Indian Air Force Agniveervayu Bharti 2025: 12वी पासवर इंडियन एअरफोर्सची अग्निवीरवायू भरती सुरू! पगार 30 हजार पर्यंत, संधी सोडू नका!

Indian Air Force Agniveervayu Bharti 2025: भारतीय हवाई दलात देशसेवा करण्याचं आणि प्रतिष्ठित नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी जाहीर झाली आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 जाहीर झाली असून, देशातील लाखो युवकांसाठी ही भरती सुवर्णसंधी ठरू शकते.

जर तुम्ही १२वी उत्तीर्ण असाल, मग ते Science विभागातून किंवा कोणत्याही शाखेत, किंवा तुम्ही Diploma किंवा Vocational कोर्स केलं असेल, तर तुम्हाला हवाई दलात भरती होण्याची संधी आहे. अग्निवीरवायू भरतीसाठी Science आणि Non-Science या दोन्ही विभागातील पात्र तरुण अर्ज करू शकतात, फक्त थोडक्यात आवश्यक अटी पूर्ण असाव्यात.

या भरतीत निवड झाल्यानंतर उमेदवारांना 4 वर्षांसाठी देशसेवेची संधी मिळते. या कालावधीत उत्तम पगार, प्रशिक्षण, सरकारी सुविधा आणि नोकरीतील सन्मान मिळतो. तसेच, निवडलेल्या काही अग्निवीरांना भविष्यात भारतीय हवाई दलात कायम सेवेची संधी देखील दिली जाते. खाली संपूर्ण माहिती व पात्रतेचे तपशील दिले आहेत.

Indian Air Force Agniveervayu Bharti 2025

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 भरतीची माहिती

घटकमाहिती
विभागाचे नावभारतीय हवाई दल (Indian Air Force)
भरतीचे नावIndian Air Force Agniveervayu Bharti 2025
पदसंख्याअधिकृत जाहिरातीनुसार लवकरच उपलब्ध
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
फीसर्व उमेदवारांसाठी ₹550 + GST
शिक्षण पात्रता12वी उत्तीर्ण (Science किंवा Non-Science विभागानुसार)
किंवा 3 वर्षांचा Diploma / 2 वर्षांचा Vocational कोर्स आवश्यक
निवड प्रक्रियाऑनलाईन परीक्षा (Phase I & II), Physical Test, मुलाखत, वैद्यकीय तपासणी
पगार व भत्तेपहिल्या वर्षी ₹30,000, चौथ्या वर्षी ₹40,000, सेवा निधी ₹10.04 लाख, इतर सुविधा

Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 Education शिक्षण पात्रता

शैक्षणिक पात्रता:-

Science विभागासाठी:

  • 12वी उत्तीर्ण (Maths, Physics, English) विषयांसह
  • प्रत्येक विषयात किमान 50% गुण आणि इंग्रजीत किमान 50% गुण आवश्यक

किंवा

  • 3 वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा (मिनिमम 50% गुणांसह) आणि इंग्रजीत किमान 50% गुण आवश्यक

किंवा

  • 2 वर्षांचा Vocational Course (Non-Vocational विषयात Physics आणि Maths असणं आवश्यक, 50% गुणांसह)

Non-Science विभागासाठी:

  • 12वी उत्तीर्ण कोणत्याही शाखेत (किमान 50% गुण आणि इंग्रजी विषयात 50% गुण आवश्यक)

Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 Age Limit वयाची अट

वयोमर्यादा :-

  • उमेदवाराचा जन्म 3 जुलै 2004 ते 3 जानेवारी 2008 दरम्यान झालेला असावा.
  • म्हणजेच किमान वय 17.5 वर्षे आणि कमाल वय 21 वर्षे

Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 Selection Process निवड प्रक्रिया

भारतीय हवाई दल अग्निवीरवायू भरती 2025 साठी निवड प्रक्रिया खालील टप्प्यांमध्ये होणार आहे:


1) Phase-I: ऑनलाईन परीक्षा (Online Exam)

  • ही परीक्षा संपूर्ण भारतात विविध केंद्रांवर घेतली जाते.
  • Science विभाग, Non-Science विभाग आणि दोन्ही विभागांसाठी स्वतंत्र पेपर असतो.

Science विभागासाठी परीक्षा:

  • English, Physics आणि Mathematics विषयांवर आधारित
  • कालावधी: 60 मिनिटे

Non-Science विभागासाठी परीक्षा:

  • English आणि Reasoning & General Awareness (RAGA)
  • कालावधी: 45 मिनिटे

Science + Non-Science विभागासाठी परीक्षा:

  • English, Physics, Mathematics, Reasoning & General Awareness
  • कालावधी: 85 मिनिटे

टीप: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील (Negative Marking लागू आहे).


2) Phase-II: शारीरिक चाचणी (Physical Fitness Test – PFT)

  • 1.6 किलोमीटर धावणे – 6 मिनिटे 30 सेकंदात पूर्ण करणे आवश्यक
  • 10 पुश-अप्स
  • 10 सिट-अप्स
  • 20 स्क्वॅट्स

3) Adaptability Test-I (सामर्थ्य चाचणी – १)

  • हा चाचणी प्रकार Communication Skills आणि Logical Reasoning तपासण्यासाठी घेतला जातो.
  • यामध्ये Pass झालेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी बोलावलं जातं.

4) Adaptability Test-II (सामर्थ्य चाचणी – २)

  • भारतीय हवाई दलाच्या वातावरणात काम करण्यासाठी उमेदवार मानसिकदृष्ट्या किती सक्षम आहे हे तपासण्यासाठी ही चाचणी घेतली जाते.

5) डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन

  • मूळ शैक्षणिक कागदपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाते.

6) वैद्यकीय तपासणी (Medical Test)

  • भारतीय हवाई दलाच्या मानकानुसार संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाते.
  • उंची, वजन, दृष्टी, इत्यादी तपासणी केली जाते.
  • उमेदवार पूर्णपणे वैद्यकीयदृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे.

अंतिम गुणवत्ता यादी (Merit List):

  • सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर अंतिम मेरिट लिस्ट तयार केली जाते.
  • मेरिट लिस्टमध्ये नाव आल्यानंतरच उमेदवाराला भारतीय हवाई दलात सामील होता येईल.

Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 Important Dates महत्वाच्या तारखा

महत्वाच्या तारखा :-

घटनातारीख
ऑनलाईन अर्ज सुरुवात11 जुलै 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख31 जुलै 2025
परीक्षा25 सप्टेंबर 2025 पासून 

Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 Important Links महत्वाच्या लिंक्स

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDF इथे क्लिक करा
Apply Online (ऑनलाईन अर्ज)इथे अर्ज करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 How to apply ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

भारतीय हवाई दल अग्निवीरवायू भरतीसाठी अर्ज प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील प्रमाणे अर्ज करावा:

  1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या — https://agnipathvayu.cdac.in
  2. होमपेजवर “Agniveervayu Intake 2025” लिंकवर क्लिक करा.
  3. नवीन उमेदवारांनी “New Registration” या पर्यायावर क्लिक करा.
  4. तुमचं नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि इतर आवश्यक माहिती भरा.
  5. नोंदणी पूर्ण केल्यानंतर लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल.
  6. लॉगिन करून अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, पत्ता इत्यादी अचूक भरा.
  7. पासपोर्ट साईज फोटो, सही आणि इतर आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करा.
  8. अर्ज शुल्क भरावा — सर्व उमेदवारांसाठी ₹550 + GST लागू आहे.
  9. सर्व माहिती पुन्हा नीट तपासा आणि अर्ज Final Submit करा.
  10. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट किंवा PDF कॉपी सुरक्षित ठेवा.

महत्वाच्या सूचना:

✔ अर्ज करताना वैयक्तिक मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरणं आवश्यक आहे.
✔ चुकीची माहिती दिल्यास किंवा आवश्यक कागदपत्रे न दिल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
✔ शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

Indian Army BSc Nursing 2025:भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग कोर्स 2025,मोफत शिक्षण आणि सैन्यात नोकरीसुद्धा!

SSC CHSL Bharti 2025: 12वी पास विद्यार्थ्यांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC CHSL कडून 3131 जागांसाठी मेगाभरती, संधी सोडू नका!

SSC CGL 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन CGL मेगाभरती, तब्बल 14,582 जागा! पगार 1 लाख पेक्ष्या जास्त! लगेच अर्ज करा!

Indian Coast Guard Bharti 2025: 10वी आणि 12वी पासवर भारतीय तटरक्षक दलात पर्मनेंट भरती! पगार 46 हजार पर्यंत! संधी गमावू नका!

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: 12वी पासवर इंडियन नेवीची ऑफिसर भरती,ट्रेनिंग सोबत डिग्री करायची संधी, पगार 80 हजार पर्यंत!

Leave a comment