CAPF Bharti 2024: केंद्रिय सशस्त्र पोलीस दलात बंपर भरती! 12 वी पास वर नोकरी मिळणार

CAPF Bharti 2024: केंद्रिय सशस्त्र पोलीस दलामध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये मुख्यत्वे करून असिस्टंट सब इन्स्पेक्टर आणि हेड कॉन्स्टेबल अशा पदांची भरती होणार आहे. ही भरती वेगवेगळ्या सैन्य दलामध्ये केली जाणार आहे, यात BSF, CRPF सारखे आर्मी फोर्सेस समाविष्ट असणार आहेत.

या भरती संबंधी अधिकृत जाहिरात देखील केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामार्फत जारी करण्यात आली आहे. जे उमेदवार हे भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना अर्ज करता येणार आहे. मोठी अशी सुवर्ण संधी आहे, संधी वाया घालू नका एकदा या आर्टिकल मध्ये जी माहिती दिली आहे ती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि फॉर्म भरून टाका.

या भरतीसाठी एकूण रिक्त जागा या 1526 असणार आहेत, दोन पदांमध्ये विभागलेले आहेत त्याची माहिती आपण खाली लेखामध्ये घेणार आहोतच. सोबतच फोर्स द्वारे या दोन्ही पदांमध्ये देखील जागांची विभागणी आहे, त्याची पण माहिती टेबल द्वारे खाली दिली आहे.

CAPF Bharti 2024

पदाचे नावविवीध पदांसाठी भरती निघाली आहे, Vacancy Details मध्ये याची पूर्ण माहिती दिली आहे.
रिक्त जागा1526
नोकरीचे ठिकाणसंपुर्ण भारत
वेतन श्रेणी92,300 रू. पासून सुरू
वयाची अट18 ते 25 वर्षे
भरती फीGeneral/OBC साठी ₹100/- [SC/ST/ExSM आणि सर्व महिलांसाठी फी नाही]

CAPF Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नाव पद संख्या
असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर/ कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) & वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट)243
हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल/ कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल) & हवालदार (क्लर्क)1283
Total1526
पद क्र.पदाचे नाव फोर्स पद संख्या
1असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर/ कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) & वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट)BSF17
CRPF21
ITBP56
CISF146
SSB03
2हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल/ कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल) & हवालदार (क्लर्क)BSF302
CRPF282
ITBP163
CISF496
SSB05
AR35

CAPF Bharti 2024 Education Qualification

  • पद क्र.1: उमेदवार हा किमान 12 वी उत्तीर्ण असावा आणि त्याला हिंदी व इंग्रजी टायपिंग येत असावी. [हिंदी/इंग्रजी टायपिंग: 10 मिनिटात 80 शब्द]

  • पद क्र.2: उमेदवार हा किमान 12वी उत्तीर्ण असावा आणि त्याला संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रती मिनिट किंवा हिंदी टायपिंग 30 शब्द प्रती मिनिट पर्यंत टायपिंग करता येत असावी.

भरती साठी पात्रता निकष हे वेगवेगळे आहेत, वर सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता, वयाची अट आणि (शारीरिक पात्रता निवड प्रक्रियेमध्ये सविस्तर पणे स्पष्ट केली आहे)

CAPF Bharti 2024 Selection Process

CAPF भरती साठी उमेदवारांची निवड ही वेगवेगळ्या स्तरानुसार होणार आहे. यामध्ये तीन टप्पे असणार आहेत.

  • शारीरिक चाचणी
  • ऑनलाईन परीक्षा
  • स्किल्स टेस्ट, कागदपत्रे पडताळणी आणि मेडिकल तपासणी

शारीरिक चाचणी (Physical Efficiency Test) PET

सुरुवातीला ऑनलाईन अर्ज सादर केल्यावर पहिल्यांदा CAPF द्वारे उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाते.

शारीरिक चाचणी मध्ये उमेदवारांची उंची, छाती सोबत रनिंग तपासली जाणार आहे.

उंचीछातीरनिंग
पुरुष165 सेमी82 सेमी1.6 Km – 6 मिनिट 30 सेकंद
महिला155 सेमीलागू नाही800 मीटर – 4 मिनिट 45 सेकंद

ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) CBT

दुसऱ्या टप्प्यात पात्र उमेदवारांची ऑनलाईन टेस्ट घेतली जाते, यामधे 100 मार्क चा ऑनलाईन पेपर असतो.

या पेपर मध्ये पडलेले मार्क हे मेरिट लिस्ट साठी Final असणार आहेत. MCQ Objective प्रकारचे प्रश्न असणार आहेत, पेपर सोडवण्यासाठी 1 घंटा 40 मिनिटे मिळणार आहेत.

📝 पेपरचा प्रकार- MCQ Objective Type
पेपर साठी वेळ – 1 घंटा 40 मिनिटे

विषयएकूण मार्क
हिंदी, इंग्रजी (Optional)20
सामान्य ज्ञान20
गणित20
कारकुनी पद्धती20
संगणक20

हिंदी किंवा इंग्रजी भाषा विषय हे Optional आहेत, यापैकी तुम्ही कोणताही एक विषय निवडू शकता.

स्किल्स टेस्ट, कागदपत्रे पडताळणी आणि मेडिकल तपासणी (DME/RME)

Skill Test

स्किल्स टेस्ट मध्ये उमेदवारांची टायपिंग स्पीड तपासली जाणार आहे. यामधे कॉम्प्युटर वर 50 मिनिटे इंग्रजी टायपिंग करायची आहे, आणि 65 मिनिटे हिंदी टायपिंग करायची आहे.

⌨️ टायपिंग स्पीड

  • इंग्रजी – 35 शब्द प्रती मिनिट
  • हिंदी – 30 शब्द प्रती मिनिट

टीप – Typing Test साठी फक्त 10 मिनिटे दिले जाणार आहेत.

Document Verification

जाहिराती मध्ये जे कागदपत्रे फॉर्म सोबत अपलोड करण्यास सांगितले आहेत, ते सर्व या स्टेज मध्ये तपासले जाणार आहेत.

कागदपत्रांची विश्वासाहर्ता तपासून उमेदवारांना Green Signel दिला जाणार आहे.

Medical Test

मेडिकल तपासणी मध्ये उमेदवारांचे आरोग्य तपासले जाणार आहे. यामध्ये उमेदवार तंदुरुस्त आहे की नाही याची टेस्ट घेतली जाते, टेस्ट मध्ये जे उमेदवार पास होतील केवळ त्यांचे मेरिट लिस्ट मधे नाव दिले जाते.

थोडक्यात वरील प्रमाणे CAPF भरती साठी निवड प्रक्रिया पार पडते.

CAPF Bharti 2024 Application Form

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये जी भरती निघाली आहे ती भरती ऑनलाईन माध्यमातून अधिकृत पोर्टल द्वारे सुरू करण्यात आली आहे. भरतीसाठी इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज करता येणार नाही, त्यामुळे फॉर्म भरताना काळजी घ्या आणि जी वेबसाईट दिली आहे त्या वेबसाईट वरूनच ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरा.

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
ऑनलाईन अर्जअर्ज करा
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख09 जून 2024
अर्ज बंद होण्याची तारीख08 जुलै 2024
  1. सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबल मधून भरतीची जाहिरात एकदा वाचून घ्यायची आहे, भरतीची जाहिरात वाचताना त्यामध्ये दिलेल्या सर्व सूचनांची काळजीपूर्वक पालन करायचे आहे.
  2. सूचना वाचून झाल्यावर वर दिलेल्या टेबल मधूनच ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करायचा आहे. लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर भरतीचा फॉर्म ओपन होईल.
  3. फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक रीत्या अचूक स्वरूपात भरून घ्यायची आहे.
  4. माहिती भरताना उमेदवारांना त्यांचा वैयक्तिक पत्ता, माहिती तसेच शैक्षणिक माहिती, कामाचा अनुभव, वेगवेगळे सर्टिफिकेट यांची पण माहिती अर्जामध्ये दाखल करायची आहे.
  5. माहिती पूर्ण भरून झाल्यावर उमेदवारांना जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक असे सर्व कागदपत्रे सॉफ्ट कॉपी स्वरूपात अपलोड करायचे आहेत.
  6. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर या भरतीसाठी जी परीक्षा फी सांगण्यात आली आहे ती देखील भरून घ्यायची आहे. भरतीची फी ही ऑनलाईन माध्यमातून कोणत्याही पेमेंट मोड द्वारे भरता येते.
  7. फी भरून झाली की नंतर उमेदवारांना त्यांचा भरतीचा अर्ज तपासून पाहायचा आहे, फॉर्म तपासून वेरिफाय केल्यानंतरच तो सबमिट करायचा आहे.

CAPF Bharti 2024 FAQ

What is the Eligibility Criteria of CAPF Bharti?

CAPF Bharti साठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान बारावी पर्यंत झालेले असावे, आणि या सोबतच अर्जदाराने टायपिंगचा कोर्स केलेला असावा. अधिक माहितीसाठी वर आर्टिकल मध्ये दिलेली माहिती वाचा.

How to apply online for CAPF Bharti?

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करताना अधिकृत पोर्टलवरून फॉर्म भरायचा आहे. इतर ऑफलाइन स्वरूपात अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही, त्यामुळे आर्टिकल मध्ये ज्या स्टेप दिल्या आहेत त्यानुसार ऑनलाइन फॉर्म भरून घ्या.

What is the last date of the CAPF Bharti Applications?

CAPF Bharti साठी ऑनलाईन अर्ज हे दिनांक 08 जुलै 2024 parynt सादर करायचे आहेत. भरती साठी अर्ज करण्याची मुदतवाढ मिळणार नाही त्यामुळे सध्या जी मुदत दिली आहे ती Final आहे. त्यामुळे 8 जुलै पूर्वी फॉर्म भरून घ्या.

2 thoughts on “CAPF Bharti 2024: केंद्रिय सशस्त्र पोलीस दलात बंपर भरती! 12 वी पास वर नोकरी मिळणार”

Leave a comment