BEL Bharti: नमस्कार मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये पदवीधर उमेदवारांसाठी भरती निघाली आहे. नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे, जर तुम्ही पदवी शिक्षण पूर्ण केले असेल, तर तुम्हाला या भरती अंतर्गत नोकरी मिळू शकते.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड द्वारे या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना तसेच जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन कंपनी द्वारे करण्यात आले आहे.
या भरती अंतर्गत एकूण 517 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, ट्रेनी इंजिनियर TE या पदासाठी फॉर्म सुरू झाले आहेत. पात्रता केवळ उमेदवार हा असावा, तसेच त्याने पदवीचे शिक्षण हे इंजिनियरिंग आणि इलेक्ट्रोनिक्स या Stream मध्ये घेतलेले असावे.
या भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात उमेदवारांना अर्ज सादर करायचे आहेत, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 मार्च 2024 आहे, म्हणजे केवळ काही दिवस राहिले आहेत, त्यामुळे तुम्ही जर या भरती साठी इच्छुक असाल, तर कृपया लवकर आपला अर्ज सादर करा.
BEL Bharti 2024
📢 भरतीचे नाव – BEL Bharti 2024
✅ पदाचे नाव – ट्रेनी इंजिनियर TE
🚩 एकूण रिक्त जागा – 517
👨🎓 शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा पदवीधर असावा.
➡️ नोकरीची ठिकाण – संपूर्ण भारत
💰 पगार – 40 हजार रुपये
💵 परीक्षा फी –
- Open, OBC, EWS प्रवर्गासाठी 150 रुपये परीक्षा फी.
- मागासवर्ग SC, ST, PWD प्रवर्गासाठी फी नाही.
📝 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
🔞 वयोमर्यादा – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरतीसाठी वयाची अट ही शैक्षणिक पात्रतेनुसार भिन्न आहे, जे उमेदवार ट्रेनि इंजिनियर पदासाठी अर्ज करू इच्छित आहेत त्यांना ही वयाची अट लागू असणार आहे.
- B.E/B.Tech: उमेदवाराचे वय हे 28 वर्षा पेक्षा जास्त नसावे.
- M.E/M.Tech: उमेदवाराचे वय हे 30 वर्षा पेक्षा जास्त नसावे.
📍 वयोमर्यादा सूट –
- SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
- OBC प्रवर्गासाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
📆 फॉर्मची Last Date – 13 मार्च 2024
🌐 अधिकृत संकेतस्थळ | bel-india.in |
🖥️ जाहिरात (अधिसूचना) | Download PDF |
📝 ऑनलाईन अर्ज (गुगल फॉर्म) | येथून सादर करा |
💰 Exam Fees | Payment करा |
BEL Bharti Education qualification Details (शैक्षणीक पात्रता निकष)
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड साठी बंपर भरती निघाली आहे, ऑनलाइन स्वरूपात अर्ज सादर करायचे आहेत. भरतीसाठी कंपनीद्वारे पात्रता निकष जारी केले आहेत, हे पात्रता निकष शैक्षणिक पात्रते वर आधारित असणार आहेत.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये इंजिनीयर ट्रेनि या पदासाठी भरती होणार आहे, त्यामुळे उमेदवार हा पदवीधर असणे अनिवार्य आहे. सोबतच उमेदवाराने त्याच्या पदवीचे शिक्षण हे मान्यता प्राप्त विद्यापीठातून घेतलेले असावे.
तसेच उमेदवाराने पदवी ही इंजिनिअरिंग Stream मध्ये घेतलेली असावी, यामधे उमेदवार हा B.E/B.Tech/M.E/M.Tech पास असावा.
पदवी शिक्षणामध्ये समाविष्ट असलेले सर्व अभ्यासक्रम हे पुढीलप्रमाणे सांगता येतील:
- Electronics
- Electronics & Communication
- Electronics & Telecommunication Telecommunication
- Communication
- Mechanical
- Electrical
- Electrical & Electronics
- Computer Science
- Computer Science & Engineering
- Information Science
- Information Technology
पदवी परीक्षेत उमेदवाराला किमान 55% गुण मिळालेले असावेत, जर पदवी शिक्षण घेताना अंतिम वर्षात किमान गुण किंवा टक्केवारी मिळालेली नसेल तर या BEL Bharti साठी असे उमेदवार पात्र असणार नाहीत.
शैक्षणिक पात्रतेमध्ये मागासवर्गीय SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे, त्यानुसार शैक्षणिक पात्रता शिथिल करण्यात आल्या आहेत. मागासवर्गीय उमेदवार हे पदवी अभ्यासक्रमामध्ये किमान उत्तीर्ण श्रेणी घेऊन पास झालेले असावेत, त्यांना वरील पात्रता निकष लागू असणार नाहीत.
BEL Bharti Apply Online (Application Form)
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती साठी उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज सादर करण्याची सुविधा नाही, तसेच सादर जरी केला तर असे अर्ज स्वीकारले देखील जाणार नाहीत.
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी उमेदवार वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून भरतीचा फॉर्म Open करू शकतो. भरतीचा अर्ज हा Google Form द्वारे घेतला जाणार आहे, त्यामुळे विशेष काळजी घ्यायची आहे.
फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, कोणतीही चूक करायची नाही, जर झाली तर ती फॉर्म सबमिट करण्यापूर्वी दुरुस्त करून घ्यायची आहे. कारण नंतर फॉर्म Edit करता येणार नाही, आणि तुमच्या एका चुकी मुळे तुमचा अर्ज देखील Reject होऊन जाईल.
परीक्षेसाठी फॉर्म प्रमाणे परीक्षा फी देखील वेगळ्या लिंक वरून भरायची आहे, त्यासाठी पण तुम्ही वर दिलेल्या लिंक वर जाऊन फी भरू शकता.
फी भरून झाल्यावर त्याची Receipt Download करून घेणे आवश्यक आहे, कारण फॉर्म मध्ये ती अपलोड करावी लागते. सोबत Exam Fees Payment चा Refrence Number देखील टाकावा लागतो.
सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्ही एकदा फॉर्म तपासून घेऊ शकता, आणि नंतर सबमिट या बटणावर क्लिक करू शकता. अशा प्रकारे तुमचा भरतीचा अर्ज भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कडे सादर होईल.
BEL Bharti FAQ
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती साठी एकूण किती रिक्त जागा आहेत?
BEL Bharti साठी एकूण 517 रिक्त जागा आहेत, ज्या ऑनलाईन स्वरूपात अर्ज करून भरल्या जाणार आहेत.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये कोणत्या पदासाठी भरती होणार आहे?
ट्रेनी इंजिनियर या पदासाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
BEL Bharti साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ट्रेनी इंजिनियर भरती साठी 13 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Mazi 10th zali ahe mee atta 12th karta ahe mla job havi ahe