Agniveervayu Sports Quota Bharti 2025: भारतीय हवाई दलाने अग्निवीरवायु (Sports) भरती 2025 जाहीर केली आहे. ही भरती खास खेळाडू तरुणांसाठी आहे जे देशासाठी हवाई दलात काम करू इच्छितात, सोबतच हि भरती फक्त 12 वी पास वर होणार आहे, जास्त शिक्षण असण्याची पण आवश्यकता या मध्ये नाहीये.
या भरतीमध्ये वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेतलेले आणि चांगले प्रदर्शन केलेले उमेदवार निवडले जाणार आहेत. जे उमेदवार जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर खेळले आहे, त्यांना या भरती मध्ये जास्त संधी दिली जाणार आहे.
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन स्वरूपात भरायचा आहे. उमेदवारांनी भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा. अर्ज करताना सर्व माहिती नीट वाचून आणि समजून घ्यावी.
या भरतीबाबत सविस्तर माहिती या लेखात खाली दिली आहे. कृपया पूर्ण माहिती वाचा आणि लागलीच ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरून घ्या.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Agniveervayu Sports Quota Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
विवरण | माहिती (Details) |
---|---|
भरतीचे नाव | Agniveervayu (Sports Quota) Bharti 2025 |
भरती करणारी संस्था | भारतीय हवाई दल (Indian Air Force) |
पदाचे नाव | अग्निवीरवायु (Sports) |
एकूण जागा | नमूद नाही |
शैक्षणिक पात्रता | किमान 12वी पास |
खेळातील पात्रता | राज्य / राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले उमेदवार |
वयोमर्यादा | 17 ते 20 वर्षे |
निवड प्रक्रिया | खेळ कौशल्य चाचणी, शारीरिक चाचणी, वैद्यकीय तपासणी |
सेवेचा कालावधी | 4 वर्षे (Agniveer योजना अंतर्गत) |
पगार / मानधन | ₹30,000/- प्रतिमाह (वर्षानुसार वाढ) + भत्ते |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन (Online) |
अर्ज फी | ₹100/- |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत वेबसाइट | https://agnipathvayu.cdac.in/ |
Agniveervayu Sports Quota Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
अग्निवीरवायु (Sports) | नमूद नाही |
Agniveervayu Sports Quota Bharti 2025: Per Month Salary
या भरती अंतर्गत जे उमेदवार निवडले जातील त्यांना पगार हा खलील प्रमाणे मिळणार आहे:
वर्ष | एकूण मासिक पॅकेज | In Hand (70%) | Agniveer Corpus Fund (30%) | Goverment Contribution |
---|---|---|---|---|
1 ले वर्ष | ₹30,000/- | ₹21,000/- | ₹9,000/- | ₹9,000/- |
2 रे वर्ष | ₹33,000/- | ₹23,100/- | ₹9,900/- | ₹9,900/- |
3 रे वर्ष | ₹36,500/- | ₹25,550/- | ₹10,950/- | ₹10,950/- |
4 थे वर्ष | ₹40,000/- | ₹28,000/- | ₹12,000/- | ₹12,000/- |
एकूण सेवानिधी योगदान (4 वर्षांनी) | ₹10.04 लाख (सरकार + उमेदवार योगदान, व्याज वगळून) | |||
इतर लाभ | राहणे, भोजन, गणवेश, प्रवास भत्ता, LTC, इ. सुविधा | |||
विमा संरक्षण | ₹48 लाखांचा नॉन-कॉन्ट्रिब्युटरी लाईफ इन्शुरन्स | |||
निवृत्ती वेतन | कोणतेही पेन्शन किंवा ग्रॅच्युइटी लाभ लागू नाहीत |
Agniveervayu Sports Quota Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
पदाचे नाव | शिक्षण |
---|---|
अग्निवीरवायु (Sports) | उमेदवार हा किमान 50% गुणांसह 12वी (Mathematics, Physics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Electronics/ Automobile/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण असावा, आणि त्याच्याकडे संबंधित क्रीडा पात्रता असावी. |
Agniveervayu Sports Quota Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती
पदाचे नाव | वयाची अट | जन्म तारीख श्रेणी |
---|---|---|
अग्निवीरवायु (Sports) | 17 ते 20 वर्षे | जन्म 01 जानेवारी 2005 ते 01 जुलै 2008 दरम्यान झालेला असावा. |
Agniveervayu Sports Quota Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
✅ 1. Physical Fitness Test (PFT) – शारीरिक चाचणी
या चाचणीत उमेदवारांची शारीरिक क्षमता तपासली जाते. यात खालील गोष्टींचा समावेश असतो:
- 1.6 किलोमीटर धावणे
- Push-ups, Sit-ups आणि Bent Knee Sit-ups
- Height, Weight आणि Chest मोजणी
Height | 152 CMS |
Chest | 77-82 CMS |
Race | 1.6 KM in 07 Mins |
Push-ups | 10 in 01 Minute |
Sit-ups | 10 in 01 Minute |
Squats | 20 in 01 Minute |
✅ 2. Sports Skill Trials – क्रीडा कौशल्य चाचणी
या टप्प्यात उमेदवारांनी ज्या खेळासाठी अर्ज केला आहे त्यामधील कौशल्य तपासले जाईल. जसे की:
- खेळातील टेक्निक्स आणि कामगिरी
- खेळाचा अनुभव आणि स्पर्धांतील सहभाग
- राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभाग
✅ 3. Document Verification – कागदपत्र तपासणी
या टप्प्यात उमेदवारांनी सादर केलेली सर्व कागदपत्रे तपासली जातील:
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- क्रीडा प्रमाणपत्रे
- ओळखपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे
✅ 4. Medical Examination – वैद्यकीय तपासणी
शेवटी उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. यात दृष्टी, रक्तदाब, वजन, इत्यादी बाबींची तपासणी समाविष्ट असते. जर उमेदवार संपूर्णतः तंदुरुस्त असेल तरच त्या उमेदवाराला फिट ठरवले जाते.
जे उमेदवार वरील सर्व टप्प्यातून पास झाले आहेत केवळ त्यांचीच Agniveervayu Sports Quota अंतर्गत भरती अंतिम निवड हि केली जाते.
Agniveervayu Sports Quota Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
तपशील | Date |
---|---|
अर्जाची सुरुवात | 11 ऑगस्ट 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 20 ऑगस्ट 2025 |
परीक्षेची तारीख | 08 ते 10 सप्टेंबर 2025 |
Agniveervayu Sports Quota Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
घटक | लिंक / माहिती |
---|---|
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
भरतीची जाहिरात PDF | Notification वाचा |
Apply Online (ऑनलाईन अर्ज) | इथे अर्ज करा |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Agniveervayu Sports Quota Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
✅ Step 1: अधिकृत वेबसाईटला भेट द्या
अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाईटवर जा:
👉 https://agnipathvayu.cdac.in
✅ Step 2: नवीन नोंदणी (New Registration) करा
तुम्ही या पोर्टलवर नवीन असाल, तर “New User Register” या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचं नाव, जन्मतारीख, ईमेल ID, मोबाईल नंबर इत्यादी माहिती भरून तुमची नोंदणी करा.
- नोंदणी पूर्ण झाल्यावर लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल.
✅ Step 3: लॉगिन करा आणि अर्ज फॉर्म उघडा
मिळालेल्या लॉगिन आयडी आणि पासवर्डचा वापर करून पोर्टलवर लॉगिन करा.
- “Agniveervayu (Sports) Application” असा पर्याय निवडा.
- अर्ज फॉर्ममध्ये तुमची वैयक्तिक, शैक्षणिक व क्रीडा माहिती नीट भरा.
✅ Step 4: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
फॉर्म भरताना खालील कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक राहील:
- फोटो आणि सही
- 10वी, 12वी चं मार्कशीट
- खेळातील प्रमाणपत्रे (District/State/National Level)
- इतर आवश्यक कागदपत्रे (PDF/JPEG फॉर्मेटमध्ये)
✅ Step 5: फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट काढा
सर्व माहिती भरल्यानंतर भरतीचा फॉर्म एकदा तपासून घ्या.
- अर्जामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करा आणि मगच फॉर्म “Submit” करा.
- यानंतर फॉर्म भरल्याची पावती येईल ती तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे, कारण पुढे भरती च्या वेळी/निवड प्रक्रियेत हि पावती लागणार आहे.
इतर भरती
Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!
IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!
AIIMS CRE Bharti 2025: 10वी, 12वी, ITI, डिग्री पासवर AIIMS मधे 2300+ जागांची भरती, पगार ₹35,400 पासून! संधी सोडू नका लगेच अर्ज करा!
BHEL Bharti 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये ITI+NAC उमेदवारांसाठी मेगाभरती! पगार ₹29,500 पासून! लगेच अर्ज करा!
ICF Bharti 2025: रेल्वे अप्रेंटिस भरती 10वी आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी,₹7000 पासून! लगेच अर्ज करा!
Indian Air Force Airmen Bharti 2025: 12वी आणि डिप्लोमा Pharmacy पाससाठी भरती, पगार ₹26,900 पासून! लगेच अर्ज करा!
NHPC Apprentice Bharti 2025: ITI, डिप्लोमा आणि डिग्री पासवर विनापरीक्षा भरती नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये, Chance सोडू नका !
Indian Coast Guard AC 01/2027: 12वी + पदवी पास तरुणांसाठी तटरक्षक दलात भरती! पगार 56,000 पासून! लगेच अर्ज करा!
Agniveervayu Sports Quota Bharti 2025 – 26 : FAQ
Agniveervayu Sports Quota Bharti 2025 मध्ये पदे भरली जात आहेत?
अग्निवीरवायु (Sports) हि पदे या भरती अंतर्गत भरली जाणार आहेत.
Agniveervayu Sports Quota Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
एकूण रिक्त जागा या अद्याप नमूद करण्यात आल्या नाहीत.
Agniveervayu Sports Quota Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 20 ऑगस्ट 2025 आहे, या तारखे नंतर फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.
Agniveervayu Sports Quota Bharti मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि 4 टप्प्यात होणार आहे यात शारीरिक चाचणी, क्रीडा कौशल्य चाचणी, कागदपत्रे पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी असे टप्पे आहेत.
11 thoughts on “Agniveervayu Sports Quota Bharti 2025: भारतीय हवाई दल अग्निवीरवायु (Sports) भरती, 12वी पास लगेच अर्ज करा”