Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात भरती! 2,08,700 रु पगार, पदवी पास लगेच अर्ज करा

Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. नुकतीच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या भरतीद्वारे पदवीधर उमेदवारांना हायकोर्ट मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.

या भरतीसाठी पदवी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. म्हणजेच, ज्यांनी पदवी पूर्ण केली आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. या भरतीची अर्ज प्रक्रिया हि पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. इच्छुक उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येईल.

या लेखात मी तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 विषयी सविस्तर माहिती सांगितली आहे. पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्ज करण्याची पद्धत आणि महत्त्वाच्या तारखा याबाबतचे सर्व तपशील खाली दिले आहेत. कृपया ही माहिती काळजीपूर्वक वाचा, सोबतच अधिकृत जाहिरात एकदा वाचून मग लगेच या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरून टाका.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Bombay High Court Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची माहिती

विवरणमाहिती (Details)
भरतीचे नावBombay High Court Recruitment 2025
भरती करणारी संस्थामुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court)
पदाचे नावस्वीय सहाय्यक (Personal Assistant)
एकूण जागा36
शैक्षणिक पात्रतापदवी पास
वयोमर्यादा21 ते 38 वर्षे
पगार / मानधन₹2,08,700/- पर्यंत
अर्ज प्रक्रियाऑनलाईन (Online)
अर्ज फी₹1000/-
नोकरी ठिकाणमुंबई व महाराष्ट्रातील न्यायालये
अधिकृत वेबसाइटbombayhighcourt.nic.in

Bombay High Court Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पदाचे नावपद संख्या
स्वीय सहाय्यक (Personal Assistant)36
Total36

Bombay High Court Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नावपात्रता व शैक्षणिक अर्हता
स्वीय सहाय्यक (Personal Assistant)अर्जदार उमेदवार हा किमान पदवीधर असावा, आणि त्याची शॉर्ट हैण्ड स्पीड 120 श.प्र.मि. सोबत इंग्रजी टायपिंगची स्पीड पण 50 श.प्र.मि. एवढी असणे गरजेचे आहे.

Bombay High Court Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

तपशीलवयाची अट
Age Limit21 ते 38 वर्षे
मागासवर्गीय प्रवर्ग5 वर्षे सूट

Bombay High Court Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 साठी निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत होणार आहे. उमेदवारांची पात्रता तपासण्यासाठी शॉर्टहँड टेस्ट, टायपिंग टेस्ट आणि मुलाखत (Viva-voce) या पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल. एकूण 100 गुणांची परीक्षा असेल ज्यामध्ये शॉर्टहँड आणि टायपिंग टेस्ट प्रत्येकी 40 गुणांची तर मुलाखत 20 गुणांची असेल. शॉर्टहँड व टायपिंग टेस्टमध्ये किमान 20 गुण मिळणे आवश्यक आहे, तर मुलाखतीत किमान 8 गुण मिळाले पाहिजेत.

PART – I: Shorthand Test (40 Marks)

  • इंग्रजीत दोन परिच्छेद (एकूण 600 शब्द) डिक्टेशन स्वरूपात दिले जातील.
  • उमेदवारांना 5 मिनिटांत डिक्टेशन घेऊन ते 35 मिनिटांत कॉम्प्युटरवर टाइप करून द्यावे लागेल.
  • या टेस्टमध्ये Speed आणि Accuracy तपासली जाईल.

PART – II: Typing Test (40 Marks)

  • इंग्रजीत 500 शब्दांचा परिच्छेद दिला जाईल.
  • 10 मिनिटांत तो कॉम्प्युटरवर टाईप करावा लागेल.
  • या टेस्टमधून उमेदवारांची टायपिंग स्पीड आणि अचूकता तपासली जाईल.

PART – III: Viva-voce (20 Marks)

  • शॉर्टहँड व टायपिंग टेस्ट यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्यानंतरच उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • मुलाखतीत उमेदवारांचे Knowldge, Confidance, Communication आणि नोकरीसाठी लागणारी आवश्यक गुणवत्ता तपासली जाईल.
  • एकंदरीत उमेदवार पात्र आहे कि नाही हे या मुलाखती मार्फत पहिले जाईल.

त्यानंतर वरील सर्व तिन्ही टप्यात जे उमेदवार पात्र होतील केवळ त्यांना मुंबई उच्च न्यायालयात नोकरी दिली जाईल.

Bombay High Court Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलतारीख
अर्जाची सुरुवात18 ऑगस्ट 2025
अर्जाची शेवटची तारीख01 सप्टेंबर 2025

Bombay High Court Bharti 2025: Important Links & Official Notification – अर्ज लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDFजाहिरात वाचा
Apply Online (ऑनलाईन अर्ज)इथून अर्ज करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Bombay High Court Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

1) अधिकृत वेबसाइटला भेट द्या

  • ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला bhc.gov.in या अधिकृत वेबसाईट ला भेट देणे आवश्यक आहे.

2) नवीन नोंदणी (Registration) करा

  • वेबसाईट वर तुमची नोंदणी करून घ्या.
  • जर आगोदर नोंदणी केली असेल तर लॉगीन करा.

3) लॉगिन करून अर्ज भरा

  • वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि इतर सर्व महत्वाची माहिती फॉर्म मध्ये भरा.
  • आवश्यक असे कागदपत्रे अर्जामध्ये अपलोड करा – पासपोर्ट फोटो, स्वाक्षरी.
  • सर्व माहिती योग्य भरल्याची खात्री करून घ्या, करणा चुकीची माहिती दिली तर अर्ज बाद होऊ शकतो.

4) अर्जाची फीस भरा

  • Debit/Credit Card, UPI किंवा Net Banking द्वारे ऑनलाइन परीक्षा फी चे पेमेंट करा.

5) Final Submit करा

  • शेवटी फॉर्म पुन्हा रिचेक करा, काही चुकल असेल तर दुरुस्त करून घ्या.
  • त्यानंतर मग डायरेक्ट फॉर्म सबमिट करून टाका.

थोडक्यात अशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन स्वरुपात मुंबई उच्च न्यायालय भरती चा फॉर्म भरता येणार आहे. पण लक्षात घ्या फॉर्म सबमिट केल्यावर तुम्हाला फॉर्म ची प्रिंट काढून घेणे आवश्यक आहे, अर्जाची प्रिंट पुढे तुम्हाला भरती प्रक्रियेत लागणार आहे.

इतर भरती

Agniveervayu Sports Quota Bharti 2025: भारतीय हवाई दल अग्निवीरवायु (Sports) भरती, 12वी पास लगेच अर्ज करा

Union Bank of India Bharti 2025: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधरांना नोकरी! ₹93,960 पगार, लगेच अर्ज करा

Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदलात BE/B.Tech/पदवी वर SSC ऑफिसर पदाची भरती! 1,10,000 रु. पगार, अर्ज करा

Western Railway Sports Quota Bharti 2025: पश्चिम रेल्वेत 10वी, 12वी, ITI पास वर खेळाडूंची भरती! 50000 रु. महिना पगार, लगेच फॉर्म भरा

CCRAS Bharti 2025: केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत 10वी पास वर भरती! 39,100 रु. महिना पगार, लगेच अर्ज करा

OICL Assistant Recruitment 2025: ओरिएंटल इंश्योरेंस कंपनी मध्ये भरती ! पदवीधर लगेच येथून अर्ज करा, पगार 20 हजार पासून सुरू!

IBPS Clerk Recruitment 2025: आयबीपीएस क्लर्क भरती, पदवी पास वर 10277 जागांची बंपर भरती, लगेच येथून फॉर्म भरा

Eastern Railway Bharti 2025: पूर्व रेल्वेत 10वी / ITI पास वर 3115 जागांसाठी मेगा भरती, लगेच अर्ज करा

Bombay High Court Bharti 2025 – 26 : FAQ

Bombay High Court Bharti 2025 मध्ये पदे भरली जात आहेत?

स्वीय सहाय्यक हे पदे या भरती अंतर्गत भरले जाणार आहेत.

Bombay High Court Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या 36 आहेत.

Bombay High Court Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 01 सप्टेंबर 2025 आहे, या तारखे नंतर फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.

Bombay High Court Bharti मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि शॉर्टहँड, टायपिंग टेस्ट आणि मुलाखतीच्या आधारावर होणार आहे.

Leave a comment