HDFC Bank Scholarship for School Students: एचडीएफसी बँकेद्वारे शाळकरी विद्यार्थ्यांसाठी एक स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.
इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिकणारे विद्यार्थी सोबतच आयटीआय, डिप्लोमा, पॉलिटेक्निक चे कोर्स करणारे विद्यार्थी देखील या स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकतात.
तब्बल 18 हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे, त्यामुळे जर तुम्ही या शैक्षणिक गटात येत असाल तर लगेच या स्कॉलरशिप साठी अर्ज करा.
HDFC Bank Scholarship for School Students
स्कॉलरशिप चे नाव | HDFC Bank Parivartan Scholarship |
स्कॉलरशिप ची सुरुवात | HDFC Bank |
उद्देश | शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे. |
लाभार्थी | पहिली ते बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पॉलिटेक्निक चे विद्यार्थी |
लाभ | 15 ते 18 हजार रुपये |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
स्कॉलरशिप साठी कोण पात्र आहे?
एचडीएफसी बँक परिवर्तन स्कॉलरशिप प्रोग्रॅम साठी खालील अटी सांगण्यात आले आहेत.
- अर्जदार विद्यार्थी हे पहिली ते बारावी, डिप्लोमा, आयटीआय, पॉलिटेक्निक कोर्स चे शिक्षण घेत असावेत.
- विद्यार्थ्यांना मागील शैक्षणिक वर्षांमध्ये किमान 55% गुण मिळालेले असावेत.
- विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आहे अडीच लाखापेक्षा कमी असावे.
- अर्जदार विद्यार्थी हा भारताचा कायमस्वरूपी नागरिक असावा.
- स्कॉलरशिप साठी गरजू, होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
किती रुपये स्कॉलरशिप मिळणार?
एचडीएफसी बँक द्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गटानुसार स्कॉलरशिप दिली जाणार आहे.
यामध्ये दोन गटात विद्यार्थ्यांना विभागण्यात आले आहे, पहिल्या गटात 1ली ते 6वी चे विद्यार्थी आहेत आणि दुसऱ्या गटात 7वी ते 12वी, डिप्लोमा, ITI आणि Polytechnic चे विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे पुढचे शिक्षण चांगले घेता यावे यासाठी 15 ते 18 हजार याप्रमाणे आर्थिक मदत HDFC बँक मार्फत केली जात आहे.
1ली ते 6वी साठी | 15,000 रु. |
7वी ते 12वी + डिप्लोमा, ITI आणि Polytechnic साठी | 18,000 रु. |
स्कॉलरशिप साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
या HDFC Bank Scholarship for School Students साठी अर्जदार विद्यार्थ्याना काही कागदपत्रे फॉर्म भरताना ऑनलाईन स्वरुपात अपलोड करावे लागतील त्याची यादी खालील प्रमाणे आहे.
हे पण वाचा: TSDPL Silver Jubilee Scholarship 2024: टाटा स्टील द्वारे ITI, डिप्लोमा विद्यार्थ्यांना 50,000 रुपये
खाली दिलेले सर्व कागदपत्रे विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना अपलोड करायचे आहेत, इतर ऑफलाईन स्वरुपात कागदपत्रे स्वीकारले जाणार नाहीत, सोबत पूर्ण कागदपत्रे असतील तरच अर्ज करता येईल. त्यामुळे या स्कॉलरशिप साठीआ आगोदर अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तयार ठेवा.
- विद्यार्थ्याचा पासपोर्ट फोटो
- मागील शैक्षणिक वर्षाचे मार्कशीट
- आधार कार्ड
- चालू शैक्षणिक वर्षाचे ऍडमिशन रिसिप्ट
- उत्पन्न प्रमाणपत्र
- बँकेचे पासबुक
- कुटुंबात आर्थिक अडचण असेल तर त्यासंबंधी पुरावा
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया
ऑनलाईन अर्ज | येथून करा |
अर्जाची लास्ट डेट | 31 डिसेंबर 2024 |
- Buddy4study या पोर्टल वर जा.
- तुमची नोंदणी करून लॉगिन करा.
- Apply Now वर क्लिक करा.
- स्कॉलरशिप फॉर्म भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्जाची छाननी करा.
- शेवटी अर्ज सबमिट करा.
हे पण वाचा: ONGC Merit Scholarship 2024: बारावी, ग्रॅज्युएशन पास विद्यार्थ्यांना मिळणार ₹48,000 लगेच अर्ज करा
नेहमी विचारले जाणारे प्रश्न FAQ
Who is eligible for HDFC Bank Parivartan Scholarship?
शाळकरी विद्यार्थी या स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकतात.
How to apply for HDFC Bank Parivartan Scholarship?
Buddy4study portal वरून ऑनलाईन फॉर्म भरा.
What is the last date to apply for HDFC Bank Parivartan Scholarship?
अर्जासाठी मुदतवाढ मिळाली आहे, विद्यार्थी 31 डिसेंबर 2024 पर्यंत फॉर्म भरू शकतात.