AIASL Jaipur Bharti 2024: एअर इंडिया एअर सर्विसेस लिमीटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे, नोकरीची मोठी नामी संधी आहे. मुलाखतीवर भरती होणार आहे, ऑनलाइन अर्ज करायचा नाहीये ऑफलाईन स्वरूपातच फॉर्म सादर करायचा आहे.
जयपूर विभागात एअर इंडिया एअर सर्विसेस लिमीटेड शाखेत रिक्त पदे भरले जाणार आहेत, पदा नुसार मुलाखतीची तारीख वेगवेगळी आहे. महत्वाची बाब म्हणजे एकूण रिक्त जागा या 145 आहेत, ज्या 6 पदांसाठी भरल्या जाणार आहेत.
विशेष गोष्ट म्हणजे हि भरती 10 वी, 12 वी, ITI, डिप्लोमा आणि पदवी या शैक्षणिक पात्रते वर पार पडणार आहे, नोकरीची ठिकाण जयपूर असणार आहे., तरी पण पूर्ण देशातील उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकणार आहेत.
AIASL Jaipur Bharti 2024
पदाचे नाव | विविध पदे आहेत, त्यांची माहिती तुम्ही Vacancy Details मधून घेऊ शकता. |
रिक्त जागा | 145 |
नोकरीचे ठिकाण | जयपूर |
वेतन श्रेणी | 18,840 ते 24,960 रुपये महिना |
वयाची अट | उमेदवारांचे वय हे 28 वर्षा पेक्षा जास्त नसावे. |
भरती फी | Open/ OBC: 500 रुपये [मागासवर्ग: फी नाही] |
AIASL Jaipur Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या | वेतन श्रेणी |
---|---|---|
ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल | 02 | 29,760/- |
कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव | 21 | 24,960/- |
ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव | 21 | 21,270/- |
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव | 18 | 24,960/- |
यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | 17 | 21,270/- |
हँडीमन | 66 | 18,840/- |
Total | 145 |
AIASL Jaipur Bharti 2024 Eligibility Criteria
- पद क्र.1: इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical / Electrical & Electronics / Electronics and Communication Engineering) आणि LVM
- पद क्र.2: पदवीधर
- पद क्र.3: 12वी उत्तीर्ण
- पद क्र.4: डिप्लोमा (Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile) किंवा ITI/NCVT Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder तसेच HMV ड्रायव्हिंग लायसन्स
- पद क्र.5: 10वी उत्तीर्ण आणि HMV ड्रायव्हिंग लायसन्स
- पद क्र.6: 10वी उत्तीर्ण
AIASL Jaipur Bharti 2024 Interview Details
मुलाखतीचे ठिकाण: Madhyawart Aviation Academy , 102 Vinayak Plaza, Doctors colony Budh Singh Pura, Sanganer, Jaipur: 302029
मुलाखतीची तारीख आणि वेळ (पदा नुसार) –
पद क्र.1 | 08 मे 2024 | 09:30 AM ते 12:30 PM |
पद क्र.2 आणि 3 | 09 मे 2024 | 09:30 AM ते 12:30 PM |
पद क्र.4 आणि 5 | 10 मे 2024 | 09:30 AM ते 12:30 PM |
पद क्र.6 | 11 मे 2024 | 09:30 AM ते 12:30 PM |
AIASL Jaipur Bharti 2024 Application Form
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
जाहिरात आणि फॉर्म PDF | Download करा |
एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये निघालेल्या भरतीसाठी ऑफलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे, उमेदवारांना त्यांचा अर्ज जाहिराती मधून मिळवता येईल. जाहिरातीच्या शेवटी भरतीचा अर्ज देण्यात आला आहे, तो तुम्हाला प्रिंट आऊट काढून घ्यायचा आहे, त्यानंतर अर्जावर सर्व आवश्यक ती माहिती भरून तो अर्ज मुलाखतीला जाताना सोबत घेऊन जायचं आहे. अर्जासोबत सर्व आवश्यक असे कागदपत्रे देखील बाळगायचे आहेत, कागदपत्रे झेरॉक्स कॉपी मध्ये असावेत, सॉफ्ट कॉपी मधील कागदपत्रे स्वीकारले जाणार नाहीत.
AIASL Jaipur Bharti 2024 Selection Process
एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड भरती साठी दोन टप्प्यांमध्ये उमेदवारांची निवड होणार आहे, यामध्ये सुरुवातीला प्रत्येक पदासाठी फिजिकल शारीरिक पात्रता चाचणी घेतली जाणार आहे.
टेस्ट घेतल्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी पाठवले जाईल, मुलाखती संबंधी संपूर्ण माहिती तुम्हाला टेस्ट वेळीच देण्यात येईल. मुलाखत Personal किंवा Virtual असू शकते, मुलाखतीमध्ये उमेदवारांना वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जाणार आहेत.
मुलाखतीमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील पास होतील त्यांनाच रिक्त जागांसाठी पदावर निवडले जाणार आहे. इतर कोणत्याही अपात्र उमेदवाराला नोकरी दिली जाणार नाही, केवळ योग्य उमेदवाराला योग्य जागी निवडले जाईल.
एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड भरती अपडेट:
- एअर इंडिया एअर सर्विसेस मध्ये 10 वी पास वर भरती! थेट मुलाखत, कोणतीही परीक्षा नाही
- पुणे एअरपोर्ट भरती, 10 वी पास वर मुलाखती द्वारे नोकरी मिळणार! जाणून घ्या माहिती
AIASL Jaipur Bharti 2024 FAQ
Who is eligible for AIASL Jaipur Bharti 2024?
AIASL Jaypur Bharti साठी दहावी बारावी डिप्लोमा आयटीआय पदवीधर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. शैक्षणिक पात्रता निकष भरतीसाठी आवश्यक आहेत, त्यामुळे जे उमेदवार या निकषात येतील त्यांनाच अर्ज करता येणार आहे.
How to apply for AIASL Jaipur Bharti?
एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन स्वरूपात भरायचा आहे, ऑनलाइन स्वरूपात कोणत्याही स्वरूपाची सुविधा देण्यात आलेली नाही.
What is the age limit for AIASL Jaipur Bharti?
एअर इंडिया एअर सर्विसेस भरतीसाठी उमेदवारांची वयाची अट ही 28 वर्षे असणार आहे, म्हणजे जे उमेदवार 28 वर्षांच्या आहेत किंवा कमी वयाचे आहेत त्यांनाच अर्ज करता येणार आहे, 28 वर्षापेक्षा जास्त वयाचे उमेदवार अर्ज करू शकणार नाहीत.
2 thoughts on “AIASL Jaipur Bharti 2024: एअर इंडिया मध्ये मुलाखतीवर थेट भरती! नोकरीची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा”