BSF आर्मी भरती निवड प्रक्रिया, जाणून घ्या काय आहेत निकष | BSF Selection Process

BSF Selection Process: नमस्कार मित्रांनो, आजच्या या आर्टिकल मध्ये आपण BSF सीमा सुरक्षा दल भरती साठी उमेदवारांची निवड कशी केली जाते? अभ्यासक्रम काय असतो? अर्ज कसा करायचा? अशी सर्व माहिती पाहणार आहोत.

भारतीय सैन्याद्वारे BSF मध्ये वेळोवेळी भरती होत असते, त्या भरती साठी बऱ्याच वेळा प्रक्रिया ही सारखीच असते. जसे निवड कशाच्या आधारावर होणार? भरती साठी कोणता अभ्यासक्रम Syllabus असणार? भरती साठी अर्ज कसा सादर करायचा?

यासंबधी मी या लेखामध्ये सविस्तर माहिती दिली आहे, ज्यामुळे तुम्ही BSF Selection Process संबंधी संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकाल. 

जर तुम्ही BSF Bharti साठी तयारी करत असाल, तर तुमच्या साठी ही माहिती खूप फायद्याची असणार आहे. यामुळे तुम्ही जेव्हा केव्हा BSF मध्ये जागा निघतील तेव्हा सर्वात आधी अर्ज सादर करू शकाल.

BSF Selection Process In Marathi

BSF भारतीय सीमा सुरक्षा दल भरती साठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुख्यतः दोन टप्प्यात केली जाते. जे उमेदवार या दोन्ही टप्प्यामध्ये उत्तीर्ण होतील, त्यांना BSF रिक्त जागांसाठी निवडले जाईल.

  • लेखी परीक्षा
  • कागदपत्रे पडताळणी
  • शारिरीक चाचणी
  • मेडीकल टेस्ट

अशा एकूण 4 निवड प्रक्रिया आहेत, ज्या दोन टप्प्यात केल्या जाणार आहेत. लेखी परीक्षा ही स्वतंत्र स्वरूपात होणार आहे, बाकी लेखी परीक्षा पास झालेल्या उमेदवारांना त्यांचे कागदपत्रे, शारिरीक चाचणी, मेडीकल टेस्ट अशी सर्व निवड प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

लेखी परीक्षा

सुरुवातीला प्रथम उमेदवारांना परीक्षा द्यावी लागते, Exam हा BSF निवड प्रक्रियेतील पहिला टप्पा आहे. परीक्षा ही साधारण पणे लेखी स्वरूपात घेतली जाते, अर्जदारांना लेखी परीक्षा द्यावी लागते. 

लेखी परीक्षेत जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांना पुढील प्रक्रियेत सहभागी होता येईल. त्यासाठी BSF Recruitment Exam पास होणे अनिवार्य आहे, परीक्षा कशी असणार त्यासाठी अभ्यासक्रम Syllabus कोणता असणार याची पूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

लेखी परीक्षा Writeen Test दिल्यानंतर वर सांगितल्या प्रमाणे उमेदवार भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात जाण्यासाठी पात्र होतो. 

लेखी परीक्षा अभ्यासक्रम

BSF Writeen Exam साठी Syllabus हा खालील प्रमाणे असणार आहे. 

जनरल नॉलेज25252 तास
तर्क25252 तास
संख्यात्मक क्षमता 25252 तास
व्यापार जागरूकता 25252 तास

BSF भरती साठी अभ्यासक्रम हा पदानुसार बदलू शकतो, त्यामुळे ज्यावेळी BSF भारतीय सीमा सुरक्षा दल भरती साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होईल, तेव्हा तुम्हाला त्या पदासंबंधी अभ्यासक्रम जणून घेणे आवश्यक असणार आहे.

वर दिलेले विषय आणि त्यांचे मार्क पण बदलू शकतात, नवीन एखादी अपडेट आली तर आम्ही तुम्हाला येथे सांगूच सोबत माहिती पण Add करू. त्यामुळे तुम्ही BSF भरती साठी पूर्ण तयारीने अर्ज करून नोकरी मिळवू शकता.

लेखी परीक्षेत पास कसे व्हावे?

BSF लेखी परीक्षा जर तुम्हाला पास करायची असेल तर तुम्ही भरती नुसार त्यासंबंधी Refference Books वाचू शकता. विषयात बदल झाला तर त्याची अपडेट जाहिराती मध्ये दिलेली असते, त्यामुळे तुमची जबाबदारी आहे की तुम्ही स्वतः हुन जाहिरात पूर्ण वाचावी. जेणेकरून तुम्हाला पुढे कोणतीही अडचण येणार नाही.

लेखी परीक्षा पास करणे सोपे आहे, BSF भरती साठीचा अभ्यासक्रम सर्व प्रथम जाणून घ्यायचा आहे. अभ्यासक्रम जाणून घेतल्यावर लेखी परीक्षेसाठी कोणकोणते विषय आहेत हे तुम्हाला कळून जाईल, मग तुम्ही त्या विषयानुसार अभ्यास करू शकता.

लेखी परीक्षेसाठी Passing Marks किती आहेत?

BSF Writeen Test साठी उमेदवारांना प्रत्येक विषयात चांगले गुण घेणे आवश्यक आहे, लेखी परीक्षेत पास होण्यासाठी प्रवर्गानुसार Qualifying Mark वेगवेगळे असणार आहेत.

EWS, OBC, मागासवर्ग, Open अशा सर्व प्रवर्गातील उमेदवारांना लेखी परीक्षेत पास होण्यासाठी वेगवेगळे मार्क घेण्याची Requirement आहे. सर्व उमेदवारांना सारखी Passing असणार नाही.

जे उमेदवार मागासवर्ग किंवा OBC प्रवर्गातील असतील त्यांना Open प्रवर्गातील उमेदवारांपेक्षा कमी मार्क जरी पडले तरी त्यांना लेखी परीक्षेत पास Declare केले जाईल. त्या उलट जर Open मधील उमेदवार Passing Grade आणू शकला नाही तर तो लेखी परीक्षेत पास होऊ शकणार नाही.

शारीरिक चाचणी 

दुसऱ्या टप्प्यात आलेल्या उमेदवारांची सुरुवातीला कागदपत्र पडताळणी केली जाईल. जर सर्व आवश्यक कागदपत्रे असतील तर उमेदवाराची शारीरिक चाचणी होईल, अन्यथा त्याच क्षणी उमदेवार बाद केला जाईल.

शारिरीक चाचणी देखील वर सांगितल्या प्रमाणे भरती नुसार बदलू शकते, मुख्य स्वरूपात BSF भरती साठी Physical Test ही Running, लांब उडी आणि उंच उडी अशा स्वरूपाची असणार आहे. 

शारीरिक चाचणी मध्ये देखील पुरुष आणि महिला यांच्या साठी काही निकष दिले आहेत, महिलांना पुरुषांपेक्षा जास्त सूट देण्यात आली आहे. 

लेखी परीक्षा आणि Physical Test या दोन्हीचा Score एकत्र करून उमदेवार निवडले जाणार आहेत. जे उमदेवार BSF भरती साठी पात्र होतील त्यांचे मेडीकल चेकअप केले जाईल, मेडिकल मध्ये जे उमेदवार पात्र होतील त्यांना अधिकृत पणे जॉइनिंग लेटर दिले जाईल.

थोडक्यात अशा प्रकारे BSF Selection Process (निवड प्रक्रिया) पार पडते. सर्व टप्प्यामध्ये पास झालेल्या उमेवारांना रिक्त जागांसाठी BSF सीमा सुरक्षा दलात भरती केले जाते.

BSF Bharti Application Form

BSF भरती साठी ऑनलाईन माध्यमातूनच अर्ज सादर करायचा असतो, जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक असतील ते अधिकृत वेबसाईट वरून अर्ज भरू शकतात. 

फॉर्म हा पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात भरायचा असतो, अर्ज करताना आवश्यक ती सर्व माहिती त्यात भरावी लागते. प्रत्येक भरती साठी प्रक्रिया ही वेगवेगळी असू शकते, पण अर्ज हा एकाच पद्धतीने भरला जातो.

नवीन भरती अपडेट:

BSF Selection Process FAQ

BSF मध्ये निवड प्रक्रिया कशी केली जाते?

निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा आणि Physical Test द्वारे केली जाते.

BSF भरती साठी मेडिकल चाचणी केली जाते का?

हो, BSF भरती साठी मेडीकल चाचणी अनिवार्य असते, पात्र उमेदवारांना मेडीकल चेकअप करावे लागते.

BSF भरती साठी अर्ज कसा करायचा?

BSF भरती साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची असते, अधिकृत वेबसाईट वरून उमेदवार अर्ज करू शकतो.

11 thoughts on “BSF आर्मी भरती निवड प्रक्रिया, जाणून घ्या काय आहेत निकष | BSF Selection Process”

Leave a comment