HDFC Bank Parivartan Scholarship 2024: 1ली ते 12वी पास ITI डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ₹18,000 ची स्कॉलरशिप

HDFC Bank Parivartan Scholarship 2024: नमस्कार मित्रांनो आजच्या या स्कॉलरशिप अपडेट मध्ये मी तुम्हाला HDFC Bank द्वारे सुरू करण्यात आलेल्या परिवर्तन स्कॉलरशिप प्रोग्राम संदर्भात सांगणार आहे.

मित्रांनो पहिली ते बारावी आयटीआय आणि डिप्लोमा विद्यार्थ्यांना एचडीएफसी बँक मार्फत तब्बल 15 ते 18 हजार रुपयांची स्कॉलरशिप दिली जाणार आहे.

जर तुम्हाला शिक्षणासाठी पैशांची अडचण असेल तर या HDFC Bank Parivartan Scholarship 2024 साठी तुमचा फॉर्म भरून घ्या.

ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरता येतो, त्याची संपूर्ण माहिती आर्टिकल मध्ये मी दिली आहे. आर्टिकल काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करा.

HDFC Bank Parivartan Scholarship 2024

योजनेचे नावHDFC Bank Parivartan Scholarship
योजनेची सुरुवातHDFC Bank
उद्देशगरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे.
लाभार्थीपहिली ते बारावी, आयटीआय, किंवा डिप्लोमा चे शिक्षण घेणारे विद्यार्थी
लाभ15 ते 18 हजार रुपये
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

HDFC Bank Parivartan Scholarship 2024 Elegibility Criteria

  • अर्जदार उमेदवार हे पहिली ते बारावी, आयटीआय, किंवा डिप्लोमा चे शिक्षण घेत असावेत.
  • विद्यार्थ्यांनी मागील शैक्षणिक वर्षात किमान 55 टक्के मार्क मिळवलेले असावे.
  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असावे.
  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबामध्ये आर्थिक अडचणी असतील तर अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

HDFC Bank Parivartan Scholarship 2024 Benefits

एचडीएफसी बँक परिवर्तन स्कॉलरशिप अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना वेगवेगळे लाभ दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाानुसार त्यांना मिळणारा आर्थिक लाभ हा वेगवेगळा आहे.

1ली ते 6वी साठी₹15,000
7वी ते 12वी, डिप्लोमा, आयटीआय, पॉलिटेक्निक साठी₹18,000

HDFC Bank Parivartan Scholarship 2024 Document List

एचडीएफसी बँक परिवर्तन स्कॉलरशिप साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे.

  • पासपोर्ट साईज फोटो
  • मागील वर्षीची मार्कशीट
  • आधार कार्ड
  • ऍडमिशन पावती
  • बँकेचे पासबुक
  • उत्पन्न प्रमाणपत्र

HDFC Bank Parivartan Scholarship 2024 Apply Online

HDFC परिवर्तन स्कॉलरशिप साठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरावा लागतो. त्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया खाली दिली आहे.

ऑनलाईन अर्जApply Online
अर्जाची शेवटची तारीख30 ऑक्टोबर 2024

एचडीएफसी बँकेच्या स्कॉलरशिप प्रोग्रॅम साठी फॉर्म हा Buddy 4 Study या वेबसाईटवरून भरला जातोय.

  • तुम्हाला सुरुवातीला Buddy 4 Study या वेबसाईटला द्यावी लागेल.
  • तिथे गेल्यावर तुम्हाला स्कॉलरशिप संदर्भात माहिती वाचता येईल.
  • त्यानंतर तुम्हाला पोर्टलवर तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
  • आणि नंतर Apply Now वर क्लिक करायचे आहे.
  • तुमच्यासमोर स्कॉलरशिप चा फॉर्म उघडेल.
  • फॉर्ममध्ये आवश्यक ती माहिती भरायची आहे.
  • माहिती भरून झाल्यावर आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
  • कागदपत्रे अपलोड केल्यानंतर फॉर्म तपासायचा आहे.
  • माहिती बरोबर असल्यास अर्ज सबमिट करून टाकायचा आहे.

HDFC Bank Parivartan Scholarship 2024 Selection Process

या शिष्यवृत्ती योजनेसाठी गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना निवडले जाणार आहे, इतर कोणत्याही विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिप प्रोग्राम मध्ये एन्ट्री दिली जाणार नाही.

जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तरच तुम्हाला स्कॉलरशिपचा ला भेटणार आहे. वर जे पात्रता निकष सांगितले आहेत त्याप्रमाणेच विद्यार्थी निवडले जाणार आहेत.

नवीन स्कॉलरशिप अपडेट:

HDFC Bank Parivartan Scholarship 2024 FAQ

Who is eligible for HDFC Bank Parivartan Scholarship 2024?

पहिली ते बारावी, डिप्लोमा, आयटीआय आणि पॉलिटेक्निक मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिप साठी अर्ज करता येतो.

How to apply for HDFC Bank Parivartan Scholarship 2024?

या स्कॉलरशिप प्रोग्राम साठी ऑनलाईन स्वरूपात Buddy 4 Study या पोर्टलवरून अर्ज करता येतो.

What is the last date to apply for HDFC Bank Parivartan Scholarship 2024?

एचडीएफसी बँक परिवर्तन स्कॉलरशिप साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 ऑक्टोबर 2024 आहे.

Leave a comment