HVF Avadi Bharti 2024: अवजड वाहन कारखान्यात मेगा भरती, 10 वी आणि ITI वर नोकरी पक्की!

HVF Avadi Bharti 2024: अवजड वाहन कारखान्यात अप्रेंटीस या पदासाठी ट्रेड नुसार भरती निघाली आहे. यामध्ये तब्बल 253 एवढ्या रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत. नोकरीची मोठी संधी आहे, त्यामुळे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर अर्ज करून टाका.

या भरतीसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे, मुझ्या बाब म्हणजे आता काही बोटावर मोजण्या इतकेच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे घाई करा गरबड करा, पण त्याआधी थोडा वेळ काढून अगदी शांतपणे एकदा भरतीची माहिती वाचून घ्या. आर्टिकल मध्ये आपण पुरेपूर माहिती दिली आहे, पण तुम्हाला जर अजून अधिकची माहिती जरी हवी असेल तर आगोदर सांगितल्याप्रमाणे या HVF Avadi Bharti 2024 ची जाहिरात नक्की वाचा.

ही ऑफलाईन स्वरूपात होणार आहे, तुम्हाला भरतीचा अर्ज पोस्टाने अधिकृत पत्त्यावर पाठवायचा आहे. त्यासाठी अर्ज कसा मिळवायचा याची माहिती आपण खाली आर्टिकल मध्ये दिली आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका.

10 वी आणि ITI च्या पोरांना तर या भरती साठी मोठे प्राधान्य असणार आहे, तुम्ही जर 10 वी पास असाल आणि फिटर, मशिनिस्ट, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, पेंटर यापैकी कोणता ITI Trade घेतला असेल आणि त्यात पास झाला असाल तर एक सेकंद वाया घालू नका नोकरी तुमची वाट बघत आहे, थोडंसं कष्ट घ्या हे आर्टिकल सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचून काढा आणि भरती साठी अर्ज करून टाका.

HVF Avadi Bharti 2024

पदाचे नावट्रेड अप्रेंटिस 
रिक्त जागा253
नोकरीचे ठिकाणतमिळनाडू
वेतन श्रेणी6600 ते ८05० रु. महिना
वयाची अट15 ते 24 वर्षे
भरती फीGeneral/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD: फी नाही]

HVF Avadi Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावट्रेडपद संख्या
ट्रेड अप्रेंटिसफिटर/मशीनिस्ट/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/पेंटर253
Total253

HVF Avadi Bharti 2024 Education Qualification

  • Non ITI: उमेदवार हे किमान 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण असावेत.
  • ITI: उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण सोबत 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI पास असावेत.

HVF Avadi Bharti 2024 Selection Process

HVF Avadi Bharti साठी उमेदवारांची निवड ही मेरिट लिस्ट द्वारे होणार आहे. या भरती साठी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा घेतली जाणार नाही.

Merit List

ज्या उमेदवारांनी या भरती साठी अर्ज केला आहे, त्यांची शैक्षणिक पात्रते नुसार निवड केली जाणार आहे.

Non ITI candidate – ज्यांनी ITI केला नाहीये त्यांना 10 वी च्या मार्क वर निवडले जाणार आहे.

ITI Candidate – ज्या उमेदवारांनी संबंधित ट्रेड मध्ये ITI केला आहे त्यांना त्यांच्या ITI Trade मध्ये मिळालेल्या मार्क नुसार प्राधान्य दिले जाणार आहे.

गुणवत्ता ज्यांची जास्त असेल अशा उमेदवारांना HVF Avadi अंतर्गत अप्रेंटीस पदासाठी निवडले जाणार आहे.

Document Verification

निवडलेल्या उमेदवारांचे कागदपत्रे HVF Avadi द्वारे तपासले जाणार आहेत. यशस्वी रित्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यावरच पुढे उमेदवाराला मेडिकल टेस्ट साठी बोलावले जाणार आहे.

Medical Examination

मेडिकल टेस्ट मध्ये Apprentice Act नुसार उमेदवारांची तपासणी केली जाणार आहे. मेडिकल चाचणी ही भरती प्रक्रियेतील शेवटचा टप्पा आहे.

निवडलेल्या उमेदवारांना मेडिकल तपासणी साठी Date आणि Time Table दिला जाईल. ITI केलेल्या आणि ITI न केलेल्या उमेदवारांची चाचणी ही वेगवेगळी घेतली जाणार आहे.

HVF Avadi Bharti 2024 Application Form

अवजड वाहन कारखाना भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना ऑफलाईन स्वरूपात पोस्टद्वारे फॉर्म सादर करायचा आहे. इतर कोणत्याही माध्यमातून फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत त्यामुळे ऑफलाईन अर्ज सादर करणे हा एकमेव पर्याय असणार आहे.

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
भरती अर्जयेथून पहा
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख10 जून 2024
अर्ज बंद होण्याची तारीख22 जून 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता - The Chief General Manager, Heavy Vehicles Factory, Avadi, Chennai – 600054. Tamilnadu.
  1. सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबल मधून भरतीची जाहिरात वाचून घ्यायची आहे. जाहिरातीमध्ये जी काही माहिती दिली आहे ती पूर्ण पाहून घ्यायची आहे. सूचना वाचायचे आहेत त्यानुसार त्यांचे पालन देखील करायचे आहे.
  2. जाहिरात वाचून झाली की त्यानंतर जाहिरातीच्या सुरुवातीला जो फॉर्म दिला आहे तो फॉर्म तुम्हाला प्रिंट आऊट काढून घ्यायचा आहे.
  3. फॉर्मच्या एक-दोन प्रिंट काढून घ्या, त्यानंतर फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती तंतोतंत भरा. सोबतच आवश्यक कागदपत्रे हार्ड कॉपी स्वरूपात फॉर्म सोबत जोडा.
  4. पूर्ण फॉर्म योग्य रित्या भरून झाला की त्यानंतर तो वर दिलेल्या अधिकृत पत्त्यावर पोस्टाने तुम्हाला पाठवायचा आहे. अधिकृत पत्त्यावर फार्म पोहोचला तरच तुमचा अर्ज स्वीकारला जातो. त्यामुळे जो पत्ता दिला आहे तोच टाका जेणेकरून तुमचा फॉर्म दुसरीकडे जाणार नाही.

HVF Avadi Bharti 2024 FAQ

What is the Eligibility Criteria of HVF Avadi Bharti?

HVF Avadi Bharti साठी अर्ज सादर करणारे उमेदवार हे किमान दहावी उत्तीर्ण असावेत आणि त्यांनी संबंधित ट्रेड मधून ITI उत्तीर्ण केलेला असावा. अधिक ची माहिती मी वर आर्टिकल मध्ये दिली आहेच, त्यामुळे एकदा आर्टिकल पूर्ण नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला भरती संबंधी अधिक ची माहिती देखील मिळून जाईल.

How to apply for HVF Avadi Bharti?

HVF Avadi Bharti साठी ऑफलाइन स्वरुपात फॉर्म भरायचा आहे, ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध नाहीये त्यामुळे अधिकृत पत्त्यावर भरतीचा फॉर्म पोस्टाने पाठवायचा आहे. फॉर्म कसा पाठवायचा? त्याची माहिती वर आपण दिली आहे सोबतच फॉर्म कुठून मिळवायचा? ती पण माहिती दिली आहेत त्यामुळे वरील आर्टिकल नक्की वाचा.

What is the last date of the HVF Avadi Bharti Application Form?

HVF Avadi Bharti Application Form सादर करण्याची शेवटची तारीख ही 22 जून 2024 आहे, आता केवळ मोजकेच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे जास्त वेळ वाया न घालता पटकन अर्ज करून मोकळे व्हा.

Leave a comment