नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण Bandhkam Kamgar Yojana Maharashtra या अभिनव अशा योजनेबद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.
राज्यातील जे लोक बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी राज्य सरकारने नव्याने Bandhkam Kamgar Yojana राबवणे सुरू केले आहे.
या योजनेद्वारे बरेचसे लाभ बांधकाम कामगारांना मिळणार आहेत, गरिबांचा या मुळे मोठा फायदा होणार आहे. आर्थिक, शैक्षणिक बाबी साठी पण या कामगार योजने अंतर्गत मदत मिळते, याची अधिक माहिती आपण या लेखामध्ये घेणार आहोत.
मुख्य स्वरूपात आजच्या या आर्टिकल मध्ये आपण बांधकाम कामगार योजने साठी अर्ज कसा करायचा? आणि सुरक्षा किट म्हणजे बांधकाम कामगाराला लागणारे आवश्यक साहित्य योजनेद्वारे अगदी मोफत कसे मिळवायचे? याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Bandhkam Kamgar Yojana Maharashtra
योजनेचे नाव | Bandhkam Kamgar Yojana |
सुरुवात | महाराष्ट्र शासन (बांधकाम विभाग) |
राज्य | महाराष्ट्र |
लाभ | आर्थिक मदत, 10 हजार रुपये किमतीचे सुरक्षा साहित्य |
लाभार्थी | राज्यातील बांधकाम कामगार |
अधिकृत संकेतस्थळ | mahabocw.in |
Bandhkam Kamgar Yojana Objective (उद्देश)
राज्यातील गरीब होतकरू बांधकाम कामगाराला मदत करण्याचा मुख्य उद्देश समोर ठेवून, महाराष्ट्र शासनाने बांधकाम विभागा अंतर्गत Bandhkam Kamgar Yojana सुरू केली आहे.
गरीब बांधकाम कामगार मेहनत करून आपले पोट भरतात, त्यांचे काम जिकरीचे असते, काही वेळा सुरक्षा साहित्य नसल्या मुळे अनेक बांधकाम कामगार आपला जीव गमावतात.
ही गोष्ट ओळखून राज्यातील सर्व बांधकाम कामगारांना Bandhkam Kamgar Yojana चा लाभ घेण्यासाठी शासनाद्वारे सध्या गावोगावी मेळावे घेतले जात आहेत, ज्याद्वारे बांधकाम कामगारांना योजनेचा पुरेपूर फायदा मिळवून दिला जातोय.
Bandhkam Kamgar Yojana Benifits (लाभ, फायदे)
बांधकाम कामगारांना या योजने अंतर्गत अनेक लाभ मिळतात, यामध्ये आर्थिक मदत केली जाते, सोबतच अनेक लाभ मिळतात. Bandhkam Kamgar Yojana अंतर्गत मिळणारे लाभ फायदे पुढीलप्रमाणे.
- योजनेसाठी अर्ज केल्यावर सुरूवातीला सुरक्षा साहित्य दिले जाते, ज्यामधे एक पेटी असते, त्यात सर्व साहित्य दिले जाते.
- सोबतच बांधकाम कामगार योजने द्वारे कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप देखील मिळते.
- कोणते साहित्य खरेदी करायचे असेल तर बांधकाम विभागाद्वारे आर्थिक मदत देखील केली जाते.
- या सोबतच अनेक फायदे असतात, घरगुती भांडे पण या योजने द्वारे दिले जातात. आणि जेव्हा कामगाराचे लग्न होईल तेव्हा देखील आर्थिक सहाय्यता केली जाते.
थोडक्यात वर जे फायदे सांगितले आहेत, ते सर्व फायदे लाभ हे बांधकाम कामगार योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दिले जातात. वरील फायद्या बरोबरच अजून बरेचसे लाभ आहेत, जे या योजनेच्या माध्यमातून अर्ज केलेल्या अर्जदाराला मिळतात.
Bandhkam Kamgar Yojana Documents (आवश्यक कागदपत्रे)
बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज ऑनलाईन स्वरूपात सादर करायचा असतो, त्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक असतात. कागदपत्रांची पूर्तता केल्यावरच बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज सादर केला जाऊ शकतो.
बांधकाम कामगार योजनेसाठी लागणारे आवश्यक सर्व कागदपत्रे पुढीलप्रमाने:
- कामगाराचे ओळखपत्र
- कामगाराचे आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- किमान 3 महिने बांधकाम कामगार म्हणून काम केलेले प्रमाणपत्र
वर सांगितलेले सर्व कागदपत्रे उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करताना Hard Copy मध्ये द्यावे लागतात. तसेच तुम्ही स्वतः जर अर्ज करत असाल तर हे सर्व आवश्यक कागदपत्रे Soft Copy मध्ये तयार करून Scan करून ठेवा.
कागदपत्रे हे Original असावेत, झेरॉक्स कॉपी अर्ज सादर करताना लागणार आहे, पण Original Documents पण जवळ बाळगणे आवश्यक आहे.
Bandhkam Kamgar Yojana Application Form
बांधकाम कामगार योजनेसाठी ज्या लोकांना अर्ज सादर करायचा आहे ते लोक दोन मार्गाने अर्ज सादर करू शकतात. एक म्हणजे ऑफलाइन स्वरूपात गावामध्ये जर बांधकाम विभागाद्वारे मेळावा आयोजित केला तर त्या मेळाव्यात तुम्ही तुमचा फॉर्म भरून घेऊ शकता.
दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही स्वतः बांधकाम कामगार विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तुमची नोंदणी करू शकता. नोंदणी केल्यावर तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून मान्यता मिळेल, याद्वारे तुम्ही बांधकाम कामगार योजनेमध्ये येणाऱ्या सर्व लाभांचा फायदा घेऊ शकता.
ऑफलाईन पद्धत
बांधकाम कामगार योजना अर्ज प्रक्रिया ही मुळात ऑनलाईन आहे, परंतु बऱ्याच बांधकाम कामगारांना ऑनलाईन स्वतः वेबसाईट वर जाऊन अर्ज सादर करता येत नाही, म्हणून गावोगावी मोहीम राबवली जात आहे, त्यामध्ये बांधकाम कामगार विभागाद्वारे एका प्रतिनिधीला पाठवून सर्व पात्र लोकांचा अर्ज भरला जातो.
तो प्रतिनिधी पण सारखीच प्रोसेस करतो, ऑनलाईन माध्यमातून तो अर्ज सादर करतो. आणि अशा प्रकारे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने तुमचा बांधकाम कामगार योजना अर्ज सादर करू शकता.
ऑनलाईन पद्धत
बांधकाम कामगार योजनेसाठी स्वतः ऑनलाईन माध्यमातून अर्ज करणे देखील शक्य आहे. तुम्ही खाली दिलेल्या स्टेप वापरून, तुमच्या सोयीनुसार मोबाईलवर किंवा लॅपटॉप, कॉम्प्युटर वरून बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज सादर करू शकता.
सुरुवातीला तुम्हाला बांधकाम कामगार विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल, तुम्ही येथे क्लिक करून पण अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता.
अधिकृत संकेतस्थळावर केल्यानंतर नवीन कामगार नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचा आहे, पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल.
तो फॉर्म तुम्हाला पहिल्यांदा काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे, फॉर्म वाचल्यानंतर आवश्यक ती सर्व माहिती फॉर्ममध्ये भरायची आहे.
जसे की तुमचे नाव, पत्ता आणि इतर महत्वाची माहिती फॉर्म भरून झाल्यावर शेवटी अर्जदाराला त्यांचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे.
फोटो अपलोड करताना काळजी घ्यायची आहे, फोटो फॉर्म मध्ये दिलेल्या योग्य साईज मध्येच असावे. पासपोर्ट फोटो सोबतच उमेदवाराला त्यांची सही किंवा अंगठा पांढऱ्या कागदावर करून त्याची पण फोटो अपलोड करायची आहे.
त्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे, अशाप्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज सादर करू शकता.
Bandhkam Kamgar Yojana FAQ
बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
बांधकाम कामगार योजनेसाठी उमेदवाराला ऑनलाइन स्वरूपात सादर करता येतो, ऑफलाईन पण सुविधा उपलब्ध आहे, त्याची सविस्तर माहिती वर लेखामध्ये दिली आहे.
बांधकाम कामगार योजनेसाठी कोणते उमेदवार पात्र असणार?
ज्या लोकांनी किमान तीन महिन्यासाठी इमारती किंवा इतर ठिकाणी बांधकामाचे काम केले असेल, असेच व्यक्ती बांधकाम कामगार योजनेसाठी पात्र असणार आहेत.
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कोणते लाभ मिळतात?
लाभार्थी व्यक्तींना सुरक्षा किट घरगुती वापरासाठी साहित्य सोबतच आर्थिक मदत तसेच लाभार्थ्याच्या मुलांना शिष्यवृत्ती असे अनेक फायदे मिळतात.
Latur
ITI
Cechą talentu jest niemożność pisania na zamówienie… Poza tym to Zgadzam się z Tobą w 100 i popieram zawarte poglądy w soposb pro-subiektywny 🙂 E. Zegadłowicz.
Trzeba mieć wytrwałość i wiarę we wlasne siły. Trzeba wierzyć, że człowiek jest do czegoś zdolny i osiągnąć to za wszelką cenę.
Уникальные фото различных тематик https://pro-dachnikov.com