Indian Army BSc Nursing 2025:भारतीय सैन्य दलामध्ये नर्सिंग ऑफिसर म्हणून करिअर करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. Indian Army BSc Nursing 2025 अंतर्गत ४ वर्षांचा नर्सिंग कोर्ससाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या कोर्सच्या माध्यमातून उमेदवारांना मोफत शिक्षण मिळेल आणि कोर्स पूर्ण केल्यानंतर थेट भारतीय सैन्यात नर्सिंग ऑफिसर पदावर नेमणूक केली जाईल.
जर तुम्ही १२वी उत्तीर्ण असाल आणि NEET UG 2025 दिले असेल, तर तुम्ही या संधीसाठी पात्र आहात. यामध्ये निवड झाल्यास संपूर्ण खर्च भारतीय सैन्य उचलते आणि नोकरीची हमी दिली जाते.
ही भरती प्रक्रिया NEET UG स्कोअर, ToGIGE परीक्षा, मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी अशा टप्प्यात होणार आहे. खाली संपूर्ण माहिती सविस्तर दिली आहे.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Indian Army BSc Nursing 2025 Vacancy जागा
एकूण जागा
एकूण जागा : 220
कॉलेज नुसार जागा
क्रमांक | कॉलेजचे नाव | युनिव्हर्सिटी | जागा |
---|---|---|---|
1 | CON, AFMC पुणे | Maharashtra Health Sciences | 40 |
2 | CON, CH(EC) कोलकाता | West Bengal Health Sciences | 30 |
3 | CON, INHS अश्विनी, मुंबई | Maharashtra Health Sciences | 40 |
4 | CON, AH (R&R) नवी दिल्ली | Delhi University | 30 |
5 | CON, CH (CC) लखनऊ | Atal Bihari Vajpayee Medical University | 40 |
6 | CON, CH (AF) बंगलोर | Rajiv Gandhi University of Health Sciences | 40 |
Indian Army BSc Nursing 2025 Education शैक्षणिक पात्रता
शिक्षण पात्रता :-
- फक्त अविवाहित, घटस्फोटित, विधवा किंवा कायदेशीररित्या विभक्त झालेल्या महिला उमेदवार अर्ज करू शकतात.
- उमेदवार भारतीय नागरिक असावा.
- उमेदवाराचा जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 30 सप्टेंबर 2008 दरम्यान असावा.
- उमेदवाराने प्रथम प्रयत्नात १२वी (Physics, Chemistry, Biology, English) उत्तीर्ण केलेली असावी आणि प्रत्येक विषयात किमान ५०% गुण असावेत.
- उमेदवाराने NEET UG 2025 परीक्षा दिलेली असावी.
- वैद्यकीयदृष्ट्या ठरवलेले मानक पूर्ण करणे आवश्यक. (कमी उंची मानक – 152 सेमी, पूर्वोत्तर राज्यांसाठी 147 सेमी)
Indian Army BSc Nursing 2025 Selection Process निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया:-
- NEET UG 2025 च्या स्कोअरवर आधारित शॉर्टलिस्टिंग
- डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
- संगणक आधारित General Intelligence & English चाचणी (ToGIGE)
- 40 प्रश्न, प्रत्येकी 2 गुण, नकारात्मक गुणांकन 0.5
- वेळ : 30 मिनिटे
- मनोवैज्ञानिक मूल्यांकन आणि मुलाखत
- वैद्यकीय तपासणी
Indian Army BSc Nursing 2025 Physical Eligibility शारीरिक पात्रता
वजन-उंची चार्ट (महिला उमेदवारांसाठी)
उंचीनुसार आवश्यक किमान वजन आणि वयोमानुसार वजन मापदंड अधिकृत नोटिफिकेशनमध्ये दिले आहेत. उमेदवारांनी हे मापदंड पूर्ण करणं आवश्यक आहे.
Indian Army BSc Nursing 2025 महत्वाच्या सूचना
महत्वाच्या सूचना:-
✔ वैयक्तिक ईमेल व मोबाईल नंबर वापरूनच नोंदणी करा.
✔ फॉर्ममध्ये दिलेली माहिती अचूक भरा.
✔ चुकीची माहिती आढळल्यास पात्रता रद्द केली जाईल.
✔ डॉक्युमेंट्सची ओरिजिनल्स स्क्रीनिंगवेळी सादर करावी लागतील.
Indian Army BSc Nursing 2025 How to apply ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
- अधिकृत वेबसाइट : https://www.joinindianarmy.nic.in
- NEET UG 2025 निकाल जाहीर झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होईल.
- उमेदवारांनी नाव, मोबाईल नंबर, ईमेल आणि इतर माहिती भरून ऑनलाइन फॉर्म भरावा.
- आवश्यकतेनुसार डॉक्युमेंट्स स्कॅन करून अपलोड करावेत.
- SC/ST उमेदवार वगळता सर्वांना ₹200 अर्ज शुल्क भरावे लागेल.
- अर्ज सबमिट केल्यानंतर Reference Number मिळेल, तो जतन करावा.
- सर्व माहिती भरताना काळजी घ्या, चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
Indian Army BSc Nursing 2025 Important Dates महत्वाच्या तारखा
घटना | तारीख |
---|---|
ऑनलाईन अर्ज सुरू | 25 जून 2025 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 जून 2025 |
स्क्रिनिंग प्रक्रिया | Base Hospital, Delhi Cantt येथे, दिनांक पुढे जाहीर |
Indian Army BSc Nursing 2025 Important Links महत्वाच्या लिंक्स
घटक | लिंक/माहिती |
अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
जाहिरात (PDF) | Click Here |
ऑनलाइन अर्ज | इथे क्लिक करा |
व्हॉट्सअॅप ग्रुप (रोजच्या अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |