Bhumi Abhilekh Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागामध्ये नवीन भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. याची जाहिरात पण आलीये, त्यामुळे जे उमदेवार इच्छुक आहेत त्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे.
भूमि अभिलेख विभाग ही महाराष्ट्रातील एक महत्वाची शासकीय संस्था आहे. या विभागामध्ये दरवर्षी विविध पदांसाठी भरती होत असते, यंदाच्या वर्षासाठी पण भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
भूकरमापक या पदासाठी हि भरती होणार आहे, संपूर्ण महाराष्ट्रात रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत. विभागानुसार पदांची संख्या हि वेगवेगळी आहे. याच्या एकूण रिक्त जागा या 903 आहेत, फॉर्म भरण्याची प्रक्रिया हि सुरु झालीये, तुम्हाला जर इच्छा असेल आणि तुम्ही पात्र असाल तर तुम्ही अर्ज करू शकता.
ऑनलाईन स्वरुपात अर्ज कसा भरायचा? निवड प्रक्रिया काय आहे? अशी सर्व महत्वाची माहिती या आर्टिकल मध्ये मी दिली आहे. पोस्ट काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Bhumi Abhilekh Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
भरती करणारी संस्था | महाराष्ट्र शासन भूमि अभिलेख विभाग |
भरतीचे नाव | Bhumi Abhilekh Bharti 2025 |
पदाचे नाव | भूकरमापक |
रिक्त जागा | 903 |
वेतन | 19,900 ते 63,200 रु. |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
शैक्षणिक पात्रता | 10वी/ ITI/ सिविल डिप्लोमा पास |
वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे |
अर्जाची फी | खुला प्रवर्ग: ₹1000/- राखीव प्रवर्ग: ₹900/- |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
Bhumi Abhilekh Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
पद क्र. | पदाचे नाव | विभाग/प्रदेश | पद संख्या |
1 | भूकरमापक | पुणे प्रदेश | 83 |
कोकण प्रदेश, मुंबई | 259 | ||
नाशिक प्रदेश | 124 | ||
छ. संभाजीनगर | 210 | ||
अमरावती प्रदेश | 117 | ||
नागपूर प्रदेश | 110 | ||
Total | 903 |
Bhumi Abhilekh Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
भूमी अभिलेख विभागातील गट-क भूकरमापक पदासाठीची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे:
- मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा,
- माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षांचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र. (ऑगस्ट २०१४ पासून अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा झालेला आहे.)
- याशिवाय, मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक आहे. (हे प्रमाणपत्र नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत मिळवणे आवश्यक आहे, अन्यथा सेवा समाप्त होईल.)
आवश्यक शिक्षण | सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा, 10वी उत्तीर्ण, ITI (सर्वेक्षक) + टायपिंग |
Bhumi Abhilekh Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
भूमी अभिलेख भरती साठी अर्जदारांची निवड हि लेखी परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे, ऑनलाईन स्वरुपात टेस्ट घेतली जाईल, त्या परीक्षेत ज्याला कुणाला सर्वाधिक मार्क्स मिळतील त्याची निवड हि भुकरमापक म्हणून केली जाईल.
1) Computer Based Examination
विषय | प्रश्न | गुण | माध्यम | कालावधी |
---|---|---|---|---|
इंग्रजी | 25 | 50 | इंग्रजी | 30 मिनिटे |
मराठी | 25 | 50 | मराठी | 30 मिनिटे |
सामान्य ज्ञान | 25 | 50 | मराठी व इंग्रजी | 30 मिनिटे |
बौद्धिक चाचणी/ अंकगणित | 25 | 50 | मराठी व इंग्रजी | 30 मिनिटे |
Total | 100 | 200 | * | 2 घंटे (120 मिनिटे) |
ऑनलाईन परीक्षेत उमेदवाराला किमान 45 टक्के गुण असणे अनिवार्य आहे, एवढे मार्क्स असतील तरच त्यांची नावे अंतिम यादी मध्ये घेतली जातील, आणि अंतिम यादीच्या माध्यमातूनच पात्र उमेदवारांची निवड हि केली जाईल.
Bhumi Abhilekh Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
अर्जाची सुरुवात | 01 ऑक्टोबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 24 ऑक्टोबर 2025 |
परीक्षेची तारीख | 13 & 14 नोव्हेंबर 2025 |
Bhumi Abhilekh Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
जाहिरात PDF | जाहिरात वाचा |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Bhumi Abhilekh Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- सर्वप्रथम वरील टेबलमध्ये दिलेल्या Apply Online लिंकवर क्लिक करून भूमि अभिलेख भरतीची अधिकृत वेबसाईट उघडा.
- वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला आधी नोंदणी (New Registration) करावी लागेल. जर आधीच अकाऊंट असेल तर थेट Login करून पुढील स्टेपला जा.
- लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला Bhumi Abhilekh Bharti 2025 या भरतीसाठी अर्जाचा फॉर्म दिसेल. त्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि इतर आवश्यक तपशील काळजीपूर्वक भरा.
- नंतर तुमची पासपोर्ट साईजची एक फोटो आणि स्वाक्षरी फॉर्म मध्ये अपलोड करा.
- मग ऑनलाईन स्वरुपात कोणत्याही पेमेंट मोड च्या माध्यमातून परीक्षा फी भरून घ्या.
- परीक्षा फी भरली कि मग भरतीचा अर्ज एकदा तपासा, आणि नंतरच शेवटी अर्ज सबमिट करा.
इतर भरती
RRB NTPC Recruitment 2025: रेल्वेमध्ये 8,850 जागांची मेगा भरती! 35,400 रु. पगार, 12वी/ पदवी पास अर्ज करा
UPSC ESE Bharti 2025: UPSC इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2026, महिना 60000 रु. पगार, पदवीधर अर्ज करा
SSC CPO Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन CPO भरती! 3000+ जागा, 1,12,400 रु. पगार, पदवीधर अर्ज करा
SSC Delhi Police Head Constable Bharti 2025: दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाची भरती! 81,100 रु. पगार, 12वी/ ITI पास अर्ज करा
BEL Bharti 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये पदवी पास वर भरती! 40,000 रु. पगार, लगेच अर्ज करा
Canara Bank Apprentice Bharti 2025: पदवी पास तरुणांसाठी कॅनरा बँक मध्ये 3500 जागांसाठी भरती, ₹15,000 पगार! लगेच अर्ज करा!
SSC Delhi Police Constable Bharti 2025: 12वी पासवर SSC कडून दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल 7565 जागांची मेगाभरती ! ₹69,100 पर्यंत पगार! इथून लगेच अर्ज करा!
RRB Junior Engineer Bharti 2025: रेल्वे मध्ये 2,570 जागांसाठी मेगा भरती! 35,400 रु. पगार, पदवीधर लगेच अर्ज करा
MSRTC Bharti 2025, महाराष्ट्र ST महामंडळमधे 17450 जागांसाठी मेगाभरती, चालक ,वाहक,Clerk, Assistant इत्यादी पदे भरणार, इथे बघा पूर्ण माहिती!
Bhumi Abhilekh Bharti 2025 – 26: FAQ
Bhumi Abhilekh Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
भूकरमापक या पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
Bhumi Abhilekh Recruitment साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
या भरती साठी एकूण रिक्त जागा 903 आहेत.
Bhumi Abhilekh Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरण्याची लास्ट डेट हि 24 ऑक्टोबर 2025 आहे.
Bhumi Abhilekh Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि ऑनलाईन लेखी परीक्षेवर आधारित आहे.
Bhumi Abhilekh Land Surveyor पदासाठी वेतन पगार किती आहे?
महाराष्ट्र शासन भूमी अभिलेख विभाग मधील भुकरमापक या पदासाठी वेतन हे 19,900 ते 63,200 रु. एवढे आहे.