करा
Union Bank of India Bharti 2025: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधरांना नोकरी! ₹93,960 पगार, लगेच अर्ज करा
Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदलात BE/B.Tech/पदवी वर SSC ऑफिसर पदाची भरती! 1,10,000 रु. पगार, अर्ज करा
Western Railway Sports Quota Bharti 2025: पश्चिम रेल्वेत 10वी, 12वी, ITI पास वर खेळाडूंची भरती! 50000 रु. महिना पगार, लगेच फॉर्म भरा
CCRAS Bharti 2025: केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत 10वी पास वर भरती! 39,100 रु. महिना पगार, लगेच अर्ज करा
OICL Assistant Recruitment 2025: ओरिएंटल इंश्योरेंस कंपनी मध्ये भरती ! पदवीधर लगेच येथून अर्ज करा, पगार 20 हजार पासून सुरू!
IBPS Clerk Recruitment 2025: आयबीपीएस क्लर्क भरती, पदवी पास वर 10277 जागांची बंपर भरती, लगेच येथून फॉर्म भरा
Eastern Railway Bharti 2025: पूर्व रेल्वेत 10वी / ITI पास वर 3115 जागांसाठी मेगा भरती, लगेच अर्ज करा
Indian Army NCC 123rd Course April 2026 – 26 : FAQ
Indian Army NCC 123rd Course April 2026 मध्ये पदे भरली जात आहेत?
ट्रेड नुसार पद भरली जाणार आहेत, यात NCC ‘C’ प्रमाणपत्र धारक पुरुष महिला आणि युद्धात हुतात्मा झालेल्यांची मुले मुली अशी पदे या भरती अंतर्गत भरली जाणार आहेत.
Indian Army NCC 123rd Course साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
एकूण रिक्त जागा या 76 आहेत.
Indian Army NCC 123rd Course साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 11 सप्टेंबर 2025 आहे, या तारखे नंतर फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.
Indian Army NCC 123rd Course April 2026 मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि 4 टप्प्यात होणार आहे यात शॉर्टलिस्टिंग, मुलाखत, वैद्यकीय तपासणी आणि मेरीट लिस्ट असे टप्पे आहेत, यावरच उमेदवारांची अंतिम निवड होणार आहे.