Bank of Maharashtra Bharti 2025: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पदवी पास वर भरती! 64,820 रु पगार, लगेच अर्ज करा

Bank of Maharashtra Bharti 2025: बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे एक मोठी भरती जाहीर करण्यात आली असून, पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. 500 रिक्त पदांसाठी ही मेगा भरती होत असून, निवड झालेल्या उमेदवारांना प्रारंभिक पगार ₹64,820 मिळणार आहे. सरकारी बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी असून, इच्छुकांनी ही संधी गमावू नये.

या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. वाणिज्य, विज्ञान, कला किंवा इतर कोणत्याही शाखेतील पदवी असो, तुम्ही अर्ज करण्यास पात्र आहात.

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरून अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. सोबतच अर्ज करण्याची शेवटची तारीख चुकवू नका, कारण नंतर एकदा का मुदत संपली कि नंतर फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.

या आर्टिकल मध्ये या भरती संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे, सर्वप्रथम हे आर्टिकल शेवट पर्यंत वाचा नंतर बँकेने जारी केलेली जाहिरात वाचून घ्या आणि मग शेवटी सर्व माहिती क्लियर झाली कि मग ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरून टाका.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Bank of Maharashtra Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची माहिती

विवरणमाहिती (Details)
भरतीचे नावBank of Maharashtra Recruitment 2025
भरती करणारी संस्थाबँक ऑफ महाराष्ट्र
पदाचे नावजनरलिस्ट ऑफिसर (स्केल II)
एकूण जागा500
शैक्षणिक पात्रताकोणत्याही शाखेतील पदवीधर
वयोमर्यादा22 ते 35 वर्षे
पगार / मानधन₹64,820/-
अर्ज प्रक्रियाऑनलाईन (Online)
अर्ज फीGeneral/OBC/EWS: ₹1180/-
SC/ST/PWD: ₹118/-
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अधिकृत वेबसाइटhttps://bankofmaharashtra.in

Bank of Maharashtra Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पदाचे नावपद संख्या
जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II)500
Total500

Bank of Maharashtra Bharti 2025: Salary Structure – वेतन श्रेणी पगार

विवरणपगाराची माहिती
Scale of PayScale II: ₹64,820 – 2,340/1 – ₹67,160 – 2,680/10 – ₹93,960
Starting Basic Salary₹64,820 प्रति महिना
वार्षिक वाढपहिल्या वर्षी ₹2,340, नंतरच्या 10 वर्षांसाठी दरवर्षी ₹2,680 वाढ
Max Basic Salary₹93,960 प्रति महिना
भत्तेDA (Dearness Allowance), HRA/Lease Rental, CCA, Medical इत्यादी
एकूण मासिक पॅकेज₹1,15,000 – ₹1,20,000 (पोस्टिंग ठिकाणानुसार बदलू शकते)

Bank of Maharashtra Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नावपात्रता व शैक्षणिक अर्हता
जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II)अर्जदार उमेदवार हा 60% (SC/ ST/ OBC/ PwBD: 55 गुण) गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी /इंटिग्रेटेड ड्युअल पदवी धारक असावा किंवा त्याच्याकडे CA ची डिग्री असावी, या सोबतच किमान 03 वर्षाचा अनुभव असणे देखील आवश्यक आहे.

Bank of Maharashtra Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

विवरणमाहिती
वयोमर्यादा22 ते 35 वर्षे
किमान वय22 वर्षे
जास्तीत जास्त वय35 वर्षे
ओबीसी प्रवर्ग22 ते 38 वर्षे (3 वर्षे सूट)
SC/ST प्रवर्ग22 ते 40 वर्षे (5 वर्षे सूट)

Bank of Maharashtra Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

  • लेखी परीक्षा –
    • उमेदवारांना प्रथम ऑनलाईन परीक्षा द्यावी लागेल, ही परीक्षा भरती एजन्सीमार्फत घेण्यात येईल.
विषयाचे नावप्रश्नांची संख्यागुण (Max Marks)वेळ (Duration)
English Language202020 मिनिटे
Quantitative Aptitude202020 मिनिटे
Reasoning Ability202020 मिनिटे
Professional Knowledge909060 मिनिटे
Total1501502 तास
  • लेखी परीक्षेविषयी महत्वाच्या बाबी:
    • Professional Knowledge या भागामध्ये बँकिंग आणि मॅनेजमेंटशी संबंधित प्रश्न असतील.
    • निगेटिव्ह मार्किंग: चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क कट केले जातील.
    • Normalization: वेगवेगळ्या सत्रांतील गुण equi-percentile पद्धतीने Normaliz केले जातील.
  • मुलाखत –
    • ऑनलाईन परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना त्यांच्या क्रमांकानुसार 1:3 प्रमाणात मुलाखतीसाठी (Interview) बोलावले जाईल.
    • ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत यासाठी गुणांचे प्रमाण 150:100 असेल, जे अंतिम निवड करताना 75:25 मध्ये रूपांतरित केले जाईल.
    • किमान पात्रता गुण —
      • UR / EWS: 50%
      • SC / ST / OBC / PwBD: 45%
  • अंतिम मेरीट यादी –
    • अंतिम मेरिट यादी ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या एकत्रित टक्केवारीनुसार तयार केली जाईल.
    • जर दोन किंवा अधिक उमेदवारांचे गुण समान असतील तर ज्याचं वय जास्त आहे अशा ज्येष्ठ उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
    • बँकेला आवश्यकतेनुसार किमान पात्रता गुण कमी करण्याचा, किंवा फक्त मुलाखतीद्वारे निवड करण्याचा अधिकार आहे.
  • उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास किंवा तो जर पात्रता निकषामध्ये बसत नसेल तर त्याचा अर्ज हा कोणत्याही टप्प्यावर बाद केला जाऊ शकतो, आणि सोबतच त्याला भरलेली फी देखील परत केली जाणार नाहीये.

Probation Period & Bond:

जे उमेदवार बँक मार्फत निवडले जातील त्यांना प्रोबेशन कालावधी आणि बॉंड ची अट लागू असणार आहे, जर उमेदवाराने हे नियम पाळले नाही तर त्याला दंड देखील होऊ शकतो.

स्केलप्रोबेशन कालावधीबाँड रक्कमकिमान सेवा कालावधी
Scale II6 महिने₹2.00 लाख2 वर्षे

Bank of Maharashtra Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलतारीख
अर्जाची सुरुवात13 ऑगस्ट 2025
अर्जाची शेवटची तारीख30 ऑगस्ट 2025

Bank of Maharashtra Bharti 2025: Important Links & Official Notification – अर्ज लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDFजाहिरात वाचा
Apply Online (ऑनलाईन अर्ज)इथून अर्ज करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Bank of Maharashtra Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक: https://ibpsonline.ibps.in/bomjul25/

Step 1: अधिकृत वेबसाइटला भेट द्या

  • वरील दिलेल्या Apply Online लिंकवर क्लिक करा किंवा Bank of Maharashtra च्या अधिकृत वेबसाइटवरील भरती विभागात जा.

Step 2: New Registration करा

  • “Click here for New Registration” या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी तिथे टाका.
  • नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मोबाईल/ई-मेलवर Registration Number आणि Password येईल.

Step 3: लॉगीन करा/ अर्ज फॉर्म भरा

  • Registration Number आणि Password वापरून लॉगिन करा.
  • त्यानंतर वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभवाची माहिती अचूक स्वरुपात फॉर्म मध्ये भरा.

Step 4: कागदपत्रे अपलोड करा

  • पासपोर्ट साईज फोटो, सही (Signature) आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • फाईलचा आकार आणि फॉरमॅट जाहिरातीत दिलेल्या निकषानुसार ठेवा.

Step 5: अर्ज फी भरा

  • तुमच्या प्रवर्गानुसार अर्ज फी ऑनलाइन स्वरुपात भरून घ्या. (Debit Card, Credit Card, Net Banking, UPI इत्यादी माध्यमातून तुम्ही फीस भरू शकता)

Step 6: अर्ज सबमिट करा

  • त्यानंतर एकदा फॉर्म मधील सर्व माहिती तपासून घ्या, काही चुकल असेल तर ते दुरुस्त करा आणि मग फॉर्म Final Submit करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून ठेवा, कारण पुढे भरती प्रक्रियेत तुम्हाला हि प्रिंट लागू शकते.
इतर भरती

Agniveervayu Sports Quota Bharti 2025: भारतीय हवाई दल अग्निवीरवायु (Sports) भरती, 12वी पास लगेच अर्ज करा

Union Bank of India Bharti 2025: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधरांना नोकरी! ₹93,960 पगार, लगेच अर्ज करा

Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदलात BE/B.Tech/पदवी वर SSC ऑफिसर पदाची भरती! 1,10,000 रु. पगार, अर्ज करा

Western Railway Sports Quota Bharti 2025: पश्चिम रेल्वेत 10वी, 12वी, ITI पास वर खेळाडूंची भरती! 50000 रु. महिना पगार, लगेच फॉर्म भरा

CCRAS Bharti 2025: केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत 10वी पास वर भरती! 39,100 रु. महिना पगार, लगेच अर्ज करा

OICL Assistant Recruitment 2025: ओरिएंटल इंश्योरेंस कंपनी मध्ये भरती ! पदवीधर लगेच येथून अर्ज करा, पगार 20 हजार पासून सुरू!

IBPS Clerk Recruitment 2025: आयबीपीएस क्लर्क भरती, पदवी पास वर 10277 जागांची बंपर भरती, लगेच येथून फॉर्म भरा

Eastern Railway Bharti 2025: पूर्व रेल्वेत 10वी / ITI पास वर 3115 जागांसाठी मेगा भरती, लगेच अर्ज करा

Bank of Maharashtra Bharti 2025 – 26 : FAQ

Bank of Maharashtra Bharti 2025 मध्ये पदे भरली जात आहेत?

जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II) हे पदे या भरती अंतर्गत भरले जाणार आहेत.

Bank of Maharashtra Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या 500 आहेत.

Bank of Maharashtra Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 30 ऑगस्ट 2025 आहे, या तारखे नंतर फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.

Bank of Maharashtra Bharti 2025 मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा आणि मुलाखत यावर आधारित असणार आहे.

Leave a comment