Central Railway Bharti 2025: मध्य रेल्वेत 10वी/ITI पास वर 2412 जागांसाठी भरती! लगेच अर्ज करा

Central Railway Bharti 2025: मध्य रेल्वेत अप्रेंटिस भरती होणार आहे, त्यासाठीची जाहिरात नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. रेल्वेत काम करण्याची ही एक सुवर्णसंधी असून इच्छुक उमेदवारांनी ही संधी सोडू नका.

या भरतीत एकूण 2412 जागा रिक्त आहेत, 10वी पास/ITI उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. विविध विभागांमध्ये प्रशिक्षणासाठी ही भरती केली जाणार असून, उमेदवारांना रेल्वे मध्ये काम करण्याची आणि अनुभव मिळवण्याची संधी यामध्ये मिळणार आहे.

भरती संबंधीची संपूर्ण माहिती या लेखामध्ये देण्यात आली असून. यात पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया अशी पूर्ण माहिती आहे. जर तुम्हाला रेल्वेत नोकरी करायची असेल तर हे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा आणि लगेच फॉर्म पण भरून घ्या.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Central Railway Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची माहिती

विवरणमाहिती (Details)
भरतीचे नावCentral Railway Apprentice Recruitment 2025
भरती करणारी संस्थामध्य रेल्वे (Central Railway)
पदाचे नावअप्रेंटिस
एकूण जागा2412
शैक्षणिक पात्रता10वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेडमध्ये ITI
वयोमर्यादा15 ते 24 वर्षे
पगार / मानधन7000 रु.
अर्ज प्रक्रियाऑनलाईन (Online)
अर्ज फीGeneral/OBC: ₹100/
SC/ST/PWD/Women: शुल्क नाही
नोकरी ठिकाणमध्य रेल्वे विभाग
अधिकृत वेबसाइटcr.indianrailways.gov.in

Central Railway Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावविभागपद संख्या
1अप्रेंटिसमुंबई1582
भुसावळ418
पुणे192
नागपूर144
सोलापूर76
Total 2412

Central Railway Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नावपात्रता व शैक्षणिक अर्हता
अप्रेंटिसअर्जदार उमेदवार हा किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असावा, आणि सोबतच तो संबंधित ट्रेड मध्ये NCVT (Fitter/ Welder / Carpenter/ Painter/ Tailor/Electrician/Mechanist / PASAA / Mechanical Diesel / Lab Assistant/Turner/Electronics Mechanic/Sheet Metal Worker / Winder / MMTM/Tool & Die Maker/Mechanical Motor Vehicle/IT & Electronic System Maintenance) ITI उत्तीर्ण असावा.

Central Railway Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

विवरणमाहिती
वयोमर्यादा15 ते 24 वर्षे
किमान वय15 वर्षे
जास्तीत जास्त वय24 वर्षे
ओबीसी प्रवर्ग15 ते 27 वर्षे वर्षे (3 वर्षे सूट)
SC/ST प्रवर्ग15 ते 29 वर्षे वर्षे (5 वर्षे सूट)

Central Railway Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

या भरतीत कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही. निवड प्रक्रिया पूर्णपणे मेरिट लिस्टवर आधारित असेल. उमेदवारांची निवड 10वी (किमान 50% गुण) आणि संबंधित ट्रेडमधील ITI गुणांच्या आधारे केली जाईल. दोन्ही गुणांचे सरासरी काढून अंतिम मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल.

SSC (10वी) टक्केवारी मोजताना सर्व विषयांतील एकूण गुणांचा विचार केला जाईल, “Best of Five” पद्धत वापरण्यात येणार नाही. ITI गुणांची टक्केवारी मोजताना संबंधित ट्रेडमधील सर्व सेमिस्टरचे एकत्रित गुण किंवा NCVT/SCVT कडून जारी केलेल्या Provisional National Trade Certificate वरील गुणांचा विचार केला जाईल.

आंध्र प्रदेश, केरळ इत्यादी राज्यांच्या बोर्डाच्या ग्रेड प्रणालीतील गुण मोजण्यासाठी, उमेदवाराने मिळवलेल्या ग्रेडच्या रेंजचे मध्यम मूल्य (midpoint) टक्केवारी म्हणून घेतले जाईल.

थोडक्यात, 10वी + ITI गुणांची सरासरी काढून उमेदवारांची या भरती मध्ये निवड केली जाईल, आणि त्यास अनुसरून अंतिम यादी हि देखील प्रसिद्ध होणार आहे.

Central Railway Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलतारीख
अर्जाची सुरुवात12 ऑगस्ट 2025
अर्जाची शेवटची तारीख11 सप्टेंबर 2025

Central Railway Bharti 2025: Important Links & Official Notification – अर्ज लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDFजाहिरात वाचा
Apply Online (ऑनलाईन अर्ज)इथून अर्ज करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Central Railway Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

1) अधिकृत वेबसाइटवर जा: RRC Central Railway ची साइट (rrccr.com) उघडा आणि “Engagement of Apprentices 2025-26 – Apply Online” वर क्लिक करा. प्रथम संपूर्ण जाहिरात नीट वाचा. अर्ज 12 ऑगस्ट 2025 पासून सुरू असून शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2025, सायं. 5:00 वाजेपर्यंत आहे.

2) कागदपत्रे तयार ठेवा: 10वीचे गुणपत्रक, ITI (NCVT/SCVT) प्रमाणपत्र/प्रोव्हिजनल, जात प्रमाणपत्र व OBC-NCL (लागू असल्यास), PwBD/Ex-Servicemen कागदपत्रे (लागू असल्यास), आधार क्रमांक (J&K/Meghalaya/Assam वगळता; तिथे पर्यायी ओळखपत्र), चालू मोबाईल व ईमेल. फोटो व सहीची स्कॅन फोटो ठरवून दिलेल्या साईज/फॉरमॅटमध्ये ठेवा.

3) नवीन नोंदणी (Registration): “New Registration” निवडा नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख अशी सर्व माहिती SSC प्रमाणपत्रानुसार जशीच्या तशी भरा. आधार क्रमांक टाका, मोबाईल/ईमेल OTP द्वारे Verify करून घ्या, नंतर Registration नोंदणी ची प्रक्रिया पूर्ण करा.

4) फॉर्म भरणे: वैयक्तिक माहिती, पत्ता, शैक्षणिक तपशील (10वी व ITI ट्रेड/सेमिस्टर तपशील) भरा. एकच क्लस्टर निवडा आणि त्या क्लस्टरमधील युनिट्सना प्राधान्यक्रम लावा. एकापेक्षा अधिक अर्ज/ अथवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.

5) फोटो/सही अपलोड करा: पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी फॉर्म मध्ये अपलोड करा, इथे लक्षात घ्या यांची साईज हि बरोबर ठरवून दिलेल्या निकषानुसार असणे आवश्यक आहे.

6) फी भरणे: अर्ज फी ₹100 (Non-refundable). SC/ST/PwBD/महिला उमेदवारांना फी माफ आहे. Debit/Credit Card, Net Banking, UPI, Wallet ने पेमेंट करा.

7) Preview व Final Submit: संपूर्ण माहिती एकदा पुन्हा तपासून घ्या, फॉर्म मधील सर्व माहिती जर बरोबर असेल तर अर्ज सबमिट करा.

एकदा का अर्ज सबमिट झाला कि त्यानंतर मग तुम्हाला त्या अर्जाची प्रिंट काढून घ्यायची आहे, प्रिंट काढली तर ती तुम्हाला पुढे भरती प्रक्रियेत कामाला येणार आहे.

इतर भरती

Agniveervayu Sports Quota Bharti 2025: भारतीय हवाई दल अग्निवीरवायु (Sports) भरती, 12वी पास लगेच अर्ज करा

Union Bank of India Bharti 2025: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधरांना नोकरी! ₹93,960 पगार, लगेच अर्ज करा

Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदलात BE/B.Tech/पदवी वर SSC ऑफिसर पदाची भरती! 1,10,000 रु. पगार, अर्ज करा

Western Railway Sports Quota Bharti 2025: पश्चिम रेल्वेत 10वी, 12वी, ITI पास वर खेळाडूंची भरती! 50000 रु. महिना पगार, लगेच फॉर्म भरा

CCRAS Bharti 2025: केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत 10वी पास वर भरती! 39,100 रु. महिना पगार, लगेच अर्ज करा

OICL Assistant Recruitment 2025: ओरिएंटल इंश्योरेंस कंपनी मध्ये भरती ! पदवीधर लगेच येथून अर्ज करा, पगार 20 हजार पासून सुरू!

IBPS Clerk Recruitment 2025: आयबीपीएस क्लर्क भरती, पदवी पास वर 10277 जागांची बंपर भरती, लगेच येथून फॉर्म भरा

Eastern Railway Bharti 2025: पूर्व रेल्वेत 10वी / ITI पास वर 3115 जागांसाठी मेगा भरती, लगेच अर्ज करा

Central Railway Bharti 2025 – 26 : FAQ

Central Railway Bharti 2025 मध्ये पदे भरली जात आहेत?

अप्रेंटिस हे पदे या भरती अंतर्गत भरले जाणार आहेत.

Central Railway Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या 2412 आहेत.

Central Railway Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 11 सप्टेंबर 2025 आहे, या तारखे नंतर फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.

Central Railway Bharti 2025 मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि मेरीट बेस आहे, मेरीट च्या आधारावर पात्र उमेदवार निवडले जाणार आहेत.

1 thought on “Central Railway Bharti 2025: मध्य रेल्वेत 10वी/ITI पास वर 2412 जागांसाठी भरती! लगेच अर्ज करा”

Leave a comment